✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'नट्स अँड बोल्ट्स'

N
Nile यांनी
Sat, 03/10/2012 - 09:44  ·  लेख
लेख
श्री आदिजोशी यांचे नट-बोल्ट तत्वज्ञान वाचले आणि बुद्धा बोधीवृक्षाखाली जे काय झालं असेल ते आम्हाला झालं. आधी आपण जोशींचे थोर विचार ऐकूयात.
एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?
(दुवा) किती थोर नै! म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली. ती निरीक्षणं आम्ही तुमच्यासमोर चित्ररुपातच देऊ इच्छितो. १. एक बोल्ट दोन नट्स, एकाच बाजुने २. एक बोल्ट आणि दोन नट्स, एक पुढून एक मागून. ३. दोन्ही बाजूंनी वापरता येणारा नट ४. बोल्ट विथ अ होल (अ‍ॅन्ड अ नट टू)!! ५. नट आणी बोल्ट्स एकत्रच!! काही काही नट्स आणि बोल्ट्स तर इतके भयानक होते की ते फोटो इथे देणं मला सभ्यतेला अनुसरून वाटत नाही. त्याशिवाय काही भन्नाट नट्स आणि बोल्ट्स बनविण्याची कल्पनाही आम्हाला चाटून गेली. पण निसर्गाचा हा भन्नाट चमत्कार पाहून एक विचार आमच्या मनात आल्याशिवाय रहावला नाही: Nature has gone nuts!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
विडंबन
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
7139 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास

चेतनकुलकर्णी_85
Sat, 03/10/2012 - 09:56 नवीन
म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली
श्या प्रकारची "nuts and bolts" निसर्गात मिळतात?? फोटोन वरून तर हे मानव निर्मित वाटत आहे..ते हि विदेशी कंपन्यान मधील.. :P
  • Log in or register to post comments

तुंम्ही नीट पाहीले तर ते नट

अन्नू
Sat, 03/10/2012 - 09:57 नवीन
तुंम्ही नीट पाहीले तर ते नट आणि बोल्ट असेच कॉम्बिनेशन आहेत. पण नटमध्ये नटच आणि बोल्टमध्ये बोल्टच असे नाही; असे होणे अशक्य आहे. आणि तसे करायचेच असल्यास त्यातील एकाला भिन्न पक्षाचा गुणधर्म द्यावा लागेल. उदा.= नटमध्ये बोल्ट्चा आकार देणे किंवा मग बोल्टला नटचा साचा देणे. ;) थिंक हटके सो नथिंग इज इम्पॉसिबल! ;) ;)
  • Log in or register to post comments

अशक्य अतिरेक....

तर्री
Sat, 03/10/2012 - 10:22 नवीन
आवरा रे आवरा. . . . . . . . . . .( खाजगी : ह.ह.पु.वा)
  • Log in or register to post comments

'तर्री' च म्हटल तुंम्ही कुठे

अन्नू
Sat, 03/10/2012 - 10:35 नवीन
'तर्री' च म्हटल तुंम्ही कुठे हरवलात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

वा: ! निळ्या वा: !

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/10/2012 - 11:18 नवीन
रिश्ता वही सोच नयी....
  • Log in or register to post comments

वेगळाच लेख. आवडून गेला..!

कॉमन मॅन
Sat, 03/10/2012 - 11:22 नवीन
वेगळाच लेख. आवडून गेला..! :)
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

सोत्रि
Sat, 03/10/2012 - 11:47 नवीन
म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला
?
तुंम्ही नीट पाहीले तर ते नट आणि बोल्ट असेच कॉम्बिनेशन आहेत. पण नटमध्ये नटच आणि बोल्टमध्ये बोल्टच असे नाही;
+१, सहमत. वरील सर्व चित्रांत दाखवलेले नट आणि बोल्ट्स हे मानवनिर्मीत दिसताहेत, असो तसाही आमचा निसर्गाचा अभ्यास कमीच हो, सिमेंच्या जंगलात वाढलो ना आम्ही. :)
  • Log in or register to post comments

क्र २ चित्रातल्या उजवीकडील

नितिन थत्ते
Sat, 03/10/2012 - 11:51 नवीन
क्र २ चित्रातल्या उजवीकडील पदार्थांना "स्टड" असेही मॅशो नाव आहे.
  • Log in or register to post comments

झाला रे झाला....निळ्या खर्‍या

प्रभो
Sat, 03/10/2012 - 11:53 नवीन
झाला रे झाला....निळ्या खर्‍या अर्थाने हिरवा झाला. ;)
  • Log in or register to post comments

सोय महत्वाची ....

छोटा डॉन
Sat, 03/10/2012 - 12:09 नवीन
धागा रोचक वाटला. नट-बोल्ट कॉबीनेशन हे २ वस्तु घट्टपणे एकत्र बांधण्यासाठी वापरात, शक्यतो २ वस्तुंमध्ये दुरावा अगर अंगत असु नये ह्यासाठी नट-बोल्ट कॉब्मीनेशनचा वापर करतात, नात्यांचेही ( रिलेशन्स रिलेशन्स ) काहीसे तसेच नाही काय ? ;) 'शेवटी काय तर सोय महत्वाची' असा निष्कर्ष ह्यातुन काढता येऊ शकतो. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

हैशा!

अन्नू
Sat, 03/10/2012 - 12:52 नवीन
निळ्यांनी नट आणि बोल्ट कॉम्बीनेशन असणारी दुर्मिळ अनैसर्गिकतेची अमुलाग्र आणि हलकट माहीती देऊन आमच्या डोक्याचे जे नटबोल्ट ढिले केले त्याबद्दल समस्त मिपा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत हाये! ही शाल Image removed. हे श्रीफळ Image removed. आन् ही फुल न्हाय फुलाची पाकळी Image removed. (टीपः- पाकळी ऐवजी अख्ख लाल गुलाबच देणार होतो पण ते उगीच "अग्गs!!" सारख अनैसर्गिक दिसल असत!) अवांतर वजा सुचना=> सदर साहीत्य मिपावरच्याच एका सदस्यांकडून तात्पुरते (सेकंड हॅन्ड) उसने घेतलेले असल्याने कार्यक्रम समाप्तीनंतर निळ्यांनी हे सामान लग्गेच आंम्हास गुपचुप परत आणून द्यायचे आहे. पाकळी हवी तर खिशातून घेऊन जाऊ शकता! ;)
  • Log in or register to post comments

च्यायला निळ्या आयडी बदल म्हण

पिंगू
Sat, 03/10/2012 - 13:01 नवीन
च्यायला निळ्या आयडी बदल म्हण आता.. - (नटोरियस नट) पिंगू
  • Log in or register to post comments

चला या निमित्ताने का होईना

गणपा
Sat, 03/10/2012 - 13:31 नवीन
चला या निमित्ताने का होईना नायल्याला बोर्डावर आणले म्हनुन आदी जोशी यांचे आभार मानायला हवेत. बाकी तुम्हा दोघाच्या तत्वज्ञानाने माझ्या भवती ही प्रकाशाच वलय दिसुन राहिलय असं माझा एल कलीग म्हणत होता.
  • Log in or register to post comments

अवांतर आवरा!

Nile
Sat, 03/10/2012 - 13:34 नवीन
अवांतराकरता मालकांनी खव आणि व्यनीची सोय केली आहे. कृपया धाग्यावरचं अवांतर आवरा! (अरे कोणी संपादक इथे कारवाई करेल काय?) ;-) मरतंय आता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

?

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/10/2012 - 14:13 नवीन
अरे कोणी संपादक इथे कारवाई करेल काय?)
लेख उडवायचा आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काय रे, काय रे!

पैसा
Sat, 03/10/2012 - 17:07 नवीन
आलेच कात्री घेऊन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओ काकू!

Nile
Sun, 03/11/2012 - 02:21 नवीन
आधी पर्‍यासारख्यांचा धुडगूस थांबवा की! (मराठी संस्थळांवर पाशवी संपदकणींची टक्केवारी इतकी जास्त का असा धागा सुरु करावा म्हणतो!) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मि. नटवरलाल :)

नंदन
Sat, 03/10/2012 - 14:36 नवीन
बाब्बौ, एवढ्या प्रकारचे नट्स पाहून आता कुठे मला 'नमन नटवरा, विस्मयकारा'चा खरा अर्थ समजला ;)
  • Log in or register to post comments

कोटीसम्राट

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/10/2012 - 15:04 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

समास?

Nile
Sat, 03/10/2012 - 15:28 नवीन
नटवरलाल
इथे काय समास वगैरेची भानगड आहे का रे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

__/\__ दंडवत स्वीकार करा

प्रीत-मोहर
Sat, 03/10/2012 - 17:04 नवीन
__/\__ दंडवत स्वीकार करा कोटिसम्राट!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

कोटीकेसरी, तुम्ही काय

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 03/11/2012 - 22:43 नवीन
कोटीकेसरी, तुम्ही काय स्क्रूड्रायव्हर घेऊन बसला होतात का? बाकी आमचा निळ्या ना बाकी... हुशारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नट असे असतील तर नटी कशी असेल

५० फक्त
Sat, 03/10/2012 - 17:42 नवीन
नट असे असतील तर नटी कशी असेल ? त्याची काही चित्रं देता येतील का ? आणि नटमध्ये बोल्ट फिरवुन फिरवुन घालावे लागतात ना ?
  • Log in or register to post comments

आपलं तांत्रिक ज्ञान

राजेश घासकडवी
Sat, 03/10/2012 - 16:58 नवीन
आपलं तांत्रिक ज्ञान पाजळण्याचा क्षीण प्रयत्न. हहपुवा झाली हे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments

क्षीण आणि हास्य

श्रावण मोडक
Sun, 03/11/2012 - 15:47 नवीन
तांत्रिक ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न क्षीण आहे, तरीही हहपुवा झाली आहे. म्हणजेच, हहपुवा होण्याचे कारण काही तरी वेगळेच आहे. काय आहे ते? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लै भारी

बॅटमॅन
Sun, 03/11/2012 - 02:48 नवीन
लै भारी कल्पनाशक्ती. हे असलंच कैतरी हुडकत होतो लै दिवस.
  • Log in or register to post comments

अभिआंतरीचे ( अभियांत्रिकीचे )

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 14:29 नवीन
आमचे मेटलर्जी, कास्टींग, थ्रेडिंग, कटिंग मोल्डिंग चे ज्ञान " सखोल " वाढले.
  • Log in or register to post comments

ते ठीक आहे.. पण सगळ्यात महत्त्वाचं

Nile
Tue, 03/13/2012 - 03:59 नवीन
म्हणजे.. फोर्जींग बद्दल ज्ञान वाढलं का नाही? ही घ्या डेफिनिशनः Forging is a process involving shaping using localized compressive forces. Forging is often classified according to the temperature at which it is performed: "cold", "warm", or "hot". ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हा हा हा

jaypal
Sun, 03/11/2012 - 21:44 नवीन
निळुभाऊ जबरा लेख. माझ्याकडुन तुला सप्रेम भेट ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ हॅ हॅ

आदिजोशी
Mon, 03/12/2012 - 11:37 नवीन
साला लईच दंगा माजवून र्‍हायली पोरं टोरं. अजून विचारमोती पाजळायला हवेत. मिपावर चैतन्य सळसळायला मदत होईल :) :) :) :)
  • Log in or register to post comments

उनसं

पैसा
Mon, 03/12/2012 - 11:44 नवीन
हल्ली तुमचा तो "उपेक्षित नवरे संघ" दुर्लक्षित पँथरसारखा थंड पडला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

confuse..

गोंधळी
Mon, 03/12/2012 - 12:26 नवीन
चर्चे चा रोख कळ ला नहि ......??????ह्या तुन बोध काय ?????
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

आदिजोशी
Mon, 03/12/2012 - 13:49 नवीन
समलिंगी, भिन्नलिंगी एकाच वेळी अनेकलिंगी, परग्रहलिंगी असे सगळे संबंध नैसर्गीक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

सगळे संबंध नैसर्गीक आहेत

गोंधळी
Mon, 03/12/2012 - 19:16 नवीन
सगळे संबंध नैसर्गीक आहेत तर नैतिक अनैतिक याचा हि खुलासा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

"नैतिक अनैतिक याचा हि खुलासा

शैलेन्द्र
Mon, 03/12/2012 - 19:28 नवीन
"नैतिक अनैतिक याचा हि खुलासा करावा." म्हणजे हो काय भावु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

म्हणजे ???

गोंधळी
Mon, 03/12/2012 - 20:08 नवीन
म्हणजे म्हणजे वा. पं. कु. का. उं. मा. चांगले/वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

हं?

Nile
Tue, 03/13/2012 - 03:51 नवीन
ही चर्चा आहे असं कोणी सांगितलं?
चांगले/वाईट.
तुम्ही वाईट आहात इतकं तरी कळलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

.

गोंधळी
Tue, 03/13/2012 - 11:00 नवीन
फुल स्टॉप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा