मराठी चित्रपटाने गाठलेल्या नव्या उंचीने पडलेले काही प्रश्न

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
3 Jan 2010 - 8:29 pm
गाभा: 

१. ज्यांनी खास मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी कर्दळी आणि झेंडूच्या बागांची जोपासना केली होती त्यांनी काय करावे?
२. मराठी नटीच्या अगम्य आणि विनोदी अशा वेषभुषेत पटाइत असलेल्या ड्रेस सप्लायरने त्या ड्रेसच्या स्टॉकचे काय करावे?
३. सजणी- दिवाणी असे यमक जुळवून गाण्यांची रचना करणारे गीतकारांनी काय करावे?
४. लेन्सला एकाच वेळी चार-चार किंवा षटकोनी चित्र दिसेल असे एक लेन्सचे सप्लायर ह्यांनी काय करावे?
५. बेंळगाव मधे धंदा व्हावा म्हणून कानडी हेलमधे बोलण्यासाठी संवाद लिहिणाऱ्या लेखकांनी काय करावे?
६. नाटकात जसे उंची आवाजात बोलावे लागते तसे चित्रपटाच्या डबींगच्या वेळी बोलणे आवश्यक नसते हे न समजलेल्या कलाकारांनी काय करावे?
७. व्कॉलीटी आणि कॉस्ट (प्रोफेशनलिझम्चा असतो) ह्याचा संबंध नसतो हे न समजलेल्यांनी काय करावे?
८. इतर प्रश्न!

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

3 Jan 2010 - 8:37 pm | चिरोटा

त्यांना डोक्याला अमृतांजन लावण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही.!!
मराठी चित्रपटांचा दर्जा वाढतो आहे ही चांगली गोष्ट आहे.भविष्यात मराठी नट्/नट्या पण एका चित्रपटामागे ५०लाख/६० लाख घेतील अशी आता आशा बाळगुया.
भेंडी
P = NP

देवदत्त's picture

3 Jan 2010 - 10:16 pm | देवदत्त

आमचा मिपा वार्ताहर कळवितो की तुमचे प्रश्न लोकसभा व विधानसभेत चर्चेसाठी पाठवले आहेत. नेत्यांना एकमेकांच्या कुरापती काढणे व सभात्याग करणे ह्यातून वेळ मिळाल्यास किंवा पुन्हा मराठीच्या मुद्याची गरज पडली की ते ह्या प्रश्नांना प्राधान्य देतील अशी आशा आहे.

अन्यथा मग महेश मांजरेकर, सचिन किंवा महेश कोठारे ह्यांना ह्या प्रश्नांवर नवीन चित्रपट काढण्यास सुचविता येईल.

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 11:10 pm | अमृतांजन

(मराठी चित्रपटांची) भरभराट असे नाव द्यायलाही सुचवता येईल.

विकास's picture

3 Jan 2010 - 10:34 pm | विकास

विषय खूप महत्वाचा आहे. पी एचडी केलेली नसल्याने सर्व प्रश्नांवर उत्तरे देण्याची माझी कुवत नाही, तरी देखील शक्यतितका प्रयत्न करतो:

१. ज्यांनी खास मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी कर्दळी आणि झेंडूच्या बागांची जोपासना केली होती त्यांनी काय करावे?
काँपोस्टींग करावे. त्यामुळे पर्यावरण वाचवायला मदत होईल. (अर्थात अमोनिया हा पण एक हरीत वायू आहे ह्या कडे त्यासाठी कानाडोळा करावा). अर्थात झेंडूंच्या फुलांपासून झंडू बाम तयार करता आला तर उत्तम.

२. मराठी नटीच्या अगम्य आणि विनोदी अशा वेषभुषेत पटाइत असलेल्या ड्रेस सप्लायरने त्या ड्रेसच्या स्टॉकचे काय करावे?
३. सजणी- दिवाणी असे यमक जुळवून गाण्यांची रचना करणारे गीतकारांनी काय करावे?
४. लेन्सला एकाच वेळी चार-चार किंवा षटकोनी चित्र दिसेल असे एक लेन्सचे सप्लायर ह्यांनी काय करावे?

प्रश्न क्रमांक २-४ साठी उत्तर एकच आहे: झी मराठीचा वापर करणे. नित्यनूतन मालीका तसेच संगिताचे कार्यक्रम असतात त्यात अथवा नव्याने एखादा महापोषाख, महागीतकार असे कार्यक्रम चालू करून त्यात लेन्सचा वैविध्यपूर्ण उपयोग करता येईल.

७. व्कॉलीटी आणि कॉस्ट (प्रोफेशनलिझम्चा असतो) ह्याचा संबंध नसतो हे न समजलेल्यांनी काय करावे?

त्यांनी अ‍ॅट एनी कॉस्ट क्व्लाईटीकडे दुर्लक्ष करत काहीतरी निर्मिती तयार करत ठेवावी. माकडाच्या टंकण्यातूनपण जसा शक्यतेच्या गणिताने शेक्सपिअर दिसू शकतो तसेच ऑस्कर/आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सव/फिल्मफेअर/महाराष्ट्र चित्रपटमंडळाचे पुरस्कार अथवा म.टा. सन्मान असे काही तरी नक्कीच पदरात पडू शकेल असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2010 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> झेंडूंच्या फुलांपासून झंडू बाम तयार करता आला तर उत्तम.
>> =))

अमृतांजन's picture

3 Jan 2010 - 10:55 pm | अमृतांजन

>>पी एचडी केलेली नसल्याने सर्व प्रश्नांवर उत्तरे देण्याची माझी कुवत नाही, तरी देखील शक्यतितका प्रयत्न करतो:>>

पी एचडी आणि प्रतिसादात्मक उत्तरे देण्याचा संबंध अजाबात कळला नाही हो!

विकास's picture

4 Jan 2010 - 1:40 am | विकास

पी एचडी आणि प्रतिसादात्मक उत्तरे देण्याचा संबंध अजाबात कळला नाही हो!

विषय गहन असल्याने त्याला संशोधनाचे पाठबळ आवश्यक आहे. त्या साठी विशेष प्रशिक्षण लागते असे मला म्हणायचे होते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Nile's picture

4 Jan 2010 - 5:10 am | Nile

त्यांना उत्तरांमधले काहीच (संबंध) कळत नाही(त) त्यांना फक्त प्रश्न पडतात, असो.

अमृतांजन's picture

5 Jan 2010 - 6:35 am | अमृतांजन

एकाच वाक्यात एखाद्या व्यक्तिचे वर्णन करण्याची कला तुम्हाला साध्य आहे राव. :-)

सन्जोप राव's picture

4 Jan 2010 - 6:12 am | सन्जोप राव

पी एचडी आणि प्रतिसादात्मक उत्तरे देण्याचा संबंध अजाबात कळला नाही हो!
पी.एच.डी. केलेल्यांना जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत असतात असे प्रतिसाददात्याला म्हणावयाचे असावे. चालायचेच!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

4 Jan 2010 - 8:27 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास यांना नेमके काय म्हणावयाचे होते याचे उत्तर तेच देऊ शकतील. परंतु 'पी.एच.डी. केलेल्यांना जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत असतात' असे मात्र निश्चितपणे म्हणायचे नसावे. श्री राव यांनी श्री विकास यांच्या विधानाचा हेतूपुरस्सर विपर्यास केला आहे, असे वाटते. (श्री राव यांनी तसे केले नसल्यास मी माझे विधान मागे घेईन.)

श्री विकास यांनी मराठी चित्रपटांचा इतिहास वा अन्य संबंधित विषयात सखोल संशोधन केलेले नाही. तेव्हा त्यांची मते अभ्यासपूर्ण आणि अधिकारी समजली जाऊ नयेत, (याचा अर्थ मते अवाजवी समजावीत असे नाही) असे त्यांना म्हणायचे असावे. यात फारसा विचार करावा लागावा असे काय आहे?

अर्थात अधिकारवाणीच्या विटांचे इमले बांधणार्‍यांना श्री विकास यांच्या विनम्रतेचा राग येणे मात्र शक्य आहे.

______________________________________________
We fight because we communicate.

सन्जोप राव's picture

4 Jan 2010 - 3:10 pm | सन्जोप राव

विषय खूप महत्वाचा आहे. पी एचडी केलेली नसल्याने सर्व प्रश्नांवर उत्तरे देण्याची माझी कुवत नाही
या वाक्याचा माझ्या कुवतीनुसार मी काढलेला अर्थ असा:
१.पी एच डी केलेल्यांकडे सर्व प्रश्नावर (प्रश्नांची?) उत्तरे देण्याची कुवत असते.
२. मी पी एचडी केलेली नाही
३. त्यामुळे माझ्याकडे सर्व प्रश्नावर (प्रश्नांची?) उत्तरे देण्याची कुवत नाही.
'पी.एच.डी. केलेल्यांना जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत असतात' या वाक्याचाही हाच अर्थ नाही का? वाटल्यास त्यातला 'जगातल्या' हा शब्द मी मागे घेतो. (तसे केल्यास श्री. अपूर्ण आपला पूर्ण प्रतिसाद मागे घेतील का?)
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

श्री विकास यांनी उपप्रतिसाद दिलेला असतांनाही त्यांच्या वाक्याचा अर्थ लावत बसणे यामागे दुसरा काय हेतू असावा?

वाटल्यास त्यातला 'जगातल्या' हा शब्द मी मागे घेतो.

हा बदल स्वागतार्ह पण अपूर्ण आहे.

(तसे केल्यास श्री. अपूर्ण आपला पूर्ण प्रतिसाद मागे घेतील का?)

तसे करण्यास आपणास माझ्या अनुमतीची गरज नाही. प्रतिसाद मागे घ्यायचा असल्यास जरूर घ्यावा. स्वत:बाबत निर्णय घेतांना अनिश्चितता असणे हे मुर्खांच्या अनेक लक्षणांपैकी एक असणे शक्य आहे.

______________________________________________
We fight because we communicate.

सन्जोप राव's picture

5 Jan 2010 - 12:45 pm | सन्जोप राव

(तसे केल्यास श्री. अपूर्ण आपला पूर्ण प्रतिसाद मागे घेतील का?)

तसे करण्यास आपणास माझ्या अनुमतीची गरज नाही.
कुणाला काय करायला आणि कुणाची अनुमती?
खुळ्याची चावडी आणि मिराबाईची मशीद!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

विकास's picture

4 Jan 2010 - 8:41 am | विकास

माझ्या पिएचडीच्या वाक्यात दारूगोळा भरलेला नव्हता. उगाच (टिपी म्हणून) चालू केलेल्या धाग्यात एक उगाच (टिपी म्हणून) टाकलेले वाक्य होते. फार त्यातून माझे थोडेफार खरडवहीचे संशोधन समजू शकेल इतकेच म्हणता येईल. ;)

मात्र आता त्या वाक्याचा अर्थच लावायचा म्हणल्यावर मला एकदम खालील वाक्य आठवले :) (कुणालाच उद्देशून नाही, तेंव्हा ह.घ्या.)

जर तुम्हाला वाटले की तुम्हाला सर्व येते तर विद्यापिठ तुम्हाला बॅचलर्सची पदवी देते, जेंव्हा लक्षात येते की आपल्याला अजून काहीच येत नाही तेंव्हा (विनम्रता लक्षात घेऊन) विद्यापिठ मास्टर्सची पदवी देते, आणि जेंव्हा साक्षात्कार होतो की आपल्यालच काय कुणालाच काही येत नाही, तेंव्हा (बिंग फुटू नये म्हणून) विद्यापिठ तुम्हाला पिएचडी देते! (तेरी भी चूप और मेरी भी चूप ;) )

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अक्षय पुर्णपात्रे's picture

4 Jan 2010 - 8:47 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास, खुलाशाबद्दल धन्यवाद.

माझ्या पिएचडीच्या वाक्यात दारूगोळा भरलेला नव्हता.

आजकाल जगातील दहशतवादी कशाचा वापर करुन स्फोट घडवून आणतील हे सांगता थोडेच येते? जालीय दहशतवादीही त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत हे मात्र लक्षात येत आहे.

____________________________________
We fight because we communicate.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jan 2010 - 9:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा ... त्या विशिष्ट वाक्यात दारुगोळा नव्हता हे अगदी १००% मान्य! पण या धाग्यातल्या प्रतिसादात हास्यस्फोटमात्र निश्चितच आहेत.

अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.

भडकमकर मास्तर's picture

5 Jan 2010 - 12:05 am | भडकमकर मास्तर

काहीशा मरगळलेल्या वातावरणात एकदम विजेचा कडकडाट व्हावा तसे अमृतांजन यांच्या या धाग्याने साध्य केले आहे ....

अमृतांजन's picture

5 Jan 2010 - 6:31 am | अमृतांजन

हो, वरील सुंदोपसुंदीने असेच म्हणावेसे वाटले- "वी आर ब्याक इन बिझनेस".

II विकास II's picture

5 Jan 2010 - 7:52 am | II विकास II

अमृतांजन - हापिसर ऑन स्पेसल डुटी

अमृतांजन's picture

6 Jan 2010 - 6:14 am | अमृतांजन

खर म्हणजे ते "विकास" नावापुढे - मागे जे भालदार-चोपदार उभे आहेत ( II विकास II) ते पाहून स्पेसल ड्युटीवए कोण आहे ते लगेच कळते.