पु लं ची गाजलेली वाक्य ...

संदीप शल्हाळकर's picture
संदीप शल्हाळकर in काथ्याकूट
7 Dec 2009 - 5:26 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

आपल्या सगळ्यांचे आवडते पुलं, ज्यांना आपण सगळे कलेतलं आराध्य दैवत मानतो, त्यांची आठवण म्हणुन त्यांची काही विनोदी वाक्य संग्रहीत करण्यासाठी मला
आपणा सगळ्यांची मदत पाहिजे.
तेव्हा आता चालु करुया या नव्या उपक्रमाला.....

प्रतिक्रिया

संदीप शल्हाळकर's picture

7 Dec 2009 - 5:31 pm | संदीप शल्हाळकर

कथाकथन : राव साहेब.
वाक्य : हे तबला वाजिवतय की मांडी खाजिवतय.....

ह्यात मला तरी काय विशेष वाटत नाही.
वेताळ

संदीप शल्हाळकर's picture

7 Dec 2009 - 6:25 pm | संदीप शल्हाळकर

विनोद आणि यमक यांचा अजोड मिलाप

खरं तर पुलंच्या प्रतिभेचे इतके पैलू आहेत कि त्याचं एकच एक आवडतं वाक्य निवडणं अशक्य आहे. सर्वांनी एक एक वाक्य जरी दिलं तर इथे "समस्त पु.ल" संग्रह होईल.
तरी प्रयत्न करून बघतो..
"ओढा लेको पैसे. करा चैन! खा. रोज शिकरण खा! मटार उसळ खा!"

राहूल's picture

7 Dec 2009 - 8:02 pm | राहूल

अंतूशेटचे वाक्यः
रत्नांगिरीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे, झंप्या?

उपास's picture

7 Dec 2009 - 8:33 pm | उपास

आणि तोच झंप्या दामले आपल्याला 'म्हैस' मध्ये सुद्धा भेटतो.. ;) 'खुळा की काय तू झंप्या.. ' - इति बकूनाना
पु.लं. नी जाता जाता रंगवलेली अशी व्यक्तिचित्र आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षितरीत्या भेटतच राहातात.. :)
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

उपास's picture

7 Dec 2009 - 8:37 pm | उपास

-

गणपा's picture

7 Dec 2009 - 8:39 pm | गणपा

अरे अशी एक एक वाक्य टाकण्या पेक्षा सरळ आख्खी म्हैसच टाकाकी इकडे, सगळीच वाक्य दमदार आहेत.

टारझन's picture

7 Dec 2009 - 9:10 pm | टारझन

अरेच्च्या ? एवढी सौम्य, निष्पाप , कोणताही इतिहास नसलेली साधी प्रतिक्रीया उडाली ? कमाल आहे .. उडवणार्‍या संपादकाचं हसु आलं .. चालू द्या भौ ;)

- टारू'ज

पिवळा डांबिस's picture

7 Dec 2009 - 10:34 pm | पिवळा डांबिस

डायवर कोन है? लायसन बघू....
:)

मेघवेडा's picture

7 Dec 2009 - 9:18 pm | मेघवेडा

उपास यांच्या प्रतिक्रियेवरून दहावीच्या अभ्यासक्रमातला पुलंचा 'उपास' हा धडा आठवला! या धड्याने 'बटाट्याची चाळ' वाचणं भाग पाडलं आणि तिथूनच सुरूवात केली पुलंचं साहित्य वाचायला! त्या मानानं फारच उशीरा दिलंय पुलंचं साहित्य अभ्यासक्रमात शिक्षणमंडळानं!

पु.लं. नी जाता जाता रंगवलेली अशी व्यक्तिचित्र आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षितरीत्या भेटतच राहातात..

खरंच.. उपास यांच्याशी अगदी सहमत! त्यांच्या साहित्यातही आणि आपल्या जीवनातही! व्यक्ती आणि वल्ली मधील प्रत्येक पात्र आपणास दैनंदिन जीवनात कुठे न कुठे तरी भेटतच असते की. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी तरी नारायण, हरी तात्या, गटणे असतातच! पुलंचं साहित्य वाचतानाच काय वाचल्यानंतरही आपण त्यातल्या पात्रांना आपल्या आयुष्यात शोधण्याचा प्रयत्न करतोच. (म्हणजे मी तरी केला, आणि अजून करतो!)

शेवटी आमचाही एक प्रयत्न, चितळे मास्तर मधील काही संवादः

"गोदीच्या पदराचा आणि लॅण्ड विण्ड्स चा संबंध .... ??"

"नाहीऽऽऽऽ...." पोरे ओरडायची.!!

--

"जनू पानशे म्हणजे दूधवाल्या पानशाचा.. ढ रांडेचा. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवणारा!!"

--

"अशी घोकंपट्टी करून घेतली पोरांकडून. नुसतं आपापलंच नव्हे, सगळ्यांना सगळं नाटक पाठ!! साताच्या शाळेला डोळे चोळीत आठापर्यंत उगवतात. नाटकाच्या तालमीला संभाजीपासून औरंगजेबापर्यंत सगळे पाचाला हजर!!"

--

मेघवेडा.

पाषाणभेद's picture

7 Dec 2009 - 9:54 pm | पाषाणभेद

आमाला पावर नाय.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

पांथस्थ's picture

7 Dec 2009 - 10:27 pm | पांथस्थ

+१

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

मेघवेडा's picture

7 Dec 2009 - 10:30 pm | मेघवेडा

"आमाला आमच्या लायनीन जावू द्या.

एऽऽ शिवराम गोविंद.. नाव काय तुझं??"

--

मेघवेडा.

jaypal's picture

7 Dec 2009 - 9:57 pm | jaypal

संदर्भ :- कर्मचा-याने रावसाहेबांच्या थेटरातील पैशांचा केलेला गफला.

१. दळीद्र वो दळीद्र शेण खायला लावतय बघा माणसाला.

२. कोणीतरी म्हणल "रावसाहेब पण त्यानी चोरी कशाला करायची? सरळ तुमच्या कडेच पैसे मागायचे"
यावर रावसाहेब म्हणतात...
"शाणच कि वो तुमी, माझी आडचण आहे रे दे थोडं पैसं असं मागीतल्यावर कोण देतं काय वो?, माझी बायको नहीरे मला सुख देत, एक पोरगी देता काय थोडं तुमच? असं म्हटतर कोण देतात काय कोण या जगामधे ? त्याला बोगार वेशीचाच रस्ता धरावा लागतय. आरे घरात एकचांगल सुख मिळाल तर कशाला माणुस रांडे कडे जाईल वो? "

मस्तानी's picture

7 Dec 2009 - 10:57 pm | मस्तानी

नवीन घर बांधणारे जोशी पु लं ना अत्याधुनिक सोयी दाखवत असतात ... त्यांनी 'नोकरांचा व घरच्यांचा संडास' वगैरे दाखवल्यावर पु लं म्हणतात ना ... "काय हो, इथे पण automatic होतं की काय ?"

त्याच गोष्टीतली आणखी काही ... "नको असलेला पाहुणा असेल तर एक automatic कुत्रा चावतो" ... "मला सार्वजनिक पूजेसाठी देणगी मागायला येणारी अजून बरीच माणस त्यांच्याकडे पाठवायची आहेत"

विकास's picture

8 Dec 2009 - 12:34 am | विकास

गाजलेले का ते माहीत नाही, पण मिष्कील विनोद आठवला:

बाळासाहेब ठाकरे शस्त्रक्रीयेनंतर हिंदूजा इस्पितळामधे होते त्या संदर्भात पुल म्हणाले होते की, "आता म्हणा: गर्वसे कहो हम हिंदूजा मे है!"

अरुण मनोहर's picture

8 Dec 2009 - 5:28 am | अरुण मनोहर

यमीपेक्षा पाचपट गोरी!

शाहरुख's picture

8 Dec 2009 - 7:00 am | शाहरुख

इथे पण कॉपी-पेस्ट करा की

sujay's picture

8 Dec 2009 - 7:27 am | sujay

"समोरच्या कोनड्यात बसली होती हिंदमाता
बेंबटेरावांच नाव घेते माझा नंबर पहीला "

सुजय

baba's picture

8 Dec 2009 - 9:24 am | baba

१ नंबर....
माझी ३.५ वर्षाची मुलगी सुध्दा ह्या उखान्याला भन्नाट हसली होती..
अजुनही हेच तिचे आवडते वाक्य आहे...

..बाबा

विजुभाऊ's picture

8 Dec 2009 - 9:30 am | विजुभाऊ

या धाग्यावर प्रतिसाद द्यायचे टाळले होते. अगदीच रहावले नाही म्हणून विचारतो आहे. हे असे बिना आगा पिछा असलेले एक वाक्याचे धागे काढले की अशा धाग्याना अवांतर प्रतिसाद येतात .
पुलंचे लिखाण जालावर उपलब्ध आहे . लोकाना ते पाठ ही आहे. या असल्या धाग्याचा नक्की उपयोग काय .

संदीप शल्हाळकर's picture

8 Dec 2009 - 11:16 am | संदीप शल्हाळकर

विजु भाऊ,
मला एक आपल्या लाडक्या पुलंचं प्रकाशचित्रं पाहिजे.
High resolution मधे जर कुठे असेल तर मला पाठवा ना....
तुमचा खुप खुप आभारी आहे......

केशवराव's picture

8 Dec 2009 - 10:12 am | केशवराव

विजुभाऊंशी सहमत !

नंदन's picture

8 Dec 2009 - 1:02 pm | नंदन

"कसं अगदी ओकंओकं वाटतंय!"

संदर्भ - शिंडरेला, श्वानस्वामिनी, पाळीव प्राणी इ. इ.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Dec 2009 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाळीव प्राणी आठवून आणखी एका आत्मकथनपर वाटणार्‍या पुलंच्या पुस्तकातले राजघराण्यातले कुत्रे आठवले. पण नकोच ते वाक्य इथे!

अदिती

श्रावण मोडक's picture

8 Dec 2009 - 1:06 pm | श्रावण मोडक

+१
"तुमच्या कशाला लक्षात येईल? तुम्हां विनोदी लेखकांना हार्टच नसतं. कुणी मेलं तरी तुम्ही हसाल."

पुस्तक : पुर्वर॑ग

पू.ल॑. नी युरोपीय स॑स्कुती व भारतीय स॑स्कुती चा फरक फार छान वाक्य्यात सागीतला आहे .

"त्या॑ची द्राक्श स॑स्कुती आणी आपली रुद्राक्श स॑स्कुती "

गारुडी,

काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...

पुस्तक : पुर्वर॑ग नाही "अपूर्वाई" आहे !
गारुडी,

काम करायचा क॑टाळा ....म्हणून ऑफिसला येतो ...

मी-सौरभ's picture

9 Dec 2009 - 12:11 am | मी-सौरभ

कोण ए......?

गोखलेना बोलवा.

इथे १० गोखले राह्तात....

.....................

...............

ह्या गण्याचे दिवसाला १०० फोन..

सौरभ

लवंगीमिरची's picture

9 Dec 2009 - 4:13 am | लवंगीमिरची

माणसांना जेवायला बोलावल्यांनंतर "चला वाढायला घ्या" ह्या वाक्याइतके उत्साहवरधक वाक्य नाही..

तबल्याला पावडर लावताना 'पफ' वापरलेला पाहून मला हसू आवरेना! हा ग्रुहस्थ बाजाच्या पेटीच्या पांढर्याशुभ्र पट्ट्या टूथब्रशने पेस्ट लावून साफ करीत असेल असे उगीचच वाटले!

त्यांना आमच्यासारखी गाडया चुकल्याची आणि परी़क्षेत नापास झाल्याची स्वप्ने पडत नसावीत! त्यांच्या स्वप्नात काय येत असेल कोण जाणे, पण जे येत असेल ते चौकोनी, गुळ्गुळीत आणि रंगीत असेल!

हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका

तुला सांगते ते वैकुंठमदी असेल - सिटींग नेक्स्ट टु गॉड .. हंड्रेड पर्सेंट तुकाराम!.. आदी बीज येकले.. गायण कर ने.
--
अजून खूप आहेत... सगळी इथे लिहित बसले तर पु. लं ची पुस्तक उतरवून काढावी लागतील!! :>

येडा अण्णा's picture

9 Dec 2009 - 12:12 pm | येडा अण्णा

"महाराजाना सुअर म्हणाला तो........" आणि अशी काहि शीवी दिली की ती जर त्या शहीस्तेखानाने ऐकली असती तर दुसरा हातही पुढे करुन म्हणाला असता की हवे तर ह्या हाताची पण बोटे तोडा पण शिवी नका देवू.

मनिष's picture

9 Dec 2009 - 2:08 pm | मनिष

"लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोकं जेंव्हा ठोकशाहीची भाषा करतात तेंव्हा मनाला यातना होतात"

संदर्भ सांगायची गरज आहे का? ;)

येडा अण्णा's picture

9 Dec 2009 - 3:54 pm | येडा अण्णा

नाथा कामत -
अविवाहीत तरूणींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून, शंकराकडून रुंडमाळा उसन्या आणून गळ्यात घालून नाचते.

अंतू बर्वा -

"'म्हणजे ? अतूशेटना मुलगा आहे ?"
"आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !"
"'कलेक्टर ?"
"भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले.

adwait gole's picture

12 Dec 2009 - 5:28 pm | adwait gole

हे तबला वजिवतय कि मान्दि खजिवतय रे.....

ऋषिकेश's picture

12 Dec 2009 - 7:35 pm | ऋषिकेश

"शेवटी काय घड्याळाचे पट्टे नी तबकड्या बदलतात.. सूखाने टळलेली दूपार पहायला तबकडी आणि पट्ट्या कुठल्या का असेना"
--
"हिने कुठल्याही पतिपरायणस्त्रीप्रमाणे आपल्या नवर्‍याचा गाढवपणा चार चौघात उघड केला"
--
"फादर फादर हे काय आहे?"
"डुक्कर"
"अच्छा म्हणजे तुम्ही मला सारखं म्हणता ते हेऽऽऽ!!!!"
--
"मास्तराच्या बायकोच्या गळ्यात नाहि पण डोळ्यात मोती पडले"
--
"मग काचांच्या तुकड्यांतून हा व हा ग आहे हे झालं"
--
"आहे तुझ्या वर्गात कोणी? लपेल फडताळात? म्हणेल चिंता करतो विश्चाची?"
---
"इथे सगळं विका.. बाल्य विका.. तारुण्य विका.. कौमार्य विका.. विकण्यासारखं नसतं ते वार्धक्य.. 'विका' हा ज्या देशाचा मूलमंत्र मंत्र आहे तिथे वार्धक्याचे निर्माल्य होत नाहि पाचोळा होतो"
--
"दारू म्हणजे काय रे भाऊऽऽ??!!"
--
"गोरंऽ! म्हटल्याबरोबार ही एवढ्यांदा ओरडली की मी ज्या अंगाकडे पहात होतो ते देखील दचकलं.. आता कपडे अंग झाकण्यासाठी घेतात हे मला ठाऊक कपड्याला स्वतःचं अंग असतं हे कसं कळणार?"
--
"कॉसमॉस? कॉसमॉस!! हा हा कॉसमॉस!!!!!!"
--
"नाम्या तो माझा शर्ट आहे!!!"
"अंगाला बरोबर आला माझ्या"
--
"ती वीट तासभर घेतल्यावर एखाद्या गोष्टीला कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात ते मला कळलं"
--
"त्याने त्या सुटाच्या एवढ्या ट्रायल घेतल्या की इंग्रजीत गुन्हेगाराच्या सुनावणीला ट्रायल का म्हणतात हे मला कळून चुकलं"

बापरे
कठीण काम आहे डोक्यात असंख्य वाक्ये घोंघावताहेत.. तुर्तास इथेच थांबतो

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

आशिष सुर्वे's picture

12 Dec 2009 - 10:03 pm | आशिष सुर्वे

शेवटी तुम्ही आम्ही काय, पत्रातल्या पत्त्याचे धनी.. मजकूराचा मालक मात्र निराळाच असतो!!

-
कोकणी फणस

सोत्रि's picture

13 Dec 2009 - 9:38 am | सोत्रि

एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्यास मराठीत "वीट येणे" का म्हणतात हे मला समजले.
(संदर्भ: माझा शत्रूपश)‌

दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेवा म्हणावं!
(संदर्भ: अंतू बर्वा)‌

अविनाशकुलकर्णी's picture

14 Dec 2009 - 2:36 pm | अविनाशकुलकर्णी

पु.ल.च्या एका सभेला आचार्य अत्रे अध्यक्ष होते...भाषणात ते पु.ल.चे कौतुक करीत म्हणाले...पु.ल.नि खूप साहित्य निर्मिती केली आहे....व मागे पु,ल,कडे बघत ते म्हणाले ."बरोबर आहे..ज्यांच्या नावात..पु..आणि ल.दोन्हि आहे तेथे निर्मितीस काय कमी"