जरा मदत करा हो.....

अनंत छंदी's picture
अनंत छंदी in काथ्याकूट
27 Feb 2010 - 1:07 pm
गाभा: 

मित्रहो...
गेले काही दिवस मी एका समस्येने त्रस्त झालो आहे. माझ्या संगणकात smitfraud-c.gp
हा विषाणू एसव्हीसीहोस्ट.एक्सई ह्या फाईलला चिकटला आहे, अनेक उपाय केले पण तो जात नाही. स्पायबॉटने काढून टाकला तरी पुन्हा येतो आणि इतर फाईल्सना चिकटायला सुरुवात करतो. काय करावे. जरा मदत करा! :(

प्रतिक्रिया

बोका's picture

27 Feb 2010 - 4:45 pm | बोका

तुम्ही अनेक उपाय करुन दमलेले दिसताय ...
आता रोगाच्या मुळावरच वार करा.
विंडोज का वापरताय याची कारणे शोधा.
सबळ कारण न सापडल्यास, लिनक्स वापरा.
उबुंटु वापरायला सोपे आहे.

मराठे's picture

27 Feb 2010 - 9:13 pm | मराठे

बोकाशी सहमत.
अर्थात सुरवातीला लिनक्स वापरताना थोडा त्रास होईल पण काही दिवसांनी सवय होईल.
पण जर संगणक कचेरीचा असेल तर कदाचीत तुम्हाला विन्डोज शिवाय पर्याय नसेल. (अजुन पर्यन्त कोणत्याही कचेरीत लिनक्स डेस्कटॉप वापरताना मी तरी बघितलेलं नाही. )

गूगल वर शोधताना सापडलेला हा दुवा पहा:
http://forums.pcpitstop.com/index.php?showtopic=155784

II विकास II's picture

27 Feb 2010 - 9:22 pm | II विकास II

शक्य असेल तर फॉरमॅट करा ना.
----

२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

टारझन's picture

27 Feb 2010 - 10:19 pm | टारझन

कंप्युटर बदला :)

स्वप्निल..'s picture

28 Feb 2010 - 5:42 am | स्वप्निल..

इथे बघा .. काही उपयोग होतो का -

http://forums.pcpitstop.com/index.php?showtopic=155784

मदनबाण's picture

28 Feb 2010 - 6:25 am | मदनबाण

SuperAntiSpyware आणि Malwarebytes AntiMalware वापरुन पहा.
काही लिंक्स :---
http://www.scanforfree.com/07/smitfraud-c.gp-removal.html
http://noahdfear.geekstogo.com/click%20counter/click.php?id=1

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.