मिड्-डे, पुणे मिरर, मुंबई मिरर, लंडनमधील "टाइम्स" व इतर काही छापील वर्तमानपत्रे ज्या आकारात येतात (बहुदा त्या आकाराला टॅब्लॉईड म्हणतात) त्या आकारात सगळीच वर्तमानपत्रे असावीत असे मला व माझ्या सारख्या असंख्य वर्तमानपत्र-वाचक-मंडळींना वाटते. सर्व लोकप्रिय मराठी वर्तमानपत्रे त्याच आकाराची असावीत. कारण शहरांमध्ये, विशेषतः मुंबई-पुण्यात नोकरदार मंडळींचे दिवसातील चार पाच तास प्रवासातच जातात. आणि अशा वेळेस चालू घडामोडींचे ज्ञान तसेच मनोरंजन मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे वर्तमानपत्र. पण, त्याच्या सध्याच्या चारवेळा घडी केलेल्या आकारत ते वाचणे फार कठीण जाते. फार तर फक्त मुख्य पान वाचता येते. तसेच लोकल ट्रेनमध्ये उभ्या उभ्या वाचणे अवघड जाते. दाटीवाटीने ट्रेनमध्ये, बसमध्ये बसले असतांना सुद्धा घडी उकलून वाचणे कठीणच जाते.
त्यापेक्षा पुस्तकासारख्या आकाराची, सध्याच्या वर्तमानत्रांपेक्षा आकाराने थोडा लहान आकार असला तर सगळ्याच बाबतीत सोयिस्कर राहील. पुरवण्या वेगळ्या न देता त्यातच समाविष्ट असाव्यात. म्हणजे वाचतांना अगदी सोयीचे होईल.
आपल्याला काय वाटते?
माझा मुद्दा बरोबर आहे का?
सकाळची सर्व मराठी वर्तमानपत्रे अशा उभा आकारात करण्यात काय अडचण आहे?
काही मराठी मात्र सायंदैनिके उभ्या आकारात येतात.
वृत्तपत्र क्षेत्रातील मंडळी या बाबत काही माहिती देवू शकतील का?
प्रतिक्रिया
24 Mar 2010 - 12:12 pm | चिरोटा
नाहीतरी बरीचशी मराठी वृत्तपत्रे टेब्लॉईडछाप बातम्या देतच आहेत तेव्हा तशाच आकाराची असायला हरकत नसावी.!!
सकाळच्या बातम्या आकाराने मोठ्या असतात .उभ्या आकारात त्या नीट मावू शकणार नाहीत असे वाटते.उ.दा. सकाळच्या वृत्तपत्रांमध्ये मी पहिल्या पानावर राष्ट्रीय/राज्य/स्थानिक अशा तीन तरी बातम्या दिसाव्यात अशी अपेक्षा करतो.उभी बनवली तर पाने सारखी उलटावी लागतील.
तसे सकाळच्या वृत्तपत्रांची सध्याची रुंदी १/२ कॉलमने कमी झालीच आहे.
आपण वर उल्लेख केलेली वृत्तपत्रे टॅब्लॉईड्स आहेत्.त्यांचे वाचक वेगळे/त्यांच्या अपेक्षा वेगळ्या.
भेंडी
P = NP
24 Mar 2010 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते
नको... उभ्या पेप्रात 'आडवी' छायाचित्रं छापता नाही येणार... आणि सगळ्या वर्तमानपत्रांची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे...
बिपिन कार्यकर्ते
24 Mar 2010 - 12:13 pm | उग्रसेन
आमच्या येळला हे लाम दोन हाताचा पेपर व्हता.
आता अजून त्यायची किती लामी रुंदी कमी करता भो.
वह्याच्या पानाच्या आकाराचा पेपर काढून नुस्तं हेडलाइन
वाचण्यात काय मजा नाय भौ.
माझा मुद्दा बरोबर आहे का?
मुद्दा अज्याबात बराबर नाय.
रद्दीत वजनाला कमी भरतेन त्याच काय ?
बाबुराव :)
24 Mar 2010 - 1:52 pm | II विकास II
पेपर हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामासाठी वापरला जातो.
26 Mar 2010 - 10:50 am | तुतुमैमै
AGREED