इंडोनेशियातील गमतीदार किस्सा मागे मि सांगितला आहेच, आता जपान मधिल काही किस्से.
२००२ ते २००५ अशी साधारण दोन अडिच वर्ष मि जपान मधे होतो, इंडोनेशिया पेक्षा भाषेचा प्रॉब्लेम जपान मधे जास्त होता. बहासा (भाषा या संस्क्रुत शब्दाचा अपभ्रंश) निदान लॅटिन लीपी मधे लिहिली जाते त्यामूळे निदान अर्थ समजला नाही तरी वाचता तरी येते, जपानी वाचणे म्हणजे सुरवातीला तर अशक्य कोटीतील गोष्ट होती.
मि आणि माझ्या बरोबर काम करणारा मनिश असे आम्ही शेजारी शेजारी रहायचो. जपानी घरे अत्यंत छोटी आणि कचकड्याची वाटायची.
एके रात्री ११ ११.३० ला मनिश ने मला जागे केले!
"नितिन, माझ्या रूम वर उंदीर आहे. सारखा खूड्खूड करत आहे. चल जरा मला मदत कर आपण त्याला मारू तरी किंवा बाहेर तरी घालवू!"
"मनिश, किती वाजले आहेत माहित आहे ना? शेजारी बोंब मारत येतील! आपल्याला धड पणे सांगताही यायचे नाही, काय झाले आहे ते! जपान आहे हा! पोलीसांना बोलवायलाही कमी करणार नाहित शेजारी पाजारी."
"असूदे, मला झोपणे अशक्य झाले आहे." लाकदी फ्लोअरींग मूळे अजूनच आवाज येत आहे."
शेवटी मी निमूट पणे त्याच्या रूम वर गेलो. खूप प्रयत्न केल्यावर लक्षात आले कि तो उंदीर ओट्या पासच्या सिंक खाली लपला आहे. अर्थात मुदलातले घरच ११ चौ. मि. चे होते त्यावरून ओटा किती मोठा (?) होता याचा अंदाज करा!
जास्त आवाज करून चालणार नव्हते, त्यामुळे भारतातल्या प्रमाणे काठी घेऊन ठोकाठोक करणे शक्यच नव्हते, त्यामूळे आम्हाला समजेना त्याला सिंक मधून बाहेर कसे काढावे? मग मला एक कल्पना सुचली, "मनिश, आपण सिंक खाली सिगारेट पेटवून ठेऊ." पण त्यातही तसा धोका होताच, लाकडी घर ना! पण दुसरा काही मार्ग सुचेना, मग अजून एक आईडीया केली, चौकात जाऊन 'व्हेंडींग मशिन' मधून दोन कोक चे कॅन आणले आणि आधी ते संपवून त्यात सिगारेट पेटवून ठेवली. पण ती आडवी ठेवल्यामूळे नीट पेटेना. आता काय करायचे. मग परत चौकात गेलो आणि चुईंगम घेऊन आलो, कॅन मधे चुईंगम चिकटवून त्यावर सिगारेट उभी केली. इतका खटाटोप करूनही मुषक महोदय काही सिंक खालून बाहेर येईनात.
हा सर्व प्रकार चांगला १२.३० पर्यंत चालू होता. मग आम्ही ठरवले की "७-११" मधे जाऊन काही उंदीर मारण्यासाठी मिळते का ते पाहू! तिथे गेलो तर खरे पण तिथल्या बाईला सांगायचे कसे! तिला इंग्लिश ओ की ठो कळत नव्हते. मनिश ने कौंटर वर तुरूतुरू बोटे फिरवून "माऊस माऊस" असे सांगितले, पण तिला काहीही कळेना! तेव्हढ्यात मला तिथे टांगलेले "मिकीमाऊस" चे चित्र दिसले. मि त्याच्याकडे बोट दाखवून परत "माऊस माऊस" असे म्हणुन बघितले, तिचा चेहरा एकदम उजळला आणि अर्थातच आमचाही! मी मनातल्या मनात "युरेका युरेका" ओरडलो. पण क्षणातच परत आमचा चेहरा बघण्यासारखा झाला! कारण ती काँप्यूटर चा माऊस घेऊन आली होती!
आम्ही परत "Not this! a real mouse! we want to chase it out!" कसे माहित नाही पण बहुतेक आमच्या हावभावांवरून तिला लक्षात आले आणि परत तिचा चेहरा उजळला! आमचा मात्र कोराच होता, कारण काय समोर येणार आहे हे समजत नव्हते. ती एक चपटे काहीतरी घेऊन आली, त्यावरील अगंम्य चित्रलीपी वरुन काहीही बोध होईना!
आमचे मख्ख चेहरे बघून तिलाही लक्षात आले कि आम्हाला काहीही कळालेले नाही! पुढचा प्रकार अशक्य कोटीतला होता!
ती कौंटर मागून पुढे आली. तिने ती चपटी वस्तू काही अंतरावर ठेवली आणि थोडे लांब जाऊन ती उंदरासारखी तुरूतुरू धावत आली, त्या वस्तू वर पाय ठेवला आणि तिथेच मागे पुढे झुलायला लागली! आम्ही आवाक होऊन थोड्यावेळ नुसतेच येड्यासारखे बघत बसलो आणि मग लक्षात आले कि तो एक सुपर ग्ल्यू आहे. उंदीर धावत धावत येईल आणि त्यावर त्याने पाय ठेवला की तो तेथेच चिकटून बसेल!
अत्यंत विजयी चेहर्याने आम्ही बाहेर पडलो, दुर्दैवाने त्या मुलीचे धड आभारही मानता आले नाहित! रस्ता ओलांडून परत यायला निघालो तर त्या मुलीची हाक ऐकू आली! पहिला विचार म्हणजे आपण पैसे दिले ना, हा आला. पण ती धावत धावत आली आणि आमच्या हातात एक चीज चे पाकिट दिले! चीज शिवाय उंदीर कसा पकडणार ही माणसं असा तिला जेन्युईन प्रश्ण पडला असणार!
आम्हाला हा अर्थातच कल्चरल शॉक होता. असे कलर शॉक नंतर ही खूप बसले! जपानी संस्क्रुतीची ओळख व्हायला सुरुवात झाली होती. आज इतकी वर्ष झाली या गोष्टीला पण मी त्या मुलीला विसरलेलो नाही! जपान आणि जपानी माणूस या बद्द्लचा आदर नंतर दिवसेंदीवस वाढतच गेला!
--------------------------------
दुसरा किस्सा ही गमतीचा आहे पण वरील प्रमाणे जपानी माणसा बद्दल काही सांगणारा नाही.
मी सायकल ने ऑफिसला ये जा करायचो. एकटाच रहायचो, त्यामूळे जितका वेळ ऑफिस मधे काढता येईल तितका काढून थोडासा उशिरानेच घरी जायचो.
मुख्य रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी बाजूच्या लेन मधून जायचो. त्या लेन मध्ये बरेच "कराओके बार" मसाज पार्लर्स" होते. एका मसाज पार्लर समोर एक मुलगी उभी राहून गिर्हाईके मिळवायचा प्रयत्न करायची.
मला ती नेहमी विचारायची, "मसाजी ईकागा देस का?" (मसाज करायचा आहे का?) मी नेहमी उत्तर द्यायचो, "निहाँगो वकारानाय!" (मला जपानी समजत नाही!) असे दोन चार वेळा झाल्यावर एके दिवशी तिने चक्क माझ्या सायकल चे हँडल धरून मला सांगितले, "कोतोबा इरानाय यो!" (भाषेची काही गरजच नाही!). मला हसू आवरेना. अर्थातच मी मसाज करून घेतला हे वेगळे सांगायला नको! (जेन्युईन मसाज होता, उगिच काहीतरी कल्पनाविलास लढवू नका!)
प्रतिक्रिया
20 Mar 2010 - 9:15 pm | II विकास II
अजुन काही किस्से टाकले तर अजुन मौज वाटेल.
असो.
>जपानी नाय
म्हणजे नाही का?
21 Mar 2010 - 9:17 am | भोचक
मस्त किस्से.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
21 Mar 2010 - 9:30 am | मदनबाण
वा, धमाल किस्सा आहे...असेच रोचक अनुभव वाचायला आवडतील. :)
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
21 Mar 2010 - 9:35 am | विंजिनेर
हॅ हॅ हॅ... कराओके+ मसाज = मसाजचे "हॅपी एंडिंग" झाले असणारच. तुम्ही सांगू नका आम्ही विचारत नाही ;)
21 Mar 2010 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त किस्से...!
और भी आने दो...!
21 Mar 2010 - 12:19 pm | स्वाती दिनेश
किस्से मस्तच!
जपानमधले आमचेही अनेक धमाल किस्से या लेखामुळे आठवले..सवडीने टाकेन..
स्वाती
21 Mar 2010 - 12:26 pm | टारझन
हा हा हा हा ! मस्तंच !!
(अफ्रिकेत चायनिज मसाज ट्रिटमेंट घेतलेला ) टीन यीन हांव
22 Mar 2010 - 1:14 am | मी-सौरभ
=)) =)) =)) =)) =))
-----
सौरभ :)
21 Mar 2010 - 9:41 pm | अनिल हटेला
अर्थातच मी मसाज करून घेतला हे वेगळे सांगायला नको! (जेन्युईन मसाज होता, उगिच काहीतरी कल्पनाविलास लढवू नका!)
--> असं असं ....:D ठीकाये......:D
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.
22 Mar 2010 - 10:26 am | बिपिन कार्यकर्ते
मस्त!!!
बिपिन कार्यकर्ते
22 Mar 2010 - 11:01 am | समंजस
मस्त!!! आणखी येवू द्या!!
:)
22 Mar 2010 - 12:14 pm | सुधीर काळे
करमरकरसाहेब,
तुमचा इंडोनेशियाबद्दलचा लेख मी या फोरमचा सभासद होण्यापूर्वीचा असावा. मी एकूण १६-१७ वर्षें इथे रहातो व भाषा इंडोनेशियाही बर्यापैकी बोलतो. मला आपला आधीचा लेख वाचायला आवडेल. तरी दुवा पाठवावा.
माझा "गीर्वाणवाणी व भाषा इंडोनेशिया" हा लेख वाचावा असे वाटत असेल तर हा दुवा उघडून जरूर वाचा!
http://www.misalpav.com/node/9655
माझे जपानमधले अनेक सुखद अनुभवांपैकी तीन अनुभव!
'दाइदो (Daido)'च्या होशीझाकी कारखान्यात 'यावाताशिंदेन' स्टेशनपासून 'दाइदोचो' स्टेशनला आम्ही सर्व सहा भारतीय trainees रेल्वेने (लोकल) जात असू. वाटेत 'ओतागावा'ला गाडी बदलावी लागे. परत येताना तसेच. एकदा रात्री उशीरा होस्टेलकडे परत येताना गर्दीत आम्हाला ओतागावा गेलेले कळलेच नाहीं. स्टेशनची नावे वाचता येत नव्हतीच. मग थोड्या वेळाने कळले कीं आपण भलतीकडेच चाललोय. मग शेजारी बसलेल्या 'निहोनजिन'ला (जपानी माणसाला) विचारले की ओतागाव कधी येणार (ओतागावा एकी दोको देस्का?-जुजबी जपानी यायला लागले होते). तो ताडकन् उठला व आम्हाला घेऊन पुढच्या स्टेशनवर उतरला व आमच्या बरोबर ओतागावापर्यंत उलटा येऊन आम्हाला बरोबर गाडीत बसवून मग तो परत गेला. रात्रीचे ९ वाजले असावेत. तो एकटा व आम्ही सहा अनोळखी भारतीय. पण त्याला भीती वगैरे कांहींही वाटली नाहीं व चिडका भावही चेहेर्यावर नव्हता.
तसाच एक अनुभव ओसाका स्टेशनवर आला. मी स्टेशनच्या एका बाजूला होतो व टूरिस्ट बस स्टेशनच्या दुसर्या बाजूला असावी. मी तो स्टॉप कुठे आहे असे एकाला विचारले तर त्याने मला ओसाकाचे प्रचंड स्टेशन आतून माझ्याबरोबर ओलांडून मला पलीकडे पोचवले.
हिमेजीला अशीच एक तरूण मुलगी आम्ही वाट चुकल्यावर रात्री दहा वाजता फक्त "नान नो कुनी" (कुठल्या देशाचे) हा एकच प्रश्न विचारून आम्हा सहाजणांना न भीता हमरस्त्यापर्यंत पोचवायला आली होती!
जपानी लोकांचे हे सौजन्य पाहिल्यावर दुसर्या महायुद्धात अनेक कुकर्में केल्याबद्दल इंडोनेशियात व सिंगापूर-मलेशियात कुप्रसिद्ध व अप्रिय असलेले जपानी ते हेच कां असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाहीं.
जपानी हे असे सभ्य व मदत करायला तत्पर असेच मत आम्हा सर्वांचे झाले.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
22 Mar 2010 - 5:04 pm | नितिनकरमरकर
सुशिरजी,
माझे जपान मधिल सर्वच अनुभव अत्यंत चांगलेच आहेत. आणि तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे, तुम्ही जाकार्ताला रहात आहात हे वाचुन खुप बरे वाटले. तुम्हाला भेटायला आवडेल. 2niteen@in.com वर संपर्क साधावा ही विनंती.
जगात दोन गोष्टींचा थांग लागणं कठीण आहे. एक म्हणजे या विश्वाचा पसारा आणि दुसरं माणसांचा मूर्खपणा. त्यातही पहिल्या गोष्टीचा कधीतरी थांग लागेल, अशी आशा आहे.
- अल्बर्ट आइन्स्टाईन