✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मद्दान

आ
आतिवास यांनी
गुरुवार, 04/10/2014 - 21:25  ·  लेख
लेख
“शाळा नाही आज, मतदान आहे,” आय म्हन्ली. त्ये काय असतंय बगाया लगी साळत. पोलिसमामाबी व्हते. राती आमच्यातच आल्ते जेवाया. हसले; जा म्हन्ले आत. मोटी मान्सं येकेक आत यणार. मंग म्हाडिक गुर्जी कागुद बग्णार. मोहिते गुर्जी शै लावनार; येक कागुद देणार त्यास्नी. मान्सं गपचिप खोक्यात कागुद टाकून जाणार.. ठप्प करत. आण्णा बसलेले छातीला बिल्ला लावून. म्या म्हन्लं, “मलाबी कागुद; शै; बिल्ला.” आण्णा म्हन्ले, “जा घरी.” बापूकाका आले. म्या बोल्ली “शै.” बापूकाका आण्णांना म्हन्ले, “बाळ्याच्या मेल्या म्हातारीचं नावं आहे यादीत मास्तर. होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” आण्णा लटलट कापत व्हते. मला वराडले, “जा मुकाट घरी." आण्णांना बापूकाकांचं भ्यावं वाटलं? मद्दान लई वंगाळ. * शतशब्दकथा

Book traversal links for मद्दान

  • ‹ शिक्षा
  • Up
  • दुस्री ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
21056 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

सहीये! अचूक. अगदी असंच होतही

यशोधरा
गुरुवार, 04/10/2014 - 21:35 नवीन
सहीये! अचूक. अगदी असंच होतही असणार.
  • Log in or register to post comments

वेगळाच अनुभव

शुचि
गुरुवार, 04/10/2014 - 21:37 नवीन
मस्त!!! सुपर्ब!!!
  • Log in or register to post comments

:D खरच लई वंगाळ वो

आत्मशून्य
गुरुवार, 04/10/2014 - 21:53 नवीन
म्तदान. खिक्क.
  • Log in or register to post comments

आन्जी इज ब्याक!

आदूबाळ
गुरुवार, 04/10/2014 - 21:57 नवीन
आन्जी इज ब्याक! कोणी प्रकाशकाने आन्जी-कथांचं एक कॉफी टेबल बुक काढावं. दोन पानांवर एक कथा. डाव्या पानावर कथेची रेखाचित्रं, उजव्या पानावर डोकावून बघणार्‍या खट्याळ डोळ्यांच्या झिपर्‍या आन्जीचा वॉटरमार्क आणि त्यावर इंपोज केलेली शतशब्दकथा. शक्यतोवर शाळकरी हस्ताक्षरात. मजा आ जायेगा. मी पहिला कष्टंबर.
  • Log in or register to post comments

ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा.

यशोधरा
गुरुवार, 04/10/2014 - 22:07 नवीन
ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मी ऐड्या दिली ना, मग मी पयला

आदूबाळ
गुरुवार, 04/10/2014 - 22:08 नवीन
मी ऐड्या दिली ना, मग मी पयला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मस्तच आहे कल्पना!

सखी
गुरुवार, 04/17/2014 - 01:01 नवीन
मस्तच आहे कल्पना! आन्जी रॉक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे

आतिवास
गुरुवार, 04/10/2014 - 23:41 नवीन
हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे तुम्ही आदूबाळ :-) चित्र अगदी डोळ्यांसमोर उभं केलंत. कधी ते वास्तवात येऊ शकलं तर ही तुमची आयडिया नक्की वापरेन. अर्थात तुम्हाला श्रेय देऊन ... (शोधायला सोयीचं जावं म्हणून हा प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर नेऊन ठेवावा म्हणतेय - अर्थात तुमची हरकत नसेल तरच!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ये हुई ना बात!!! आदूबाळ

शुचि
गुरुवार, 04/10/2014 - 23:43 नवीन
ये हुई ना बात!!! आदूबाळ यांचेही कौतुक अन आपले स्वप्न साकार होवो ही शुभकामना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

अगदी जरूर ठेवा.

आदूबाळ
Fri, 04/11/2014 - 10:04 नवीन
अगदी जरूर ठेवा. अशी स्वप्नं बघत रहायला हवीत ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

१०० नंबरी आयड्या !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/14/2014 - 23:22 नवीन
१०० नंबरी आयड्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्तं !

अनुप ढेरे
गुरुवार, 04/10/2014 - 22:17 नवीन
मस्तं !
  • Log in or register to post comments

प्रसंग समोर उभा केलात!. . .

खेडूत
गुरुवार, 04/10/2014 - 22:58 नवीन
प्रसंग समोर उभा केलात!. . . :)
  • Log in or register to post comments

मस्त ! आदुबाळ चि आयडीया

खटपट्या
गुरुवार, 04/10/2014 - 23:14 नवीन
मस्त ! आदुबाळ चि आयडीया चान्गली आहे.
  • Log in or register to post comments

आवडली

मधुरा देशपांडे
गुरुवार, 04/10/2014 - 23:23 नवीन
आन्जी च्या इतर कथांप्रमाणेच हीसुद्धा आवडली.
  • Log in or register to post comments

सरसच.ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या अ

राही
Fri, 04/11/2014 - 00:08 नवीन
ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या लघुकथा आठवल्या. त्यात अर्थात मिस्किल आंजी नाही. पण मिताक्षरी आणि अर्थबहुल. वर आदूबाळ यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर ह्या कथांचे पुस्तक व्हावे. उषा मेहता यांनी अनुवादलेल्या किचन कवितांप्रमाणे छोटेखानी पण आशयघन. लंपन, गोट्या या व्यक्तिचित्रांप्रमाणे ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल.
  • Log in or register to post comments

अनुमोदन

आनन्दा
Fri, 04/11/2014 - 10:35 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

पी. मानसी यांचं लेखन मी

आतिवास
गुरुवार, 04/17/2014 - 08:55 नवीन
पी. मानसी यांचं लेखन मी अजिबात वाचलेलं नाही - आता मिळवून वाचते! अर्थात आंग्ल अनुवाद - बहुधा साहित्य अकादमीत मिळावीत त्यांची पुस्तकं. वाचायला काहीतरी नवं सुचवल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

मास्टरनी की मास्टरी को (फिर

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/11/2014 - 00:24 नवीन
मास्टरनी की मास्टरी को (फिर से)सलाम!
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Fri, 04/11/2014 - 00:27 नवीन
उत्तम कथा आवडली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

बहुगुणी
Fri, 04/11/2014 - 02:56 नवीन
राही वर म्हणतात त्याप्रमाणे 'मिताक्षरी आणि अर्थबहुल'! ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल. +१०००
  • Log in or register to post comments

मस्तच.

नगरीनिरंजन
Fri, 04/11/2014 - 05:24 नवीन
मस्तच. आदूबाळची कल्पनाही आवडली.
  • Log in or register to post comments

कडमडली पुन्हा आन्जी!

स्पंदना
Fri, 04/11/2014 - 06:54 नवीन
कडमडली पुन्हा आन्जी! काय मस्त ग अतिवास! अगदी गावाकडची शाळा, ते मतदानाला उभे लोक, सगळ सगळ डोळ्यासमोर आलं. आदूबाळ __/\__!!
  • Log in or register to post comments

आन्जी च्या सगळ्याच गोश्टी

प्रीत-मोहर
Fri, 04/11/2014 - 08:43 नवीन
आन्जी च्या सगळ्याच गोश्टी आवडतात :) आतिवास पुस्तकाच मनावर घ्याच!!!
  • Log in or register to post comments

झक्कास!!

किसन शिंदे
Fri, 04/11/2014 - 08:49 नवीन
काय पन ना आन्ना, टाक्लं अस्त यखादं मत आन्जीनं त काय आबाळ कोसळ्ळं अस्तं का. वरून पाश्शेची नोट मिळाली नस्ती का मग. कॉफी टेबल बूकची उत्सूकता आहे.
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
गुरुवार, 04/17/2014 - 08:57 नवीन
"पाश्शेची नोट"!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आवडेश

प्रमोद देर्देकर
Fri, 04/11/2014 - 09:27 नवीन
आवडेश

╱╱┏╮╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱ ╱╱┃┃╱╱╱┳╱┓┳╭┫┳┓╱ ▉━╯┗━╮╱┃╱┃┣┻╮┣╱╱ ▉┈┈┈┈┃╱┻┛┛┻╱┻┻┛╱

  • Log in or register to post comments

अंजी रॉक्स,

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/11/2014 - 09:40 नवीन
अंजी रॉक्स,
  • Log in or register to post comments

ही पण कथा मस्त जमून आली आहे.

राजो
Fri, 04/11/2014 - 10:00 नवीन
ही पण कथा मस्त जमून आली आहे. आंजी रॉक्स.. खरंच!
  • Log in or register to post comments

मस्त!

अजया
Fri, 04/11/2014 - 10:04 नवीन
केसाच्या झिप्र्या आवरत ,गावभर फिरणारी आंजी दिसली.अगदी सपष्ट!
  • Log in or register to post comments

मस्त

सुहास झेले
Fri, 04/11/2014 - 10:10 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments

असो

सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/11/2014 - 14:14 नवीन
:( असो
  • Log in or register to post comments

किती छान

सविता००१
Fri, 04/11/2014 - 14:25 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

हा हा हा, एकच नंबर!!!!!!

बॅटमॅन
Fri, 04/11/2014 - 14:28 नवीन
हा हा हा, एकच नंबर!!!!!! आदूबाळ म्हंटात ते अगदी खरंय. तसं एखादं बुक्क निघावं अन अखिल म्हाराष्ट्रात पापिलवार होऊन जावं. लै मजा यील तेच्यायला.
  • Log in or register to post comments

हेहेहे. मस्तय मद्दान.

कवितानागेश
Fri, 04/11/2014 - 15:43 नवीन
हेहेहे. मस्तय मद्दान. पन लहान मुले मद्दान नाई केले तरी हौशीनी शाई लावून घेतात आणि मिरवतात, हे मात्र पाहिलय. :)
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Fri, 04/11/2014 - 20:00 नवीन
सर्व वाचकांचे आभार. आन्जीच्या मिपावर येण्याला प्रोत्साहन देणा-या सर्व प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

मस्तय!

पैसा
Sat, 04/12/2014 - 22:54 नवीन
म्या पन आज बोटाला शै लावून आली की! लै मज्जा.
  • Log in or register to post comments

आन्जी रॉक्स!

आयुर्हित
Sun, 04/13/2014 - 00:54 नवीन
बोटाला शै लावून आल्याबद्दल आपले आणि व आन्जी चे ही अभिनंदन! आन्जी रॉक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आन्जी

योगी९००
Sun, 04/13/2014 - 11:28 नवीन
आन्जे केल्लेस्स गं मद्दान... आवडेश..... (होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” - हे एकदम राष्ट्रवादी स्टाईल वाटते..)..
  • Log in or register to post comments

राष्ट्रवादी शैली ही (आधीच्या)

आतिवास
गुरुवार, 04/17/2014 - 08:52 नवीन
राष्ट्रवादी शैली ही (आधीच्या) काँग्रेस शैलीशी मिळतीजुळती आहे ना? का वेगळी आहे बरीच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

ऑल इन वन, छान !

चौथा कोनाडा
Sun, 04/13/2014 - 13:09 नवीन
छान ! निरागसपणा, राजकारण, करड्या शिस्तीचे अण्णा : ऑल इन वन ! झकास कथा आवडली !
  • Log in or register to post comments

+1

शुचि
Sun, 04/13/2014 - 20:47 नवीन
अण्णानचे पात्रही खूप छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मद्दान करन्यायेवडी 'शानी'

प्यारे१
Sun, 04/13/2014 - 21:13 नवीन
मद्दान करन्यायेवडी 'शानी' आन्जी कधी हुनार ?
  • Log in or register to post comments

एक लंबर!

सुधीर
Mon, 04/14/2014 - 22:49 नवीन
मला वाटलं आन्जीला इसरलात की काय मद्दानाच्या पूर्वतयारीत? +१ टू आदुबाळ.
  • Log in or register to post comments

मस्त !

drsunilahirrao
Tue, 04/15/2014 - 14:35 नवीन
मस्त ! :)
  • Log in or register to post comments

ह्या मोठया मान्साईच असंच

जयनीत
Wed, 04/16/2014 - 16:10 नवीन
ह्या मोठया मान्साईच असंच -ह्यायते. आता हेच बगा थे मोठ मोठे हिरो हिरोइना टीव्हीवर दिन रात ठणाण बोंबलते लोकाईवो मद्दान करा मद्दान करा म्हनुन अन आन्जी करायले गेली तवा अण्णा नाय म्हनाले. आन्जी सोबत नेहमी असंच होतं. ती बिच्चारी गरीब गाय! तिच्यावर सारेच वरडतात शाळेमंधी गुर्जी अन घरी आण्णा. फक्त एक मोत्याच हाय जो तिचं ऐकतो तिनं काय बी म्हटलं तर झोकात शेपूट हलवतो 'गपचिप'.
  • Log in or register to post comments

हे बरीक खरं

आतिवास
गुरुवार, 04/17/2014 - 08:58 नवीन
हे बरीक खरं :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयनीत

मस्त

चाणक्य
गुरुवार, 04/17/2014 - 04:17 नवीन
एकदम कडक
  • Log in or register to post comments

यकटी आन्जीच न्हाय. मलाबी

गब्रिएल
गुरुवार, 04/17/2014 - 18:08 नवीन
यकटी आन्जीच न्हाय. मलाबी ल्हान्पनी मद्दान न्हाय करु दिलं. आता साय्बान्नी आयड्या दिली त्या टाय्मापासून्चा सग्ळा अनुशेश भरून काडायला. सायबांचा लईच इजय आसो.
  • Log in or register to post comments

आंजी ...

देशपांडेमामा
Tue, 04/30/2019 - 17:34 नवीन
पुन्हा एकदा मतदान पुन्हा एकदा आंजी :-) देश
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा