क्रिकेट आणि मी
क्रिकेट आणि मी
क्रिकेट चं माझं वेड अगदी लहानपणापासून -म्हणजे चौथी पांचवी पासूनचं. तेंव्हा तो खेळ देखिल कळायचा नाहीं व इंग्रजीतील commentary सुद्धा. पण विजय हजारे खेळायला आला की मी रेडीओ जवळ बसुन राह्यचो. तेंव्हाची audio technology सुद्धा फारशी प्रगत नव्हती. फलंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही. पण हजारे खेळत असताना असला disturbance खूपच सुखद वाटायचा.
विजय मांजरेकर चं या खेळात पदार्पण झालं तेंव्हा मला बऱ्यापैकी हा खेळ समजायला लागला होता व थोडं फार इंग्रजी देखील समजायला लागलं होतं. या काळांत मी क्वचितच ब्रेबॉर्न वरचा सामना चुकवला असेल. हजारे ला प्रत्यक्षात फलंदाजी करताना मी पाहू शकलो नव्हतो पण मांजरेकर ची फलंदाजी अनेकदा पाह्यलीय.
हे सर्व मी मुंबईत शाळेत असेपर्यंत कारण नंतर मी मुंबईबाहेर पडलो व आजतागायत. बाहेर असलो तरी मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीम वरचं प्रेम कायम होतं. सुट्टीवर मुंबईत असतांना Times Shield च्या सामन्यात देखिल मला इंटरेस्ट असायचा. बऱ्याच वेळा मला सुट्टी नेमकी पावसाळ्यात मिळायची. कांगा लीग चे सामने मला वाटतं जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात सुरु व्हायचे; तेंव्हा ऐकायला मिळायचं की कांगा लीग मध्ये खेळतांना ground strokes न खेळणं कसं अपरिहार्य असतं कारण ओल्या outfield मुळे जोरात मारलेला चेंडू देखिल लांबवर जाउ शकत नव्हता. Lift them up, that is the only way. या काळात ओवल, आझाद व क्रॉस मैदानावरची space sharing arrangement बघून मजा यायची. एका सामन्यातला लोंग ऑफ किंवा लोंग ऑन चा क्षेत्ररक्षक दुसऱ्या सामन्यातल्या स्लीप मध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या जवळ.
मुंबई चा फलंदाज म्हणजे तंत्रशुद्धता हे समिकरण जे मी पाहिलं ते मांजरेकर पासून सुरु झालं व पुढे दिलीप सरदेसाई, सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर व सचिन तेंडूलकर व आत्ता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे पर्यंत तसंच चालू राह्यलं --अजूनही ते तसंच राहू शकेल पण या खेळाने आपलंच तंत्र बिघडवून घेतलंय त्याला मुंबई तरी काय करणार.
-२-
सुनील गावसकर नावाचं वादळ त्याच्या १९७०/७१ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर जे अंगावर आलं ते त्यानंतर बरीच वर्षे मला झपाटून गेलं.
आत्ता हेल्मेट न घालता कोणीही फलंदाजी करायला धजणार नाहीं.पण तेंव्हा गावसकर हेल्मेट का वापरत नाही या बद्दल बोलताना एक प्रसिद्ध समालोचक म्हणाला होता, “he does not need a helmet”. गावसकरच्या तंत्रशुद्धतेचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर “Never take your eyes off the ball’. पाकिस्तान च्या दौऱ्यावर असताना TV वरदाखविलेलं एक क्षणचित्र मी कधीच विसरणार नाही. इम्रान चा अंगावर उसळून आलेला एक चेंडू खेळणं अशक्य होतं व त्याला सोडण हेच अपरिहार्य होतं. इथे बरेचसे फलंदाज गोंधळून गेले असते व त्यांनी हा चेंडू एकतर अंगावर /हेल्मेटवर घेतला असता किंवा तो खेळायचा अनैच्छिक, केविलवाणा प्रयत्न करून slip cordon मधल्या टीकुठल्यातरी क्षेत्ररक्षकाकडे सोपा झेल देऊन तो मोकळा झाला असता. Not Sunil Gavaskar. हेल्मेट शिवाय असलेला सुनील कमरेत पूर्णपणे मागच्या मागे वाकला व शेवटपर्यंत त्याने आपली नजर चेंडूवरून काढली नाहीं. तेंव्हा सामन्याचं वर्णन करणारा पाकिस्तानी समालोचक् सामना सोडून हेच क्षणचित्र पुन्हा पुन्हा दाखवीत राह्यला “This is a lesson in true technique for all young batsmen” असं अर्ध स्वतःशीच व अर्ध इतरांसाठी पुटपुटत.
लष्करात असतांना एका ठिकाणी माझ्यापेक्षा एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत या बाईचं क्रिकेट वरचं ज्ञानपूर्वक प्रेम पाहून मी आश्चर्यचकित झालो. तिला गावसकर व महिन्दर अमरनाथ खूप आवडायचे पण या दोघांत सुनील अग्रस्थानी असायचा. आम्ही भेटलो की फक्त सुनील गावसकर बद्दल बोलत बसायचो. सुनीलची तिसावी व तेंव्हाची रेकॉर्ड ब्रेकिंग सेन्चुरी झाली तेंव्हा नेमकी माझी बदली सिकरान्दाबाद ला झाली व या सेचुरीचा पूर्वार्ध ट्रेन मधेच गेला पण सुदैवाने उत्तरार्ध मी ऐकू शकलो. या नंतर आम्ही एकमेकांना एक लांबलचक व भावविवश पत्र लिहिलं व विषय होता गावसकरची हे तिसावी सेन्चुरी. नंतर या बाई मला पुण्यात भेटल्या पण तो पर्यंत गावसकर नावाचं वादळ शमलं होतं व मुंबईने दुसऱ्या एका वादळाला जन्म दिला होता.
गावसकरने निवृत्ती घेतली तेंव्हा माझ्या डेक्कन क्वीन च्या पुणे-मुंबई फेऱ्या सुरु होत्या. पिंपरी चिंचवड भागात कुठल्यातरी एका इमारतीवर कुणीतरी एक बोर्ड लावला “सुनील तुझ्याशिवाय आम्ही टी व्ही बघूच शकत नाहीं.” मी पहिल्यांदा हा बोर्ड पाह्यला व दचकलो. आपल्याला मनापासून कांहीतरी म्हणायचं असतं व ते कुणीतरी आधीच म्हणून जातं.
(यातलं बरंच कांही मी कांही वर्षांपूर्वी लिहिलं होतं व आत्ता update केलंय. तेंव्हा सचिनचं नुक्तच पदार्पण झालं होतं सचिन वर लिहायचं तर ते स्वतंत्रपणे लिहावयास हवं कारण त्यात क्रिकेट बरोबर इतर कांही गोष्टींचाहि समावेश करायला लागेल.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
परवाच दिली होती ना डायरी?
बडे बुढोंने कहा हय....
खिक्क्क
छान लिहीले आहे.....
चांगला लेख आहे. मी १९८७
ये बात कुछ हजम नही हुइ. हे
आहा..................!!!!!!!!
@ये बात कुछ हजम नही हुइ. हे
धन्यवाद! लेख वाचून
आवडलं!
पाहूया कसं जमत ते.
मुक्त विहारि व श्रीगुरुजी.
जमेल तसे लिहा...
क्रिकेट व्यतिरीक्त देखील ह्या
क्रिकेटवर बरेच चांगले लेख
"अव्वल नंबर" विसरू नका!
"अव्वल नंबर"
बरोब्बर, तोच!
सगळे ऑष्ट्रेलियन बोलर आमिर खानाला फुलटॉसच टाकतात.
फूटबॉलवरचा अर्शद वारसी आणि
का ते समजले नाही..
किती बोलावे आणि किती नाही , वेड लावले क्रिकेट ने
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
छान
हो.ना.
सचिन जबरदस्त आहे.
हळवं केलत.
आवडला
जबरी