✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वड्याचं तेल

स
सस्नेह यांनी
Mon, 05/23/2016 - 12:44  ·  लेख
लेख
‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’ ‘नाही साहेब,...’ ‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’ ‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’ ‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’ ‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’ ‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’ ‘....’ ‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा ! कामं चुकवून बसून खायला काय तुमच्या बापाची जहागिरी हाय काय कंपनी म्हंजे ?’ ‘होय साहेब !’ ‘आं ...?’ ‘नाही साहेब, म्हंजे होय, पुढल्या महिन्यात ही सगळी बाकी भरून काढतो.’ ‘हं...शाणे बना ! चला निघा आता, खुर्ची खोळंबली असेल तुमची. घ्या बोलवून ज्युनिअर्सना आणि घाला चार लाथा ***वर ! कामं करा म्हणावं ***हो !’ ‘यस्सर ! गुड डे सर !’ ‘^&*/$#..!’ ------------------------------------ ‘आयला लैच खवळलाय आज खवीस ! जाम खिंकाळतोय. धामणे, बोलवा सगळ्या फिल्डवाल्यांना ! बसतो एकेकाच्या मानगुटीला !’ ‘पण आज काय झालंय साहेब ? नेहमी तर सीईओ साहेब चांगले बोलतात.’ ‘अहो पालकमंत्र्यांची मिटिंग नाय का झाली काल ? मिनिष्टरसायबानी लै तासलं म्हणे ! मग काय हाण हिकडं डाऊनलोड !’ ‘अर्रर्र, मग बराबर ! वड्याचं तेल वांग्यावर ! ....आत्ता फोन लावतो सगळ्यांना !’ ----------------------------------- ‘काय गं, मी कधीपासून थांबलोय इथं. कुठं गेली होतीस ? घराची किल्ली तरी ठेवशील का नाही ?’ ‘अहो पण तुम्ही आज इतक्या लौकर कसे घरी ? हापिसातल्या लोकांनी हाकललं का काय ?’ ‘कळली अक्कल ! हापिसात बसून काय आम्ही टवाळक्या करतो होय ? ते काय आराम घरात बसून टीव्ही बघायचं काम नाय ! डोकं लागतं डोकं. उद्या माझ्या जागी जाऊन बसा हापिसात, मग समजतंय कसं लाथा खाव्या लागतात ते ! मला शिकवतेय अक्कल ..’ ‘अहो पण मी कुठं काय शिकवतेय ? एवढं चिडायला काय झालं ?’ ‘घोड्याला गाढव झालं ! शॉपिंग करत नुसतं बोंबलत फिरायचं सोडून कामं करा कामं !’ ‘अहो, घरातली कामं आवरूनच गेले होते ना शॉपिंगला ?’ ‘गप्प बसा ! माहितीय मोठ्या विद्वान आहात तुम्ही. चला घाला आता काहीतरी गिळायला.’ ‘.....’ ----------------------------------- ‘ए आई, हे बघ मी काय बनवलंय, कागदाचं विमान ! झुईईईई sss’ ‘निलेश अभ्यास सोडून कागदं काय फाडत बसलाहेस ? होमवर्क कधी करायचं ?’ ‘आई, मघाशीच केलं....’ ‘मग स्पेलिंग्ज म्हणत का बसला नाहीस ? काल टीचर ओरडल्या लक्षात आहे ना ?’ ‘अगं केलीयेत मी स्पेलिंग्ज कालच.’ ‘मग आणि एकदा कर. सारखं खेळ खेळ काय ते ? एवढा मोठ्ठा घोडा झालास तरी समजत नाही ? अभ्यास मागं आहे तुझा. तो अनिल बघ, तुझ्यामागून येऊन फर्स्ट आलाय आता. ‘ ‘आई घोडा म्हणजे हॉर्स ना ?’ ‘हो आणि गाढव म्हंजे अ‍ॅस ? तुझ्यासारखं ?’ ‘अँ अँ sss, मी नाई गाढव, तूच गाढव, जा !’ ‘द्यू का एक दणका आता ? आगाऊपणा करतोस ? चल बघू बस अभ्यासाला. नाहीतर उद्या तुला बाल्कनीत झोपवणार बघ.’ ‘अँ अँ sss..’ ----------------------------------- ‘डोरेमॉन, तुला अक्कल नाही, तू गाढव आहेस ‘ ‘....’ ‘समजतंय का काही मी बोलतोय ते ? एवढा मोठ्ठा घोडा झालास तरी जरापन समजत नाही बघ तुला.’ ‘....’ ‘आणि होमवर्क केलस का नाही अजून ? तो किटरेत्सु बघ किती हुशार आहे ? तुझ्यासारखा गाढव नाही.’ ‘.....’ ‘तुला केमिस्ट्रीचं स्पेलिंग येतं काय ? दाखव बघू म्हणून ?’ ‘....’ 'करशील का ? आगाऊपणा करशील ? थडाक !' '.....' ‘बघू नको माझ्याकडे, जा अभ्यासाला बस, शाणा बन जरा. नायतर तुझं काय खरं नाय. उद्याच तुला अंगणात फेकून देणार बघ !’ ‘.....’ -----------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10507 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

हायला ... धमाल एकदम

संजय पाटिल
Mon, 05/23/2016 - 12:53 नवीन
हायला ... धमाल एकदम सीइओ ते डोरेमॉन भारीये.....
  • Log in or register to post comments

अंहं

सस्नेह
Mon, 05/23/2016 - 14:17 नवीन
मिनिष्टर ते डोरेमॉन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

म्हणजे मिनिस्टरने सुद्धा

रमेश भिडे
Mon, 05/23/2016 - 16:30 नवीन
म्हणजे मिनिस्टरने सुद्धा कुणाकडून (घटनाबाह्य-हाक/रास्वसं/मा, घटनाअंतर्गत-मुमं/पं प्र, पक्षांतर्गत-प्रअ वगैरे) तरी बोलणी खाल्ली आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हे खरंतर ओबामांपासून सुरु

जव्हेरगंज
Mon, 05/23/2016 - 23:22 नवीन
हे खरंतर ओबामांपासून सुरु व्हायला पायजे होतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ओबामामाची मामी राहिली. मिशेल

रमेश भिडे
Tue, 05/24/2016 - 00:07 नवीन
ओबामामाची मामी राहिली. मिशेल बॉस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अर्र.. मी पयला हे रायलंच..

संजय पाटिल
Mon, 05/23/2016 - 12:55 नवीन
अर्र.. मी पयला हे रायलंच..
  • Log in or register to post comments

हम्म!

रमेश भिडे
Mon, 05/23/2016 - 12:56 नवीन
हम्म!
  • Log in or register to post comments

=))

जेपी
Mon, 05/23/2016 - 13:01 नवीन
=)) तेल बरच खाली पर्यंत पाझरलय..
  • Log in or register to post comments

तुझा हातखंडा आहे ग टिपीकल

पिलीयन रायडर
Mon, 05/23/2016 - 13:27 नवीन
तुझा हातखंडा आहे ग टिपीकल साहेब लोकांचं बोलणं!! पर्फेक्ट वातावरण तयार करतेस!! एकच नंबर जमलंय!
  • Log in or register to post comments

अरे मधला एक पार्ट राह्यला.

अभ्या..
Mon, 05/23/2016 - 13:36 नवीन
अरे मधला एक पार्ट राह्यला. मिपावर असतात ना काही वांगी. ;)
  • Log in or register to post comments

चांगले लिहिले आहे . :)

मृत्युन्जय
Mon, 05/23/2016 - 13:39 नवीन
चांगले लिहिले आहे . :)
  • Log in or register to post comments

मस्तच ग

कविता१९७८
Mon, 05/23/2016 - 13:42 नवीन
मस्तच ग
  • Log in or register to post comments

:) :(

टवाळ कार्टा
Mon, 05/23/2016 - 13:54 नवीन
:) :(
  • Log in or register to post comments

छान लिहिलय!

अनुप ढेरे
Mon, 05/23/2016 - 13:56 नवीन
छान लिहिलय!
  • Log in or register to post comments

बिच्चारा

नाखु
Mon, 05/23/2016 - 14:09 नवीन
डोरेमॉन त्यानी कुठला वडा शोधायचा तेलासाठी ????? लेख फर्मास्च.. बिन्तावडीतला नाखु
  • Log in or register to post comments

:)

मन१
Mon, 05/23/2016 - 14:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments

:) मस्तं!

पद्मावति
Mon, 05/23/2016 - 14:21 नवीन
:) मस्तं!
  • Log in or register to post comments

काय म्हन्जे कायच कळळ नाय.

जव्हेरगंज
Mon, 05/23/2016 - 14:39 नवीन
काय म्हन्जे कायच कळळ नाय. कुनी सम्जावेल का?
  • Log in or register to post comments

नको उगा जव्हेरभाऊ.

अभ्या..
Mon, 05/23/2016 - 14:41 नवीन
नको उगा जव्हेरभाऊ. तुमचं भरताचं वांगं व्हायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हाहाहा!!

जव्हेरगंज
Mon, 05/23/2016 - 15:33 नवीन
समजली समजली!!!! उतरंडीवरनं घसरत गेलय तेल. LOL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

धमाल!

बोका-ए-आझम
Mon, 05/23/2016 - 15:00 नवीन
स्नेहातै अधनंमधनं येतात पण फुल कल्ला करतात!
  • Log in or register to post comments

वा! फारच आवडला लेख. वांग पार

प्रियाजी
Mon, 05/23/2016 - 15:17 नवीन
वा! फारच आवडला लेख. वांग पार तेलात भिजून निघाल.
  • Log in or register to post comments

लेख भारी!

एस
Mon, 05/23/2016 - 15:19 नवीन
बरीच काळजी घेऊनही माझ्याकडून एखादे वेळेसतरी असे इकडचा वैताग तिकडे काढणे घडते. परत असे होऊ लागल्यास हा लेख आठवून वेळेत सावरता येईल.
  • Log in or register to post comments

झकास... आवडली वांग्यावरची

डोमकावळा
Mon, 05/23/2016 - 18:53 नवीन
झकास... आवडली वांग्यावरची 'तेलप्रक्रिया'.
‘द्यू का एक दणका आता ? आगाऊपणा करतोस ? चल बघू बस अभ्यासाला. नाहीतर उद्या तुला बाल्कनीत झोपवणार बघ.’
बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो. नाहीतर आमच्या मातोश्रींनी एव्हाना लाटणं तुटोस्तर सत्कार केला असता.
  • Log in or register to post comments

यावरून एक विनोद आठवला...

जव्हेरगंज
Mon, 05/23/2016 - 21:16 नवीन
बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो. खिक्क! मज्जा म्हणजे दोघांचीही ! बालकांची आणि पालकांचीही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोमकावळा

मस्तच. बाकी सरकारी

विवेकपटाईत
Mon, 05/23/2016 - 20:31 नवीन
मस्तच. बाकी सरकारी बाबुलोकांना असा अनुभव नेहमीच येत राहतो.
  • Log in or register to post comments

कथा आवडली...

मुक्त विहारि
Mon, 05/23/2016 - 20:44 नवीन
एका कपनीत असातांना, एका सॉफ्ट-स्किल वर्कशॉपमध्ये, हीच "म्हण-कथा", वेगळ्या प्रकारे सांगीतली होती.
  • Log in or register to post comments

आवडले

पैसा
Mon, 05/23/2016 - 21:02 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

मस्त!

इशा१२३
Mon, 05/23/2016 - 21:15 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

ह्म्म.. शेवट मस्त आणि

आनन्दा
Mon, 05/23/2016 - 21:33 नवीन
ह्म्म.. शेवट मस्त आणि वांग्याचा प्रवास पण आवडला.
  • Log in or register to post comments

आवडली....

उगा काहितरीच
Mon, 05/23/2016 - 21:34 नवीन
आवडली....
  • Log in or register to post comments

लोल :)

रातराणी
Mon, 05/23/2016 - 22:59 नवीन
लोल :)
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय!

निशाचर
Tue, 05/24/2016 - 01:54 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

कथा छान आहे पण एक प्रश्न पडला

अमित भोकरकर
Tue, 05/24/2016 - 03:56 नवीन
कथा छान आहे पण एक प्रश्न पडला कि कोणी पालकमंत्री एखाद्या कम्पनीच्या CEO ला का ओरडेल. ZP चा CEO वर ओरडु शकेल फार तर.
  • Log in or register to post comments

अहो, ती गवर्न्मेंट कंपनी आहे

सस्नेह
Tue, 05/24/2016 - 10:16 नवीन
अहो, ती गवर्न्मेंट कंपनी आहे समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित भोकरकर

आवल्डं

खटपट्या
Tue, 05/24/2016 - 04:36 नवीन
आवल्डं
  • Log in or register to post comments

हम्म........

रेवती
Tue, 05/24/2016 - 06:25 नवीन
हम्म........
  • Log in or register to post comments

आवडली पण शेवटाला काळजात थोडी

कानडाऊ योगेशु
Tue, 05/24/2016 - 08:49 नवीन
आवडली पण शेवटाला काळजात थोडी कालवाकालव झाली.!
  • Log in or register to post comments

ह्म्म.. आजच आमच्या पिल्लाने

आनन्दा
Tue, 05/24/2016 - 14:43 नवीन
ह्म्म.. आजच आमच्या पिल्लाने तिच्या बाहुलीला "खोटे बोलतेस का" म्हणून दरडावले आणि मला हीच कथा आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

शेवटी पोरांवरच सगळेजण उखडतात

अन्या दातार
Tue, 05/24/2016 - 11:38 नवीन
शेवटी पोरांवरच सगळेजण उखडतात राव! :(
  • Log in or register to post comments

बाल्कनीमधे झोपायला लावणं ही

क्रेझी
Tue, 05/24/2016 - 16:38 नवीन
बाल्कनीमधे झोपायला लावणं ही खरोखर भयंकर शिक्षा असू शकते. आमच्या सोसायटीमधे रोज एका मुलाला त्याची आई ही शिक्षा करते आणि तो अगदी केविलवाण्या आवाजात आईची माफी मागतांना ऐकलं की खूप वाईट वाटतं. बाकी कथा अगदी सत्य आहे, निदान आई-बापाचा रागतरी मुलांवरच निघतो हे हल्ली ब-याच घरातलं चित्रं आहे :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा