✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

णवसदस्य आणि जगप्रसिद्ध संस्थळ

ज
ज्ञानोबाचे पैजार यांनी
Fri, 09/18/2015 - 12:48  ·  लेख
लेख
पेरणा एका जगप्रसिध्द संस्थळावर, नव्याने आलेल्या एका स्वयंघोषित प्रेशिताच्या मागे इतर सदस्य लागलेले असतात. त्या प्रेशिताला त्या संस्थळाचे संपादकही सहानुभूतीने सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. त्याला व इतरांना सबुरीने घ्यायचा सल्ला देतात. काही नाठाळ सदस्यांना कानपिचक्याही देतात. त्यामुळे इतर सदस्य निराश होउन या प्रेशिताडे दुर्लक्ष करु लागतात. थोड्या दिवसांनी तो स्वयंघोषित प्रेशित संपादकांवरच विखारी टिका करायला लागतो. त्यांच्यावरच कंपुबाजीचे व पक्षपाताचे आरोप करायला लागतो. त्या जगप्रसिध्द संस्थळाचे संपादक काहीही झाले तरी पहिल्यांदा सदस्यच असतात व सद्स्यांचेच संपादक झालेले असतात. ते त्या स्वयंघोषित प्रेशिताला उत्तरे देण्यास समर्थ असतात. ते बघून इतर सदस्यांनाही चेव येतो व ते पुन्हा एकदा साद प्रतिसांदाचि नव्या जोमाने देवाणघेवाण करू लागतात. स्वयंघोषित प्रेशिताच्या प्रत्येक शब्दाचा किस पाडुन त्याची मते हाणुन पाडायला सुरवात करतात. तो स्वयंघोषित प्रेशितही चवताळुन सदस्यांवर तुटुन पडतो. आणि मग एका घनघोर शाब्दिक युद्ध सुरु होते. माघार घ्यायला कोणिच तयार नसते. या सगळ्याचा अतिरेक झाल्यावर संपादक त्या स्वयंघोषित प्रेशिताचा यथायोग्य सत्कार करतात व त्याला चपला घालुन चालु पडायला सांगतात. जाताना प्रेशित मनाशी म्हणतो "माझ्या ज्ञानाची इथे काही किम्मतच नाही. इकडल्या लोकांची माझ्याशी बोलण्याची पात्रताच नाही. या चिखलात लोळणार्‍या डुकरांना मी स्वच्छ कसे रहायचे हे शिकवायचा प्रयत्न करतोय आणि उलट ते सगळे कंपु करुन माझ्यावर चिखलफेक करत आहेत. केवढी ही कृतघ्नता. यांना यांच्या भ्रमातच राहुदे." तात्पर्य - सार्वजनिक ठिकाणी कोणी विचारला नसताना / कोणाला गरज नसताना सल्ला देणे व उगाचच जिथेतिथे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे मुर्खपणाचे आहे पैजारबुवा,
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
इतिहास
बालकथा
औषधोपचार
कृष्णमुर्ती
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
चौकशी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10708 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

एकदम बरोबर.

एस
Fri, 09/18/2015 - 13:06 नवीन
बादवे, प्रेषिताच्या मनातलं तुम्हांला कसं कळलं?
  • Log in or register to post comments

बाकी काही कळो ना साक्षात

विशाल कुलकर्णी
Fri, 09/18/2015 - 15:20 नवीन
बाकी काही कळो ना साक्षात प्रेषिताच्या मनातले कळणारा सेमी प्रेषित मिपावर आहे हे कळले.अहोभाग्य... मठ वगैरे काढणार असाल तर कळवा, ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सेमी प्रेषित म्हणजे "से मी

बॅटमॅन
Fri, 09/18/2015 - 16:53 नवीन
सेमी प्रेषित म्हणजे "से मी इज़ प्रेषित" अर्थात "मला फुले वहा" पंथी =)) =)) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

"मला फुले वहा" पंथी

सूड
Fri, 09/18/2015 - 18:58 नवीन
"मला फुले वहा" पंथी
म्हणजे मकारादि मकारान्त !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरेच्च्या ही विभक्ती लक्षातच

विशाल कुलकर्णी
Sat, 09/19/2015 - 11:27 नवीन
अरेच्च्या ही विभक्ती लक्षातच आली नव्हती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भ्रम हा एक शब्द परिचयाचा

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 13:27 नवीन
भ्रम हा एक शब्द परिचयाचा वाटला. पेरणा इस्कटली आहे. सापडत नाहीये.
  • Log in or register to post comments

मला पण दिसेना पेरणा

चाणक्य
Fri, 09/18/2015 - 13:39 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पेरणा का दिसत नाही? आता नवीन

मांत्रिक
Fri, 09/18/2015 - 13:37 नवीन
पेरणा का दिसत नाही? आता नवीन मेंब्रांना कसं कळावं बरं!
  • Log in or register to post comments

असो पण स्वतंत्र म्हणूनही

मांत्रिक
Fri, 09/18/2015 - 13:48 नवीन
असो पण स्वतंत्र म्हणूनही बलवान आहे. नित्य व्यवहारातील उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

अरे देवा,

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/18/2015 - 13:48 नवीन
पेरणेलाच पंख लागले बहुतेक. आता आमच्या या लेखाचे काही खरे नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हे देवा

नाखु
Fri, 09/18/2015 - 13:58 नवीन
मूळ वाचेपर्यंत ही (काळ)वेळ वाचकांवर यावी. जागो जागो वाचक जागो चळवळ्या नाखु
  • Log in or register to post comments

णव सधस्य???

बाबा योगिराज
Fri, 09/18/2015 - 14:44 नवीन
नाय कळले... . कन्फ्यूज़्ड बाबा
  • Log in or register to post comments

ये सब क्या हय?

आदूबाळ
Fri, 09/18/2015 - 14:46 नवीन
ये सब क्या हय?
  • Log in or register to post comments

हा रतिबाच्या दुधाचा खरवस आहे.

सस्नेह
Fri, 09/18/2015 - 14:54 नवीन
हा रतिबाच्या दुधाचा खरवस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

किमान

नाखु
Fri, 09/18/2015 - 14:58 नवीन
सगळ्यांना खरवस वाटप होईस्तोर तरी मूळ "खव्वा का पाणी घातलेल दूध" गायब करायच नव्हतं ना? अभामिपाजमेल्तिथेशंकामिळालेतर्चसमाधान्वाचक्संघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

म्हशीला यावेळी पण टोणगा च का?

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 15:00 नवीन
म्हशीला यावेळी पण टोणगा च का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

चव्कशी

नाखु
Fri, 09/18/2015 - 15:03 नवीन
साठी समीती नेमली असावी असा अंदाज आहे. अंदाजपंचे नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हस कुनाचीय?

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 15:05 नवीन
म्हस कुनाचीय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

कृपया

नाखु
Fri, 09/18/2015 - 15:10 नवीन
"धन्या शेठ" ना संपर्क करणे . मिपा नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हस कुनाची गवळ्याची

सस्नेह
Fri, 09/18/2015 - 21:20 नवीन
म्हस कुनाची
गवळ्याची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लावा रे एट्रोसिटी. ;-)

अभ्या..
Fri, 09/18/2015 - 21:45 नवीन
लावा रे एट्रोसिटी. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

.

सस्नेह
Fri, 09/18/2015 - 21:57 नवीन
बेशक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुम्चा काय इशय न्है.

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 22:17 नवीन
तुम्चा काय इशय न्है. म्हशीला म्हन्तोय त्यो. रेड्याचं नाव हाय ते लाडाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कोण? आपला दिनू?

पीके
Fri, 09/18/2015 - 22:48 नवीन
कोण? आपला दिनू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

काय हो हे पैजारबुवा ?

मदनबाण
Fri, 09/18/2015 - 15:01 नवीन
काय हो हे पैजारबुवा ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
  • Log in or register to post comments

हे गुढ काव्य आहे

मारवा
Fri, 09/18/2015 - 15:16 नवीन
मज आंधळ्याला बघता येत नाही संजय हवा होता दाखवायला त्याला दुरदृष्टी चे वरदान लाभलेले होते.
  • Log in or register to post comments

हे स्वयंघोषित प्रेषित बहुधा

होबासराव
Fri, 09/18/2015 - 18:46 नवीन
मि मिपा चा सदस्य होण्यापुर्वि इथे ज्ञानकण वाटत असावे. त्यामुळे फारच संक्षीप्त कळाले. निराकार होबासराव
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
Fri, 09/18/2015 - 18:48 नवीन
क्या बात है.... अद्यापही असे काही गहनविचारी, नाना प्रकारे, इतर नावाने सदस्यत्व घेवून आणि स्वतःलाच टिडियस करणारे फुल्ल बॉटल लिंबू सरबत पिवून, उगाच्च सचिनच्या आवेशात, उद्दामपणे हितोपदेश करत असतात.
  • Log in or register to post comments

वा वा मुवि तुम्हि तर

होबासराव
Fri, 09/18/2015 - 18:57 नवीन
खानवळितल्या सगळ्याच मेंब्राचि हजेरि घेतलि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नाही हो...आम्ही आपले साधे सरळ वाक्य लिहिले आहे....

मुक्त विहारि
Fri, 09/18/2015 - 19:36 नवीन
असो, पैजारबुवांचा लेख वाचून, अद्याप काही जणांची पोटे, जागो रे जागो रे, करत दादा करत आणि ताई-अक्का, असे रेकत पण असतील. असो, तात्पर्य काय तर-----काजवा देखील स्वयंप्रकाशित असतो, पण ही अशी गूणी बाळे, कचर्‍यात पडलेले अभ्रक, त्यांच्या स्वतःच्याच मुखकमलाला लावून, सोंगे आणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

- सार्वजनिक ठिकाणी कोणी

द-बाहुबली
Fri, 09/18/2015 - 18:53 नवीन
- सार्वजनिक ठिकाणी कोणी विचारला नसताना / कोणाला गरज नसताना सल्ला देणे व उगाचच जिथेतिथे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे मुर्खपणाचे आहे
ख्यिक्क... त्यापेक्षा सरळ कट्टे करावेत असे माझं प्रामाणीक मत आहे.
  • Log in or register to post comments

त्यांना जौन आज "वर्ष" वग्रे

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/18/2015 - 19:37 नवीन
त्यांना जौन आज "वर्ष" वग्रे झालं का??? ;) एकदम श्रद्धेची अंजलीच वाहीलीये.. :D म्हून इचरायलो!
  • Log in or register to post comments

फस्क्लास जमलिये जिल्बी..!

भैड्या
Fri, 09/18/2015 - 20:23 नवीन
फस्क्लास जमलिये जिल्बी..!
  • Log in or register to post comments

नाकापेक्षा मोती जड....

प्रभाकर पेठकर
Fri, 09/18/2015 - 22:02 नवीन
ओसामाला कसं अमेरिकेनेच वाढवला आणि अमेरिकेनेच संपविला..
  • Log in or register to post comments

पेरणा

मित्रहो
Fri, 09/18/2015 - 22:20 नवीन
पेरणा न कळल्याने फारसे कळले नाही. पेरणा फार जुनी वाटत नाही. हे ३२८४४ तर पेरणा ३२८४१.
  • Log in or register to post comments

आज ओपनला काय फिगर??

अभ्या..
Fri, 09/18/2015 - 22:24 नवीन
आज ओपनला काय फिगर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

नाही माहीत

मित्रहो
Fri, 09/18/2015 - 22:32 नवीन
पेरणा मात्र आजच १०:३९ ते १०:५८ च्या दरम्यान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ग्यानु भावजी आता एकदाच नाव घ्या बर

मारवा
Fri, 09/18/2015 - 22:28 नवीन
आता लइ येळ झाला मंडळी खोळंबलीत नाव घ्या बरया बोलानं वंदा मंदा सुनंदा कोनाच बी घ्या पण नाव घ्याच आत्ता आमी जीवाचा कान करुन एकतोय उत्तरासाठी नवा धागा नका काढु फक्त
  • Log in or register to post comments

The

vikramaditya
Sat, 09/19/2015 - 10:47 नवीन
Self proclaimed genius was roasted and " barbecued " at " Mipa" nation. May he find peace at "heaven"ly abode. Amen.
  • Log in or register to post comments

नक्की काय होती म्हणे पेरणा?

असंका
Sat, 09/19/2015 - 12:25 नवीन
नक्की काय होती म्हणे पेरणा?
  • Log in or register to post comments

संदर्भ नाही कळला पण त्यानं

रातराणी
Sat, 09/19/2015 - 12:29 नवीन
संदर्भ नाही कळला पण त्यानं फारस काही बिघडलं नाही. :D
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा