✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमच्या विवाहाची कहाणी - ४

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 04/09/2015 - 21:21  ·  लेख
लेख
आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588 आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631 आमच्या विवाहाची कहाणी - ३- http://www.misalpav.com/node/30795 गुरुवारी हा निर्णय आला होता कि मुलीला पण मुलगा पसंत आहे. म्हणजे आता लग्न ठरले होतेच. रविवारी काय होते याची मला फारशी चिंता नव्हती. शुक्रवार आणि शनिवार आपण तिला फोन करावा कि न करावा या बद्दल मी विचार करत होतो. तिला मला फोन करणे शक्य नव्हते कारण माझ्या खोलीत फोन नव्हता. आणि क्ष किरण विभागाचा फोन तिच्या कडे दिलेला नव्हता. मग मी रविवार संध्याकाळ पर्यंत थांबण्याचे ठरवले. उगाच उतावळा नवरा आणि …। व्हायला नको. रविवारी आई, वडील, भाऊ आणि वहिनी दुपारी जेवायला त्यांच्याकडे पनवेलला गेले. संध्याकाळी फोन केला तेन्व्हा आईकडून साग्रसंगीत हकीकत कळली. तिकडे गेल्यावर भावी सासुबाइंकडून मुलाच्या घटस्फोटाची हकीकत कळली मुलीला तिच्या भावाने रिलायंस पाताळगंगा येथे असलेली नोकरी सोडून पुण्याला स्थायिक व्हावे असे वाटत होते. तेथे नोकरी मिळाली नाही तर काहीतरी धंदा कर पण पुण्यालाच ये. अशा तर्हेच्या दुराग्रही स्वभावामुळे त्यांचे वितुष्ट आले होते. आई वडिलांनी तुमच्या मुलाच्या घटस्फोटाचा मुलीच्या पसंतीशी काहीही संबंध नाही हे सांगितल्यावर सासूबाईंचा बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळले. त्यांना एक असा अतिशय वाईट अनुभव आला होता. त्यांच्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम पुण्याच्या एका प्रथित यश कुटुंबात झाला होता. मुलाचे आई वडील पुण्यात यशस्वी उद्योगपती होते. पुण्यात त्यांचा बंगला होता. मुलगा इंजिनियर होऊन अमेरिकेत ग्रीन कार्डहोल्डर होता तीन बैठका झाल्या होत्या. मुलाच्या आणि मुलीच्या वेगळ्या तीन भेटी झाल्या होत्या. बंगल्याच्या गच्चीवर मुलाने मुलीबरोबर आपल्या भावी संसाराबद्दल बरीच चर्चा सुध्धा केली होती. यानंतर एक दिवस मुलाच्या आत्याच्या सांगण्यावरून त्यांनी हे लग्न मोडले होते. का तर सासू आणि सुनेचे पटत नाही मग अशा आईची मुलगी कशाला करून घेतोस? (अशा छप्पन्न मुली मी तुझ्यापुढे आणून उभ्या करते) यामुळे मुलीच्या मनावर ओरखडे उठले होते. अशा मुळे तिचे आई वडील फार तणावाखाली होते. आई वडिलांनी ते सर्व ऐकून घेतले. त्यांना सांगितले कि आम्हाला यामुळे काहीच फरक पडत नाही.मुलीच्या भावाच्या घटस्फोटात मुलीचा दोष काय आहे ? असो. हि सर्व कहाणी सांगितल्यावर शेवटी आईने सांगितले कि तू तिथे एकदा फोन कर आणि मुलीला तुझ्या तोंडून निर्णय सांग. है शाबास. म्हणजे मी ज्याची वाट पाहत होतो कि फोन करू कि नको त्याऐवजी एकदम लायसन्स च मिळाले. मग काय हा फोन ठेवला आणि तो फोन केला. पहिल्यांदा काय बोलावे हा विचार आता मागे पडला. पहिल्यांदा इकड तिकडचे बोलणे झाले. आणि मी माझा निर्णय तिला सांगितला. आणि आमच्या संवादाला सुरुवात झाली. एक दिवसाआड मी रात्री दहा वाजतो फोन करत असे. यानंतर आम्ही काय बोलायचो हे फारसे महत्त्वाचे नाही. ( ते तसे नसतेच) पण समोर एस टी डी च्या बूथ वर दर ३६ सेकंदानी मीटर पुढे सरकत असलेला दिसे. मी अर्धा तास बोलत असे. अर्ध्या तासाचे ५० रुपये होत. ( तेंव्हा माझा पगार ६४००/- रुपये होता). यानंतर पुढच्या बोलण्याची बैठक आमच्या घरी झाली. बैठकीनंतर माझ्या मामेभावाचा( हा माझ्या वर्गातच होता) साखरपुडा पार्ल्याला होता. तेथे सायंकाळी ६ वाजता जायचे होते. मी स्कुटरने येणार हे जाहीर केले. वडिलांनी आपण सगळे ट्याक्सीने जाऊ इ इ सुचवत होते पण मी स्कुटरनेच येणार म्हणून आग्रह धरला. शेवटी आई बडील सगळे ट्याक्सीने गेले. आणि मी आणि आमची चि. सौ.कां. कायनेटिक होंडाने गेलो. तिला असा घरात प्रत्येकाने स्वतंत्र विचार करण्याची सवय नव्हती. तिने विचारले कि आपण ट्याक्सीने का गेलो नाही. मी डोळा मिचकावून विचारले कि मग तुला माझ्या जवळ बसायचा चान्स कसा मिळाला असता?. त्यावर ती झक्क लाजली. मुलुंडहून पार्ल्याला जाताना मध्ये साकी नाक्याच्या आसपास स्कूटर पंक्चर झाली. जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन स्टेपनीचा टायर टाकून घेतला. ( इतर वेळेस मी स्वतः ते केले असते पण साडी नेसून बायको जवळ असताना आणि साखरपुड्याला जायचे असताना हात कशाला काळे करा? ) हे होईस्तोवर मध्येच पाऊस आला. त्यासाठी आम्ही थांबलो. आणि पार्ल्याला पोहोचेपर्यंत आई वडील पोहोचलेलेच होते. सगळ्यांनी उशीर का झाला? असे विचारले तेंव्हा मी खरी असलेली कारणे सांगितली ती कुणीच ऐकून घेतली नाही. सगळे हेच म्हणत होते कि याना फिरायला चान्स मिळाला आहे मग उगाच इतरांची अडचण कशाला? शेवटी मी कारणे देणे सोडून दिले. नातेवाईकांची तिची ओळख करून दिली. खेळीमेळीत दिवस गेला. शेवटी तिला दादर पनवेलच्या बस मध्ये बसवून दिले. साडी नेसण्याच्या गडबडीत तिने तिच्या बाबांकडून पैसे घेतलेच नव्हते. पर्स मध्ये जेमतेम ३०-४० रुपये होते. मी तिला शंभरच्या दोन नोटा काढून दिल्या. पावसापाण्याचे दिवस आहेत, जवळ असावेत म्हणून. ती पण अशी वेडी कि लग्न होईपर्यंत मी दिलेल्या नोटा म्हणून तिने पर्स मध्ये जपून ठेवल्या होत्या कुठेही खर्च केल्या नव्हत्या. यानंतर साखरपुडा ठरला १६ ऑगस्टला रविवारच होता. पनवेलला सकाळी आमचे अगदी जवळचे असे नातेवाईक मिळून ४० -५० माणसे होती. आता लग्नाची तारीख ठरवण्याची आणि पुढच्या तयारीची बैठक झाली. लग्नात मोठ्या जेवणावळी घालून पैशाचा अपव्यय करावा हे मला न पटणारे होते. सुदैवाने मला हि आणि तिलाही मोठा भाऊ आहे आणि त्यांच्या दोघांच्या लग्नात घरच्या मंडळींची हौस फिटली असल्याने थोडक्यात विवाह करावा या माझ्या मताला विरोध असा फारसा झालाच नाही. त्यामुळे मी आमच्या कुल्गुरुना विचारलेले होते कि गोरज मुहूर्तावर लग्न करायला काही शास्त्रात आडकाठी आहे का? त्यांनी असे काही धर्म शास्त्रात नाही. असे सांगितले. मुंबईत लग्नाच्या चार अक्षता टाकून पहिल्या पंगतीला जेवून पळणे या प्रकाराबद्दल मला तिडीक आहे.त्यामुळे लग्न हे संध्याकाळी करायाचे आणि त्यानंतर स्वेच्छा भोजन( बुफे) असेच असावे याबद्दल मी आग्रही होतो. त्यावर गुरुजी ना हेही विचारले कि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लग्न होण्यासाठी कोणते विधी आवश्यक आहेत/ त्यावर ते म्हणाले कन्यादान, सप्तपदी आणि ( बहुतेक लाजाहोम) हे तीनच विधी आवश्यक आहेत बाकी सर्व फापट पसारा आहे असे सांगितले. त्यामुळे आमचे लग्न हे फक्त त्या तीन आवश्यक विधीनुसार संपन्न झाला. ७ ऑक्टोबर १९९२ बुधवार रोजी आमचे लग्न झाले.एम डी करत असल्याने मला फक्त चार दिवस (बुधवार ते शनिवार) रजा होती. ७ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता आम्ही सर्व मुलुंड च्या महाराष्ट्र सेवा संघाच्या कार्यालयात गेलो घरची अगदी जवळची नातेवाईक मंडळी ५०-६० लोक फक्त. अडीच ते सव्वा चार असे विधी होऊन चार बावीस च्या मुहूर्तावर आमचे लग्न लागले. चहा पाणी होऊन पाच वाजता आमची सौ. ब्युटी पार्लर मध्ये गेली. पावणे सहा वाजता परत हॉलवर आली. सहा ते नऊ असा स्वागत समारंभ साधारण तीनशे माणसे आली. देणे घेणे, आहेर, पुष्प गुच्छ काहीही नाही. खेळीमेळीच्या वातावरणात लग्न पार पडले. यानंतर आम्हीच आमच्या सासरच्या माणसांची "पाठवणी" केली. माझा मेहुणा बहिणीची पाठवणी करताना खूप रडला. एक तर आपल्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे बहिणीचे लग्न जुळत नाही याचा खूप ताण त्याच्या मनावर होता तो उतरला आणि आता बहिण दुसर्या घरी गेली याचे दुःख होतेच. शेवटी रात्री दहा वाजता आम्ही रिक्षात बसून घरी परत आलो. लग्न घरी आम्ही दोघे, भाऊ वहिनी आणि आईवडील असे सहा जण फक्त होतो. परत येताना हातात फक्त बायकोची एक कपड्यांची बैग होती. भाऊ आणि वहिनीने त्यांची बेडरूम आम्हाला सजवून दिली होती. दुसर्या दिवशी सकाळी १० च्या विमानाने आम्ही मधुचंद्रासाठी कुणूर (उटी) ला रवाना झालो. तीन दिवस तेथे राहून चौथ्या दिवशी रविवारी दुपारी विमानाने मुंबईत आलो. रविवारी रात्री २१. ०० च्या मद्रास एक्स्प्रेसने आम्ही दोघे तिची एक आणि माझी एक अशा ब्यागा घेऊन पुण्यास रवाना झालो. पुणे स्टेशन वर माझे जवळ जवळ २५ मित्र त्यांच्या दुचाक्या घेऊन अनपेक्षितपणे आमच्या स्वागतासाठी रात्री साडे बारा वाजता हजर झालेले होते. त्यांनी आमचे सामान आपल्या ताब्यात घेतले आम्हाला एक मोटार सायकल दिली आणि सर्वजण ए एफ एम सी च्या मेस वर आलो.या अशा स्वागतामुळे सौ. भारावून गेली.कारण लष्करातील माणसाशी लग्न झाले आहे पुढे काय असेल याची कोणतीच कल्पना नव्हती. अर्थात ती स्वतः डॉक्टर असल्याने मित्रांबरोबर गप्पा मारताना मोकळेपणा होताच. तेथे एका मित्राच्या खोलीवर याच्या त्याच्या कडून कपबशा, 'मग' उधार आणून कॉफी पानाचा कार्यक्रम झाला. आणि आम्ही आमच्या एका खोलीच्या घरामध्ये परत आलो. दोन ब्यागा घेऊन संसाराला सुरुवात झाली. ब्रम्ह्चार्याच्या मठीत जे असावे ते सामान माझ्याकडे होते म्हणजे एक टी व्ही., एक म्युझिक सिस्टीम, स्कूटर, ढीगभर पुस्तकं आणि चहा करता येण्यापुरती भांडी आणि दोन कपबशा . एक सरकारी कपाट, एक बेड अन एक टेबल खोलीत होते. पुढच्या पाच दिवसांनी आम्हाला २ बेडरूमचे सरकारी घर मिळाले. मग पुढचे दोन महिने रोज स्कूटरने तुळशी बागेची चक्कर करून संसाराची भांडी कुंडी जमविली. फ्रीज घेतला. अशी आमच्या विवाहाची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

Book traversal links for आमच्या विवाहाची कहाणी - ४

  • ‹ आमच्या विवाहाची कहाणी - ३
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
22925 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

ईतक्यातच संपवला पिच्चर :(

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/09/2015 - 21:31 नवीन
ईतक्यातच संपवला पिच्चर :( मला वाटलेले....इतक्या दिवसांनी लेख आलाय तर मस्त लां .....बलचक असेल बरीच काटछाट झालेली वाटतेय ;)
  • Log in or register to post comments

मस्त

रामपुरी
गुरुवार, 04/09/2015 - 21:34 नवीन
अशा सरळ साध्या 'आपल्या' वाटतील अश्या गोष्टी हल्ली फार वाचायला मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments

असेच म्हन्तो

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 04/09/2015 - 22:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

सहमत

नंदन
गुरुवार, 04/09/2015 - 23:41 नवीन
असेच म्हणतो. कहाणीचे चारही भाग आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

कहाणी आवडली!

अजया
गुरुवार, 04/09/2015 - 22:14 नवीन
कहाणी आवडली!
  • Log in or register to post comments

सुंदर कहाणी

निमिष ध.
गुरुवार, 04/09/2015 - 23:17 नवीन
डॉ. साहेब सुंदर कहाणी आहे. आवडली एकदम :)
  • Log in or register to post comments

साधं सरळ पण तरीही पुढे काय

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/09/2015 - 23:36 नवीन
साधं सरळ पण तरीही पुढे काय त्याची उत्सुकता लावणारं लेखन. मस्तच हो डॉक्टरसाहेब! बेष्ट बघा!
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
गुरुवार, 04/09/2015 - 23:53 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहमत

पिवळा डांबिस
Fri, 04/10/2015 - 00:32 नवीन
बरोबर वर्णन केलयंस बिका. लिखाण आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सर्व जेष्ठ

नाखु
Fri, 04/10/2015 - 08:32 नवीन
मिपकरांशी सहमत. साधी सोपी सरळ (अगदी "शन्ना कथा" वाचतोय असे उगा ओढून ताणून चढ्-उतार नाहीत याचा जास्त आनंद !!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अगदी असेच

प्रदीप
Sat, 04/11/2015 - 12:59 नवीन
म्हणतो. लिखाण आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अनुभवकथन आवडले

श्रीरंग_जोशी
Fri, 04/10/2015 - 00:37 नवीन
अनुभवकथन मनापासून आवडले. आटोपशीर विवाहसोहळ्याची पद्धत अनुकरणीय आहे.
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/10/2015 - 18:13 नवीन
+१ असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मस्त !!!

अभिजीत अवलिया
Fri, 04/10/2015 - 02:15 नवीन
मस्त !!! तुमचे लग्न साध्या पद्धतीने झाले हे ऐकून बरे वाटले. बर्‍याच वेळा साधेपणात गोडी असते.
  • Log in or register to post comments

खूप आवडली कथा (सत्यकथा)

खटपट्या
Fri, 04/10/2015 - 02:35 नवीन
खूप आवडली कथा (सत्यकथा)
  • Log in or register to post comments

सगळे भाग भाग मनापासुन आवडले !

मदनबाण
Fri, 04/10/2015 - 06:38 नवीन
सगळे भाग मनापासुन आवडले ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)
  • Log in or register to post comments

मजा आली :)

स्पा
Fri, 04/10/2015 - 09:03 नवीन
मजा आली :)
  • Log in or register to post comments

छान लेख! लग्न कसे करावे

उगा काहितरीच
Fri, 04/10/2015 - 10:10 नवीन
छान लेख! लग्न कसे करावे याबद्दल तुमच्या विचारांशी सहमत . पाहु अस्मादिकांचे काय होते ते ;-)
  • Log in or register to post comments

मस्तच...

रुस्तम
Fri, 04/10/2015 - 10:50 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments

चारही भाग आवडले.

कंजूस
Sat, 04/11/2015 - 05:54 नवीन
चारही भाग आवडले.
  • Log in or register to post comments

+१

आजानुकर्ण
Fri, 04/10/2015 - 16:23 नवीन
छान
  • Log in or register to post comments

+१

सूड
Fri, 04/10/2015 - 16:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आवडल...

जेपी
Fri, 04/10/2015 - 16:37 नवीन
आवडल...
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली. पण विवाहाची

नगरीनिरंजन
Fri, 04/10/2015 - 18:25 नवीन
गोष्ट आवडली. पण विवाहाची गोष्ट म्हणायचं आणि लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतच्या गुलाबी दिवसांचं वर्णन चटावरच्या श्राद्धासारखं उरकायचं याला काही अर्थ नाही बघा.
  • Log in or register to post comments

हा हा

आजानुकर्ण
Fri, 04/10/2015 - 18:32 नवीन
हा हा.. हे बाकी खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अहो

सुबोध खरे
Fri, 04/10/2015 - 21:31 नवीन
अहो आमचे गुलाबी दिवस अजून संपलेले नाहीत. ते वर्णन सावकाश येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

.

रुस्तम
Fri, 04/10/2015 - 21:51 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वा वा शाब्बास! गुलाबी दिवस

नगरीनिरंजन
Sat, 04/11/2015 - 06:40 नवीन
वा वा शाब्बास! गुलाबी दिवस संपल्यावरच वर्णन करायचं असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आवडले!!

जुइ
Fri, 04/10/2015 - 18:26 नवीन
खुप साधी आणि सुटसुटीत विवाहाची कहाणी ऐकायला मिळाली!!
  • Log in or register to post comments

आवडले

जगप्रवासी
Fri, 04/10/2015 - 18:38 नवीन
तुमच लिखाण साध सरळ असत, एकदम मनाचं ठाव घेणारं, खूप आवडल
  • Log in or register to post comments

लाजवाब.

अर्धवटराव
Fri, 04/10/2015 - 20:53 नवीन
ऋषीकेश मुखर्जीचे जुने अमोल पालेकर चित्रपट आणि हम आपके है कौन चा सुरेख मिलाफ झाल्यासारखी वाटली हि सत्यकथा. एक नंबर डॉक्टरसाहेब.
  • Log in or register to post comments

+१

रुस्तम
Fri, 04/10/2015 - 21:51 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आवडलं, डॉक्टरसाहेब!

आदूबाळ
Fri, 04/10/2015 - 21:43 नवीन
आवडलं, डॉक्टरसाहेब!
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर हो...!

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/11/2015 - 02:48 नवीन
अतिशय सुंदर हो...! अविच्छिन्ना प्रीतीरस्तु। __/\__
  • Log in or register to post comments

अविच्छिन्ना प्रीतीरस्तु

टवाळ कार्टा
Sat, 04/11/2015 - 09:40 नवीन
अविच्छिन्ना प्रीतीरस्तु
अविची इच्छा प्रीती रस्त्यात भेटूदे??? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दंगा चालू होणार आता.

पॉइंट ब्लँक
Sat, 04/11/2015 - 21:33 नवीन
दंगा चालू होणार आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अविची इच्छा प्रीती रस्त्यात

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/11/2015 - 23:44 नवीन
अविची इच्छा प्रीती रस्त्यात भेटूदे??? >> थांब हो कार्ट्या! तुला ना आता... फट्कूटवाळ-बॅटुकातृप्त Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डोकच्या धाग्यावर दंगा नक्को..

टवाळ कार्टा
Sat, 04/11/2015 - 23:48 नवीन
डोकच्या धाग्यावर दंगा नक्को...ते इंजेक्शन देतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्यांच्याकडे दंबूक पन है ना

हाडक्या
Mon, 04/13/2015 - 19:02 नवीन
त्यांच्याकडे दंबूक पन है ना बे.. "शांतपणे" दंबूक काढतील ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे ते नै

टवाळ कार्टा
Mon, 04/13/2015 - 20:14 नवीन
हे ते नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

प्रीतीचं स्पेलिंग चुकलंय काय

सूड
Mon, 04/13/2015 - 16:02 नवीन
प्रीतीचं स्पेलिंग चुकलंय काय रे ब्याट्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

येप्स यू आर रैट्ट. प्रीति

बॅटमॅन
Mon, 04/13/2015 - 16:09 नवीन
येप्स यू आर रैट्ट. प्रीति मधील ति ही संस्कृतात ह्रस्व*** असते, मराठीत दीर्घ असते. ***मराठी उच्चाराप्रमाणे पाहता र्‍हस्व, (र ला ह जोडलेला) तर संस्कृतप्रमाणे पाहता ह्रस्व. (बरोब्बर उलटा क्रम)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एकदम प्रसन्न केलंत वातावरण!!

असंका
Sat, 04/11/2015 - 09:11 नवीन
एकदम प्रसन्न केलंत वातावरण!! अगदी शं ना नवरेंची आठवण झाली!(आधी पण कुणीतरी हेच म्हणलं होतं....१००% सहमत) सुंदर!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

मस्त.

एस
Sat, 04/11/2015 - 11:03 नवीन
आवडेश...
  • Log in or register to post comments

एक शंका आहे .

बाबा पाटील
Sat, 04/11/2015 - 12:10 नवीन
स्कुटर खरच पंक्चर झाली होती का हो ?
  • Log in or register to post comments

तुमची चि सौ का बरोबर असेल तर

सुबोध खरे
Sat, 04/11/2015 - 12:43 नवीन
तुमची चि सौ का बरोबर असेल तर काय फरक पडतो?पन्कचर झाले की नाही?
  • Log in or register to post comments

चला, साधेसेच पण निर्विघ्न!!

स्पंदना
Sat, 04/11/2015 - 14:21 नवीन
चला, साधेसेच पण निर्विघ्न!!
  • Log in or register to post comments

सरळसोपे खरेकथन आवडले. इतक्या

पलाश
Sat, 04/11/2015 - 18:08 नवीन
सरळसोपे खरेकथन आवडले. इतक्या वर्षांपूर्वी असा आटोपशीर लग्नसोहोळा केला त्याबद्दल सर्व जाणत्यांचे कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sun, 04/12/2015 - 11:50 नवीन
साधी सरळ कहाणी! आवडली!!!
  • Log in or register to post comments

मस्तच !!!

पर्नल नेने मराठे
Mon, 04/13/2015 - 10:40 नवीन
मस्तच !!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा