आजची परिस्थिती (माय नेम ईज खान)

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in काथ्याकूट
14 Feb 2010 - 1:22 pm
गाभा: 

सरकार : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा माय नेम ईज खान बघा. नाही तर....

विरोधी पक्ष : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा माय नेम ईज खान बघाल तर याद राखा.

मिडीया : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा फक्त माय नेम ईज खान विषयीच चर्चा करा.

सामान्य जनता कुठे दिसते आहे का हो या सगळ्यामधे ??????????????

आहो जनता आहे कुठे ???
ती कालच्या स्फोटात.................................................

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Feb 2010 - 1:24 pm | विसोबा खेचर

आहो जनता आहे कुठे ???
ती कालच्या स्फोटात.................................................

!!!

तात्या.

शाहरुख's picture

14 Feb 2010 - 2:03 pm | शाहरुख

सरकारने शाहरुख खानचे चोचले पुरवण्यासाठी चित्रपटाला पोलिस संरक्षण दिले असं का वाटतंय सगळ्याना ??

एका हिंदूवादी म्हणवणार्‍या पक्षाची एका मुसलमान असलेल्या नटाशी शब्दिक चकमक चालू असताना, हिंदू-मुसलमान दंगलींचा इतिहास आपल्याला असल्याने, सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायला नको का ? नाहीतर चित्रपटाचे निमित्त होऊन नसती आफत यायची शक्यता नव्हती का ? स्वतःचा फायदा उठवण्यासाठी इश्श्यु शिवसनेने उभा केला का शाहरुखने हा मुद्दा जरा बाजूला ठेवू, पण सरकारने खबरदारी घेतली नसती आणि काही झाले असते तर ? आपण (तुम्ही आणि मी) सरकारच्याच नावाने बोंबा मारल्या नसत्या का ?? कुणीतरी दुसर्‍या एका धाग्यावर लिहिलंय की "इतर २ चित्रपटांना न मागता सुरक्षा का नाही दिली"....मला तरी सरकारने शाहरुखच्या पिक्चरबाबत नाईलाजाने का होईना पण जास्त काळजी घेणे गरजेचे वाटले.

पोलिसांना चित्रपटासाठी वॉचमनगिरी करावी लागली ही गोष्ट निश्चितच खरी आणि तुमच्या-माझ्यासाठी दुर्दैवी आहे पण मी तरी याचा दोष सरकारला देणार नाही.. याचा दोष शिवसेना किंवा शाहरुख पैकी एकाचा किंवा दोघांचाही आहे. ज्यांना शिवसेनेचा दोष वाटतो त्यांनी सेनेला पाठिंबा देऊ नये..ज्यांना शाहरुखचा वाटतो त्यांनी सिनेमा बघू नये.

अजून एक स्फोट घडवून अतिरेक्यांनी सरकारची, पोलिसांची , "इंटेलिजन्स" ब्युरोची, तुमची आणि माझी पुन्हा एकदा ** मारली आहे.बाकी काय बोलणार ??

मी_ओंकार's picture

15 Feb 2010 - 12:55 am | मी_ओंकार

सविस्तर प्रतिक्रिया इथे दिलेली आहे.

- ओंकार.

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Feb 2010 - 3:17 am | अक्षय पुर्णपात्रे

शाहरुखशी सहमत आहे.

मराठे's picture

15 Feb 2010 - 3:18 am | मराठे

१००% सहमत.

शुचि's picture

15 Feb 2010 - 4:01 am | शुचि

चांगला मुद्दा मांडला आहे. सहमत!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

देवदत्त's picture

15 Feb 2010 - 7:01 pm | देवदत्त

तुमचे म्हणणे एका दृष्टीने बरोबर आहेत. पण काही गोष्टींबद्दल आणखी सांगावेसे वाटले म्हणून लिहित आहे.

सरकारने शाहरुख खानचे चोचले पुरवण्यासाठी चित्रपटाला पोलिस संरक्षण दिले असं का वाटतंय सगळ्याना ??
सुरक्षेच्या दॄष्टीने कमी पण फक्त शिवसेनेला कमीपणा यावा हयाकरीता जास्त म्हणून केले हेच दिसते.

पोलिसांना चित्रपटासाठी वॉचमनगिरी करावी लागली ही गोष्ट निश्चितच खरी आणि तुमच्या-माझ्यासाठी दुर्दैवी आहे पण मी तरी याचा दोष सरकारला देणार नाही..
पोलिसांना जे सांगितले ते करावे लागते, त्यांचा दोष नाही. पण गृहमंत्री आणि इतरांना आपल्या लवाजम्यासह सिनेमागृहात जाण्याची गरज काय होती? लोकांना सांगू इच्छित असाल की आम्ही सिनेमागृहात सिनेमा पाहिला तुम्हीही पहा, काही धोका नाही, तर त्यात फरक आहे. त्यांच्या आजूबाजूला ५० सुरक्षारक्षकांचा गराडा असतो. सामान्य माणसाच्या नाही.

आणि एक मुख्य मुद्दा म्हणजे , सिनेमाला संरक्षण देणे हे तेवढे गरजेचे नाही. जर मुळातच देशातील लोकांना सुरक्षा देण्यात पोलिसांची संख्या कमी आहे, तर ते लोकांना सांगू शकतात की सिनेमाकरीता आम्ही इतर ठिकाणची सुरक्षा कमी नाही करू शकत, त्यापेक्षा सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकला. भले इथे शिवसेना वरचढ झाली असती, पण वास्तव कारण दिल्याने लोकांचा सरकारवर विश्वास वाढला असता.

ज्यांना शिवसेनेचा दोष वाटतो त्यांनी सेनेला पाठिंबा देऊ नये..ज्यांना शाहरुखचा वाटतो त्यांनी सिनेमा बघू नये.
आणि सरकारचे काय? त्यांचे दोष झाकूनच ठेवायचे का? शिवसेनेने स्वतःच्या फायद्याकरीता हा मुद्दा उचलला असेल. पण काँग्रेस ही स्वतःच्या फायद्याकरीता असले वाद चिघळू देते हेच दिसत आले आहे.

असो, हे नेहमीच चालणार आहे आता.

शाहरुख's picture

16 Feb 2010 - 2:09 am | शाहरुख

शिवसेनेला कमीपणा यावा हयाकरीता..

फक्त यासाठी संरक्षण दिले असे मला तरी नाही वाटत पण शिवसेनेने मुर्खपणा करुन आयता चान्स दिल्याने सरकारने याचा राजकीय फायदा घेतला हे खरं..

गृहमंत्री आणि इतरांना आपल्या लवाजम्यासह सिनेमागृहात जाण्याची..

तुमचे बरोबर आहे..सुरक्षा रक्षकांच्या घोळक्यात बसुन असले नाटक करायची काहीच गरज नव्हती. (अवांतर - मागच्या वर्षी बॅडमिंटनच्या हैद्राबाद ओपन मधे दहशतवादाचे सावट असल्याने परदेशी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली होती. चिदंबरम यानी तेंव्हा सुरक्षा न घेता प्रेक्षकांत बसुन सामना बघितला होता..आवडले होते मला.)

आणि एक मुख्य मुद्दा म्हणजे , सिनेमाला संरक्षण देणे हे तेवढे गरजेचे नाही. जर मुळातच देशातील लोकांना सुरक्षा देण्यात पोलिसांची संख्या कमी आहे, तर ते लोकांना सांगू शकतात की सिनेमाकरीता आम्ही इतर ठिकाणची सुरक्षा कमी नाही करू शकत, त्यापेक्षा सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकला. भले इथे शिवसेना वरचढ झाली असती, पण वास्तव कारण दिल्याने लोकांचा सरकारवर विश्वास वाढला असता.

सरकारला जर आधीच माहिती असेल की शनिवारी संध्याकाळी ६ ला अतिरेकी जर्मन बेकरीत स्फोटकं ठेवायला येणार आहे आणि तरीही सरकारने उपलब्ध असलेले ४ पोलिस मंगला टॉकीजला ६ च्या 'माय नेम..' च्या खेळाला पाठवले असतील तर सरकारने चित्रपटाला (खरं तर चित्रपटाला नाही पण तरीही) संरक्षण देण्यास प्राधान्य दिले असे आपण म्हणू शकतो.तसे नसावे अशी अपेक्षा..

आय.पी. एल. - २ च्या वेळेस केंद्र सरकारने आयोजकांना सांगितले होतेच ना की लोकसभा निवडणूका असल्याने स्पर्धा त्या वेळेत भरवू नका म्हणून !! चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलायचे तर नक्की किती काळ पुढे ढकलायचे ?

आणि सरकारचे काय? त्यांचे दोष झाकूनच ठेवायचे का?

अर्थातच नाही...अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणणे हे सर्वस्वी सरकारचेच अपयश आहे.माझाही सरकारवर राग आहेच की..पण म्हणून वड्याचे तेल वांग्यावर कशाला काढायचे ?

असो, हे नेहमीच चालणार आहे आता.

होप नॉट !!

विशाल कुलकर्णी's picture

15 Feb 2010 - 7:05 pm | विशाल कुलकर्णी

मला तर वाटते की सरकारने बरोबर वेळ साधून काही दिवसापुर्वी परत ऐरणीवर आलेल्या महागाईवाढी च्या मुद्द्याला पद्धतशीरपणे बगल दिली आहे. माय नेम.... च्या नादात विरोधी पक्ष आणि इव्हन जनता देखील तो मुद्दा काहीकाळापुरता का होइना विसरली आहे. शाहरुखच्या खांद्यावर बंदुक ठेवून सरकारने बरोब्बर नेम साधला आहे. सद्ध्या सगळे (चॅनेल्सहीत) शाहरुखचा विजय आणि सेनेचा पराजय यावरच बोलताहेत. या नादात सामान्य माणसाचा केवढा मोठा पराभव झालाय.... who cares? :-(

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अन्या दातार's picture

24 Feb 2010 - 12:32 pm | अन्या दातार

सुरक्षा व्य्वस्थेचा बोजवारा उडू नये म्हणून सेना व शाहरुख यांच्यात समझोता/समेट घडवून आणला असता तर:
१. पोलिसांना नसती वॉचमनगिरी करायला लागली नसती.
२. पुण्यात बाँबस्फोट कदाचित टळला असता.
३. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास अबाधित राहिला असता.
जर दहशतवादी/नक्षलवादी/जिहादी यांच्याशी चर्चा होऊ शकते तर सेना तर राजकिय पक्ष आहे. त्यांच्याशी चर्चा करणे सोपे होतेच ना.
अशी चर्चा करण्यापेक्षा मुद्दा जास्त ताणून धरल्याने लोकांकडे काय संदेश गेला ते पाहू:
१. सरकारला शाहरुख महत्त्वाचा वाटतो; भलेही लोकांची सुरक्षा गेली तेल लावत.
२. सेनेवर कुरघोडी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसबळाचा नको तसा वापर केला.

शाहरुखची विधाने खरंच किती देशभक्तिपर आहेत? आपण कोणासाठी ही विधाने करत आहोत याचेही भान त्याला नाही. त्यासाठी हा एक दुवा.
http://blog.sureshchiplunkar.com/2010/02/paki-players-ipl-shahrukh-khan-...

तिमा's picture

14 Feb 2010 - 7:44 pm | तिमा

शिवसेनेसकट सर्वांनी काही वर्षांपूर्वी निघालेली 'एक चिडिया अनेक चिडियां' ही डॉक्युमेंटरी बघावी, म्हणजे आपला शत्रु नक्की कोण याचा बोध होईल! यु ट्युबवर उपलब्ध आहे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सुनील's picture

15 Feb 2010 - 10:13 am | सुनील

शाहरुख यांच्या ह्या धाग्यावरील आणि ओंकार यांच्या दुसर्‍या धाग्यावरील प्रतिसादाशी सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सरकारने तर वेळ साधलीच पण शहारुख पण काय कमीचा आहे का? >:P जर झेंडाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादामुळे प्रेक्षकांना त्रास नको या कारणास्तव आपल्या पहिल्यावहिल्या दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचे औदार्य अथवा सुजाणपणा अवधुत करु(शेवटी संस्कार म्हणतात ते यालाच) शकतो तर शहरुख देखिल तसे करु शकला असता....पण मुळातच माज असलेल्या व्यक्तीकडुन अशी अपेक्षा करणे म्हणजे आपलाच मुर्खपणा.सेनेने शाहरुखला केलेल्या विरोधाचे धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला राज्यसरकारकडुन व प्रसार माध्यमांकडून..........
स्वगतः 8>
कदाचित मराठी चित्रपटांना उदा :नटरंग,झेंडा,शिक्षणाच्या आयचा घो यासारख्यांना मिळणारा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद व प्रसिद्धी पाहुन शाहरुखच्या पोटात भितीने गोळा आला नसेल कशावरुन?(हे स्वप्न कधी पुर्ण होईल तो सुदिनच म्हणायचा!) <:P
आता सेनेने या दृष्टिकोनातुन विचार केला नाही आणि त्याचा परिणाम करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे म्हणण्याची पाळी सेनेवर आली..... :/
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

दादा कोंडके's picture

15 Feb 2010 - 10:09 pm | दादा कोंडके

सरकार म्हणतं, "कायदा हातात घ्याल तर याद राखा!"
आता दहशतवाद्यांनी घेतला हातात कायदा, आता काय Xट करणार आहेत?
उलटपक्षी, ज्या देशातून हे सगळं होतय, त्यांच्या बद्दल कळवळा असणार्‍या माजूर्ड्या शाहरुखच्या पिक्चरला संरक्षण?

पिक्चरला संरक्षण दिलं नसतं तर फार-फार तर पिक्चर थेटरात लागला नसता. पण इथं बाँबस्फोट झाले नसते.
म्हणजे सरकारला दहशतवाद्यांपेक्षा शिवसेना जनतेचा मोठा शत्रू वाटतो.

अमेरिकेने दोन महिन्यापुर्वीच भारतातल्या अमेरिकन लोकांना दक्ष राहण्याचा इशारा दिला होता. आणि तुमच्या Xडीखाली बाँब ठेवला तरी पोलिसांना पत्ता नाही!

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Feb 2010 - 10:12 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री कोंडके, संरक्षण दिले नसते तर हल्ला झाला नसता या गृहीतकास काही पाया आहे का?

दादा कोंडके's picture

15 Feb 2010 - 11:48 pm | दादा कोंडके

श्री कोंडके, संरक्षण दिले नसते तर हल्ला झाला नसता या गृहीतकास काही पाया आहे का?
हो, तुमचं बरोबर आहे. हल्ला झालाच नसता असं नाही, पण कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचं हे आपण कधी ठरवणार? चोर कुंपणावरून देखील उडी मारून येउ शकतो, पण आपण घराला कुंपण घालतोच ना.

२६/११ च्या हल्यानंतर काय झालं, आबांनी राजीनामा दिला. आता काय करणार? खरं तर नैतीक जबाबदारी म्हणून राजकीय संन्यासच घ्यायला पाहिजे.

राहूलच्या मुंबई वारीचे फलीत काय? हा प्रश्न विचारण्यापेक्षा, शिवसेनेनं जोडे उचलण्याचा इश्यु केला.
महागाई, बेरोजगारी, लोकसंख्या, दहशतवाद हे प्रश्न सोडून लोकाच्या अस्मितांशी किती दिवस खेळणार आहेत हे लोक?
कोंग्रेस, सरकार म्हणून खूप नालायक आहे. पण आपल्या दुर्दैवाने, सर्वात मोठे विरोधी पक्ष तर त्यांच्या अजेंड्यामध्येच गंडलेले आहेत. त्यामुळे चांगला पर्याय मिळणं खूपच अवघड आहे.