✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

त्या तरूतळी

अ — अनन्त्_यात्री, Tue, 05/14/2024 - 13:12
अशोकाच्या पारावर सीतामाय उसासते सोनमृगाच्या मोहाला मनोमन धि:कारते शमीवृक्षाचा विस्तार शस्त्र पार्थाचे झाकतो प्रत्यंचेला स्पर्शण्यास शर अधीरसा होतो वृद्ध बोधिवृक्षातळी गौतम नि:संग बसे बोधरवि उगवता दिव्यप्रभा फाकतसे अजानवृक्षाच्या तळी ज्ञानयोगी अविचल अभावाच्या कर्दमीही प्रतिभेचा परिमळ नांदुरकीची डहाळी आज कशाने हलते? अणूहुनी सूक्ष्म कोणी सारे आकाश व्यापते!

प्रतिक्रिया द्या
3679 वाचन

💬 प्रतिसाद (14)

वा ! मस्त !!!

अहिरावण
Tue, 05/14/2024 - 13:17 नवीन
वा ! मस्त !!! मोहाचा फुलोरा दिशांतरी जातो रिचवून शांतपणे सारी दु:खे सोसतो!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

बाजीगर
गुरुवार, 05/16/2024 - 22:35 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

खूप आवडली ही कविता.

प्रचेतस
Tue, 05/14/2024 - 13:19 नवीन
खूप आवडली ही कविता.
  • Log in or register to post comments

@अहिरावण

कर्नलतपस्वी
Tue, 05/14/2024 - 13:47 नवीन
शिपाई बुलबुल चे जोडपे विमनस्क अवस्थेत घरट्याकडे एक टक बघत बसले होते तेंव्हा हेच विचार मनात आले... मोहाचा फुलोरा दिशांतरी जातो रिचवून शांतपणे सारी दु:खे सोसतो! अनंत यात्री च्या कवीता लाजवाब असतात. आवडली हे वेगळे सांगत नाही.
  • Log in or register to post comments

वाह वाह वाह

बाजीगर
गुरुवार, 05/16/2024 - 22:31 नवीन
क्या बात है कर्नलजी....बेहद खूष, मदहोष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सुंदर!

Bhakti
Tue, 05/14/2024 - 14:16 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

वाह!

चांदणे संदीप
गुरुवार, 05/16/2024 - 14:08 नवीन
वेगवेगळे वृक्ष आणि त्या खालच्या/त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या भावना. सिंपली ग्रेट! ___/\___ सं - दी - प
  • Log in or register to post comments

भावस्पर्शी कविता.

चित्रगुप्त
गुरुवार, 05/16/2024 - 14:59 नवीन
कविता खूप भावली. या पाची वृक्षांचे फोटो वा चित्रे हुडकायला हवीत.
  • Log in or register to post comments

नांदुरकी वृक्ष

चित्रगुप्त
गुरुवार, 05/16/2024 - 15:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजानवृक्ष

चित्रगुप्त
गुरुवार, 05/16/2024 - 15:10 नवीन
Image removed. नाथमंदिरातील अजानवृक्ष.
  • Log in or register to post comments

अशोकवनात सीता

चित्रगुप्त
गुरुवार, 05/16/2024 - 18:14 नवीन
Image removed. सोळाव्या शतकातले एक चित्र.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर खूप सुंदर

बाजीगर
गुरुवार, 05/16/2024 - 22:28 नवीन
अनंन्तयात्रीजी आपल्या कवितेचा बाज वेगळाच आहे, वाचून अतिप्रसन्न जाहलो. बहोत खूब. मला ही काही ह्याच लाईनवर म्हणावेसे वाटले, म्हणून मोरोपंतांच्या ओळी घेऊन म्हणतो, पुष्पवर्ण नटला पळसाचा । पार्थ सावध नसे पळ साचा !! पंतांचा खेळ आर्या वृत्ताचा । महापंडीत तो मोरया वृत्ताचा ।।
  • Log in or register to post comments

मुद्दाम log in करून

प्राची अश्विनी
Fri, 05/17/2024 - 12:24 नवीन
मुद्दाम log in करून प्रतिक्रिया देण्याइतकी कविता आवडली. अप्रतिम!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
Sun, 05/19/2024 - 17:26 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा