भारतीय पासपोर्ट क्रमांक

मेघवेडा's picture
मेघवेडा in काथ्याकूट
2 Dec 2009 - 4:51 pm
गाभा: 

काल ऑफिसात बसल्या बसल्या असंच सहजच म्हणून विचार करता करता माझ्या बावळट मनाला एक प्रश्न पडला. खरंतर एका गोर्‍याचा पासपोर्ट पाहिला मी आणि तेव्हापासून हा प्रश्न मनात रूंजी घालतोय. ब्रिटिश पासपोर्ट पाहिल्यावर एक गोष्ट लगेच ध्यानात आली ती म्हणजे त्यांची पासपोर्ट क्रमांकाची रचना. यांचा पासपोर्ट क्रमांक ११/१२ आकडी संख्या आहे. वाटलं, काय बावळटपणा आहे. आपला पासपोर्ट क्रमांक बरा, एक अक्षर आणि सात आकडे. लक्षात ठेवायला सोपे!
आणि तेव्हाच डोक्यात किडा वळवळला, युनायटेड किंगडमची लोकसंख्या आहे फक्त ६-७ कोटी आणि यांच्या पासपोर्ट क्रमांकाच्या कमाल संरचनांची संख्या (कॉम्बिनेशन्स ला मराठी शब्द नाही मिळाला!) आहे १०^११ म्हणजे १०० अब्ज!! आता आपल्या भारतीय पासपोर्ट क्रमांकाची रचना लक्षात घेता, (एक अक्षर आणि सात आकडे) कमाल संरचनांची संख्या (पुन्हा कॉम्बिनेशन्स!) पुढीलप्रमाणे:

२६ अक्षरांतून १ अक्षर आणि १० आकडे, ७ जागा म्हणजे २६ x १०^७ = २६ कोटी. ( सध्या अपवादांकडे दुर्लक्ष करूया!)

आता भारताची लोकसंख्या कोटींचे शतक केव्हाच पार करून गेली आहे. अशा परिस्थितीत पासपोर्ट क्रमांकांचा घोळ नाही होणार का? वेळ आल्यास (आणि कधीतरी येणारच!) या क्रमांकाच्या संरचनेत बदल करावा लागल्यास ते मोबाईल अथवा टेलिफोन नंबर बदलण्याइतक्या सहजतेने होऊ शकते का?

काहीतरी मार्ग असलाच पाहिजे नाही का? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

--

(संख्यांच्या घोळात हरवलेला) मेघवेडा.

प्रतिक्रिया

सध्या तरी आठवले ते बहुतेक बँकानी coreबँकींग तत्वानुसार आपले खातेक्रमांक १४ अंकी करून घेतले.
असाच प्रकार पारपत्रासाठीसुद्धा वापरता येईल.

अरुण मनोहर's picture

2 Dec 2009 - 6:47 pm | अरुण मनोहर

प्रकाटाआ.

लंबूटांग's picture

2 Dec 2009 - 8:02 pm | लंबूटांग

काहीच करावे लागणार नाही असे मला वाटते.

सध्या ज्या ठिकाणी अंक आहेत त्या ठिकाणी अक्षरे वापरता येऊ शकतील. आणि मग २६*३६^७ =२०३७४६८२६६४९६ इतके विवीध क्रमांक उपलब्ध होतील.

पहिल्या स्थानी केवळ अक्षर न वापरता अंक सुद्धा वापरले तर ३६^८ = २८२११०९९०७४५६ इतके विवीध क्रमांक उपलब्ध होतील.

धनंजय's picture

2 Dec 2009 - 8:41 pm | धनंजय

उत्तम (outside the box). सोपा आणि थेट विचार.

अनामिक's picture

2 Dec 2009 - 8:46 pm | अनामिक

हेच म्हणणार होतो... पण लंबूटांगने आधीच प्रतिसाद दिला.

-अनामिक

प्रभो's picture

2 Dec 2009 - 8:11 pm | प्रभो

पहिल्या ठिकाणी अक्षर वापरण्यामागे कारण असावं..सध्याच्या G सिरीजच्या पासपोर्टांना इमिग्रेशन चेक ची जरूरत नसते..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

लंबूटांग's picture

2 Dec 2009 - 10:43 pm | लंबूटांग

माझ्या माहितीप्रमाणे ECNR हा फक्त एक शिक्का असतो तुमच्या पासपोर्ट वर..

आत्ताच विकि वर वाचल्याप्रमाणे २००७ नंतर दिलेल्या पासपोर्ट मधे पान क्र. २ ECNR साठी मोकळे सोडले असते.

माझा स्वतःचा पासपोर्ट G सिरीजचा नाही आहे पण इमिग्रेशन चेक ची जरूर नाही आहे.

पाषाणभेद's picture

3 Dec 2009 - 5:13 am | पाषाणभेद

"माझा स्वतःचा पासपोर्ट G सिरीजचा नाही आहे पण इमिग्रेशन चेक ची जरूर नाही आहे."

काय म्हणायचं काय आहे तुम्हाला?

"माझा स्वतःचा पासपोर्ट G सिरीजचा नाही म्हणून मला इमिग्रेशन चेक ची जरूर नाही", असे तर म्हणायचे नाही ना? मग सरळ बोला ना हो.

------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

लंबूटांग's picture

3 Dec 2009 - 6:39 am | लंबूटांग

मला असे सांगायचे आहे की

"माझा स्वतःचा पासपोर्ट G सिरीजचा नाही तरीही मला इमिग्रेशन चेक ची जरूर नाही"

वर प्रभो यांनी लिहीले आहे की
>>सध्याच्या G सिरीजच्या पासपोर्टांना इमिग्रेशन चेक ची जरूरत नसते

हे वाचून असे वाटले की ज्यांना इमिग्रेशन चेक ची जरूरत नसते अशांना G सिरीज चे पासपोर्ट देतात.

थोडक्यात, सिरीज आणि इमिग्रेशन चेक चा काहीही संबंध नाही.

प्रभो's picture

3 Dec 2009 - 8:42 pm | प्रभो

>>वर प्रभो यांनी लिहीले आहे की>>सध्याच्या G सिरीजच्या पासपोर्टांना इमिग्रेशन चेक ची जरूरत नसते

माझ्या माहितीप्रमाणे G सिरीजच्या पासपोर्टांमधे इमिग्रेशन चेक चे पानच नाहिये...बाकिच्या सिरिज ना इमिग्रेशन चेक चे पान आहे व त्यावर शिक्का मारून घ्यावा लागतो जर इमिग्रेशन चेक करावे लागणार असेल तर...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

लंबूटांग's picture

3 Dec 2009 - 9:44 pm | लंबूटांग

हे असे आहे तर..

माहितीत भर टाकल्याबद्दल धन्यु :)

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 8:44 pm | श्रावण मोडक

१२ आकडी यूआयडी आणि त्यासाठीचे ४ आकडी संकेताक्षर अशी एक एकूण १६ आकड्यांची व्यवस्था येतेच आहे. त्यातूनच पासपोर्टसाठी काही होईल कदाचित.

चतुरंग's picture

2 Dec 2009 - 9:09 pm | चतुरंग

हा दुवा पहा. पासपोर्टसंबंधी बरीच माहिती दिली आहे.

भारतीय विदेश मंत्रालयाने आता ई-पासपोर्ट द्यायला सुरुवात केली आहे. आयायटी कानपूरच्या मदतीने ६४केबी डाटा मावेल अशी इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेले पासपोर्टस वितरित व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या हे पासपोर्टस फक्त राजकीय व्यक्ती आणि अतिमत्त्वाच्या व्यक्तींसाठी असले तरी लवकरच सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होतील.
ह्यात नंबरांची अडचण अजिबातच येऊ नये. आणि बनावट पासपोर्टस होण्याची शक्यता अतिशय कमी होईल.

चतुरंग

सुनील's picture

3 Dec 2009 - 11:19 am | सुनील

एखाद्या गोष्टीसाठी कितपत जागा पुरेल असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याचे उत्तर, संबंधित व्यक्तीचा दृष्टीकोण (Horizon) कितपत व्यापक आहे, त्यावर अवलंबून असते.

Y2K आठवते? ८० च्या दशकात जेव्हा संगणक प्रणाली निर्माण होऊ लागल्या तेव्हा नव्या सहस्रकाचा विचार तेव्हाच्या संगणक प्रणाली विकासकांच्या डोक्यात नव्हता. म्हणूनच वर्षांसाठी केवळ दोनच जागांची सोय त्यांनी करून ठेवली. सहजिकच त्यानंतर आणखी दोन जागांची सोय करण्याचा भुर्दंड त्यांना पडला.

आता देशांतील पोस्ट ऑफिसेसना क्रमांक देण्यासंबंधी पाहू. भारतात पिन नंबर हा ६ आकडी असतो. आणखी पुढची अनेक वर्षे त्यात बदल करावा लागणार नाही. अमेरिकेने ५ आकडी झिप स्वीकारला. पण आता त्याला ४ आकडी जोड-झिप लावण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.

याबाबतीत इंग्रज हुशार खरे! त्यांनी आपला पोस्ट कोड निव्वळ आकड्यांचा न ठेवता, अक्षर-आकडे असा संमिश्र ठेवला. त्याचा फायदा असा की, केवळ एका पोस्ट कोडात इंग्लंडात जेमतेम ८० ते १०० घरे येतात.

आता वळूया भारतीय पासपोर्ट कडे. प्रचलित पद्धतीनुसारदेखिल सुमारे २६ कोटी पासपोर्ट देता येतात. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के होते. सध्या किती पासपोर्ट दिले गेले आहेत? भारतात पासपोर्ट करू इच्छिणार्‍या लोकांची संख्या कितपत जाऊ शकते? माझ्या मते, आणखी अनेक वर्षे प्रचलित पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मेघवेडा's picture

3 Dec 2009 - 2:41 pm | मेघवेडा

Y2K चा विचार आला होता माझ्या मनात .. आणि म्हणूनच हा प्रश्न पडला मला की जर पासपोर्ट क्रमांकाची संरचना बदलायची वेळ आली तर ते दूरध्वनी क्रमांक बदलण्याइतके सोपे आहे का?

भारतात पासपोर्ट करू इच्छिणार्‍या लोकांची संख्या कितपत जाऊ शकते?

शक्य झाल्यास १००%!! हे अवास्तव आहे याची पुरेपूर कल्पना आहे मला.. पण निदान ५०% तरी?? ही संख्याच जाते ५० कोटींच्या वर!! मग बदल करायचा झाल्यास किती खर्चिक आणि कष्टप्रद ठरू शकते याबाबत काही कल्पना नाही मला आणि ते जाणून घ्यायची माझी इच्छा आहे.

---
मेघवेडा.