११ मार्च ही धर्मवीर संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. सन १६८९ मध्ये ह्या महापुरुषाने आपला देह ठेवला. मुगलानी कपटाने पकडून त्यांना हाल हाल करुन ठार मारले.
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्या छाव्याला माझा त्रिवार मुजरा..
- (मराठी मावळा) शेखर
प्रतिक्रिया
11 Mar 2008 - 6:43 pm | सन्जोप राव
इतिहास, पुराणपुरुष, संस्कृतीरक्षक, परमपूज्य आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त यांच्यामुळे वगैरे सर्व- मग तिथे या संभाजी महाराजांपासून सांगलीत नक्षलवाद पसरवणार्या संभाजीराजांपर्यंत - आंणि त्यांची कवने गाणार्या सगळ्यांना कमरेपासून लवून कुर्निसात आणि शिरवाडकरांच्या चार ओळी-
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
कर पदस्थल त्यांचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा
सन्जोप राव
11 Mar 2008 - 7:35 pm | इनोबा म्हणे
छत्रपती संभाजी महाराजांना या मावळ्याचा मानाचा मूजरा...
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
11 Mar 2008 - 7:42 pm | llपुण्याचे पेशवेll
देश, धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था|
परमप्रतापी महातेजस्वी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था|
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
पुण्याचे पेशवे
11 Mar 2008 - 9:27 pm | सागर
छत्रपति संभाजी महाराजांना माझ्या एका मित्राकडून छोटासा मुजरा
- सागर
"आज ११ मार्च... छत्रपति संभाजी महाराज यांची ३१९ वी पुण्यतिथी ....आजच्याच दिवशी १६८९ साली क्रूर औरंगजेबाने अमानुष पद्धतीने त्यांना ठार मारले... ... मरण स्वीकारले पण धर्म बुडू नाही दिला अशा या शूरवीर छत्रपति संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम
- उदय गंगाधर सप्रे, ठाणे"
11 Mar 2008 - 11:01 pm | सर्वसाक्षी
धाकट्या छत्रपतींना प्रणाम!
12 Mar 2008 - 1:06 am | प्राजु
"या या शिवपुत्र संभाजीला मरणाची भिती??? अरे... या संभाजीच्या आरोळ्या सोड पण त्याच्या श्वासांचा आवाज सुद्धा तुला ऐकू येणार नाही" असे औरंगजेबाला निक्षून सांगणारा छावा एकदाच जन्मतो..
- (सर्वव्यापी)प्राजु
12 Mar 2008 - 11:40 am | धमाल मुलगा
धाकल्या महाराजा॑च्या पायाशी ह्या मावळ्याचा त्रिवार मुजरा !!!
श्री.श॑भुराजे म्हणजे खरा शेर! केवळ त्या॑च॑ आणि स्वराज्याच॑ दुर्दैव आडव॑ आल॑, म्हणून वरना...खाली जि॑जीपर्य॑त पोहोचलेली हि॑दवी स्वराज्यसीमा वर दिल्लीच्या ऐय्याश तक्ख्ताला फोडून नक्कीच अटकेपर्य॑त पोहोचली असती.
हलकट और॑ग्याच्या प्रत्येक छळाला अस्सल म्हराठमोळ्या मुजोरीन॑ हसत स्विकारुन त्याला हतबुद्ध करणार्या श॑भुराजा॑चे चरणि प्रणाम.
सागर,
सप्रे॑च्या 'झ॑झावात' ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
हर हर महादेव.
धमालराव देशमुख-पाटील.
12 Mar 2008 - 2:49 pm | सागर
धमालराव देशमुख-पाटील,
माझा मित्र उदय सप्रे हा शिवरायांच्या इतिहासाने भारुन गेलेला एक उत्तम लेखक आहे.
माझ्यापेक्षा वयाने मोठा असूनही त्याची आणि माझी मैत्री आहे.... हा त्याचा मोठेपणा आहे.
लवकरच उदयच्या "झंझावाता"ने अवघे मराठी साहित्यविश्व शिवकालीन होऊन जाईन याची खात्री वाटते...
लवकरच माझा मित्र उदय "झंझावात"चा हा संकल्प पूर्ण करेन याची खात्री आहे ....
- सागर
12 Mar 2008 - 11:42 am | विसोबा खेचर
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्या छाव्याला माझा त्रिवार मुजरा..
शंभूराजांना माझेही वंदन!
आपला,
(थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.
12 Mar 2008 - 7:39 pm | कलंत्री
संभाजी महाराज यांच्या आत्मसमर्पणाची आठवण ताजी आहे हे पाहुन बरे वाटले. पण यांच्या आत्मार्पणाची तिथी ही पाडव्याच्या पहिल्या दिवशी पाळायला हवी. औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली पण, बाकी रोमांचकारक सविस्तर नंतर,
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना.
असो.
12 Mar 2008 - 8:09 pm | व्यंकट
तिथी तारखेचा अजून एक वाद.
(ऐतिहासिक वादाला कंटाळलेला)
व्यंकट
12 Mar 2008 - 11:56 pm | विसोबा खेचर
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना.
का? आज पाळली म्हणून बिधडलं कुठे? आदराची भावना त्यामुळे थोडीच कमी होणार आहे??
व्यंकटराव म्हणतात ते योग्यच आहे. आपण मंडळी अजूनपर्यंत तारखा-तिथ्यातच अडकलेली आहोत! अर्थात, या निमित्ताने शंभूराजांचे पुष्यस्मरण करून त्यांची शूर आणि दिलेरी वृत्ती अंगी बाणवायची की तारखा तिथ्यांच्या वादात आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत बसायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे!
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना.
मिपाला तरी ही सूचना पाळणे आवडणार नाही. कारण एखाद्या दिलेर राजाची पुण्यतिथी वर्षातनं दोन दोनदा पाळणे हे मिपा हास्यास्पद, तसेच एक पोरखेळ समजते! आणि कुठल्याही पवित्र गोष्टीचा पोरखेळ होता कामा नये असेही मिपाला वाटते. शंभूराजे हा पोरखेळाचा विषय नक्कीच नाही!
हे मिपाचं मत झालं!
अर्थात, त्यातूनही एखाद्याने अगदी हट्टाने पाडव्याच्या पहिल्या दिवशीदेखील मिसळपाववर शंभूराजांचे पुण्यस्मरण केले तरी मिपाकरता ते आदरणीयच असेल. कारण मुळात मिपाला शंभूराजांच्या मृत्युच्या तारखेशी अथवा तिथीशी मतलब नसून त्यांच्यातल्या शूर, दिलेर आणि धाडसी वृत्तीशी मतलब आहे!
असो..
आपला,
(व्यथित) तात्या.
8 Apr 2008 - 6:04 pm | स्वाती दिनेश
पाडव्याच्या पहिल्या दिवशी ??
ह्यातला पहिला दिवशी हे कळले नाही.
चैत्र शुध्द प्रतिपदा- गुढीपाडवा. तो एकच दिवस साजरा केला जातो ना?
13 Mar 2008 - 12:12 am | प्राजु
आवडला तात्या.... सहमत आहे तुमच्याशी.
- (सर्वव्यापी)प्राजु
13 Mar 2008 - 12:25 pm | उदय सप्रे
"औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली " हे अर्धवट सत्य आहे.
खरी तिथी फाल्गुन वद्य अमावास्या अशी आहे.आणि ज्या राजाने आपली प्रजा सुखेनैव नान्दण्यासाठी आत्मसमर्पण केले त्या वीर राजाची आठवण
पाडव्याला करणे हे पण योग्यच आहे.पण आपण सगळे आता मराठी पन्चान्ग पाळतो का? रोजचा दिनान्क पण मार्च १४ , २००८ असाच लिहितो ना?
पाठ्यपुस्तकात पण असेच सन आणि सनावळ्या देतात - सामान्य जनतेला लक्षात राहील असे दिनान्क देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तसे लिहिले होते.
असो, सूचना मान्य-मा़झ्यापुरती - कारण मी ऐतिहासिक कादन्बरी लिहितोय आणि मला या तिथी माहित आहेत, मी पाळतो ही, सगळ्यान्ना ते
जमेलच असे नाही.
चूक भूल द्यावी घ्यावी,
आपला विनम्र,
उदय सप्रे,ठाणे.
मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते
छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" साठी पण प्रायोजक हवा आहे
मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.
8 Apr 2008 - 5:50 pm | अनामिका
काय दैवदुर्विलास पहा!
गेल्याच आठवड्यात विश्वास पाटिल यांची "संभाजी "कादंबरी वाचायला घेतली.एरवी २ दिवसात पुस्तक वाचुन संपवायचे हा माझा निश्चय असतो.पण या वेळेस अंमळ जरा वेळच लागला.शेवटच प्रकरण वाचायला घेतल आणि काहि केल्या पुढे वाचण्याची इच्छाच होईना.शेवटी प्रयत्नपुर्वक वाचुन काढले आणि अख्खा चैत्र पाडव्याचा दिवस रडुन काढला.संभा़जी राजांना दिलेल्या यातना वाचताना सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि ह्रुदय पिळ्वटुन निघाले. मन विषण्ण आणि व्यथित झाल. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बहुमुल्य प्राणांची आहुती दिली आणि आपण मात्र त्यांच्या मुळे मिळालेल स्वत्व सांभाळायला नालायक ठरलो .आज आपण खरच किती हतबल आहोत हा विचार मन पोखरतोय. हा पाडवा मरेपर्यंत स्मरणात राहिल.
ह्या माहान वीराला मानाचा मुजरा!
"अनामिका"
»
8 Apr 2008 - 11:49 pm | पान्डू हवालदार
छत्रपती संभाजी महाराजांना माझेही वंदन