गाभा:
मध्यंतरी एका देशाने तेथील नागरिकांच्या काळ्या पैशावरचा कर रद्द (कर माफी) जाहीर करून त्यांना काळा पैसा बाहेर आणण्याची व तो देशांतर्गत व्यापारात गुंतवण्याची संधी दिल्याचे वाचनात आले.
त्यातून त्यांचे वर्किन्ग कॅपिटल वाढले, देशातील गुंतवणूक वाढली, मंदीच्या काळात परिस्थिती सावरायला मदत झाली आणि रोजगारनिर्मिती झाली.
असा उपाय आपल्या भारतात केला तर???
त्याचे काय फायदे अगर तोटे असतील? अशा मार्गाने का होईना, काळा पैसा योग्य मार्गाने बाजारात येईल? त्यात धोका काय?
आपले काय मत?
-- अरुंधती
प्रतिक्रिया
22 Mar 2010 - 4:01 pm | युयुत्सु
कुणालाही प्रश्न सोडवण्यात खराखुरा रस नसतो.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Mar 2010 - 4:27 pm | शानबा५१२
मध्यंतरी एका देशाने तेथील नागरिकांच्या काळ्या पैशावरचा कर रद्द (कर माफी) जाहीर करून त्यांना काळा पैसा बाहेर आणण्याची व तो देशांतर्गत व्यापारात गुंतवण्याची संधी दिल्याचे वाचनात आले
हा असला देश महान आणि ते पैसे गुंतवणारे त्यापेक्षा..........मग काय?.........आपल्य देशात कोण अस करेल?
अशा मार्गाने का होईना, काळा पैसा योग्य मार्गाने बाजारात येईल?
कोण तयार होणार आहे आपला पैसा असा द्यायला?
जो देईल तो थोड्या दिवसात ढगात जाईल कोण्याच्या तरी रागाचा शेवट बनुन
त्याचे काय फायदे अगर तोटे असतील?
कोणी आपले पैसे देशासाठी गुंतवले तर त्यात तोटा कसा असेल?
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
22 Mar 2010 - 4:39 pm | विजुभाऊ
लॉजीक काय आहे ते समजले नाही.
त्या पैशावरील कराना माफी देणे म्हणजे प्रामाणीकपणे कर भरणार्या खुळ्या नागरीकांचा बळी देणे होईल.
तो पैसा पांढर्या अर्थव्यवस्थेत कसा आणता येईल त्यासाठी बरेच इतर मार्ग आहेत.
पण तो ज्यांचा आहे त्याना तो इथे आणण्यात बिलकूल रस नाहिय्ये.
त्यांच्यासाठी दुबै वगैरेत बरेच मार्केट उपलब्ध आहे