✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दोन लघु कथा

व
विवेकपटाईत यांनी
Sun, 08/27/2023 - 10:28  ·  लेख
लेख
शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे. चंद्रमाचा फोटो पाहून मुलाने कपाळावर हात मारला आणि तेंव्हापासून तो एकच गाणे गुणगुणत राहतो. चाँद सी बायको हो मेरी ऐसा मैंने क्यों सोचा था. २ आजोबांनी एका प्लॉटवर एक चंद्रमौळी झोपडी बांधली. आजोबांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर त्याच्या नातवाने तिथेच एक उंच गगनचुंबी इमारत बांधली. नातू खुश झाला. आपण ही गगनचुंबी इमारत कशी बांधली सर्वांना सांगू लागला. पण त्या इमारतीची प्रशंसा करत नातेवाईकांनी त्याला म्हंटले या गगनचुंबी इमारतीचे श्रेय तुला नाही फक्त तुझ्या आजोबांना आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
गझल
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4452 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

तुमचा (पेनचा) ब्रँड कोणता ?

अहिरावण
Sun, 08/27/2023 - 12:18 नवीन
तुमचा (पेनचा) ब्रँड कोणता ? तुमचे लेखन वाचून https://misalpav.com/node/9875 हे नेहमी आठवते
  • Log in or register to post comments

विवेक पटाईतच्या सर्व लेखनाचे

विवेकपटाईत
Tue, 08/29/2023 - 08:54 नवीन
विवेक पटाईतच्या सर्व लेखनाचे श्रेय माकडांनाच आहे - महर्षि डार्विन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

इमारतीचे श्रेय तुला नाही फक्त

विजुभाऊ
Mon, 08/28/2023 - 11:04 नवीन
इमारतीचे श्रेय तुला नाही फक्त तुझ्या आजोबांना आहे.
बरोबर आहे. आजोबानी लग्नच केले नसते तर नातवाने श्रेय घ्यायचा प्रश्न आलाच नसता.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

भागो
Mon, 08/28/2023 - 14:32 नवीन
विजुभाऊ दे धमाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

चळ आहे फक्त

सुरिया
Mon, 08/28/2023 - 15:14 नवीन
चळ आहे फक्त
  • Log in or register to post comments

आजोबांच्या मृत्यूच्या साठ

गवि
Mon, 08/28/2023 - 15:19 नवीन
आजोबांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर त्याच्या नातवाने तिथेच एक उंच गगनचुंबी इमारत बांधली.
कौतुक आहे. नातू जन्मला त्याच दिवशी आजोबा निजाधामास गेले होते का?
  • Log in or register to post comments

माझ्या आजोबांनी एक उत्तुंग

भागो
Mon, 08/28/2023 - 17:09 नवीन
माझ्या आजोबांनी एक उत्तुंग इमारत बांधली. मी आता भाड्याच्या झोपडीत रहात आहे!
  • Log in or register to post comments

--- असे चित्र हल्ली दिसते.

चित्रगुप्त
Mon, 08/28/2023 - 21:47 नवीन
आजोबांनी भरपूर मोठी जागा घेऊन त्यात मोठा वाडा बांधला, अंगणात खूप फळझाडे लावली... माझ्या वडिलांचे, माझे बालपण त्यात गेले... भरपूर फळे खाली, बागेत हुंदडलो .... आता मुलाने सगळी झाडे तोडून लाकडे विकली, वाडा पाडून चाळीस फ्लॅट बनवून विकले.... त्यापैकी एका फ्लॅटच्या एका लहानश्या खोलीत आता आम्ही उभयता रहातो ... --- असे चित्र हल्ली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

चला. माझ्या आजोबांनी...

भागो
Mon, 08/28/2023 - 17:19 नवीन
चला. माझ्या आजोबांनी... नावाची एक सेरीज बनवायला पाहिजे. पण त्या आधी कीर्ती सांगे आजोबांची तो एक पद्धतमूर्ख
  • Log in or register to post comments

कीर्ती सांगे आजोबांची तो एक

विजुभाऊ
Tue, 08/29/2023 - 11:52 नवीन
कीर्ती सांगे आजोबांची तो एक पद्धतमूर्ख
मूळ श्लोकात कीर्ती सांगे वडीलांची तो येक मूर्ख असे आहे. ( याचा कोणताही राजकीय संदर्भ लावू नये)
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

भागो
Tue, 08/29/2023 - 13:20 नवीन
दासबोधाच्या एका समासात पढतमुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. तुम्ही म्हणता ते अगदी सत्य आहे. केवळ स्पेशल इफेक्ट्स साठी वडिलांचे आजोब केले आहे. पटाईत ह्यांचा दासबोधाचा गाढा व्यासंग आहे, त्यांना हे सहज पटावे. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांची क्षमा मागतो. ते माझे पण कुलदैवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा