ज्ञानेश्वरीतली आकाशयात्रा?

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
3 Feb 2010 - 11:47 am
गाभा: 

शुचि चा http://www.misalpav.com/node/10919 हा लेख वाचून पसायदान च्या दोन ओळी आठवल्या.
संपूर्ण पसायदान एक सुंदर रचना आहे. पण मला ह्या दोन ओळी खूप भावल्या आहेत.
"चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु ||"

ह्या ओळींचा अर्थ खालील प्रमाणे सरळ सरळ लावण्याची खुप ईच्छा होते.------
चंद्रमे जे अलांछन- अनेक चंद्र जेथे आहेत अशा ग्रहाचा उल्लेख?
हे चंद्र डाग रहीत आहेत. म्हणजे उल्का पडून पडून खडबडीत झालेले नाहीत. म्हणजेच वातावरणाचे कवच असलेले.
मार्तंड जे तापहीन- असे अनेक सुर्य, जे तापहीन आहेत. (म्हणजे फार जास्त उष्ण नसलेले, असा अर्थ घ्यावा काय?)
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु- ज्ञानेश्वरीत, वास्तव्यास अनुकुल ग्रह निवडण्यासाठी मार्गदर्शन तर केले नसावे?

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

3 Feb 2010 - 12:28 pm | ज्ञानेश...

सज्जन पुरूषांची लक्षणे सांगतांना दिलेल्या उपमा/विशेषणे आहेत ती.
या आधीच्या ओवीमधेही या सज्जनांना-
-चालणारे कल्पतरू,
-चैतन्ययुक्त चिंतामणी
-बोलणारे अमृत
या उपमा दिलेल्या आहेत.

'ये मेरा प्रेमपत्र पढकर...' या गाण्यात पुढील ओळी आहेत-
"तुझे मै चाँद समझुंगा, मगर उसमें भी दाग है,
तुझे सूरज मै समझुंगा, मगर उसमें भी आग है !"

याबद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल !

शुचि's picture

4 Feb 2010 - 5:07 am | शुचि

+१
माझ्या वाचनात आणि ऐकीवात सज्जनांचा सन्दर्भच आला आहे.
दुसरं म्हणजे - दुसरी ओळ आहे " ते सदा सर्व सज्जना सोयरे होतु" मग जर ग्रहांबद्दल ज्ञानेश्वर महाराज बोलत असतील तर ते फक्त सज्जनांना सोयरे कसे होऊ शकतील? तेव्हा हा मुद्दा माझ्या मते मोडीत निघतो.

माफ करा वरील वाक्यात मी अर्थ लावाय्ला चुकले आहे. माझ्या कुवतीबाहेरची ओवी आहे. कॅरी ऑन.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2010 - 12:35 pm | llपुण्याचे पेशवेll

अलांछित (डाग नसलेल्या) चंद्राप्रमाणे शीतल आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि उपयोगी पण जराही उष्ण किंवा ज्याचे तेज दुसर्‍याला त्रास होणार नाही असे जे संतसज्जन आहेत त्यांच्या सत्संगाचा लाभ सर्वांना होवो. ते संतसज्जन सर्वांचे सोयरे (सोयिरा म्हणजे नुसताच नात्यातला नव्हे तर नात्यातला आणि त्या व्यक्तिबद्दल कणव असलेला) व्हावेत.

चूभूदेघे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2010 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते

लॅटरल थिंकिंग छान. अर्थ पण तशा प्रकारचा निघू शकतो. पण माऊलींना तो अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही. :)

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

3 Feb 2010 - 3:12 pm | विजुभाऊ

ज्ञानेश्वर माऊलीना मानवाजातीने दुसर्‍या ग्रहाचा शोध घेणे अभिप्रेत नसावे .

चतुरंग's picture

3 Feb 2010 - 8:28 pm | चतुरंग

ज्ञानियांच्या राजा, पुन्हा एकदा यावे लागणार तुम्हाला असं दिसतंय!

(रेडा)चतुरंग

मिसळभोक्ता's picture

4 Feb 2010 - 3:17 am | मिसळभोक्ता

अवतार सिनेमा हा पसायदानावर आधारित आहे का ? मला तरी तसे वाटते.

सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति, ही अथर्वशीर्षातील माझी आवडती ओळ. ही ज्ञानेश्वरांना उद्देशून लिहिली असावी का ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

4 Feb 2010 - 8:53 am | विकास

ज्ञानेश्वरांना यात नावे ठेवली गेली नसली तरी त्यांचे शब्द हे "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेतले आहेत असे वाटते. संपूर्ण पसायदान, त्या मागची पूर्वपिठीका समजून घेतल्यास ज्ञानेश्वर हे भावार्थ दिपिका म्हणून ना कुठली विज्ञान कथा लिहीत होते, ना जादूच्या दिव्याची अद्भूत कथा...

तरीदेखील, स्वा.सावरकरांनी (टाळकुटे जास्त झालेत म्हणून त्यांचे डोळे उघडे करण्यासाठी) ज्ञानदेवांवर केलेली टिका या निमित्ताने आठवली: "उत्तरेहून अल्लाउद्दीन खिल्जीची स्वारी येत आहे, इतके साधे रामदेवरायला सांगण्याचे, पोस्टमनचे काम देखील ज्ञानेश्वरांनी केले नाही." (ज्ञानेश्वरांबद्दल मला देखील आदर, कुतुहल आणि भक्ती आहे. तेंव्हा येथे कुणालाही मी टाळकुटे म्हणत नाही आहे, कृपया गैरसमज नको!)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)