आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर
आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो.
गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची.
आमी सर्वे मऊ हून जायचो.
नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा.
म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...”
अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का.
पण मला कटाळा यायला.
सारखी बबली माझ्यासंगं.
कुणी मला खेळायला बी घेईना.
झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच.
हात बी दुखायला लागला. बबली जड लई.
एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं.
जोरात चिमटा काढला बबलीला.
रडली लई. खच्चून.
आता अजाबात येत न्हाई ती माझ्याकडं.
पैला नंबर गेला म्हणा.
जाउंदे.
(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द- अनुभव मांडण्याचा हा प्रयोग.)
- गपगार
- हसू
- फुस्स...
- बटाटा भाजी
- नौस
- यष्टी
- टकाटक
- गपचिप
- शिक्षा
- मद्दान
- दुस्री
- नाटेठोम
- दिसली समद्यांना ...
- सपान
- शरयत
- धरसोड
Book traversal links for आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शंभर नंबरी लिहिलंय.
जमलंय!
हाहा!
मस्त प्रकार आहे हा!
जबरी!
आवडले.
मस्तय.
हम्म्म ... असं 'मऊ दिसलं, कि
सही
आभार
लयच भारी!!!
हाहाहा! मस्तच लिवलंय.
खरचं छान लिहिलय.
छान :)
आभार
भारी बरं का..
आभार
आवडेश .... चिकणं लिवलय
आवडलं लई... खच्चून.
+१