सुरक्षा ? ? ?

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in कलादालन
23 Nov 2009 - 6:01 pm

प्रत्येक पातळीवर सुरक्षेचा विचार करणे आवश्यक असते ते समाजात रुजवणे तितकेच महत्वाचे आहे. असे झाले तरच आमच्या सीमा व जनता सुरक्षित होण्याची शक्यता आहे.

ह्या कामगाराने सुरक्षित काम करण्या करिता कमरेला सुरक्षा चामडी पट्टा बांधून काम करणे आवश्यक आहे.

पायात रबरी बुट असणे आवश्यक. विज रोधकावर पाय ठेवणे चूक आहे.

दोन तारा एकत्र जोडताना बरोबर आणि चुक काय हे ह्या चित्रात दिसते आहे.

अशी जोडपट्टी नटबोल्टने जोडणे अत्यंत चांगली पध्दत आहे.

अशा प्रकारे अधांतरी फ्युज वापर फार धोका दायक असते. ती फ्युज वायर जळल्या नंतर दोन्ही टोके आधार नसल्याने दुसर्‍या तारांना जोडल्या जातील व फार मोठे नुकसान ओढवेल. हे असे सुरक्षा खेळ सगळी कडे होत असल्याने विज प्रवाहात नेहमी व्यत्यय येत आहे.  आम्ही सुरक्षेला महत्व कधी देणार ?

कला

प्रतिक्रिया

सेफ्टि आणि सिक्युरिटी ची गल्लत झालेली दिसत्येय. फोटोंवरुन हे सेफ्टि वरिल विवेचन आहे असं दिसतंय मग याचा सीमा सुरक्षेशी काय संबंध?

मंदू

मदनबाण's picture

23 Nov 2009 - 6:22 pm | मदनबाण

विजमंडळ त्यांच्या कर्मचार्‍यांना सुरक्षा पुरवत नाही असे दिसते !!! :O

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

प्रमोद देव's picture

23 Nov 2009 - 6:25 pm | प्रमोद देव

मुळात प्रश्न समजून घेऊ या.
ह्या चित्रांवरून कळतंय की अशी कामं किती धोकादायक पद्धतीने केली जातात..

इथे त्या कामगाराची आणि अपघाताने शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता लक्षात घेऊन, कोणतीही काळजी घेतलेली नाही हे स्पष्ट दिसतंय.
रानडेसाहेब,चांगलं टिपलंय तुम्ही...दृष्य. पाहू या संबंधितांचे डोळे उघडतात का ते.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

नंदू's picture

23 Nov 2009 - 7:19 pm | नंदू

हे पहा.

http://wiki.answers.com/Q/1_Explain_the_difference_between_safety_and_se...

असो. आमच्या सिंव्हपुरचा फायर सेफ्टी अवेअर्नेसचा हा पुरावा पहा.

From SONY" alt="" />

नंदू

स्वाती२'s picture

23 Nov 2009 - 6:57 pm | स्वाती२

बाप रे! किती धोकादायक! या कामगारांची युनियन काही करत कसे नाही या बाबत?
चलता है! ही वृत्ती कुठल्याही परिस्थीतीत घातकच! कालच वाचले शिकागोच्या भारतीय वकिलातीने नियम न पाळल्यामुळे राणाला व्हिसा मिळाला. पुढे जे घडले ते ..... :(

चतुरंग's picture

23 Nov 2009 - 7:19 pm | चतुरंग

सर्व स्तरावर आपल्याकडे धोका पत्करण्याची आणि निष्काळजीपणाची परिसीमा दिसते!
मानवी जिवाची किंमत आपल्याकडे शून्य आहे!

अमेरिकेत खाली दर्शवलेल्या चित्रातल्या प्रमाणे स्वयंचलित बास्केट मध्ये बसून इलेक्ट्रिक कंपनीची माणसे काम करताना दिसतात.

संपूर्ण सुरक्षापोषाख आणि हारनेस पट्ट्यासह कामगार


(चित्रे आंतरजालावरुन साभार.)

रानडे साहेबांनी सुरक्षेचा प्रश्न अगदी कळीचा मानला आहे हे योग्यच आहे. सगळीकडे भोंगळ कारभार करणारे लोक बहुसंख्येने असले तर सीमांवरही फार वेगळी परिस्थिती असू शकत नाही!

(विद्युत अभियंता)चतुरंग

सूहास's picture

23 Nov 2009 - 7:24 pm | सूहास (not verified)

सुरक्षेचा प्रश्न अगदी कळीचा मानला आहे हे योग्यच आहे. सगळीकडे भोंगळ कारभार करणारे लोक बहुसंख्येने असले तर सीमांवरही फार वेगळी परिस्थिती असू शकत नाही! >>

स ह म त !!

उदा.. २६/११

सू हा स...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2009 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रानडे साहेब, आपल्याकडे सुरक्षीतता नावाच्या गोष्टीला प्राधान्य नाही,
हे वरील सर्व छायाचित्रातून स्पष्ट होतं. जो पर्यंत अपघात होत नाही तो पर्यंत सुरक्षिततेचा विचार होतच नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

असो, मिपावर आपले स्वागत आहे. :)

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

23 Nov 2009 - 8:35 pm | धमाल मुलगा

>>जो पर्यंत अपघात होत नाही तो पर्यंत सुरक्षिततेचा विचार होतच नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
दुर्दैवानं सहमत असेच म्हणेन.
आणि दुर्घटना घडल्यानंतर होतो तो सुरक्षिततेचा विचार.....अंमलबजावणीबाबत तर काय बर्‍याचदा आनंदीआनंदच! (अर्थात, काही ठिकाणी होतेही जुजबी अंमलबजावणी, पण प्रमाण फार कमी.)

विंजिनेर's picture

23 Nov 2009 - 8:54 pm | विंजिनेर

अहो कारण सोपंय.
सुरक्षा पाळायची तर त्याला खर्च येतो. उदा. चतुरंगांच्या प्रतिसादातला टोपलीचा ट्रक, कामगारांचा सुरक्षा पोषाख इ. ह्याला पैसे पडतात (आणि ते गिर्‍हाईकांच्या वीजबीलातून वळवले जातात).

भारतात ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची किंमत मिळवली तर वीज अमेरिकेत मिळते तेव्हढी महाग होईल. भारतात ते परवडणार नाही.
ह्याची दुसरी बाजू अशी की भारतात मनुष्यबळाची 'किंमत' ह्या सगळ्या खर्चाच्या तुलनेत कमी आहे(म्हणजे वीज मंडळ सुरक्षेवर खर्च करत नाही असं म्हणून एखाद्याने नोकरी सोडून दिली तरी त्याच्यामागे तोच धोका पत्करून काम करू पाहणारे इच्छुक १०० असतील).
शिवाय गलथान कारभार/असलेल्या नियमांची ढिसाळ अंमलबजावणी इ. आहेच.
सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून सुरक्षिततेकडे सर्रास दुर्ल़क्ष होते/केले जाते.

हे सगळे न करताही आज वीज किती महाग झाली आहे भारतात!
पुण्यात आज एका घरगुती यूनिट विजेला ३०० यूनिट्स पासून पुढे ५रु.प्रतियूनिट पडतात. ५०० यूनिट्स चा खर्च १२००रु. आहे.
ते सुद्धा लोडशेडिंग मधून वीज मिळाली तर!

३३% वीज गळती/चोरी, जुने ट्रान्सफॉर्मर्स, जुनी वितरण व्यवस्था, वारंवार ट्रान्सफॉर्मर्स जळणे, जनरेटर्स ट्रिप होणे ह्या सगळ्याने जे नुकसान होते ते ह्या खर्चाच्या कैकपट असते!
लोक बिझनेस किती काळ बंद ठेवणार जनरेटर सेट्स लावून १०रु. प्रतियूनिट दराने सुद्ध लोक घेत रहातात कारण वीज ही मूलभूत सुविधा आहे.

नवीन मंत्री/अधिकारी आले की चकाचक नवीन गाड्या, काही कारण नसताना ऑफिसचे नूतनीकरण असल्या गोष्टींवर करदात्यांचे कोट्यावधी रुपये उधळताना कामगारांच्या मूलभूत सुरक्षेचा खर्च असा किती जास्त असणार आहे?

चतुरंग

रामपुरी's picture

25 Nov 2009 - 2:28 am | रामपुरी

"वीज अमेरिकेत मिळते तेव्हढी महाग" म्हणजे नक्की केवढी महाग? अमेरिकेत वीज महाग आहे असं मलातरी वाटत नाही. अर्थात दरडोई उत्पन्न वगैरे बाबी विचारात घेतल्या तर. आणि नुस्तंच "गुणिले पन्नास" केलं तरी फार महाग नाही. मुंबईत रिलायन्सचे बिल साधारण एवढेच येते (तेवढ्याच वापराचे.. comparing apple to apple).

पाषाणभेद's picture

24 Nov 2009 - 3:41 am | पाषाणभेद

अहो हे सगळे कॉन्ट्रक लेबर कामे करतात. विजकर्मचारी असले अघोरी उपाय करत नाही. गरीब लेबर लोक पोटासाठी कुठल्याही सुविधेविना कामे करण्यास बांधील असतात. आता त्या लेबर कडून चांगले काम होईल का?

आमच्या कडे एका जंक्शन बॉक्सात कनेक्टर जळाला तर वायर गुंडाळून काम चालू ठेवतात. कसले त्यांच्या वर कामे करणारे लोकं अन अधिकारी. बसून पैसे खायचे धंदे *ल्यांचे.

--------------------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै सिकीरूटी की आवश्यकता है | रहेना, खाना, पीना मुफ्त रखेगा | साल में दो बार युनिफोर्म | अन्य नौकरीयां भी उपलब्ध | नौकरी पाने के लिए हमे कान्टेक करें |)
(गुडगूडी टाईम्स -छोटा विज्ञापन बडा काम )

धनंजय's picture

24 Nov 2009 - 8:48 pm | धनंजय

छायाचित्रे, माहिती, आणि चतुरंग यांचे प्रतिसाद चांगले आहेत.

मनुष्याच्या जिवाला क्षणिक धोका आहे, त्याचे फायदा तोट्याचे गणित आपण हलगर्जीपणाने करतो. बास्केट ट्रक नसला तरी रबरी बूट, योग्य प्रकारचे फ्यूझ वगैरे यांची किंमत फारशी नसावी. हे आताच करता येईल.

आणि आशा करूया की नजिकच्या भविष्यात जिवाच्या धोक्याची किंमत इतकी मानली जाईल, की बास्केट-ट्रकला वढीव खर्चही वाजवी मानला जाईल.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Dec 2009 - 3:04 pm | अविनाशकुलकर्णी

प्रत्येक पातळीवर सुरक्षेचा विचार करणे आवश्यक असते ते समाजात रुजवणे तितकेच महत्वाचे आहे. असे झाले तरच आमच्या सीमा व जनता सुरक्षित होण्याची शक्यता आहे. .
===============================