गाभा:
नमस्कार मिपाजन हो !
माझी मुलगी ह्या वर्षी बारावी (सायन्स ) ला शिकत आहे , तर बारावी नन्तर कोणता कोर्स करावा ? तिची ईछा इन्जिनीरीन्ग कोर्स करावा हि आहे . इन्जिनीरीन्ग ला कोणती ब्रान्च ( खास करुन मुलीन साठी योग्य ) घ्यावी ? आपण जर मार्गदर्शन कराल तर फार बरे होईल . आपला अशोक .
प्रतिक्रिया
29 Dec 2009 - 11:19 pm | शाहरुख
नमस्कार..
जर आपला प्रश्न "इन्जिनीरीन्ग ला तिने कोणती ब्रान्च घ्यावी" असेल तर माझ्या मते आपली मुलगीच याचे सर्वात चांगले उत्तर देऊ शकेल :-)
ओव्हर टू मास्तर..
29 Dec 2009 - 11:40 pm | टुकुल
बरोबर ठिकाणी प्रश्न विचारलात...
परबु मास्तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील, त्यांच ऐकुन ऐकुन इथले बरेच जण तुम्हाला सांगु शकतील, पण सोनारानेच कान टोचले तर बर म्हणुन जास्त काही लिहित नाही.
--टुकुल
30 Dec 2009 - 12:35 am | चिरोटा
बर्याच मुली स्थापत्य/यांत्रिकी घेताना दिसत नाहीत एवढे नक्की. !!इलेक्ट्रॉनिक्स्/संगणक अभियांत्रिकीकडे मुलींचा जास्त कल दिसतो.
भेंडी
P = NP
30 Dec 2009 - 1:36 am | लंबूटांग
तिची ईछा इन्जिनीरीन्ग कोर्स करावा हि आहे . इन्जिनीरीन्ग ला कोणती ब्रान्च ( खास करुन मुलीन साठी योग्य ) घ्यावी ?
तिला कशात रस आहे? कोणतीही एक ब्रांच मुलांसाठी जास्ती योग्य आणि मुलींसाठी कमी असे नाही आहे. मुलींना mechanical अवघड वाटू शकते कारण तिथे बरेच अंगमेहनतीचे काम असते. पण प्रत्येक ब्रांचचे काही फायदे आणि तोटे आहेत. उदा. एखाद्याला खूप वेळ Computer Screen कडे बघवत नसेल तर Computer Engineering करणे कठीण जाईल.
केवळ engineer व्हायचे म्हणून मिळेल ती ब्रांच घेऊन माझे स्वतःचे कित्येक मित्र engineer झालेले आहेत जो मला केवळ मूर्खपणा वाटतो. मला स्वतःला १२ वी ला PCM मध्ये कमी गुण असल्यामुळे computer engineering ला admission मिळत नव्हती. पण mechanical/ Instrumentation हे पर्याय मिळत असूनही मी B.Sc. Computers ला admission घेतली होती.
कारण मला computers च शिकायचे होते. हे मला पक्के माहित होते. आणि माझ्या पालकांनीही मला कधीही force केला नाही. अथवा त्यांच्या अपेक्षा माझ्यावर लादल्या नाहीत.
माझ्या शेजारच्या मुलाला पालकांनी लहानपणापासून "तू डॉक्टर हो" त्यांना खूप पैसा आणि मान मिळतो असे सांगितले होते. कारण वडीलांना इच्छा असूनही होता आले नव्हते आणि त्यांचा शाळेपासूनचा जिवलग मित्र डॉक्टर आहे. त्या मुलाला Medical साठीची CET सुद्धा देऊ दिली आणि शेवटी पालकांनी सांगितले आपल्यालाकडे पैसे नाहीत (हे सांगितले आणि मग income tax वाचतो म्हणत ठाण्यात दुसरे घर घेतले. असो.) त्यामुळे आता तू engineer हो. त्या मुलाचा मला वरीलप्रमाणेच काहीसा प्रश्न. मी कोणती ब्रांच घेऊ? मी त्याला विचारले तुला काय आवडते? त्याला स्वतःलाच माहित नव्हते. कारण लहानपणापासून डॉक्टर व्हायचे मनावर बिंबवलेले. मग कोणातरी नातेवाईकाने सांगितले (जो स्वतः १०वी पास आहे- माझे असे अजिबात म्हणणे नाही आहे की कमी शिकलेला म्हणजे मूर्ख. मी त्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे; कोणतेही generalization नाही आहे- व मोठमोठ्या बाता मारण्यापलीकडे फारसे काहीच करत नाही) मरीन engg. कर. त्यांच्या family चा तो नातेवाईक idol आहे. त्या मुलालाही त्यात प्रचंड interest निर्माण झाला. पण पालकांनी सांगितले नाही. मरीन इंजिनीअरिंग काही करायचे नाही. तुला लांब राहावे लागेल जे त्यांना पसंत नव्हते.
परत मला प्रश्न.
तो : Computer/ IT branch कशी आहे? Mechanical पेक्षा चांगली ना? की Electronics & Telecomm करू?
मी: कोणतीच ब्रांच वाईट नाही आहे रे. तुला जे आवडते तेच कर.
तो: पण Computer वाल्यांना जास्ती पैसे मिळतात ना?
मी: पैसेच कमवायचे असतील तर मग इतरही बरेच मार्ग आहेत. तुला १२ वीला IT course आवडत नव्हता ना? आणि पैसेच म्हणशील तर सध्या IT वाल्यांचेच jobs पटापट जातायत.
तो: मग Mechanical चांगले ना? त्यांना recession मुळे काही फरक नाही पडत ना?
मी: तुझ्याकडे जर का त्या विषयातले knowledge असेल तर जॉब मिळेलच. बिल गेट्स कॉलेज drop out होता, माहित आहे ना. तू ह्या सगळ्याची कशाला चिंता करतोयस आत्ता?
त्याने शेवटी computer engg. लाच admission घेतली आहे. असो.
आता त्याच्याच लहान भावाला- जो १० वीला आहे- IPS करायचे आहे. वास्तव चित्रपट बघितल्यापासून घोडा आणि तत्सम गोष्टींबद्दल प्रचंड आकर्षण. आधी डॉन व्हायचे होते. आता IPS म्हणतोय. तो म्हणे मी arts ला जातो. Science घेउन lab मधे वेळ घालवण्यापेक्षा UPSC चा अभ्यास करेन.
घरातून प्रचंड विरोध. सगळे पोलिस पैसे खातात. काहीतरी विचार करू नकोस. इतका हुशार आहेस. आर्ट् स ला कसला जातोस?
त्याला सांगितले बाबांना विचार. मोठमोठी loans sanction करताना Bank Manager पण पैसे खातात. मग तुम्ही कशाला bank manager च्या प्रमोशन साठी इतके झटत होतात?
असो. आता त्या नातेवाइकाने सांगितले की IPS officer ना खूप मान असतो. प्रचंड मोठी घरे मिळतात म्हटल्यावर आता घरून परवानगी मिळाली आहे IPS
करायला. तरीपण Science ला जा हे टुमणे आहेच. काय बोलणार.
आपल्याइथली शिक्षणव्यवस्था अशा mentality ला कारणीभूत असावी असे मला वाटते.
असो थोडेसे अवांतर झाले आहे. क्षमस्व.
तर सांगायची गोष्ट ही की, तिला कशात interest आहे त्याच branch ला जाऊ द्यात.
30 Dec 2009 - 2:02 am | पाषाणभेद
लंबूटांग म्हणतात त्यात तथ्य आहे. तिच्या मनाचा कलही लक्षात घ्यावा.
बाकी हॉटेल मॅनेजमेंट ही आहे.
mpsc upsc करायचे असल्यास साधे सरळ ग्रॅज्यूएशन करा. BSc (Comp) करा वाटले तर. आजकाल मराठी मुलेही बिहारी तरूणांच्या तुलनेने कॉम्पीटेटीव्ह एक्झाम पास होत आहेत.
खाली एक bmp फाईलची लिंक देत आहे. उपयोग होईल असे वाटते.
http://3.bp.blogspot.com/_5kyXFoS5yXA/SlXrx7OohmI/AAAAAAAAXqg/4XsNvtMj3Z...
अवांतर: वरील उदाहरणातील लहान भाऊ करीयरमध्ये बरेच पुढे जाईल. तो प्रॅक्टीकल विचार आतापासूनच करतोय. भरपूर पैसा कमवेल बघा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
30 Dec 2009 - 8:55 am | sujay
3 idiots बघा.
2 Jan 2010 - 9:48 am | सुधीर काळे
पूर्णपणे सहमत. 3 idiots पहा आणि मगच निर्णय घ्या.
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
30 Dec 2009 - 10:34 pm | हरकाम्या
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. सध्या माझे धाकटे चिरंजीवही
बारावीत आहेत. त्यांनाही आणि मलाही हाच प्रश्न भेडसावतो आहे.
आपण दिलेल्या तक्त्याने बरेचसे काम सोपे झाले आहे. नंतर पुढे बघता येइल.
30 Dec 2009 - 11:28 pm | बिपिन कार्यकर्ते
चांगला तक्ता... धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
31 Dec 2009 - 5:30 am | चतुरंग
चांगला तक्ता आहे.
आणखी पर्याय माहीत असले तर ते या तक्त्यात टाकून तक्ता समृद्ध करता येईल का? हा मूळ तक्ता इंटरॅक्टिव आहे का?
चतुरंग
31 Dec 2009 - 7:38 am | पाषाणभेद
तक्ता .bmp मदी हाय आन मुळ कापी माझ्याकडं नाय. तरीबी तुमाला काय याच्यामदी टाकायच आसल तर त्ये टाका की आन येवूंद्या. सगळ्यांस्नी १० वी १२वी नंतरच्या काय काय वाटा हायती त्या माहीत तर व्हतील ना.
रंगसंगती, थोडेफार अक्षर येगळे दिसना का. त्यानं कायबी फरक पडनार न्हाय पन एक चांग्ल काम हुईल पगा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
31 Dec 2009 - 4:02 pm | स्वाती२
लंबूटांग, उत्तम प्रतिसाद.
पाषाणभेद छान तक्ता आहे. भाचा १० वीला आहे. त्याला उपयोगी पडेल. धन्यवाद.
30 Dec 2009 - 10:12 am | टारझन
जियो लंबुटांग जियो !
संतुलित आणि विचारपुर्वक प्रतिसाद ! जियो ... लाख लाख जियो !
मास्तरने आता अंतरजालावर डोळे मिटायला हरकत नाही =))
उत्तराधिकारी आलेत :)
ह्या धाग्याबद्दल पतिल साहेबांचे आभार ... आम्हालाही आमच्या आपत्याच्या शिक्षणाची चिंता भेडसावते आहे. ह्यातून योग्य मार्गदर्शन मिळेल.
- प्रश्नाधिकारी
30 Dec 2009 - 10:33 am | jaypal
... आम्हालाही आमच्या आपत्याच्या शिक्षणाची चिंता भेडसावते आहे.
टारुजी अभिणदण
तुमच्या आपत्यास आनेक शुभाशिर्वाद
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
30 Dec 2009 - 10:31 am | वेताळ
आम्हालाही आमच्या आपत्याच्या शिक्षणाची चिंता भेडसावते आहे
अहो पण इतक्या लवकर टारु शेठ तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही.
लग्न, त्यानंतर मुले,त्यानंतर शाळा, आणि मग १२ वी ला जाणे ह्यात त्याना खुप वेळ लागतो. आतापासुन काल्जी करु नका.पातिल साहेबांचे वेगळे आहे.बाकी लबुटांग ह्याचा प्रतिसाद आपल्याला आवडला. अजुन मास्तरांचे मार्गदर्शन आवश्य घ्या.
वेताळ
30 Dec 2009 - 1:19 pm | विनायक प्रभू
अहो पातिलसाहेब,
कुठला कोर्स करावा ह्याची हे तुम्ही किंवा आणखी कोण कसे काय ठरवणार?
आधी सी.ई.टी ची परिक्षा होउ द्या.
मुलीला आपल्याला साधारण किती मार्क पडणार ह्याचा अंदाज आल्यावर विचार करावा.
तुम्ही कुठे राहता?
आजुबाजुला कुठली कॉलेजेस आहेत.
तील्या हव्या असलेल्या शाखेसाठी लांब हॉस्टेलला जायची तीची आणि तुमची तयारी आहे का?
आता ह्या विषयावरचे चर्वितचर्वण घरात करु नका.
बारावी ची परिक्षा होउ दे.
त्याच्या साठी काही मदत लागली तर कळवा.
जरुर करेन.
30 Dec 2009 - 1:38 pm | विनायक प्रभू
अॅड्मिशन मिळते म्हणुन इंजिनियरिंग ला जाउ नये.
फक्त ३६% मुले के.टी शिवाय पहीले वर्ष पास होतात.
माझ्या मता नुसार १ के.टी.= १.५ लाख
बारावी पेक्षा गणिताची डीग्री ऑफ डिफीकल्टी इंजिनियरीमधे दुप्पट.
इंजिनियरिंग चा खर्च सुमारे ६ लाख( चार वर्षात कोर्स पुर्ण झाला तर)
ह्या रिंग मधे उतरताना विचार करावा.
30 Dec 2009 - 3:25 pm | काजुकतली
३ इडीयटस पण पाहुन या....
30 Dec 2009 - 9:35 pm | अमृतांजन
आय वाज बॉर्न इंटेलिजन्ट- एड्युकेशन स्पॉइल्ड मी
31 Dec 2009 - 11:57 am | नि३
पतील साहेब..
जास्त काही बोलत नाही फक्त एकच सांगतो
तुम्ही आणी तुमची मुलगी दोघे ही जाऊन एकदा ३ इडीयटस हा नविन आमिर खान चा सिनेमा बघुन या..
तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळेल
---नि३.
31 Dec 2009 - 11:54 pm | चतुरंग
(ईडियट)चतुरंग
31 Dec 2009 - 12:05 pm | विजुभाऊ
इंजीनियरिंग मेडीकल पेक्षा इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
फार्मसी / फिजीऑथेरेपी वगैरे मध्ये उत्तम जॉब्स उपलब्ध आहेत.
ते पर्याय देखील विचारात घ्यावेत
31 Dec 2009 - 4:33 pm | स्वाती२
पतील साहेब, तुमच्या मुलीने इंजिनिअरच व्हायचे ठरवले असेल आणि कुठली शाखा याबद्दल मनात गोंधळ असेल तर शक्यतो या शाखांचे पदवीधर प्रत्यक्ष काम कसे करतात तेही पहावे. आपल्याला रोज ८-१० तास असे काम करायला आवडेल का याचा विचार करावा.
31 Dec 2009 - 10:36 pm | अशोक पतिल
आपण सर्व मिपा मित्राचा , दिलेल्या उपयु़क्त माहिती व प्रतिसादाबद्दल आभारी आहे. खास करुन पाषानभेद यानी दिलेल्या लिन्क मुळे छान माहिती मिळाली .
आपणा सर्वाना नववर्ष २०१० च्या हार्दिक शुभेछा !!!
अशोक .