काँटँगो आणि बॅकवर्डेशन म्हणजे काय ? (फायनान्स मधली टर्म आहे)

बट्ट्याबोळ's picture
बट्ट्याबोळ in काथ्याकूट
26 Jan 2010 - 8:49 pm
गाभा: 

काँटँगो आणि बॅकवर्डेशन म्हणजे काय ? सध्या बजेटिंग मधे गुंतलो आहे ... काही टर्म्स ची माहीती मराठीमधे कोणी
सांगितली तर कळायला सोप जातं मला :). क्रुपया थोडक्यात माहिती डाकवावी.

प्रतिक्रिया

अजय भागवत's picture

26 Jan 2010 - 9:13 pm | अजय भागवत

तुम्हाला बेसिक कंन्सेप्ट- फ्युचर्स, स्पॉट, मार्केट, डीलिव्हरी मंथ- माहित असल्यास पटकन सांगता येईल. कळवा, त्याप्रमाणे सांगतो. तसेच तुमच्या ह्या प्रश्नाच्या आशयाचा पण थोडा भाग कळवा- कमोडीटी कोणती आहे?

अजय भागवत's picture

26 Jan 2010 - 9:59 pm | अजय भागवत

काँटँगो-

अशी एखादी अट किंवा स्थिती ज्यात भविष्यातील "फ्युचर कॉन्ट्रॅक्टची" किंमत स्पॉट किंमतीपेक्षा जास्त होते. असे होण्याची अनेक कारणे असू शकतात जसे, एखाद्या कमोडीची साठवण करण्याचा खर्च, किंवा विम्याचा खर्च त्याच्या किंमतीत जमा होतो व भविष्यातील किंमत वाढते- जे घेणाऱ्याला तोट्याचे असते.

अट किंवा स्थिती- एखादा बदल, किंमतीची वाटचाल किंवा करार, जो दुसरा एखादे पाऊल टाकण्याआधी पूर्ण करायचा, विचारात घ्यायचा असतो. अशा अटी प्रामुख्याने एखाद्या कराराशी निगडीत असतात.

बदल- एखादा सातत्यतेने- वेळ व ठिकाण दोन्हीशी संबंधीत असलेला- घडणारा बदल, जो मानवीय हस्तक्षेपाशिवाय होऊ शकेल. हा बदल एखाद्या भविष्यातील बदल-साखळीचाही भाग असू शकतो, की जी बदल-साखळी एखाद्या पुर्वी घडलेल्या मोठ्या घटनेचे कारण असते.

किंमतीची वाटचाल, आणि स्टॉकचा व्हॉल्युम किंवा संपुर्ण मार्केटचा व्हॉल्युम.

एखादा कायदेशीर करार जो दोन किंवा अधिक संस्थांना त्याप्रमाणे काम करण्याला अथवा न करण्याला मदत करतो.

करार- कर्ज, वचननामे

delivery- कोणताही कायदेशीर हस्तांतरण किंवा मालकीहक्क मिळणे.

फ्युचर- एक मान्यताप्राप्त, हस्तांतरणीय असा करार जो, कमोडीटी, रोखे, चलन, इंडेक्सचा कायदेशीर हस्तांतरण किंवा मालकीहक्क मिळण्यासाठी एखाद्या पुर्वनियोजित किंमतीला पुर्वनियोजित तारखेला केलेला करार.
फ्युचरमधे खरेदीचा करारनामा केला जाणे बंधनकारक असते. (ऑप्शनच्या उलट). तरीही ह्यात दोन्ही बाजूंना समान धोक्याचा सामना करावा लागतो व तो कितीही मोठा असू शकतो. ऍसेटचे हस्तांतर ठराविक तारखेला होते.

स्पॉट- लगेचच मालकीहक्कांचे हस्तांतर होणे अशा स्वरुपाची खरेदी.

*******
बॅकवर्डेशन -

जेव्हा शेवटच्या डिलिव्हरी महिन्यात बाजाराची अशी स्थिती होते जेव्हा फ्युचरची किंमत जवळील डिलिव्हरी महिन्यातील किंमतीपेक्षा कमी असते.

फ्युचरची भविष्यातील किंमत जी, त्या करारात बांधिल असलेले दोन घटक त्या किंमतीला व्यवहार करण्यास वचनबद्ध असतात.

डिलिव्हरी महिना- ज्या महिन्यात फ्युचर कॉन्ट्रॅक्ट पुर्णत्वाला जाणार असते तो महिना.

ह्यात बाजाराची एखादी वैशिठ्यपुर्ण स्थिती कारणीभूत असते- बाजाराची अशी वैशिठ्यपूर्ण स्थिती ज्यात एखादी संस्था सहभागी होते, किंवा बाजारात तेव्हा एखादे नवे प्रॉडक्ट आणते. बाजाराची स्थितीचे वैशिठ्य असे सांगता येईल-अशावेळी जेव्हा त्या संस्थेचे कंम्पिटीटर बाजारात सक्रिय असतात, त्यांच्या कंपिट करण्याच्या तीव्रतेचा संबंध असतो, तसेच एकंदरीतच बाजाराची तेजी-मंदी विचारात घेतली जाणे.

अजय भागवत's picture

26 Jan 2010 - 10:02 pm | अजय भागवत

प्रकाटा

बट्ट्याबोळ's picture

26 Jan 2010 - 11:17 pm | बट्ट्याबोळ

अजयदादा धन्यवाद !!

फुल झेपलं !!!

आता गुगलींग करून अधीक माहिती मिळवण सोप्पं जाईल :)

थोडक्यात ही टर्म कोणीतरी पैसे तयार करण्यासाठी काढली आहे.
ज्याचे आम्ही शिकार होऊ पाहतो आहे !

पण काय करणार .. कराव लागणार.

माझी कमो: अ‍ॅल्युमिनियम.