युनिकोडी मोडीचा मसुदा व आवाहन

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in काथ्याकूट
15 Feb 2010 - 12:38 pm
गाभा: 

सुघड सुबक अक्षरवळणे जपणार्‍या मोडी लिपीस युनिकोड मध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. मिशिगन विद्यापीठातील डॉ. अशोक पाण्डेय यावर काम करत आहेत.

प्राथमिक मसुदा आपणास
येथे सापडू शकेल. मोडी चे युनिकोडीकरण निर्दोष व्हावे याकरिता मोडी प्रेमी व तज्ज्ञांकडून सूचना/ टीपण्ण्या अपेक्षित आहेत.

तुम्हाला मोडी येत नसली पण मोडी वर काम करणार्‍या व्यक्ती/संस्था माहिती असतील किंवा त्यांचे योगदान उपयुक्त ठरेल असे वाटल्यास त्याबाबतची माहिती/संपर्क अवश्य द्या.

हा मसुदा जास्तीत जास्त मोडीप्रेमींपर्यंत पोचवण्याचा कोणता मार्ग सुचल्यास जरूर सांगा.


युनिकोड का?
संगणकाच्या दुनियेत युनिकोड हा प्रमाण अक्षरसंच आहे (Standard Character Set ) फार पूर्वी लोकसत्ता नेटवर वाचण्यासाठी मिलेनिअम वरूण नावाचा फॉण्ट इन्स्टॉल करावा लागायचा हे जुन्या नेटकरांना आठवत असेल. प्र्त्येक संकेतस्थळ स्वतःचा फॉण्ट वापरी. तुम्ही संगणक बदलला वा फोर्मॅट केला की पुन्हा फॉण्ट इन्स्टॉल करावा लागे. युनिकोडमुळे हे चित्र बदलले. आज हे संकेतस्थ्ळ आणि अशी कितीतरी मराठी, कानडी स्वाहिली वगरे अनांग्ल संस्थ्ळे सुरळीत चालतात ते युनिकोडच्या भरवश्यावर.

मानवी संस्कृतीतील कोणत्याही जिंवत वा मृत ज्ञात लिपीचे संगणीकरण हे युनिकोडचे ध्येय ! नाना भाषा व लिप्या बघ्ता हे काम किती जटिल आहे याची कल्पना करत येते.

असे म्हणतात की undigitized (असंगणकीय स्वरूपातील) ज्ञान नष्ट होऊ शकते. कदाचित अतिशयोक्ती असली तरी मोडीचा समृद्ध वारसा टिकवायचा असेल तर मोडी चे युनिकोडीकरण किती गरजेचे आहे ते लक्षात यावे!

मसुद्यावरील प्रतिक्रिया व चर्चा अपेक्षित आहे.
धन्यवाद!

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

15 Feb 2010 - 1:37 pm | चिरोटा

चांगला उपक्रम आहे. मध्यंतरी माझा मोडी फाँन्ट्स बनवण्याचा विचार होता. पण नेटवर कोठेच माहिती मिळत नव्हती.
मोडीला unicode characters मिळाले की देवनागरी भाषेत लिहिलेली वाक्ये मोडीत कशी दिसतील ते प्रॉग्रॅम बनवून पाहता येइल.
भेंडी
P = NP

उपक्रमास शुभेच्छा!

परंतु ह्याच्या उपयोगितेबद्दल शंका आहेत. मोडीत आता नव्याने काही लिखाण होणे नाही. पूर्वीचे लिखाण स्कॅन करूनदेखिल साठवता येते. त्यासाठी स्वतंत्र अक्षरसंच बनवण्याची गरज नाही, असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Feb 2010 - 3:36 pm | प्रकाश घाटपांडे

धन्यवाद अभिरत
सदर माहिती इतिहास व मोडीलिपी तज्ञ श्री मंदार लवाटे यांना पाठवली आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नितिन थत्ते's picture

15 Feb 2010 - 5:29 pm | नितिन थत्ते

सुनीलशी सहमत आहे. मोडीत नव्याने लेखन करण्याची काय गरज?
मोडी लिपी झटपट लेखन करण्यासाठी अस्तित्वात आली. म्हणजेच जोपर्यंत हाताने लिहायचे आहे तोपर्यंतच मोडी वापरणे योग्य.
काँप्युटरसाठी मोडी लिपी अगदी अनावश्यक.

नितिन थत्ते

इंटरनेटस्नेही's picture

3 Aug 2011 - 2:07 am | इंटरनेटस्नेही

.

@सुनिल – मोडी लिपीत आता काही लिखाण होत नाही हा केवळ समज आहे. मोडी लिपीत व्यापक प्रमाणावर लिखाण होत नाही असे म्हणणे योग्य होईल. हे पहा - http://www.facebook.com/album.php?id=1065674525&aid=2103644

@प्रकाश – या उपक्रमात श्री.मंदार लवाटे किती सहभाग देतील याची सशंकता आहे.

@नितिन – मोडी एक सांस्कृतीक वारसा म्हणून तिचा पुरस्कार झाला पाहीजे. त्यात लिखाण झाले पाहीजे. अल्पसे लिखाण होतंही असते. श्रीमोडीवैभव नावाचे माझे ५०-५० मोडी-देवनागरी अशी याची रचना आणि मांडणी असलेले त्रैमासीक आहे. श्री.धोंडोपंत आपटे यांचे विदेशातील मराठी आणि इतर मोडी लिपी जाणकार यांच्या कागदोपत्री संपर्क हा मोडी लिपीत असतो. http://dhondopant.blogspot.com. मी इतिहास अभ्यासक आणि मोडी लिपी जाणकार आणि संशोधक असल्याने मला पत्र मोडी लिपीत येता आणि मी इतिहास संशोधकांना मोडी लिपीतंच पत्र लिहीतो. असा मी एकटा नाही.
http://modi-script.blogspot.com

rajeshkhilari's picture

13 Apr 2011 - 5:40 pm | rajeshkhilari

@ अभिरत भिरभि-या – युनिकोड मोडी लिपीबाबत अनेकांनी संकल्प सोडला. काही जणांनी सुरुवातही केली होती. बर्कली युनिवर्सिटीचे श्री.अंशुमन पांडे http://std.dkuug.dk/JTC1/SC2/WG2/docs/n3780.pdf यांचा त्यांच्या तर्फे उपक्रम चालू आहे.
मुंबईत श्री.शुभानन गांगल [ marathi.unicode@yahoo.com ] यांनी गेल्या जानेवारी महिन्यात मोडी युनिकोड तयार करायला घेतले. सुरुवातीला मी त्यांच्या संपर्कात होता. आता याची प्रगती कुठ पर्यंत आली आहे हे ठाऊक नाही.

एकछत्र असे प्रयत्न कुठेच नाहीत. व्यक्तीगत बरेच सुरु आहेत. सोमेश बारटक्केंनी अनेक वर्षांपूर्वी “Hemadree” नावाचा true type font आणला. फार मोठी सुरुवात सोमेशने करून दिली. पण ती बालबोधी सारखी आहे. पुढे सरकायलाच हवे. युनिकोड कसे करायचे हे तांत्रीक विज्ञान माझ्याकडे नाही पण मोडी लिपीच्या बारकाव्यांचे ठोस ज्ञान मात्र माझ्याकडे आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Apr 2011 - 8:22 pm | llपुण्याचे पेशवेll

झक्कास. अभिरतने चिकटवलेल्या मोडी प्रस्तावात क ते ज्ञ या अक्षरांची बारखडी मिळाली. पण सर्व स्वर, सर्व व्यंजने आणी बाराखडी मिळाली नाही. कोणी चिकटवेल काय? मी माफक प्रमाणात मोडी शिकण्याचा प्रयत्न केला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2011 - 1:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले एक मिपाकर श्री विश्वास कल्याणकर हे मोडी लिपीचे जाणकार आहेत.
काही मदत होते का पाहा....!

उपक्रमवरील चर्चेचा एक दुवा..!

-दिलीप बिरुटे

चांगली कल्पना........
मोडी युनिकोड वर यायलाच हवी... ती मराठीची विशेष लिपी आहे. तिच्या वापराने महाराष्टाची अस्मिता ही जागृत होईल, व मराठीला ही उर्जा मिळेल.
मी स्वतः गेली १० वर्षे मोडीतच स्वाक्षरी करीत आहे. त्यानिमित्ताने मी मोडीशी संपर्क कायम ठेवला आहे.
एकच शंका आहे, मोडीची कुठली अक्षरे फोण्ट नियमित करणार ? कारण शिवपूर्वकालापासुन पेशवेकाल व नंतर आधुनिक कालापर्यंत मोडीची अक्षरलेखन स्टाईल बदलत आली आहे............

@ पुण्याचे पेशवे - सर्व स्वर आणि व्यंजन http://modi-script.blogspot.com इथे मिळतील.

@ईश आपटे - पेशवेकालीन मोडी लिपीला पर्याय नाही. तिच सर्वोत्त्म आणि आकर्षक शैलीत आहे.

मोडी लिपीचा युनिकोड फाँट तयार झाला आहे. केवळ युनिकोड काँसर्शीयमची मान्यता मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. ते या महिंन्यात होईल. त्यानंतर इंटर्नेटवर मोडी लिपीत टाईप करता येईल. म्हणून ज्यांना येत नाही त्यांनी लवकरात लवकर शिका.

मोडी लिपी बाबत ताज्या घडमोडींची माहिती करून घेण्यात करीता या मोडी लिपी समूहाला भेट द्या - https://www.facebook.com/groups/123786634305930/?ap=1