काही महिन्यांपूर्वी डिस्कव्हरी वर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती.. त्यामधे दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी इत्यादीच्या नर मादी सहजीवनातील वैशिष्ट्ये दाखविताना तुलना अशी होती की -
१. सामान्यतः कीटकांमधे .. उदा. मधमाशी, मुंगी इ. मधे मादी चे प्राबल्य असून नर मात्र प्रजोत्पादना पुरतेच असतात .. वंश सातत्याची प्रेरणा राखून मादी प्रजोत्पादन व पुढील कार्ये पार पाडते ..
२. दक्षिण भारतातील लंगूर माकड तसेच आफ्रिकेतील चिपांझी तसेच सिंह , हत्ती , गवे इ. मधे एक नर अनेक माद्यांचा सहवास करतो आणी स्वतः चा वंश पुढे चालवतो.... यामु़ळेच कळपातील मु़ख्य नराची जागा जेव्हा दुसरा तरुण घेतो तेव्हा तो पहिल्या नराची लहान मुले मारुन टाकतो (विशेषतः सिंह)... व "मोकळ्या" झालेल्या माद्यांशी सहवास करुन स्वत:ची प्रजोत्पत्ती करवुन घेतो..
यापुढे निवेदकाने मानवांच्या बाबतीत असे भाष्य केले की
जेव्हा एखादी मानव स्त्री योग्य वयात वंशसातत्यासाठी नराची निवड करते तेव्हा तिच्या मूळ प्रेरणा ह्या बाळाला व तिला सुरक्षितता व स्थैर्य कोण देईल अशा मानव पुरुषास निवडण्या कडे असेल तसेच दीर्घ कालीन स्थिर संबंधांची अपेक्षा ती करेल...
या उलट मानवी पुरुषामधे .. (अर्थातच) मर्कटाचे काही अंश असल्याने (Can't Help it !)
पुरुष जास्तीत जास्त ठिकाणी आपले "बीज" कसे पेरले जाईल असा प्रयत्न करेल... (एकोहम बहुस्याम | )
हे पाहिल्या वर साहजिकच पेपर मधील वाचनात येणा-या व समाजात नित्य ऐकायला मिळण्या-या सांसारिक विसंवादाच्या व त्यातून घडणा-या दुर्दैवी घटना.. घटस्फोट .. इत्यादी चे स्मरण झाले....
की वर सांगितलेल्या या स्त्री पुरुषांच्या मूलभूत लैंगिक प्रेरणांच्या भिन्नते मुळे अनेक विसंवाद होत असावेत का ?
आणी जर हे समजून घेतले तर "केवळ शारिरीक संबंधाच्या बाबती मधील हक्काच्या भावने पोटी व त्यास अवास्तव रित्त्या निष्ठा व प्रेम यांच्याशी जोडल्यामुळे विनाकारण वादंग वाढवणे कमी केले तर अनेक संसार सुखी होतील..." असे वाटते ..
अर्थात हे आताच्या आधुनिक काळानुसार . स्त्रियांच्या बाहेर वावरण्यामुळे आता असा समजुतदार पणा पुरुषांनाही दाखवणे भाग पडेल
यावर मिपाकरांची मते जाणण्यास उत्सुक आहे...
प्रतिक्रिया
20 Mar 2010 - 11:30 pm | डावखुरा
कशालाही चिकटलेले नसणे म्हणजे 'नग्न' होय......
आणि सर्वस्वाला चिकाटलेले असणे म्हण़जे 'लग्न' होय....
मानव ह्या तत्वानुसार जगणे आदर्श मानतात...
प्राणी जेव्हा प्रजनन करतात तेव्हा ते आपल्या पिलाना त्यान्च्या हिमतिवर जगायला सोडुन देतात....
पण त्याउलट मानव हा विधियुक्त [मला लिव्ह ईन रिलेशनशिप बद्दल कहि बोलायचे नाही] समारम्भात आपन एकमेकाला स्वीकरतो ...
आणि आपल्या वन्शव्रुद्धीच्या द्रुश्टीने प्रयत्न करत आपल्या अपत्या च्या पालन पोषण करण्यासाठी झटत असतात....
हाच मुख्य फरक आहे....मानव नर मादि आणि पशु नर मादि यात..
आपण जर या सम्बन्धातिल पवित्रता जाणुन घेतलि तर पेपर मधील वाचनात येणा-या व समाजात नित्य ऐकायला मिळण्या-या सांसारिक विसंवादाच्या व त्यातून घडणा-या दुर्दैवी घटना.. घटस्फोट ..बलात्कार.. इत्यादी आटोक्यात येउ शकतील ... "राजे!"
20 Mar 2010 - 11:54 pm | आळश्यांचा राजा
इंग्रजीमध्ये याला oversimplification म्हणतात. असो.
प्रतिक्रिया वाचायला आवडतील.
आळश्यांचा राजा
20 Mar 2010 - 11:59 pm | डावखुरा
'oversimplification' हा शब्द वापरायचे प्रयोजन कळेल का?"राजे!"
21 Mar 2010 - 12:00 am | आळश्यांचा राजा
हे मूळ लेखाला उद्देशून आहे. आपल्या प्रतिक्रियेला नव्हे.
आळश्यांचा राजा
21 Mar 2010 - 7:27 am | तिमा
हा लेख ओढून ताणून बादरायण संबंध जोडल्यासारखा वाटतो.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
21 Mar 2010 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे
यात संसार म्हणजे लग्न करुन जगलेले सहजीवन असा अर्थ अभिप्रेत आहे काय? लैंगिक प्रेरणा ही बाब नैसर्गिक आहे. त्यातील भिन्नतेमुळेच वाद होतात याच्याशी मी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
21 Mar 2010 - 12:29 pm | टारझन
काय हो घाटपांडे साहेब .. ते काय म्हणतात ते .. "बौद्धिक मैथुन" का काय ते .. ते हेच का ? =)) =))
- (बौद्धिक मैथुन प्रेमी) उपक्रमवेताळ
21 Mar 2010 - 9:50 pm | प्रकाश घाटपांडे
यामागील प्रेरणा उर्फ कंड ही 'तशीच' असते. त्यामुळे कंडशमनाचा आनंद काही वेगळाच असतो.
पण काही लोक बौद्धीक मैथुनाला वंध्या मैथुन म्हणतात ते आम्हाला मान्य नाही. वंध्या हा 'फल'निष्पत्तीकारक आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
21 Mar 2010 - 10:44 am | वेताळ
आणी जर हे समजून घेतले तर "केवळ शारिरीक संबंधाच्या बाबती मधील हक्काच्या भावने पोटी व त्यास अवास्तव रित्त्या निष्ठा व प्रेम यांच्याशी जोडल्यामुळे विनाकारण वादंग वाढवणे कमी केले तर अनेक संसार सुखी होतील..." असे वाटते ..
पांडवप्रेमी दिसता.
माणसात व माकडात काही तरी फरक शिल्लक ठेवा.
वेताळ
21 Mar 2010 - 1:00 pm | युयुत्सु
जैविक दृष्ट्या हा फरक २ % पेक्षा कमी आहे
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Mar 2010 - 1:00 pm | युयुत्सु
जैविक दृष्ट्या हा फरक २ % पेक्षा कमी आहे
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Mar 2010 - 11:04 am | युयुत्सु
+१
आणि त्या प्रेरणांना योग्य वाट देण्या ऐवजी त्या दडपून टाकण्या कडे समाजाचा कल असतो. दूर्दैवाने निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत. बलात्कारा सारखे अनर्थ त्यातूनच उद्भवतात.
उत्तम चर्चा प्रस्ताव
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Mar 2010 - 11:20 am | युयुत्सु
+१
आणि त्या प्रेरणांना योग्य वाट देण्या ऐवजी त्या दडपून टाकण्या कडे समाजाचा कल असतो. दूर्दैवाने निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत. बलात्कारा सारखे अनर्थ त्यातूनच उद्भवतात.
उत्तम चर्चा प्रस्ताव
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
21 Mar 2010 - 10:41 pm | सागरलहरी
आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |
धर्मो हि एको तेषामधिको , धर्मेण हीना: पशुभि: समाना : ||
अशी शिकवण उत्क्रांती चा शारिरीक पातळी वरचा टप्पा मानवाने बराचसा गाठल्यावर त्याला निती नियमात सुबद्ध करुन नैतिक उत्क्रांती साठी पूर्वी पासून प्रयत्न होतात. पण या मधे भले भले हार जातात हे ही खरे... आपल्या कडे पुराण काळापासून असे किस्से प्रचलित आहेत ज्यात शहाण्या सुरत्यांना देखील त्यांच्या मूळ प्रेरणा ना बळी पडावे लागले... उदा- वेदा तील प्रसिद्ध यम -यमी संवाद (हा खरेच अभ्यासनीय आहे ) , विश्वामित्र - मेनका , बृहस्पतीने त्याचा भाउ उतथ्य याची सुंदर गर्भवती पत्नी ममता हिच्याशी रत होणे (हा त्यावेळ्चा गर्भ बृहस्पतीच्या शापामुळे अंध झाला .. तोच प्रसिद्ध "अस्य वामस्य " सूक्ताचा कर्ता "दीर्घतमस" झाला...., महर्षी वेदव्यास यांच्या जन्माला पराशर मुनी व मत्स्य गंधा यांचा मोहवश तात्कालिक संबंध कारण झाला..आणि एवढेच नव्हे तर याउपरही ती पराशराच्या वरामुळे झालेली योजनगंधा कोळीण असूनही पुढे हस्तिनापूरची महाराणी झाली. [ जे लोक "जात , जात " म्हणून बडवतात व मनुस्मॄती चे सोयिस्कर दा़खले देतात त्यांनी याची ही नोंद घ्यावी ] इंद्रा बाबत ही असे उल्लेख येतात., कुंतीला लग्ना आधी बाळ (कर्ण) झाले आहे हे लपून राहिले असेल का ? तरी तिला राजघराण्यात स्वीकारले गेले..
म्हणजे मानवाची स्खलनशीलता मान्य करुनही ( फक्त २% फरका मुळे ) सातत्या ने चांगले विचार बिंबवण्याचा प्रयत्न आपल्या संस्कृतीत दिसतो.. आता याला विरोधाभास म्हणायचे की नैतीक उत्क्रांती चा जाणीवपुर्वक प्रयत्न म्हणायचे हे प्रत्येकाने ठरवावे...
21 Mar 2010 - 11:15 pm | टारझन
च्यायला ... मराठी_चावट_कथा_याहु_गृप हा फार अलिकदे निघलाय म्हणायचं .. इथे तर फार पुर्वी पासुन इन्सेक्ट स्टोरिज .. फ्यँटसीज लिहुन ठेवल्यात .. कृपया जरा विस्तृत ल्ह्या ना राव .. बरेच दिवस झाले वाचन नाही :)
लग्नाचा आणि कुंतीला पोरं होण्याचा काही एक संबंध नाही बरं .. एकंही नवर्यापासुन नव्हतं म्हणे ... तीने देवांबरोबर (देवाबरोबर नाही) तोंड काळं केलं होतं , तिला मी कधीही माफ करणार नाही. आणि बाय दं वे .. पहिला चान्स सुर्यदेवाने मारलेला ... सुतपुत्र ही सुर्याची पैदास होती.
असो .. भारताच्या प्राचिन ब्लॉग्ज चा आदर आहे .
21 Mar 2010 - 11:33 pm | सागरलहरी
वेदामधे यम त्याची बहीण यमीला नाते संबंधातील लैंगिक संपर्क कसे चूक आहेत हे सांगतो.
त्यामूळे माझ्या माहिती नुसार आपल्या इतिहासात इन्सेस्ट संबंधाला प्रोत्साहन ही नाही आणी तसे उल्लेख माझ्या माहिती नुसार नाहीत. मुळात अतिप्राचीनते मुळे आपला इतिहास, वांड्मय , रुपक कथा नीती कथा इत्यादी ची खूप सरमिसळ आहे.
तिला मी कधीही माफ करणार नाही.
का तुम्ही का रागावला ?
22 Mar 2010 - 8:50 am | युयुत्सु
गैरसोयिच्या इतिहासाकडे कानाडोळा करायच्या प्रवृत्तीचे हे उत्तम उदाहरण आहे. अधिक माहिती साठी जिज्ञासूनी ऐतरेय ब्राह्मणातील महीदास ऐतेरेयाच्या गाथा वाचाव्यात. राजवड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचावे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Mar 2010 - 11:05 am | प्रकाश घाटपांडे
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास आता जालावर उपलब्ध आहे.
http://www.marathipustake.org/History.asp
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
22 Mar 2010 - 4:36 pm | समंजस
एका चांगल्या संस्थळाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद प्रकाशराव!!!
22 Mar 2010 - 8:06 am | शुचि
(१) स्त्री ही अल्फा-मेल शोधते अस मला तरी पटतं. जो तिला समर्थ्यवान (मग ते मनोबळाने, वैचारीक बळाने अथवा धनाने) पण जो वरचढ वाटतो त्याला ती मनाने वरते. She definately lusts after him.
(2) Once married why would a man work his ass off whole his life for a woman? That is still a puzzle for me. म्हणून मला वाटतं स्त्री ने पुरुषाला थोडं सुटवंग ठेवलं पाहीजे. थोडी डोळेझाक केली पाहीजे. Boys will always be boys हे मला पटतं 8|
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
22 Mar 2010 - 4:54 pm | सुनील
2) Once married why would a man work his ass off whole his life for a woman? That is still a puzzle for me. म्हणून मला वाटतं स्त्री ने पुरुषाला थोडं सुटवंग ठेवलं पाहीजे. थोडी डोळेझाक केली पाहीजे. Boys will always be boys हे मला पटतं
सहमत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Mar 2010 - 5:54 pm | राजेश घासकडवी
प्रजननात नर व मादी यांच्या भिन्न भूमिका असल्यामुळे त्यांच्या जनुक सातत्यासाठीची धोरणं (स्ट्रॅटेजीज) भिन्न असतात. यावर खूप अभ्यास केला गेलेला आहे. इव्होल्यूशनरी सायकॉलॉजी, सोश्योबायोलॉजी, इव्होल्यूशनरी गेम थियरी... अशा विषयांवर गूगल शोध घेतलात तर यावर वेधक लेख मिळू शकतील.
चक्रमवेताळ व शुचि यांनी खरं तर स्त्रियांची जोडीदार निवडण्याची दोन टोकांची धोरणं सांगितली आहेत...
त्यावरून मला एक सुंदर आणि अतिशय प्रसिद्ध प्रयोग आठवला. एकाच पुरुषाच्या चेहेऱ्याच्या चित्रात बदल करून त्याचे फेमिनाईन (शांत, काहीसा गरीब, गोड, स्थिरतेचं प्रतीक असलेला, समंजस प्रतिमेचा) व मास्क्युलिन (राकट, शक्तीशाली, अल्फा मेल, प्रतिमेचा) अशा रेंजमधली चित्रं तयार केली. वेगवेगळ्या स्त्रियांना त्यातला कुठचा आवडला हे विचारलं. त्यात असं दिसून आलं की सर्वात अधिक फर्टाईल (दोन मासिक पाळ्यांच्या सुमारे मध्यभागी) असलेल्यांनी अल्फा मेल निवडला, तर इतर काळातल्या स्त्रियांनी जास्त स्थिर, कमी डॉमिनेटिंग वाटणारा निवडला.
याचा अर्थ असा की जोडीदार म्हणून त्यांनी समंजस निवडला, तर अपत्यप्राप्तीसाठी अल्फा मेल निवडला. जनुकसातत्याच्या दृष्टिकोनातून स्त्रीची सर्वोत्तम स्ट्रॅटेजी अशी की भरवशाचा, मुलांचं मनापासून संगोपन करणारा नवरा करायचा व 'बाहेर' जाऊन मुलं अल्फा मेलकडनं मिळवायची... (यात मी 'असं करावं' असं म्हणत नाही, काय आहे ते सांगतोय. जनुकसातत्यापेक्षा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी या जगात आहेत.)
मुद्दा असा की चक्रमवेताळांच्या मूळ मांडणीशी मी सहमत आहे - आपल्या नैसर्गिक ऊर्मी व समाजव्यवस्थेसाठी केलेल्या तडजोडी व त्यातून आलेली बंधनं यात तफावत आहे. त्या दोन्हींचा अधिक चांगला मेळ घालणं शक्य आहे.
राजेश
22 Mar 2010 - 9:01 pm | शुचि
फक्त राकट आणि मस्क्युलाइन असणं म्हणजे उत्कृष्ट "जीन्स" पुढच्या पीढीला देऊ शकणं असं मला तरी वाटत नाही. त्या दृष्टीने तो प्रयोग फारच "सुपरफिशिअल" वाटतो.
हे मला जरूर पटतं की स्त्री ही डोळसपणे पुरुष निवडते ... आणि वरचढ त्यातल्या त्यात पुरुषच ती निवडते. पण *फक्त* राकट आणि मस्क्युलाइन काही पटत नाही. फरच "बेस" लेव्हल वरचं वाटतं ते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
22 Mar 2010 - 10:47 pm | राजेश घासकडवी
तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'बेस' शारीर आकर्षण आणि शांत डोक्याने विचार या दोन्हींचं ते कॉंबिनेशन असतं. ते थोडंसं मोराच्या पिसाऱ्यासारखं आहे. त्यामुळे अर्थातच मर्यादा आहेत. पण हा सर्वमान्य प्रयोग आहे. शारीर आकर्षणाच्या भागाविषयी - व्हिज्यूअल क्लूज द्वारे. त्याचं वेगळं इंटरप्रेटेशन काय करणार?
राजेश
23 Mar 2010 - 8:52 am | युयुत्सु
"त्या दोन्हींचा अधिक चांगला मेळ घालणं शक्य आहे."
हे विधान मला अतिरंजित आणि उंटावरून शेळ्या हाकणे या प्रकारातले वाटते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
23 Mar 2010 - 9:12 pm | राजेश घासकडवी
ज्या विषयावरती एक पुस्तक लिहिता येईल ते एका वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला की ते थोडं गुळमुळीत वाटतं खरं.
पण 'अतिरंजित' कसं काय? आणि उंटावरनं शेळ्या हाकण्यासाठी 'भारतीय न्यायसंस्थेने अमुकतमुक करावे' अशी भावे प्रयोगाची विधानं हवीत, नाही का?
राजेश
22 Mar 2010 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार
Don't marry & make a woman happy. In fact remain a bachelor & make several women happy.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Mar 2010 - 7:11 pm | टारझन
वर बौद्धिक मैथुन पहायला मिळाले =))