भारतीय महिलांविषयीचे विनोद

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
6 Mar 2010 - 11:50 am
गाभा: 

आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

  • आपल्या मते विनोद चांगला असावा.
  • विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
  • विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
  • विशुध्द ज्ञानार्जनात भावना भडकणे अभिप्रेत नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक संवेदनशील व सुजाण स्त्री असूनही त्यांना सर्व प्रकारच्या जातीय, प्रांतिक, लैंगिक, धार्मिक आणि इतरही अस्मितांचे दर्शन घडवणार्‍या विनोदांचेही वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.

एखाद्या समाजात एखाद्या समाजघटकाविषयी उत्पन्न होणारे विनोद हा समाजशास्त्रीय संशोधनाचा एक भाग असतो, याविषयी काही शंका असल्यास विनोदांवरील हा निबंध वाचावा. त्याउप्पर काही शंका असल्यास त्या आम्हांस विचाराव्या.

धन्यवाद,
चिंतातुर जंतू

प्रतिक्रिया

टारझन's picture

6 Mar 2010 - 11:57 am | टारझन

आता आपलीच चिंता वाटते :)
एक सल्ला "म्हैलांपासुन सावधान !! "
शुभेच्छा !

-चिम्टातुरचंतु

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2010 - 12:07 pm | अविनाशकुलकर्णी

आम्हास एक विनोद माहित आहे बघा आवडला तर.....
"लेडिज होस्टेल मधे लाईट गेले..अन मुलीं मेणबत्त्या शोधायला लागल्या"

ज्ञानेश...'s picture

6 Mar 2010 - 12:14 pm | ज्ञानेश...

हे एक अशक्य कोटीतले गृहस्थ आहेत ! :T

चिंतातुर जंतू's picture

6 Mar 2010 - 12:21 pm | चिंतातुर जंतू

हाच विनोद जसाच्या तसा (उदा.) इंग्लंडातील महिलांविषयीही सांगितला जाऊ शकतो, त्यामुळे तो भारतीय महिलांविषयी नसावा, असे वाटते. आपण 'रग्बी जोक्स'चे चाहते आहात काय? असो. तरीही धन्यवाद.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

शुचि's picture

11 Mar 2010 - 10:44 pm | शुचि

हा विनोद खरा असा आहे -

लेडीज हॉस्टेल मधे लाइट जातात. मुली (खरं पहाता दिवे दुरुस्त करण्यासाठी) मुलांच्या होस्टेलात निरोप पाठवतात - "ए लवकर या रे. दिवे गेलेत"

मुलं उलटा निरोप पाठवतात - आज बिझी आहोत. मेण्बत्त्यांनी काम चालवा आजच्या दिवस.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2010 - 12:38 pm | अविनाशकुलकर्णी

खरे आहे इंग्लंडातील महिलां जरी निराळ्या असल्या तरी मेणबत्त्या एकच सारख्या असतात...

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2010 - 1:02 pm | राजेश घासकडवी

आपण दोन्हीकडच्या मेणबत्त्या लावून बघितल्या आहेत काय?

Nile's picture

6 Mar 2010 - 1:20 pm | Nile

ठ्ठो! =)) =))

Nile's picture

6 Mar 2010 - 1:39 pm | Nile

अरे रे ! आमची आत्मीक कोंडी फुटायची वेळ आली! शी शी शी शी शी! कसले हे धागे! काय चहाटळपणा आहे? बंद करा असली थेरं!

Nile's picture

6 Mar 2010 - 1:44 pm | Nile

अरे रे ! आमची आत्मीक कोंडी फुटायची वेळ आली! शी शी शी शी शी! कसले हे धागे! काय चहाटळपणा आहे? बंद करा असली थेरं!

टारझन's picture

6 Mar 2010 - 1:48 pm | टारझन

केवळ तुमच्यासाठीच !!

-लिंकाळ
ह्या लिंक साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत !

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2010 - 2:20 pm | अविनाशकुलकर्णी

अरेरे टाऱझन बुवा..लावली ना वाट धाग्याची.....ति पण सचित्र
आता वाजले की बारा

चिंतातुर जंतू's picture

6 Mar 2010 - 11:06 pm | चिंतातुर जंतू

आम्हांस वाटले होते की रसिक मिपाकरांकडून काही रसाळ विनोद लाभतील, पण अजून तरी इथे मेणबत्त्या, केळे नि भोपळा यांशिवाय काही हातास लागले नाही. हीच फळे काय मम तपाला...
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

शुचि's picture

6 Mar 2010 - 11:07 pm | शुचि

सांता: स्वयंपाक करणे, घर साफ ठेवणे आणि कपडे धुणे आदि गोष्टींचा कंटाळा येऊन मी लग्न केलं शेवटी.

बांता: काय सांगतोस काय? अरे अगदी याच कारणांकरता माझं लग्न मोडलं.

नीट पाहीले असता - विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित आहे.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चिंतातुर जंतू's picture

7 Mar 2010 - 11:02 am | चिंतातुर जंतू

एखाद्या समाजात एखाद्या समाजघटकाविषयी उत्पन्न होणारे विनोद हा समाजशास्त्रीय संशोधनाचा एक भाग असतो, याविषयी काही शंका असल्यास विनोदांवरील हा निबंध वाचावा. त्याउप्पर काही शंका असल्यास त्या आम्हांस विचाराव्या.

वाचकांच्या भल्यासाठीची एक सूचना करावयाची राहून गेली. उपरोल्लेखित शंका आपणास नसतील, तरीही दिलेला दुवा एकदा पाहावा. निबंधात मासल्याखातर दिलेले विनोदांचे काही विशेष नमुने आपली करमणूक करतील, अशी अपेक्षा आहे.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नितिन थत्ते's picture

8 Mar 2010 - 10:21 pm | नितिन थत्ते

निबंध म्हटले की कोदांचीच आठवण येते.

नितिन थत्ते

टारझन's picture

8 Mar 2010 - 10:33 pm | टारझन

गरिबांचे नितिन थत्ते = कोदा :)

- गरिबांचा टारझन

शुचि's picture

7 Mar 2010 - 1:56 pm | शुचि

एक जहाज बुडले. पुढील लोक एका एकाकी बेटावर अडकले.
(१) २ इटॅलिअन पुरुष आणि १ इटॅलिअन बाई

(२) 2 फ्रेन्च पुरुष आणि १ फ्रेन्च बाई

(३) २ जर्मन पुरुष आणि १ जर्मन बाई

(४) २ ग्रीक पुरुष आणि १ ग्रीक बाई

(५) २ पोलीश पुरुष, १ पोलीशबाई

(६) २ मेक्सिकन पुरुष, १ मेक्सिकन बाई

(७) २ अमेरीकन पुरुष, १ अमेरीकन बाई

(८) २ भारतीय पुरुष आणि १ भारतीय स्त्री

१ महीन्यानंतर पुढील गोष्टी आढळून आल्या:

(१) एका इटॅलिअन पुरुषाने दुसर्‍या इटॅलिअन पुरुषाचा त्या इटॅलिअन बाईकरता खून केला.

(२) दोघे फ्रेन्च पुरुष आणि ती फ्रेन्च बाई मजेत रहात आहेत.

(३) दोघा जर्मन पुरुषांचे एक वेळापत्रक आखलेले आहे - त्या जर्मन बाई बरोबर कसा वेळ घलवायचा त्याचे.

(४) दोघं ग्रीक पुरुष एकमेकांबरोबर रहतात, आणि ग्रीक बाई स्वयंपाक, घर साफ वगैरे करते.

(५) पोलिश पुरुषांनी एकदा त्या पोलीश बाईकडे पाहीलं आणि एकदा समुद्राकडे आणि त्यांनी समुद्र पोहून जाणं पसंद केलं.

(६) दोघं मेक्सिकन पुरुष , त्या बेटावरच्या लोकांना ती मेक्सिकन बाई विकायच्या मागे आहेत.

(७) ते दोघं अमेरीकन पुरुष आत्महत्येच्या विचारात आहेत. ती अमेरीकन बाई पुढील गोष्टींचा काथ्याकूट करते- तिच्या शरीरवर तिचच हक्क कस आहे, स्त्रीमुक्ती, घरकामाचा समान वाटप, पूर्वीचा तिचा मित्र किती चांगला होता आणी तिला किती चांगली वागणूक देत असे, तिचे तिच्या आईबरोबर चे नाते.

(८) अरे पण भारतीय पुरुषांचे काय झाले?
ते वाट बघतायत कधी कोणीतरी त्या भारतीय स्त्री शी ओळख करून देईल तर बरं होइल म्हणून. ;;)

ता.क.- मी हा विनोद उद्धृत केला कारण त्या पुरुषांनी ओळख नाही करून घेतली तर त्या स्त्रीनी कमीत कमी पुढाकार घ्यायचा होता. म्हणून मला हा विनोद जितका पुरुषांवरचा वाटतो तितकाच त्या भारतीय स्त्री वरचाही वाटतो.

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)क जहाज बुडालं आणि पुढील काही लोकं एकाकी बेटावर जमले:

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Mar 2010 - 9:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वेळेत आठवले तर विनोद सांगायला हरकत नाही, पण आधी प्रोजेक्ट आणि अभ्यासकाबद्दल माहिती कळली तर बरं होईल.

अदिती

चतुरंग's picture

8 Mar 2010 - 3:25 am | चतुरंग

चतुरंग

चिंतातुर जंतू's picture

8 Mar 2010 - 9:58 am | चिंतातुर जंतू

एकोणिसाव्या शतकातील आणि नंतरचे सामाजिक परिवर्तन हा या विदुषींचा मुख्य आस्थाविषय आहे. त्याचा एक भाग म्हणून त्यांना आधुनिक भारतीय स्त्रीच्या जडणघडणीचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी स्त्रियांविषयीच्या गंभीर आणि अभ्यासपूर्ण लिखाणाखेरीज लोकसंस्कॄतीतले (popular culture) स्त्रीचे चित्रण आणि त्यात कालानुरूप झालेला बदल त्यांना अभ्यासायचा आहे. विनोद हा त्याचा एक भाग आहे.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 11:01 am | अरुंधती

सरदार जोक्स चालत असतील तर हे घ्या :

सरदारणी : अहो, लवकर उठा, उठा बरं!

सरदार : अगं, काय कटकट आहे तुझी! रात्रीचे २ वाजलेत! कशाला उठवतेस मला?

सरदारणी : अहो, तुम्ही झोपेची गोळी घ्यायला विसरलात म्हणून उठवलं!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 11:30 am | अरुंधती

पती : माझा मित्र एवढ्या शांत स्वभावाचा आहे की कोणत्याही परिस्थितीत तो आपले मानसिक संतुलन अजिबात ढळू देत नाही

पत्नी : कसं काय?

पती: परवा आम्ही त्याच्या अपार्टमेंट बिल्डींगबाहेर उभे होतो. वरून एका खिडकीतून एका बाईने भस्सदिशी वरण खाली ओतले. ते नेमके माझ्या मित्राच्या डोक्यावर पडले. आम्ही वर पाहिले तर ती खिडकी त्याच्याच स्वयंपाकघराची होती आणि खिडकीत हातातले रिकामे पातेले घेऊन त्याची पत्नीच उभी होती.

पत्नी: बरं मग?

पती: मग काय? माझा दोस्त शांतपणे वर बघून पत्नीला म्हणाला, "अगं, जरा कालची शिल्लक राहिलेली चपाती पण टाक ना! जेवणच होऊन जाईल!"

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 11:43 am | अरुंधती

दिल्ली जाने वाली एक बस खचाखच भर चुकी थी। एक बुढिया बस रुकवा कर चढ गई। कंडक्टर के मना करने पर उस ने कहा मुझे ज़रुरी जाना है। किसी ने बुढिया को सीट नही दी। अगले बस स्टैंड से एक युवा सुंदर लडकी बस मे चढी तो एक दिल फैंक युवक ने अपनी सीट उसे आँफर कर दी और खुद खडा हो गया। युवती ने बुढिया को सीट पर बैठा दिया और खुद खडी रही । युवक अहिस्ता से बोला, " मैने तो सीट आप को दी थी।" इस पर युवती बोली, "धन्यवाद, लेकिन किसी भी चीज पर बहन से ज्यादा मां का हक होता है।"

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 11:45 am | अरुंधती

पत्‍नी अपने लिए बाज़ार से एक नई ड्रैस लेकर आई तो उस ड्रैस को देखकर पति गुस्से में बोला," यह तुम क्या पारदर्शी ड्रैस उठा लाई हो, इस मे तो आर- पार सब दिखाई देता है।" पत्‍नी मुस्कुराकर बोली, " आप भी बडे भोले हो, भला जब मैं इस ड्रैस को पहन लूंगी तो आर- पार क्या दिखाई देगा?"

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 12:08 pm | अरुंधती

मुलीच्या घरी कांदेपोह्यांचा कार्यक्रम चालू असतो.
मुलगी : तुम्ही काय करता?
मुलगा (मिष्किल स्वरात) : आंघोळ! (हा हा हा)

मुलगा : बरं ते जाऊ देत, तुला काय येतं?
मुलगी (चिडून) : घाम! (ह्यँ ह्यँ ह्यँ)

मुलगा (वरमून) : बरं, तुला गाता येतं का?
मुलगी : हो ssss
मुलगा : मग गाऊन दाखव!
मुलगी : तो काय बाहेर वाळत घातलाय
मुलगा : वाळू दे वाळू दे!

ह्यावर मुलगी बाहेर जाऊन मूठभर वाळू आणून मुलाच्या हातात देते आणि मुलगा जागीच मूर्च्छित होतो.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 2:41 pm | विसोबा खेचर

हा जोक महिलांशी निगडीत नाही तरी पण चांगला आहे म्हणून येथे द्यावासा वाटला -

एकदा एक जपानी पर्यटक भारतात येऊन कुठल्याश्या गुंफा पाहात असतो.. त्याच्यासोबत लोकल गाईड असतो आणि त्याला माहिती पुरवत असतो..

तेवढ्यात तो गाईड तिथल्याच एका कोपर्‍यात लघुशंका फेडायला जातो.. हे पाहून अचंबित झालेला जपानी पर्यटक त्याला म्हणतो,

"आमच्या देशात जर कुणी अश्या महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी लघुशंका फेडू लागला तर पोलिस येऊन पकडतात..!"

त्यावर तो गाईड म्हणतो,

"आयला, कमाल आहे.. तुमच्याकडे पोलिस पकडतात? आमच्याकडे पोलिस अशी मदत करत नाहीत, आमचं आम्हालाच पकडावं लागतं! =))

तात्या.

दिपक's picture

8 Mar 2010 - 3:20 pm | दिपक

=)) =)) =)) =))

=)) =)) =)) =))

टारझन's picture

8 Mar 2010 - 9:52 pm | टारझन

च्यायला ... आमच्याच कार्ल्या च्या जोक ला काय लागलं व्हतं कुणास ठाऊक :)
असो .. त्या प्रतिसादाने ही अंमळ ८-९ व्यनिंची पावती दिली ... उडला तरी बाहत्तर त्र्याहत्तर :)

आमचा प्रतिसाद गुपचुप उडवणार्‍याचं सुकलं कार्लं =))

- कार्लेश सुकटणकर

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2010 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या जंतुकाकांना आपली पुप्यानी पाठवलेली पि डी एफ फॉरवर्ड कर बर. ;)

©º°¨¨°º© परा झिंटा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

लंबूटांग's picture

10 Mar 2010 - 8:20 pm | लंबूटांग

काल परवाच कोणीतरी उदाहरण विचारत होते ना रे टार्‍या? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Mar 2010 - 4:44 pm | बिपिन कार्यकर्ते

स्थळ : रेल्वे स्टेशनावरची तिकिट खिडकी.
वेळ : पंजाब मेल येण्याची.

खिडकीसमोर मोठी रांग... बरेच सरदारजी रांगेत उभे.

पहिला सरदारजी : एक पंजाब मेल दे दो...
दुसरा सरदारजी : एक पंजाब मेल...
तिसरा सरदारजी : एक पंजाब मेल...
चौथा सरदारजी : एक पंजाब मेल...

एक सरदारनी पण असते, तिचा नंबर येतो...

सरदारनी : एक पंजाब फीमेल...

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

8 Mar 2010 - 4:47 pm | नितिन थत्ते

अरे तुम्ही महिलांचे जोक सांगताय की सरदार महिलांचे?

नितिन थत्ते

उल्हास's picture

8 Mar 2010 - 8:43 pm | उल्हास

भारतीय महिलां नायगरा धबधबा पाहण्यास जातात. गाईड माहीती
सांगताना म्हणतो या धबधब्याचा आवाज २ की .मी . पर्यन्त ऐकु येतो
बायांनो आपण थोडावेळ शांत राहीलात तर तुम्हालाही तो ऐकु येईल

चिंतातुर जंतू's picture

10 Mar 2010 - 2:44 pm | चिंतातुर जंतू

प्रतिसाद देणार्‍या सर्वांस धन्यवाद. आपला प्रतिसाद उडवला गेला असल्यास कृपया तो आम्हांस व्यक्तिगत निरोप म्हणून पाठवावा, ही विनंती. दुष्काळी विभागांप्रमाणे आमचाही अनुशेष मात्र अजून भरून निघालेला नाही, त्यामुळे आणखी विनोद सुचल्यास तेही येथे टाकावे.

एक विनोद आमच्याकडून -
प्रत्येक भारतीय महिला राणी लक्ष्मीबाई का असते?
लग्नाआधी तिला राणीसारखी वागणूक मिळते. लग्नानंतर काही काळ ती लक्ष्मी असते. थोडे वय झाले की ती निव्वळ (कामवाली) बाई राहते.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

अरुंधती's picture

11 Mar 2010 - 10:19 pm | अरुंधती

यांच्या बायका चिडल्या की काय म्हणतात?

पायलटची बायको : गेलास उडत.
मंत्र्याची बायको : पुरे झाली तुमची आश्वासनं.
शिक्षकाची बायको : मला नका शिकवू.
रंगा-यांची बायको : थोबाड रंगवीन.
धोब्याची बायको : चांगली धुलाई करेन.
सुताराची बायको : ठोकून काढीन.
तेलीची बायको : गेलात तेल लावत.
न्हाव्याची बायको : केसाने गळा कापलात की हो.
डेंटिस्टची बायको : दात तोडून हातात देईन.
शिंप्याची बायको : मला शिवलंस तर याद राख.
अभिनेत्याची बायको : कशाला नाटक करता.
वाण्याची बायको : नुसत्या पुड्या सोडू नका.
आणि
बातमीदाराची बायको : बाता मारणं बंद करा.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

11 Mar 2010 - 10:25 pm | अरुंधती

बंडू बावळेचा चेहरा त्या दिवशी पाहण्यासारखाच झाला होता. दोन्ही गाल सुजले होते आणि दोन्ही गालांवर पाच पाच बोटं स्वच्छ उमटली होती.

ते पाहून बंडूच्या मित्रानं काळजीनं विचारलं, काय झालं रे, बंडू ? , गाल कुणी लाल केले तुढे ?
अरे यार, या बायकांचा स्वभावच तेढा !, बंडू म्हणाला.

ते ऐकून मित्राने, का रे असं काय झालं ? असे विचारलं.

अरे, मी त्या मल्टीप्लेक्समध्ये मी सिनेमा पाहायला गेलो होतो. तिथल्या त्या सरकत्या जिन्यावर माझ्यापुढेच एक पोरगी उभी होती. तरुण, आकर्षक, भरदार, तिचा स्कर्ट अतिशय तोकडा होता आणि तो एका बाजूनं चुरगाळून जरा वर सरकला होता. तिला सांगून उगाच एम्बॅरस करण्याऐवजी आपणच नीट करावा, असा विचार करुन मी तो स्कर्ट व्यव्स्थित केला तर तिची काय समजूत झाली देव जाणे, वळून खाडकन मुस्कटातच भडकावली माझ्या...

अरेरेरे ! फार वाईट झालं ! या पोरी असतातच अशा चक्रम ! मित्र सहानुभूतिपूर्वक म्हणाला.
एवढ्यात त्याला काहीतरी आठवले म्हणून त्याने विचारले, अरे पण हे झालं एका गावाच !

दुसरा गाल कुणी रंगवला ?

तिनेच, बंडू म्हणाला.

पण का ? , मित्राने विचारलं.

अरे मी स्कर्ट नीट केलेला तिला आवडला नाही, तेव्हा मी विचार केला की कदाचित तिला तसा चुरगाळलेला आणि सरकलेलाच स्कर्ट आवडत असेल,

त्यामुळे मी तो पूर्वीसारखाच करायला गेलो आणि...........

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/