✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्द झाले मोती...

ग
गणेशा यांनी
Fri, 05/29/2015 - 14:22  ·  लेख
लेख
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही.. आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले... एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
प्रश्नोत्तरे
वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
93236 वाचन

💬 प्रतिसाद (152)

प्रतिक्रिया

फार आवडलाय हा धागा.

मधुरा देशपांडे
Wed, 06/03/2015 - 13:27 नवीन
फार आवडलाय हा धागा.
  • Log in or register to post comments

गणेशा मस्त रे!

नाखु
Wed, 06/03/2015 - 14:15 नवीन
खरच लहानाबरोबर लहान होणं सोपं असतं का? नसतंच कारण ज्या क्षणी तुम्ही विचार करता की मी लहान होतो आहे तेव्हांच तुमचं बाल्य हरवलेलं असतं. बाल्य कसे पाहिजे मित्रांअम्ध्ये दिलखुलास शेर्‍याला, हजरजबाबीपणाला आपोआप टाळी देणारा-घेणारा हात जसा उस्फुर्त आतून असतो अगदी तसाच. एकदा का तुम्ही बाल्यपणात आपोआप घुसलात की त्या नजरेने जग सुंदर दिसतं अगदी पुस्तकातल्या चित्रा सारखं स्वच्छ, निर्मळ. थोडी कट्टी थोडी बट्टी ,खोटा खोटा स्वयंपाक भातुअकलीच्या भांडयातून दिलेले बेदाणे-शेंगदाणे आपण फार मोठा चविष्ट पदार्थ खातोय असा भाव केल्याबरोबर डोळ्यांत ओसंडणारा आनंद, मध्ये लुड्बुड केली तर लटका राग हे खाली बसून बरोबरीने अनुभवायची गंमत आहे. कपड्यांची धुळीअगोदर, मोठेपणाची वस्त्रे झटकली तरच मस्ट. मी एका वर्षी दिवाळी किल्ल्यासाठी लेकीला आणि लेकाला माती-चिखलात हात घालून किल्ल्यासाठी मदत घेतली तेव्हा किल्ला कसा झालाय त्याहीपेक्षा ही नदी/हा डोंगर मी केलाय याचेच त्या दोघांना खूप अप्रूप होते.(अजून ही चित्रे माळावर आहेत) ह्या दिवाळीत काढावीच बाहेर, आपण का अड्वायच आपल्यातल्या !!!! ताईदादाचा बापूस नाखु
  • Log in or register to post comments

@ नाद..

गणेशा
Wed, 06/03/2015 - 15:49 नवीन
आपल्या मनातील आपले विचार.. सहजपणे जेंव्हा असे बाहेर येवु लागतील.. आपल्याच लिखानातुन एक एक रुप घेवु लागतील, तेंव्हा त्यांना आपल्याला तठस्थपणे पाहता येवु शकेल... मग कुठल्या विचारांचे रुप आपल्याला बदलायचे.. कुठले चित्र कसे निट करायचे.. हे आपल्यालाच समजेल... आपणच आपल्या विचारांचे चित्रकार.. मुर्तीकार... कुठला टाका कुठे टाकायचा हे ठरवणारे ही आपण .. आणि कुठला रंग कुठे भरला की उठुन दिसेल हे ठरवणारे ही आपण.. निसर्ग ही असाच असेल नाही ?. प्रत्येक वेळेस एक वेगळीच निर्मिती साकारण्याचे सामर्थ्य ही त्याच्यात असेच आले असेल... स्वताच्याच निर्मितीस तठस्थपणे पाहणे ही पण एक कलाच...
  • Log in or register to post comments

हे सुरांनो

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 06/03/2015 - 17:00 नवीन
हे सुरांनो चंद्र व्हा! काय रचना आहे... विरहणी म्हणजे काय ते हे गाणं ऐकून कळते. परीपूर्ण रचना.. अप्रतिम संगीत आणि अभिषेकीवुबा तर बिनतोड... एकाकी दुर माळरानावर ती उभी आहे. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आहे, आणि तिच्या मनातून उमटलेल्या वेदनेतून या रचनेने जन्म घेतलाय. पण वेदना कशी पोहचवणार? तर ती सुरांनाच सांगते, तुम्हीच चंद्र व्हा आणि चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा. काय कल्पना आहे ना? जीवघेणा प्रकार आहे. तसाच काहीतरी विचार डोक्यात ठेवून हे लिखाणः ---------------------- दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- वाट भरकटून अंधारात चाचपडत चाचपडत त्याच्याकडे पोहचण्याचा निष्फळ प्रयत्न माझा फसलाच परत एकदा --- वेदनेला शब्द सापडतात कधी कधी नि:शब्द तडफड एका क्षणात आकाश व्हावे सगळी वेदना कृष्ण मेघात भरावी आणि बरसावे... रिक्त होईस्तोवर --- आज परत एकदा पौर्णिमा आली आता अधीरता अगतिकता झाली बेचैनी रिक्ततेकडे झुकली अन् वेदना जिवावरचे दुखणे झाले तरीही दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा....
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 06/03/2015 - 17:23 नवीन
कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम. अभिशेकीबुवांच्या गाण्याचा प्रश्र्णच नाही, त्याला काही तोडच नाही, पण हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली ती मुग्धा वैशंपायन https://www.youtube.com/watch?v=1qFJtCMqcK0 पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

बुवा

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 06/03/2015 - 18:01 नवीन
कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम.
अहो कोणाच्या पंक्तित बसवयतात... ?? माझी लायकी तरी आहे कां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/11/2015 - 07:18 नवीन
क्या बात है पैजारबुवा, माझी सकाळ सुंदर झाली. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

व्वाह!!

किसन शिंदे
Fri, 06/12/2015 - 21:10 नवीन
व्वाह!! काही काही ठिकाणी घेतलेल्या हरकती जबराट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+++१११

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/14/2015 - 10:28 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

वा!

पैसा
Wed, 06/03/2015 - 17:11 नवीन
काय सुंदर धागा आहे हा!
  • Log in or register to post comments

मिका, या झाल्या एका

जयंत कुलकर्णी
Wed, 06/03/2015 - 17:59 नवीन
मिका, या झाल्या एका विरहिणीच्या व्यथा पण पुरुषांचे त्यांची प्रेयसी, पत्नी कुठे गावाला गेल्यावर काय कमी हाल होतात का ? हे बघा काय म्हणतो पास्तरनाक..... दरवाजातून आत बघितले माझेच घर मला ओळखू येईना अचानक तिच्या जाण्याने घराचा आणि मनाचा कसा गोंधळ उडाला आहे भयानक. ठणकणार्‍या वेदना आणि डोळ्यांतील अश्रू समजून नाही देत या अवस्था झालेल्या जखमा कशा मोजता येतील आणि कशाने ? मनात एक तीव्र कळ ऊठली. मी जागा होतो का स्वप्नात ? का माझ्या डोळ्यातील पाण्याने माझ्या बुद्धीवर मात केली आहे ? धुरकटलेल्या काचांमुळे का डोळ्यांतील पाण्याने हे जग मला पार तुटलेले वाटते आहे. मनोवेदनेत माझ्या का दिसत आहेत मला राक्षसी लाटा आणि तुटलेली घरे ? ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........
  • Log in or register to post comments

..

पैसा
Wed, 06/03/2015 - 18:02 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

व्वाह...

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 06/03/2015 - 18:14 नवीन
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले
व्वाह...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

वॉव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/07/2015 - 13:58 नवीन
ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. सुरेख. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे

प्यारे१
Wed, 06/03/2015 - 18:14 नवीन
शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे अनिमिष नेत्रांनी बघत फ़क्त आस्वाद घेत राहावं.... शांतपणं मनाच्या खोल तलाशयात या रत्नाना साठवत राहावं... सरस्वतीच्या या पुत्रांना नतमस्तक होत निव्वळ न्याहाळत राहावं... एकेका मुक्तकासाठी/ कवितेसाठी तुम्हाला एक एक पार्टी लागू! मिपा वरचा अप्रतिमोत्तम वरचा क्रमांक असलेला एक धागा
  • Log in or register to post comments

@ मिका आणि जयंत जी.

गणेशा
Wed, 06/03/2015 - 18:55 नवीन
@ मिका आणि जयंत जी. एकोळी रिप्लाय ह्या धाग्यावर खरे तर द्यायचे नाही ठरवलेले आहे, पण तुम्हा दोघांच्या या अतिउच्च विचार/लिखाना ला सलाम तर करावा लागतोच .... तरीही जाता सुचेल ते लिहितोच. इतरांना मात्र एक विनंती एकोळी रिप्लाय शक्यतो नको.. वा.. छान ही नको.. त्या उलट शब्दांच्या थव्याने तुम्ही येथे या.. मनसोक्त जे वाट्टेल ते लिहा.. त्याची खरी गरज आणि एकदम धागा वाचताना ही मग मध्येच थांबल्या सारखे होणार नाही.. फक्त रिप्लाय किती पेक्षा किती मुक्तके/कविता/चित्रे ते महत्वाचे.. उत्तर लिहितो असेच...
  • Log in or register to post comments

विरह...

गणेशा
Wed, 06/03/2015 - 19:48 नवीन
@ मिका @ जयंत जी... तिचे नसणे माझ्या मनाला मान्यच नसते कधी... ती गेली त्या दिवशी तिने आनंदाने अंगणात रांगोळी काढली होती...ठिपक्या ठिपक्यांचे कासव तीला यायचे.. तेव्हडेच यायचे... ती गेली आणि त्या रांगोळीचे ठिपके धुसर झाले... आज पर्यंत पुन्हा अंगणाला रांगोळीचा स्पर्श झाला नाही.. तिचे मंगल पावित्र्य अंगणाला पुन्हा कधी मिळाले नाही.. ही गत फक्त अंगणाची.. माझ्या आयुष्याचे वेगळे असे काय झाले ? अंधुक भग्न घराच्या कडेकपारीतुन अजुनही तो ओळखीचा सूर ऐकु येतो..... ओठांच्या घाटावर.. त्या शब्दसावल्या अजुनही विखुरलेल्या आहेत .. तश्याच ... आवाज न करता... मळकट पायवाटेवर... ते ओळखीच वारुळ अजुन तसेच आहे... दु:ख पारावर अजुनही तसेच घट्ट बसुन आहे... शेताच्या बांधावर भासांची टोळी अशीच अचानक येते अन मग फाटक्या माझ्या झोळीतुनही त्या टपोर्‍या दाण्यांना अलगद वेचुन न्हेते.. आजकाल हे असेच होते.. पाटाचे पाणी पण हबकुन वाहते... काल वटपोर्णिमा होती.. ते वडाचे झाड मात्र वाळलेले होते.. नाही.. दोरा होता गुंडाळलेला.. करकच्च... पण त्याच्या पारंब्याला माझी स्वप्न लगडलेली होती.. आणि निजले होते माझे विचारगाव त्या तिथेच झाडाखाली...
  • Log in or register to post comments

कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि

रातराणी
गुरुवार, 06/04/2015 - 01:30 नवीन
कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि वार्याबरोबर उडून गेलेला तिचा सुगंध, आता पुन्हा ती बहरेल का? मोडून पडलेला विश्वास आणि बाहेरून आत शिरू पाहणाऱ्या वादळांची धिटाई, आता पुन्हा ती जळेल का? रुतलेली अदृश्य जखम आणि श्वासांचही ओझ झाल्यासारखा तुझा अनोळखी अबोला, आता पुन्हा ती हसेल का? तू गाशील विरहाचे गाणे आणि ती सोडवत बसेल आठवणींचा गुंता, खर सांगा, आता पुन्हा ती जगेल का? ( हे अगदीच काहीतरी आहे पण आमच्या हाताला खाज फार!)
  • Log in or register to post comments

कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या

भीमराव
गुरुवार, 06/04/2015 - 11:17 नवीन
कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या भावना यावर सहजतेन हळुवार फुंकर घालनारी तु पहील्याच भेटीमधे मनाला अलगद स्पर्ष करून गेली नसतीस तर मला साहजिकच नवल वाटलं असतं. दररोज तुझ्या मनाचे ऊलगडनारे नवे नवे पदर मला कळत नकळत तुझ्या जवळ खेचत होते. तुझा अल्लडपना तर खुप गोड वाटायचा.मी इतका गुंतत चाललो होतो की तुझा थोडासा विरह देखिल मला खुप अस्वस्थ करून जायचा. तु हाती न लागनारे मृगजळ कधीच न्हवती, मात्र तरीही सहज साद्ध्य ही न्हवती. आयुष्याचं प्रतयेक वळन आजही तुझी साथ मागतं. निवांत अशा एकांतामधे तर मनाला खोल खोल जखमा होऊन जातात. कधी कधी तर तुझ्या आठवणीने इतका वेडा होऊन जातो, माझं मलाच भान रात नाही. वाटलेलं तुझी आठवण मनाला मोरपीसासारखी सुखावत राहील, मऊ पीसाला इतकी धार येईल हे मात्र स्वप्नातही वाटलं न्हवतं
  • Log in or register to post comments

तिच माझ्यावर प्रेम होत

मदनबाण
गुरुवार, 06/04/2015 - 11:55 नवीन
तिच माझ्यावर प्रेम होत पण व्यक्त करण जमल नाही तिला सर्व मला उमगल होत पण तसं दाखवण जमल नाही मला...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swift
  • Log in or register to post comments

जयंत काका,

नाखु
गुरुवार, 06/04/2015 - 12:57 नवीन
तुमच्या या कवीतेने जखम ओली झाली
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........
जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी.. तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको. आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो. आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला. अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात. एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही. शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे. काकाश्रींचा पंखा नाखुस
  • Log in or register to post comments

आनंद

गणेशा
गुरुवार, 06/04/2015 - 15:27 नवीन
@ बाबुदादा... हळव्या या वातावरणाला थोडेशे चेंज करावे म्हणतो .... ---------------- तु आयुष्यात आली.. अन आनंदाचे उधान आयुष्यात आले... लवासाला पहिल्यांदा भेटलो आपण..लग्ना अगोदर .. साखरपुड्यानंतर .. जाताना मुठा नदी किती सुंदर दिसत होतीना तिकडे... तिथेच विसावलो त्या छोट्ट्याशा ब्रिजवर आपण ... पहिल्यांदाच लाजत झालेला तो स्पर्श .. अह्हा हा किती सुंदर.. मोरपिस अंगावरुन फिरुन जावे तसाच... मग आपण पुढे फिरत गेलो.. निसर्ग आपल्या दोघांना आवडतो.. त्या निसर्गात मनमुराद फिरणे पण .... पण माझा एक रुसवा अजुनही आहे, साखरपुडा आणि लग्नात इतके ४-५ महिन्यांचे अंतर असताना ही आपण फक्त एकदाच भेटु शकलो ... तु आता म्हणत असते आपण पुन्हा लवासा ला जावू .. गेल्यावर्षी खुप हट्ट केला.. पण मी न्हेले नव्हते.. या वर्षी पावसात..आपण जाउया नक्की... खरे सांगु मला तुझ्याशिवाय असे फिरायला जायला आवडत नाही शक्यतो ... १० जून माझा वाढदिवस असतो .. दरवर्षी याच्या आसपासच्या सुट्टीमध्ये आपण फिरायला जातो.. या वर्षी पण त्याच्या आसपास आपण जावु फिरायला... काळ किती फास्ट पळतोय ना.. अस वाटत आहे.. हा काळ असाच थांबावा या क्षणांमध्येच... तु मला शर्ट घेतला या वर्षी पण .. तु नेहमीच वाढदिवसा साठी मला शर्ट घेते.. मला आवडते ते खुप.. यावेळेस चा व्हाईट शर्ट .. तो ही कॅज्युअल pepe jeamo चा.. मस्त आहे एकदम... मला खरेच छान वाटले.. पण तुला असे वाटते.. तु काहीच जास्त घेतले नाही.. कारण तुझ्या वाढदिवसाला तुला २ ड्रेस हवे असताना मी तुला ४ गिफ्ट दिले होते... घरी सांगताना पण आपण १च घेतला असे सांगितले होते... किती दिवस झाले ना आपण पिक्चर ला एकत्र गेलो नाही... आता पर्यंत पिक्चर ला जाताना आपले मात्र लक खुप खराब आहे... आपण लग्ना नंतर पाहिलेला पिक्चर होता डर्टी पिक्चर .. काय करणाअर दोनच ऑप्शन होते... एक डर्टी आणि दुसरा विकी डोनर ... मग डर्टी निवडला.. लग्नाच्या गडबडीत नक्की तो कशावर आहे ते ही माहिती नव्हते... नंतर मात्र धमाल आली मराठी किती सुरेख चित्रपट पाहिले आपण ना.. त्यातल्या त्यात शाळा आणि दुनियादारी मस्तच होते... ती पुस्तके मी तुला वाचायला दिली होती.. तुला वाचनाची जास्त आवड नाही.. पण ही आणि या बरोबर अनेक पुस्तके तु, मी म्हणालो म्हणुन वाचली... आता लवकरच आपण नाटकाला ही जात जावु .. मला नाटके आवडतात.. तु अजुन तशी नाटके पाहिली नाहीसच .. तुला बाहेरचे खायला आवडते.. पाणीपुरी वडापाव भेळ आणि मासे... मला तर खायला आवडतेच त्यामुळे फिरणे आण खाणे होत रहातेच.. पण तु मागच्या काही महिन्यांअगोदर ठरवले आहे, बाहेरचा खर्च कमी.. त्यामुळे आता बरीच मुरड बसली आहे या गोष्टींना.. तसे बरे आहे.. पण तुझी पाणीपुरी मात्र मध्ये मध्ये डोके वर काढतेच आहे...
  • Log in or register to post comments

मागिल काही दिवसांअगोदर, जवळच

गणेशा
गुरुवार, 06/04/2015 - 16:20 नवीन
मागिल काही दिवसांअगोदर, जवळच झाडावर चूऊताईचे घेरटे पाहिले.... चिऊ आपल्या इवल्याश्या पिल्लांना खाऊ देत होती.... त्या पिल्लांची तिला पाहण्याची ओढच लागली असेल त्याच्या अगोदर.. बिच्चारी चिऊ ताई पण.. कधी एकदा खाऊ घरात बाळांसाठी न्हेते असे वाटुन पटकन माघारी फिरली असेल.. मागच्या आठवड्यात ती पिल्ले हळुच आपल्या आईकडे बघुन घरट्यातुन टुनकन बाहेर आली होती.. जास्त लांब नाही गेली पण थोडे पंखांना बळ देत असल्यासारखे पाहिले त्यांनी .. मग चिऊताईने पुन्हा त्यांना घरट्यात जाण्यास सांगितले नव्हे घरट्यात लोटलेच जणु ... असेच त्यांची शाळाच जणु अजुन चालली होती.. फांदिच्या टोकावर बसुन ती पिल्ले धडपडत का होईना .. हळु हळु पंखात बळ साठवत होती.. चिऊताई आता मास्तरीन म्हणुन पण एकदम छान दिसत होती.. आज ती पिल्ले थोडे दूर उडुन गेली ... पंखात आकाश सामावण्याचा त्यांच्या इरादा होता हे नक्की... बालगीत झाडावरती घरटे चिऊताईचे ... पानांआड दडलेले.. .... घास भरवती पिल्लांना आपल्याच इवल्या चोचीने पंखाना बळ देती ती छडी हातात घेवुनी ... आकाशा ला मिठीत घेवू ही प्रार्थना तिच्या शाळेची... एक दिवस आला असा .. परिक्षा संपली पटकन चिऊताईची शाळा संपली पिल्ले उडाली भुर्रकन
  • Log in or register to post comments

उपक्रम चांगला आहे.

मनीषा
गुरुवार, 06/04/2015 - 18:08 नवीन
उपक्रम चांगला आहे. असं लिहून ठेवलेलं चांगलंअसतं. ते परत वाचताना काहीवेळा नवल वाटतं. कधीतरी असही काही आपल्या मनात आलं होतं म्हणून .
  • Log in or register to post comments

असेच माझे काही ......

मनीषा
गुरुवार, 06/04/2015 - 20:59 नवीन
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु? ........आणि काय सांगु? नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच आणि आतल्या प्रकाशावर पडू दिली नाही अंधाराची छाया कधी म्हणूनच तर आहेत त्या माझ्या जीवाच्या जीवलग निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात जगाच्या सा-या तापांपासून दूर कधीतरी वाटतं मलाही पहावं .... काय चाललं आहे बाहेर? मग उघडते मी एक छोटासा झरोका बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता त्यातुनच येतात मग जुन्या नव्या आठवणी काही सुखावणा-या .... तर .. काही रडवणा-या त्यांच्याशी बोलत राहते मी कधी ---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही बाहेरचा कोलाहल मला अगदी ----- नवा नवा वाटतो त्यात एखादा ओळखीचा सूरही असतोच त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात ------ मग सगळे चेहरे एकमेकात मिसळतात अन त्यांचा बनतो एकच चेहरा त-हेत-हेच्या भाव-भावनांचे आविष्कार दाखवणारा त्यातून मग अनेक रंग विखूरतात त्यातले काही मला भावतात देखील ... मग मी त्या रंगांना निरखून पाहते त्यांना एक आगळा वेगळा गंध असतो .... तो गंध माझ्या कणाकणात भिनतो मनावर एक अनोखी धुंदी चढते ---- त्या गंधांची ........ त्या रंगांची मग त्या चार भिंतीतलं माझं एकटेपण जणू नाहीसं होतं अनेक भावनांचे रंग... त्यातून तयार होते एक अद्भूत नक्षी कशी माहित नाही ... पण मला ती आवडते त्या नक्षीच्या बिलोरी काचा सा-या घरभर पसरतात त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात माझं मन मोहून जातं त्या कवडशांना हातात घ्यावं त्यांना जवळून पहावं ... असं वाटतं ...... पण त्यांना हातात घ्यायला मी जाते .... तशी ते माझ्यापासून लांब जातात असा खेळ ---------- कितीतरी वेळ चालतो शेवटी मी थकून जाते एका जागी बसून त्या कवडशांकडे पहात राहते हळूहळू उन, आपली पावलं मागे घ्यायला लागतं तसे सारे कवडसे सुद्धा त्याच्या मागे धावतात मग तिथे काहीच रहात नाही दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो शांत ..... सुस्थीर .... अश्वासक....... मनाला दिलासा देणारा काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा माझं मन शांत होतं पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र हरवूनच जातात माझ्या मनात राहतात मग फक्त त्यांच्या आठवणी त्या आठवणी मी माझ्या मनात जपून ठेवते आता त्या आठवणींना माझ्याकडे यण्यासाठी झरोक्याची आवश्यकता नसते त्या चार भिंतींच्या अवकाशात त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या सोबती असतात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

ओथंबलेलं आकाश

जयंत कुलकर्णी
Fri, 06/05/2015 - 06:04 नवीन
Image removed. ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

धन्यवाद ! सुरेख फोटो ..

मनीषा
Tue, 06/09/2015 - 09:36 नवीन
धन्यवाद ! सुरेख फोटो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सुर्रेख लिहित आहात सगळे.

यशोधरा
गुरुवार, 06/04/2015 - 22:00 नवीन
सुर्रेख लिहित आहात सगळे.
  • Log in or register to post comments

@ मनीषा

गणेशा
Fri, 06/05/2015 - 00:47 नवीन
आठवणींचा बिलोरी आरसा आपल्याकडे असला की कधी पण आपण त्या आरश्यातुन काळाच्या पडद्याला छेद देत त्यावेळेसचे क्षण पुन्हा अनुभवत असतो ... मन आपल्याच भिंतींना झुगारुन कधी मुक्त होऊन जाते ते ही कळत नाही ... आठवणी त्या सुखाच्या बालपणीच्या ... भातुकलीच्या ... बाहुलीच्या केसांसारख्या.. मखमली सोनेरी रंगांच्या... नववारीतील आज्जीच्या गोष्टीतल्या परीसारख्या... अंगणातल्या अबोलीच्या. आठवणी त्या सुखाच्या ... पहिल्या रिकाम्या दप्तराच्या... पाटीवरील पहिल्या अक्षराच्या... आठवणी त्या सुखाच्या.... बालसंवगड्यांशी खेळण्याचा... माळलेल्या गजर्‍याच्या आठवणी त्या सुखाच्या... पाहिलेल्या नजरेच्या... मुक्या स्पर्श भावनांच्या... आठवणी त्या सप्तपदीच्या प्रितीतल्या गोडव्याच्या तुझ्या माझ्या गोड क्षणांच्या आठवणी त्या सुखाच्या ... अवांतर.. ५ मिनिटात काय लिहिले हे पुन्हा न वाचताच देत आहे... लिहायला गेलो गद्य आणि झाले असेच काहितरी पद्य..
  • Log in or register to post comments

तुमची उत्स्फुर्त कविता छानच

मनीषा
Tue, 06/09/2015 - 09:38 नवीन
तुमची उत्स्फुर्त कविता छानच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

गणेशा ; पैजारबुवा __/\_/\

सनईचौघडा
Fri, 06/05/2015 - 07:22 नवीन
गणेशा ; पैजारबुवा __/\_/\
  • Log in or register to post comments

उद्या... शिवराज्यभिषेक दिन...

गणेशा
Fri, 06/05/2015 - 12:29 नवीन
उद्या... शिवराज्यभिषेक दिन... सगळे मित्र रायगडाची वाटा चालत आहेत.. मी मात्र आज येथेच ऑफिसात .. आज चतुर्थी पण आहे.. सकाळी पाऊस पडला .. वातावारण खुप मस्त आहे... पण पावसामुळे बाळाला घेवुन या चतुर्थीला मोरया गोसावी मंदिरात सकाळी सकाळी जाता आले नाही... संध्याकाळी जाईन पण .. बाळाला बप्पा खुप आवडतो .... मंदिरात गेल्याने छान वाटतेच.. पण महिन्यातुन एकदा सकाळी एकत्र बाहेर पडायला मिळते ते पण खुप छान ... आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्वांसाठी टाईम काढलाच पाहिजे असे वाटते.. मग ते मित्र असुद्या.. फॅमिली असुद्या नाहीतर पर्सनल गोष्ट असुद्या .... मुलांना तर टाईम दिलाच पाहिजे.. प्रत्येक पालकाने हे केलेच पाहिजे.. बाळ मोठे झाल्यावर तर आठवड्यातला एक दिवस मी बाळासाठी रीझर्व ठेवणार आहे.. मग तो शनिवार असेल किंवा रविवार.. पण फक्त बाळाबरोबर.. वाटल्यास बाळाला माझ्यासोबत फिरण्याच्या सवयी लावेल ... बाप झाल्यावर किती गोष्टी बदलतात ना... पहिल्यांदा दुकानात गेलो की मी माझ्या वस्तुंबद्दल विचार करायचो.. मस्त आवडेल ते घ्यायचो .. आजकाल असे होत नाही.. पैसे आले की बाळाला काय घ्यावे असे वाटते.. तीला एखादी फ्रॉक लहान पडत असली की दूसरी आपण बघुन ठेवलेली आता घेवुया असे वाटते... खेळणी.. गाडी..इतकेच काय सायकल ची पण तयारी आताच झाली आहे... खरेच बाप हा मुलगी झाल्यावर पुर्ण बदलतो .. बदलतात त्याचे विचार.. आचार... हे मला आता कळते आहे... जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा माझे वडील तायडी ला बिंधास्त ट्रीप ला जावुन द्यायचे.. तिचे खुप लाड करायचे.. माझ्या पेक्षा.. तेंव्हा मी आईला बोलायचो ते.. आई माझी होती ना.. तायडीचे पप्पा.. पण आज कळते आहे.. हा नैसर्गिक बंध आहे... कदाचीत बाप झाल्यावर आपल्या बापाच्या भावना आपल्याला जास्त कळत असतील .. असेच असेल...
  • Log in or register to post comments

@ गणेशा: बाप झाल्यावर गोष्टी बदलतात.

मोहनराव
Fri, 06/05/2015 - 15:37 नवीन
बरोबर आहे तुमचे. आजकाल ऑफिसमधुन घरी जाण्याची एक अनामिक ओढ असते. ते इवलेइवले हात हातात घेऊन एक गालाचा मुका घेतला व बाळाचे आपल्याला बघुन खुश होणे पाहिलं की दिवसभराचा थकवा कुठे निघुन जातो कळतच नाही. जगातल्या कसल्याही दुखा:चा लवलेश नाही.. चिंता नाही. असे आयुष्य परत जगता आले तर किती मजा येईल असे वाटते. ये दौलतभी लेलो ये शोहरतभी लेलो... गझल आपसुकच गुणगुणायला लागतो. मध्ये ही बाळाला घेऊन गावी गेलेली महिनाभर, तर मन कशातही रमायचे नाही. चातकासारखी बाळाची वाट पाहिली. परत आली तेव्हा स्वारी ओळखायला तयार नाही :( पण लगेच एक दिवसात परत माझ्याकडे छकुली येऊ लागली. मी विचार केला, आत्ताच आपले हे हाल.. अजुन काही वर्षांनी मुलगी मोठी होऊन सासरी जाऊ लागली तर आपले काय होणार. तेव्हा एका मुलीच्या बापाचे दु:ख काय असते याची कल्पना येऊ लागली.
  • Log in or register to post comments

साधुची झोळी का पडली?

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 06/07/2015 - 12:57 नवीन
साधुची झोळी का पडली? नदि काठच्या एका गर्द झाडी मधे बसून, तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करत होता, तिकडुन तो कोणाला सहज दिसत नव्हता, पण तो मात्र बरेच काही पाहू शकत होता, नुकताच वयाच्या सोळाव्या वर्षी विरक्त होउन, त्याने संन्यास घेतला होता, आणि भगवंताचा शोध घेत, दिवसरात्र तो रानोमाळ भटकत होता, अचानक कसल्यातरी आवाजाने, त्याची समाधी भंग पावली, एक लावण्यवती, रमत गमत पाण्याला जाताना, त्याला दिसली, हरणाची चपळाई आणि मोराचा डौल होता, तिच्या पावलो पावली जणु केतकीच्या बना मधून, एखादी नागीण सळाळत निघाली, त्या वेळी त्या दोघांशीवाय, तिथे तिसरे कोणीच नव्हते, तो आपल्याला बघतो आहे, याचे तिला जरा देखील भान नव्हते, तिच्या हातात एक आणि एक कमरेवर एक असे दोन घडे होते, आणि मोकळे लांबसडक केस तिच्या कमरेवरती रुळत होते, इकडे साधूबुवांच्या हृदयाची धडधड मात्र, जोरदार वाढली होती, आता त्या जागेवरुन उठायची सुध्दा, त्यांच्या मधे हिम्मत नव्हती डोळ्यांची पापणी मिटावी, असे ठरवून देखील, ती बंद होत नव्हती दूसरीकडे आपल्या चंचल, कमकुवत मनाची, त्यांना लाज वाटत होती इकडे तिकडे सावध नजर टाकत, क्षणार्धात ती निर्वस्त्र झाली, मासोळी सारखी सुळकन, नदिच्या पाण्यात तिने उडी मारली, मनसोक्त डुंबुन झाल्यावर, ती तशीच ओलेती बाहेर निघाली, अनिमिष नेत्रांनी हे बघणार्‍या साधुच्या, जीवाची मात्र काहीली झाली, हे सगळे कमी होते म्हणुन की काय?, ती इकडेच यायला निघाली, साधुबुवांच्याच समोरच्या झुडपा मागे उभी राहून, अंग कोरडे करु लागली, तिची सूर्यासारखी तेजस्वी नितळ काया, साधुबुवांना अगदी जवळून दिसली, आणि तिच्या अंगप्रत्यांगाच्या गोलाई मधे, बुवांची नजर अडकून बसली, स्वतःच्याच धुंदीत असलेल्या तिला मात्र, कशाचेही भान नव्हते, तिचे ओलसर मोकळे केस, सुर्यकिरण पडून चमचम चमकत होते, तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवातुन, यौवन ओसांडून वहात होते, ते पहाताना साधुमहाराज मात्र, हाताच्या मुठी घट्ट आवळत होते, बर्‍याच वेळा नंतर अखेर, त्यांना मोकळा श्र्वास घेता आला, कारण त्यांच्या समोरचा मोहमायेचा खेळ, होता आता संपला, घागरींमधे पाणी भरुन घेउन, तिने आपल्या गावाचा रस्ता धरला, बुवांनी इतकावेळ नकळत घट्ट आवळलेल्या मांड्या, थोड्या मोकळ्या केल्या, साधुबुवांना आपल्या या निर्लज्ज कृतीची फारच शरम वाटली, तो एक अपघात होता, असे म्हणुन, त्यांनी स्वतःची समजुत घातली, चित्त थार्‍यावर यावे म्हणुन, झोळी मधली पोथी त्यांनी काढली, परमेश्र्वराच्या शोधा कडे, त्यांनी पावले पुन्हा एकदा वळवली, पोटात कावळे कोकलायला लागले, म्हणुन ते गावा कडे गेले, "ओम भवती भिक्षांदेही", असे एका घरा समोर जाउन म्हणाले, याचकाची नजर नेहमी जमिनी कडे हवी, हा नियम ते विसरले, आणि भिक्षा घेउन येणारी स्त्री पाहुन, त्यांचे देहभान हरपले, ती तिच होती, जिला त्यांनी नुकतेच नदिवर पाहिले होते, आता तिने कपाळावर कुंकु गळ्यात मंगळसुत्र घातले होते, सुरेखसा गजरा माळत, केसही तिने निटनेटके बांधले होते, जणू बुवांच्या समोर साक्षात सरस्वतीचेच प्रतिरुप उभे होते, "महाराज भिक्षा घ्यावी", नमस्कार करत ती म्हणाली, बुवांच्या छाती मधली धडधड, पुन्हा एकदा वाढली, पायातली शक्ती गेली, हातातली झोळी खाली पडली, तिच्याकडे न पहाता, बुवांनी तिकडून जोरात धुम ठोकली, एका खोल कड्याच्या टोकावर, स्तब्ध पणे साधुबुवा बसले होते, हे असे का झाले?, याचा विचार करताना, स्वतःलाच हसत होते, कारण विचार करता करता, त्यांच्या हेच लक्षात आले होते, "देव आहे चराचरी" हे तत्व, त्यांना नीटसे समजलेलेच नव्हते, "पुनश्र्च हरी ओम" असे म्हणत, त्यांनी ध्यानासाठी डोळे मिटले, त्यांच्या डोळ्यासमोर, पुन्हा एकदा तेच नदिवरचे दृष्य उभे ठाकले, पण यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित, जराही नाही ढळले, एका तटस्थवृत्तीने, ते आपल्या मनाच्या या खेळाकडे पाहु लागले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

मनीषा
Tue, 06/09/2015 - 09:43 नवीन
अप्रतिम ! अशी तटस्थं वृत्ती प्राप्तं झाली- म्हणजेच त्या साधुबाबांची साधना सफल झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

@ पैजारबुवा ...

गणेशा
Mon, 06/08/2015 - 12:12 नवीन
@ पैजारबुवा ... समरसता ही मनाची एक कला आहे.. या कलेचा आनंद जोपर्यंत माणसाला घेता येत नाही.. तो पर्यंत त्याला जीवन जगणे म्हणजे काय हे कळालेच नाही असे वाटते...
  • Log in or register to post comments

@ समरसता ही मनाची एक कला आहे..

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/08/2015 - 15:47 नवीन
आधीं दृश्या सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें । मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ - रामदास स्वामी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वाः बुवा वाः

जडभरत
गुरुवार, 07/23/2015 - 20:58 नवीन
वाः बुवा वाः लिहिणारे समर्थ तर ग्रेटच पण हा इतका दुर्मिळ आणि अर्थपूर्ण श्लोक लक्षात ठेवणारे तुम्ही पण ग्रेट!!! हा श्लोक पाठ करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

देवावरती विश्वास ठेवावा की न

गणेशा
Mon, 06/08/2015 - 13:51 नवीन
देवावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा ... हा मुद्दा वेगळा.. पण माणसांच्यात..मुलांच्यात ..कामात.. मित्रांच्यात सदभावनेने जो वेळ घालवाला जाईल तोच देवपुजेचा अर्थ असावा असे माझे मत आहे.. देवपुजेच महत्व त्यामुळे नक्कीच कमी होत नाही.. स्वता लहानमुलासारखे जगणे थोडे मुस्किलच आहे, या जीवनात फक्त साथ देवुन नाही तर त्याबरोबर योग्य गरज निभावने पण तितकेच मोलाचे ....आणि गरजेला पैश्याची निकड लागतेच.. मग व्यवहारी जगणे आले.. आणि मग पुन्हा कायम, आपल्या मुलांच्यात ही लहान होउन जगता न आल्याचे शल्य पण .. त्यामुळे मुलांशी मैत्रीपुर्ण वागताना लहान व्हायचे.. आनंद साजरा करायचा अगदी त्यांच्याच पद्धतीने.. पण नंतर पुन्हा व्यवहारी बनायचे.. बहुतेक हे असेच करावे लागत असेल जगताना... कदाचीत त्यामुळे निदान अपेक्षांचे शल्य तरी नाही बोचणार .... अपेक्षांचे ओझे आपणच आपल्यावर टाकत जातो .. बहुतेक आपण विचार जास्त करतो .. त्याचेच हे ओझे.. मग आपण जर विचार जास्त करतो तर आपण लहान कसे होऊ .. मग विचार करने सोडुन ही देता येत नाही... हे असेच असते.. अनेक प्रश्नांचे उत्तर आपण एकच करुन ठेवलेले असु शकते.. त्यामुळे उत्तरे बदलायला .. निटसे पुन्हा उत्तरे सुधारायला लागलेच पाहिजे ....
  • Log in or register to post comments

प्रेम

गणेशा
Tue, 06/09/2015 - 12:57 नवीन
आत्ताच.. पाउस, ती आणि मी चा भाग १ वाचला आणि थोडे मनाशीच बोलावेसे वाटले.... च्यायला, या असल्या कथा वाचल्या की आमचे काय होते काय माहित .. सगळ्या कॉलेज च्या आठवणी सरसर डोळ्यापुढे येतात. तिच्या डायरीतल्या शेवटच्या पानावरील या ओळी मात्र लगेच आठवतात "तू अशीच हसत रहा... सर्वांचे मन मोहत रहा... माझी नसताना पुन्हा... माझीच होत रहा... " तिने मला डेडिकेट केलेले हे गाणे मात्र माझे ही आवडते गाणे झाले आनि कायम ऐकतो ... " --- --- आते जाते.. ह्सते गाते..सोचा था मैने मन मे कई बार.. ओठो की कली, कुछ और खिली...ये दिल पे हुआ है किसका इफ्तियार तुम कोन हो.. बतलातो दो.. क्यो करने लगी मै तुमपे एतबार खामोश रहु .. या मै कह दू .. या कर लु मै चुपकेसे ये स्विकार यही सच है शायद मैने प्यार किया हा हा तुमसे मैने प्यार किया ... " आठवणी या अश्याच असतात.. प्रेम प्रत्येक वेळेस सफल होईल असे नाही.. पण माणसाने आपल्या नजरेत कधी पडु नये असे मला वाटते.. कोण कधी कोठे असेल .. आणि आयुष्यात फिरुन कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही .. माणसाने माणुसकीने जगले पाहिजे.. भले एकत्र असु नाही तर नसु.. स्वाभिमान मात्र माणसाने कधीच गहान टाकु नये.. आजकालच्या प्रेमात पडलेल्या पोरांकडे बघुन एक खिन्न भाव समोर येतो .. काय ते लागट ..लाचार.. मागे मागे फिरणे.. प्रेम हे असे नसते.. तुम्ही कसे ही असा.. मनातुन कसा आहे हे महत्वाचे..... स्वाभिमानाने प्रेमात जगलेले दिवस आठवले की अजुनही छान वाटते..... त्यानंतर सर्वांचे ब्रदर टाईप मटेरीअल असा आलेला उल्लेख ही आवडला.. कारण नंतर मी कधी मुलींवर प्रेम केलेच नव्हते.. आमची ही आयुष्यात येई पर्यंत.... आणि अचानक ब्रदर टाईप मटेरीअल चे .. हीच्या साठी हजबंड टाईप मटेरीअल मध्ये रुपांतर झाले हे कळलेच नाही...
  • Log in or register to post comments

आज १० जून. १० -१२ दिवस ह्या

गणेशा
Wed, 06/10/2015 - 16:09 नवीन
आज १० जून. १० -१२ दिवस ह्या थ्रेड वर पहिले लिहायचे असे ठरवले होते... मस्त झाला हा थ्रेड .. विशेषकरुन पैजारबुवांचे रिप्लाय जास्त भावले... नविनच काही सदस्य येथे लिहिलेले पाहिलेले.. खुप छान लिहिले त्यांनी एकदम आवडले... विशेषकरुन बाबुदादा आणि भाग्यश्री यांचे लिखान मस्त झाले.. इतर ही सर्वांनी खुप छान लिहिले आहे... सर्वांचे आभार या धाग्यावर आनखिन लिहावे असे वाटत आहे.. परंतु कदाचीत थांबावे लागेल.. बघु.. आज तर लिहिल मात्र..
  • Log in or register to post comments

मी सुख आणि समाधान वेगळे माणतो

गणेशा
Wed, 06/10/2015 - 16:27 नवीन
मी सुख आणि समाधान वेगळे माणतो ... सुख हे स्वःमर्यादीत असते... समाधान मात्र सार्वभौम असते... सुख म्हणजे माणासाने स्वतासाठी... स्वताच्या आनंदासाठी केलेल्या गोष्टी... समाधान म्हणजे फक्त स्वताचेच नाही तर इतरांचा ही आनंद जाणुन त्या दृष्टीने केलेला प्रवास असतो ... माणुस समाधानी असेल तर तो सुखी असतोच .. परंतु तो सुखी असेल तर तो समाधानी असेलच असे नाही... संत महात्मे हे समाधानी होते... अनेक राजे सुखी होते.... रानात दिवसभर राबणारा..हिरवं जीवन फुलवणारा... दिवसात भाकरी-तुकडा जो मिळेल त्यात पोट भर खाणारा शेतकरी सुखी नसला तरी समाधानी असु शकतो ... आणि एसी मध्ये गलेलट्ठ पगार घेणारा माणुस.. चारचाकी.. ऐशोआरामात आयुष्य काढणारा माणुस सुखी असेल पण समाधानी असेलच का हे सांगता येत नाही... सुख हे कधीच संपत नाही.. प्रत्येक सुखाच्या शेवटी दूसर्या सुखाचा माग दडलेला असतो ... आणि मग माणुस आपसुकच त्यावरुन चालत राहतो.. कदाचीत त्याचे ध्येयच त्या मार्गावरुन मार्गक्रमण करत असते... समाधान तसे मनाला संतुष्ट करुन जाते... ते मनाला कधीच सुखाच्या मागावर धाडत नाही.. शेवटी माणासाने सुखी आणि समाधानी हे दोन्ही व्हायचे ठरवले तर त्याने समाधानी आधी व्हावे... नाही तर सुखाचे अनेक प्रवास करुन ही त्याला समाधाचा अर्थ काही सापडत नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

सुखाचे अनेक प्रवास करुन ही त्याला समाधाचा अर्थ काही सापडत नाही अ

नाखु
Wed, 06/10/2015 - 17:42 नवीन
पूर्ततेचे निकष अपेक्षा म्हणजे समाधान म्हणजे लाहान मुलानी बर्फाचा गोळा मागीतला किंवा फुगा मागीतला आणि त्याला तो मिळताच रडणे बंद झाले तर आपण उस्फुर्तपणे म्हणतो "झाले ना समाधान" म्हणून सूख हे सापेक्ष आहे. परीस्थीती,मनुष्यस्वभाव्,सामाजीक्,आर्थीक स्थिती.म्हणजे ज्याला दोन वेळेच्या खाण्याची मारामार त्याला निवासी वॉचमनची नोकरी मिळाली अगदी खाऊन्-पिऊन तर तो समाधानी असेल पण सुखी असेलच असे नाही कारण पुर्वीची रिकाम्टेकडी उनाडकी आता करता येत नसेल. अश्या वेळेला वाटणारी खंत्/असमाधान हे आधिच्या परिस्थीतीशी तुलना केल्याने आलेली असते. ज्यानी वारंवार नोकरी बदलली त्यांना याचा नक्कीच अनुभव असेल. समाधानी असलेच पाहिजे पण समाधानी वृत्तीचा अतिरेकापोटी आणि "ठैविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान" याचा चुकीचा (सोयीस्कर) अर्थ लावून आळशीपणा+आपले सामर्थ्य न तपासण्याचा धोका वाढतो. समाधान हे कशाशी तुलना करणारे नसेल तर ते जास्त उपकारक निर्भेळ अस्ते. आनंदाचा पाया समाधान असेल तर त्याच्याप्रती तटस्थता येणे हे सुखाच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. हा सर्वात निसरडा आहे. कारण यातच सुख मिळते असा भ्रम झाला की मन पुनःपुन्हा तेच मागते. अगदी आवडीचे जेवण-सिनेमा आपण सतत दोन्-तीन दिवस खाऊ-बघू शकत नाही म्हणजेच समाधान्+आनंद हा त्या क्षणापुरता असतो त्या सुखद क्षणांची उजळणी आठवण येणे म्हणजे तो क्षण जगणे. गणेशा जेव्हा कॅमेर्याचा शोध लागला नव्हता किंवा तो जास्तच महागडा होता तेव्हा आपण लग्न्+सहल्+वाढदिवस साजरे करीत नव्हतो का ?करीत होतो पण ते क्षण टिपण्याच्या नादात समारंभाला आलेल्या लोकांशी धड नीट बोलता येत नसेल तर नक्की सोय की गैरसोय हे ठरविण्याची वेळ आली आहे. म्हणून सुख-समाधान आणि आनंद याबाब्त कुणाचेही लगेचच एक्मत होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आज १० जून, आयुष्याची नविन

गणेशा
Wed, 06/10/2015 - 16:45 नवीन
आज १० जून, आयुष्याची नविन सुरुवात ... आज ३३ पुर्ण झाले... विश्वास बसत नाहिये ... दिवस किती फास्ट चालले आहेत ना.. आयुष्यात काही भरीव करुन मागे आपले नाव ठेवुन जावे असे काही मनात नाहिये... पण सहज मिळुन गेलेले आयुष्य सुखा समाधाना ने जगुन जेव्हडे क्षण मिळाले ते निट उपभोक्ता/जगता आले पाहिजे असे सामान्य माणसा प्रमाणे मला वाटते... पण हा वेळ असाच इतका पटकन निघुन गेला तर आयुष्य जगायचेच राहिले अशी बोच आयुष्याच्या शेवटी वाटत राहिल काय असे सहज वाटुन ही वाईट वाटले... आयुष्यात माणसाने आपल्याला सर्वात जे आवडते ते तरी मनसोक्त करावे असे वाटते... मला फिरायला आवडते.. निदान निटसे .. निरोगी आयुष्य आहे तोपर्यंत मनसोक्त फिरुन घ्यायचे ठरवत आहे..... काय माहीत उद्या चाळीसी नंतरच उडेल बल्प झालो तर .... ? असो... आज आनंदाचा दिवस आहे.. चांगलेच विचार करु या... पुढच्या वर्षी लेह - लडाख ट्रीप मनाशीच फिक्स करतोय .. निसर्ग माणसाने निसर्गात जावून अनुभवावा असे मला नेहमीच वाटते... निसर्ग कागदावर--शब्दातुन कधीच अनुभवता येत नाही... माणुस फक्त वाचुन --चित्रात पाहुन फक्त मनाची कल्पना करुन घेतो की आपण तो अनुभवला ..आणि आनंदी होतो.. निसर्ग जोपर्यंत डोळ्यातुन आत उतरत नाही तोपर्यंत त्याची नशा कळत नाही असे वाटते... आज बुधवार , सुट्टी नाहीच... त्यामुळे शनिवार/रविवारी बायको बरोबर लवासाला जावूया म्हणतोय .... नोव्हें-डिसेंबर मधील ट्रीप सुद्धा राजस्थान/सिंधुदुर्ग हे फायनल केले पाहिजे... बहुतेक कोकणच करावे.. म्हणजे लेह साठी पैसे पुरतील .... असो.. प्रत्येक १० जून ला असेच अनेक प्लॅन फायनल होत राहतात.. काही पुर्ण होतात.. काही तसेच मनात घर राहुन राहतात...
  • Log in or register to post comments

@ नाद ..

गणेशा
Wed, 06/10/2015 - 18:12 नवीन
@ नाद .. कॅमेर्‍याचा शोध.. मोबाईलचा शोध ही क्रांती आहे.. पण त्याचा अतिरेक वाईट ... जुन्या स्मृती जपुन ठेवाव्यात म्हणुन कॅमेराचा उपयोग योग्यच.. पण माणुस आजकाल हे विसरत चालला आहे हे मान्य...अतिरेक वाईटच.. समारंभ माणसे महत्वाची.. त्यांच्याशी बोलणे महत्वाचे की वेगवेगळ्या अ‍ॅंगल ने फोटो काढत बसुन वेळ घालविने महत्वाचे हे ज्याने त्याने ठरविले पाहिजे... पण याचा अर्थ कॅमेरा - मोबाईल वाईट नाही तर तो हाताळण्याची आपली पद्धत चुकीची आहे हे मान्य करावे लागेल... " ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान..." याचा चुकीचा अर्थ लावुच नये.. मुळात आळशी रहा असे हे वाक्य सांगत नाहिये ... ते सांगते आहे.. जसे आहे तसे आनंदी रहा.. सुखाच्या मागे न लागता निरपेक्ष आयुष्य जगताना समाधानी रहा... सापेक्ष आवडीनिवडी म्हणजे सुख ही नाही.. समाधान ही नाही... आनंदाचा पाया समाधान असावा.. हे अगदी योग्य.. असे असेल तरच तो माणुस समाधानी होतो .. कुठल्याही व्यक्तीसापेक्ष आवडीनिवडीतुन समाधान मिळत नसते.. कदाचीत ते सुख असु शकेल पण ते क्षणिक असते.. लहानपणी.. अगदी पिवळ्या धम्मक गवतातुन फुलपाखरांचा वेध घेणे पण मनाला समाधान देत असे.. तेंव्हा आनंद -समाधान या गोष्टी म्हणजे नक्की काय हे माहित ही नसत .. पण मनाचा एक निर्लोभ पणा.. इनोसंट पणा तेंव्हा होता.. तश्याच निर्लोप पणाने गोष्टींचा आनंद मिळवत गेले की समाधान मिळते.. त्या निर्लोभ मनाला लोभाचा .. अट्टाहासाचा... अहंकाराचा स्पर्श झाला की त्या मिळणार्या आनंदाला ही अर्थ रहात नाही.. आणि समाधान हे लोभाच्या कक्षेत कधीच येत नाही.... आनंद कदाचीत क्षणिक त्या घटकेपुरताच मर्यादित असु शकतो ... पण त्यातुन मिळणारे समाधान हे चिरतरुन असु शकते... कोणाच्या आयुष्यात उपयोगी पडण्याचा आनंद त्या क्षणांमध्ये मिळत असेल.. पण त्या आनंदी क्षणांमुळे आपण कोणाच्या तरी आयुष्यात आनंद दिला हे समाधान चिरतरुण असेल.... शेवटी आनंद-सुख - समाधान-- ह्या बाबत प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असेल नाही असे नाही.. पण आयुष्यात माणुसकीने जगणे तर आपल्या हातात आहे.. त्यातुन काही नाही निदान थोडेसे समाधान मिळतेच
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख आहे हा धागा!

किसन शिंदे
गुरुवार, 06/11/2015 - 01:07 नवीन
अतिशय सुरेख आहे हा धागा! पैजारबुवा, मिका, गणेशा, रातराणी, जकुसर सगळ्यांचे प्रतिसाद सुंदर आहेत फार..
  • Log in or register to post comments

अतिसुंदर धागा... वारंवार परत

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/11/2015 - 12:45 नवीन
अतिसुंदर धागा... वारंवार परत उघडून एकाहून एक सरस कलाकृतींचा रस घ्यायला लावणारा...
  • Log in or register to post comments

खिडकित उभा राहीलोय । बाहेर

प्रसाद गोडबोले
Fri, 06/12/2015 - 00:16 नवीन
खिडकित उभा राहीलोय । बाहेर मस्त ओलसर मातीचा अन त्यावरून येणार्या अलगद वारयाच्या झुळुकेचा आस्वाद घेत । निव्वळ रातकिड्याञ्च्या आवाज सोडले तर बाकी काही नाही । बस फ़क्त आपण 'एक' आहोत ही एक जाणीव । बस :)
  • Log in or register to post comments

@ प्रगो....

गणेशा
Fri, 06/12/2015 - 12:17 नवीन
@ प्रगो.... आपण 'एक' आहोत ही जाणीवच खुप आनंददायक असते ना.. मग भले आपण हे निसर्गा ला उद्देशुन म्हंटलो असेल... मित्रांना उद्देशुन म्हंटले असेल किंवा लाडक्या प्रेमिकेला म्हंटले असेल... ही जाणीव जीवनाला एक पुर्णत्व प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करते... कधी कधी मात्र एकांतात ... रात्री रातकिड्यांच्या अवाजात.. अंधारात .. मन त्या अनामिक पोकळीला... त्या अल्हाददायक पण एकट्या असणार्‍या वातावरणाला उगाच छेद देत जाते... आणि मग ती अल्हाददायक पोकळी, मनाची जागा कधी व्यापते कळतच नाही .... मग आपल्याला विसर पडतो .. बाजुच्या जगाचा.. आणि एक गुढता निर्माण होते मनामध्ये.. आपण त्या मध्ये कधी खेचले जातो कळतच नाही....
  • Log in or register to post comments

पाउसाची रिमझिम मध्ये मध्ये

गणेशा
Fri, 06/12/2015 - 12:42 नवीन
पाउसाची रिमझिम मध्ये मध्ये चालू झाली आहे, मान्सुन उशीरा येणार असे पेपर मध्ये आले असले तरी ७ जून ला नेहमी प्रमाणे पावसाने हजेरी लावली होती... आराध्या झाल्यापासुन चा हा दूसरा पावसाळा... गेल्या पावसाळ्यात मात्र बाहेर फिरता आले नव्हते... यावेळेस ती कसर भरुन काढायची आहे... ६ जूनलाच तीला लोहगड ला घेवून गेलो होतो..दुडूदुडू पळत होती खुप... पवना डॅमला जायला ७ वाजले होते पण ...धावती भेट दिली होती... पवना डॅम च्या पाण्यात पाय बुडवून खेळण्यात आराध्याला मजा वाटली होती... ती अलगद पोहत आलेली बदके पण मस्त वाटली... आज १२ जून आणि पुन्हा शुक्रवार आहे, उद्या पुन्हा मावळात फिरायलो जातो आहे.. बहुतेक 'लवासा' ला पण जाईल... लवासाला जातानाचा रोड मला खुप आवडतो.. जाताना खाली आलेले ढग.. .. बाजुला वाहणारी मुठा... शेतात काम करत असणारे शेतकरी.. मस्त वाटते खुप... लवासाला ४ वर्षापुर्वी गेलो होतो ... त्या नंतर ही पहिलीच वेळ ... मन निसर्गाशी एकरुप झाले की मस्त वाटते... तो हिरवाजर्द थंड आल्हाद स्पर्श मनाला मोहहुन टाकतो .. एक नविन टवटवी घेवुन मन पुन्हा आनंदाने बागडू लागते...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा