(अताशा कसे हे मला काव्य होते?)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
6 Mar 2008 - 3:38 am

संदीप खरे यांचे 'अताशा असे हे मला काय होते?' ही आमची प्रेरणा.

अताशा कसे हे मला काव्य होते?
कुण्या कवीच्या पाणी डोळ्यात देते
बरा वागता वागता फीट येते
विडंबून शब्दात ते काव्य येते

जरी वाचता हा पसारा कवींचा
कसा हर्षतो चोर माझ्या मनीचा
असे हालते आत जोरात काही
मिळे माल कच्चा तरी तो मलाही

नसे ती दयाही, अनवधान नाही
कसे ते विडंबू, असे भान तेही
जसा चोर निघतो धनाच्या भिलाषा
सगळे नकाशे, अनुमान नाही

जसा ऐकू येतो कवींचा इशारा
क्षणी दूर होतो मनींचा पिसारा
विडंबून ज्या रोज जातो पळूनी
कवींनाच त्या मागू जातो सहारा

कशी ही अवस्था कवींना कळावी?
विडंबून काव्ये बिडी ती वळावी?
किती ते विडंबू तरी काव्य साचे
कशी ही मनींची ती उर्मी ढळावी?

कवींना जरासा पुरे हा इशारा
तुम्ही आवरावा कवने पसारा
जरी जालि त्या सोडिले काव्य कोणी
'रंग्या'स मलिदा धन्याला खरारा!

चतुरंग

प्रतिक्रिया

सर्किट's picture

6 Mar 2008 - 3:40 am | सर्किट (not verified)

जरी जालि त्या सोडिले काव्य कोणी
'रंग्या'स मलिदा धन्याला खरारा!

वा ! क्या बात है !!

संदीपचे काही खरे नाही आता !

- सर्किट

प्राजु's picture

6 Mar 2008 - 6:23 am | प्राजु

तुमचे काव्य आवडले...
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 8:36 am | विसोबा खेचर

कवींना जरासा पुरे हा इशारा
तुम्ही आवरावा कवने पसारा
जरी जालि त्या सोडिले काव्य कोणी
'रंग्या'स मलिदा धन्याला खरारा!

हा हा हा! मस्त रे रंगा....

आपला,
(रंग्याचा फ्यॅन) तात्या.

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 8:36 am | विसोबा खेचर

कवींना जरासा पुरे हा इशारा
तुम्ही आवरावा कवने पसारा
जरी जालि त्या सोडिले काव्य कोणी
'रंग्या'स मलिदा धन्याला खरारा!

हा हा हा! मस्त रे रंगा....

आपला,
(रंग्याचा फ्यॅन) तात्या.

धनंजय's picture

6 Mar 2008 - 5:33 pm | धनंजय

पण "भिलाषा"?