"महाराष्ट्रा मधे बाकिच्यांना taxi परमिट न देण्याचा निर्णय नैतिक अधोगतिचा आहे काय ?"

बट्ट्याबोळ's picture
बट्ट्याबोळ in काथ्याकूट
20 Jan 2010 - 9:30 pm
गाभा: 

http://timesofindia.indiatimes.com/pollslist/2238809.cms

वरिल पोल मधे तुमच मत द्या .. पोल असा आहे :

"महाराष्ट्रा मधे बाकिच्यांना taxi परमिट न देण्याचा निर्णय नैतिक अधोगतिचा आहे काय ?"

नाही म्हणून उत्तर द्यावे !!

प्रतिक्रिया

II विकास II's picture

20 Jan 2010 - 10:36 pm | II विकास II

मत दिले आहे.

बाबुराव's picture

20 Jan 2010 - 10:46 pm | बाबुराव

सवाल काय कल्ला नाय

बाबुराव :)

अरे वाय झेड, लिन्क उघड आणि "नो" हे मत दे ...

मराठी कळलं नाही विंग्रजी कुठुन कळणार ?

बाबुराव's picture

20 Jan 2010 - 11:07 pm | बाबुराव

लिन्कला उघडून 'एस' ला मत टाकला

बाबुराव :)

चिरोटा's picture

21 Jan 2010 - 12:20 am | चिरोटा

येस निवडून बाबुरावांनी बट्ट्याबोळच करुन टाकला. :D

भेंडी
P = NP

शाहरुख's picture

21 Jan 2010 - 8:43 am | शाहरुख

श्री. बाबुराव - =))

श्री. बट्ट्याबोळ - 'रिग्रेसिव्ह स्टेप' मधे नैतिकता कुठे आली ?

सकाळमधे बातमी वाचली तेंव्हा नीट खुलासा झाला..वापरात नसलेल्या टॅक्सी-परवान्यांच्या नुतनीकरणासाठी सरकारने या अटी घातल्या आहेत.
१. टॅक्‍सीचालक हा १५ वर्षांपासून राज्याचा अधिवासी असला पाहिजे.
२. टॅक्‍सीचालकांना मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे बंधनकारक आहे.

यातील पहिली अट योग्य वाटते..आणि दुसर्‍या अटीचा फायदा करुन घेण्यासाठी प्रो. चाटेंची 'मराठी शिकवणी' सुरू होईल असे वाटते :-)

वाटलच होत !! म्हणुनच आधिच वाय झेड म्हणलं. विश्वास सार्थ ठरवलास !!!

निमीत्त मात्र's picture

21 Jan 2010 - 12:26 am | निमीत्त मात्र

अरे वाय झेड, लिन्क उघड आणि "नो" हे मत दे ...

मराठी कळलं नाही विंग्रजी कुठुन कळणार ?

बर्याच दिवसांनी मिपावर झणझणीत प्रतिसाद दिसला. बाबुरावांचे उत्तर तर त्यावर कडी =)) =))

टुकुल's picture

21 Jan 2010 - 11:01 am | टुकुल

हेच म्हणतो.. =)) =)) =D>
बर, लिंक उघडुन सांगितल्याप्रमाणे केले आहे ;)

--टुकुल

चिरोटा's picture

20 Jan 2010 - 11:02 pm | चिरोटा

मनसेला मिळणारा वाढता प्रतिसाद बघता ही 'आयडिया' निघाली असावी. खरे तर स्थानिक लोकांना प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे.असो.
संबंधित अधिकारी टेबलावरूनच पैसे घेवून काम करतील ही अपेक्षा!
भेंडी
P = NP

देवदत्त's picture

21 Jan 2010 - 1:01 pm | देवदत्त

ते मतदान सोडा. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपले नियम एका दिवसात बदलले. त्यांच्या मते मराठी सोबतच हिंदी किंवा गुजराती यापैकी किमान एक भाषा येणे पुरेसे आहे.
त्यांचा निषेध.

चिरोटा's picture

21 Jan 2010 - 1:45 pm | चिरोटा

टॅक्सी युनियनवाले कोर्टात गेले तर सरकारचे तोंड फुटायची शक्यता होती.म्हणून मत बदलले असावे.
भेंडी
P = NP

II विकास II's picture

21 Jan 2010 - 3:43 pm | II विकास II

नवीन वादाला तोंड फुटेल असे वाटते.

प्रशु's picture

21 Jan 2010 - 4:51 pm | प्रशु

असोकभे॑य्या चो॑हान कि जय हो..........

मुळात साडेचार हजार टॅक्सींना परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवेत हे तुर्तास मानून चालले तरि टॅक्सीचालकाचा व्यवसाय करण्याची तयारी तथाकथित साडेचार हजार मराठी युवकांची आहे का ?

रिक्षाचालकांच्या व्यवसायाचे चित्र पुरेसे स्पष्ट आहेच्....आंम्ही भले नाक्यावर उभे राहुन टिंगल टवाळ्या करु पण रिक्षा अथवा टॅक्सी चालवणे आमच्या प्रतिष्ठेला मारक आहे.......चुकुन माकुन या व्यवसायात आलोच तरी आंम्ही आमच्या मर्जीप्रमाणेच व्यवसाय करू......मनात असेल तरच भाडे स्विकारु रात्रीची झोप पुर्ण न झाल्यास दुपारची वामकुक्षी प्रवाश्याच्या नाकावर टिच्चुन घेऊच घेऊ......उर्मट्पणे प्रवाश्यांशी संभाषण करुच करु......जास्त पाउस असताना किंवा इतर कुठली आपत्ती असताना प्रवाशाकडे वाढीव भाडे सगळे नियम धाब्यावर बसवुन मागुच मागू कसे?या सगळ्या मराठी असणार्‍यांच्या अटी मान्य असतील तरच परवाने स्विकारु नाही तर तुंम्ही फुकट दिलेते तरी आंम्हाला ते नको.
असो पुन्हा एकदा मराठीचे राजकारण डो़के वर काढणार हे निश्चित.....
अशोकरावांनी स्वतःच्या मंत्रिमंडळाचा निर्णय फिरवाला ह्यात नवल ते काय्?धरसोड वृत्ती असणार्‍यांकडुन ठाम भुमिकेची व मुळात कणा हा अवयव नसलेल्यांकडून मराठी बाणा जपण्याची अपेक्षा करणे म्हणजे तद्दन मुर्खपणा.....
मराठीचा काथ्याकुट करायला अजुन एक आयता विषय आघाडी सरकारने दिलाय आता बसा कुटत आणि रवंथ करत.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

तसा कुठलाच अजेंडा समोर नसताना, मुख्यंत्र्यांनी मराठीची घोषणा करणे, एका दिवसात ती मागे घेणे आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी तोफ डागणे, हे सर्व शिस्तीत घडवल्यासारखे झाले आहे.

वास्तविक सरकारी अधिकार्‍यांनी, त्यांना दिलेल्या अधिकाराप्रमाणे, १५ वर्षे वास्तव्याचा पुरावा नीट तपासला, तरी पुष्कळ झाले. कोणत्याही राजकीय पुढार्‍याला यात तोंड घालायची काहीही आवश्यकता राहणार नाही, आणि तशी ती नसावीदेखिल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

21 Jan 2010 - 6:07 pm | विकास

वरील प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

एकीकडे सरकारी अधिकार्‍यांनी नियम पाळणे, ते पाळले जात आहेत का हे राज ठाकरेस हौस असल्यास त्याच्या माणसांनी आरटीआय चा वापर करून पहाणे आणि दुसरीकडे मराठी माणसांनी विविध क्षेत्रात जाण्याची तयारी गोष्टी झाल्या तरी पुरे...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

II विकास II's picture

22 Jan 2010 - 8:08 am | II विकास II

एकीकडे सरकारी अधिकार्‍यांनी नियम पाळणे, ते पाळले जात आहेत का हे राज ठाकरेस हौस असल्यास त्याच्या माणसांनी आरटीआय चा वापर करून पहाणे आणि दुसरीकडे मराठी माणसांनी विविध क्षेत्रात जाण्याची तयारी गोष्टी झाल्या तरी पुरे...
बर्‍याच मराठी मुलांना/माणसांना नाक्याकर टवाळ्या करुन रिक्षा भाड्याने द्यायला आवडते, एक निरिक्षण

लोकसत्ता:

कायदा म्हणतो
महाराष्ट्र मोटार वाहन नियम -२४
लोकसेवा वाहन चालविणाऱ्या चालकांचे अधिकारपत्र:- (१) मोटार कॅब वगळता लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र देण्यात आले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल. त्यासाठी शर्त अशी असेल की, त्या व्यक्तीला ती ज्या भागात वाहन चालविणार आहे, त्या भागाची भौगोलिक माहिती असल्याबद्दल आणि मराठीचे व त्या भागात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाऊ ज्ञान असल्याबद्दल प्राधिकाऱ्याला खात्री पटवून दिली पाहिजे.

शासनाचे स्पष्टीकरण
टॅक्सीचालकांना परवाने देण्याच्या निर्णयाबाबत अधिवासाचा कालावधी व भाषेच्या अनुषंगाने राज्य मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदींत कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (२) आणि नियम २४ (१) नुसार महाराष्ट्रात टॅक्सी चालविण्यासाठी अधिकृत परवानगी प्राप्त करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला ज्या क्षेत्रात तो टॅक्सी चालवू इच्छितो त्या क्षेत्राची माहिती असणे तसेच त्याला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आणि त्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे. तसेच अशा व्यक्तीकडे सक्षम महसूल अधिकाऱ्याने दिलेला १५ वर्षे अधिवासाचा दाखला असणे आवश्यक आहे.

एकलव्य's picture

23 Jan 2010 - 3:06 am | एकलव्य

...