नमस्कार,
मिसळपाव.कॉम परिवारात सामील होताय त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. हा लेख तुम्ही मिसळपाव.कॉमवर अगदी नवीन आहात आणि सोबतच मराठी आंतरजालावर(इन्टरनेट) सुध्दा नवीन आहात असं गृहीत धरून लिहीलेला आहे. त्यामुळे सदस्यं नोंदणीकरण्याच्या आधी हा लेख वाचला तर सहसा येणार्या अडचणी येणार नाहीत.
१) मिसळपाववर तुम्ही मराठीत सदस्यं नाव घेऊ शकता. नव्हे तुमचं नाव मराठीतच असावं हा आग्रह आहे. मराठीत नाव लिहीता येईल का? अशी आपली पहिली शंका असू शकते. मात्र त्याची काळजी नाही. आपण सर्वांनी मोबाईलमध्ये इंग्रजी अक्षारांमध्ये मराठी मजकुर लिहीलेला असेलच तेथे तो इंग्रजीतच दिसतो. येथे मिसळपाववर मात्र त्याच पध्दतीने म्हणजे इंग्रजी अक्षरांत लिहीलेला मजकुर सरळ मराठीत दिसतो. :) याचा अर्थ असा की तुम्हाला मिसळपाव.कॉम वर मराठीत लिहायला केवळ ५ मिनीटे पुरतील.
तरीही काही अडचण आलीच तर कुठल्या शब्दासाठी काय लिहावे याचा तक्ता तयार आहे तुमच्या मदतीला. तो तक्ता येथे आहे.
थोडा वेळ जरा येथे घालवा म्हणजे आयुष्यात मिसळपाव किंवा आंतरजालावर कुठेही बिनचुक लिहायला लागाल.
२) समजा असे झाले की सदस्यंनाव घेताना काही चुक झाली तर काळजी करू नका. तुम्हाला आलेल्या ईमेल मधील माहिती सोबत तुम्ही खाली दिलेल्या ईमेल वर मेल करा. तुमच्या नावातील चुक दुरुस्त करून दिल्या जाईल.
३) तुम्ही सदस्यं खाते बनवण्यासाठी जसे सदस्यं नाव देणे गरजेचे आहे तसेच एक कार्यरत ईमेल पत्ता देणे गरजेचे आहे. तुमच्या खात्याचे संकेताक्षर (पासवर्ड) याच खात्यावर पाठवले जाईल. तसेच पुढे सुध्दा काही कामा निमीत्तं तुमच्याशी संपर्क साधायला हाच ईमेल वापरल्या जाईल.
४) तुम्ही खाते बनवल्यावर ते व्यवस्थापनाकडे सक्रिय करण्यासाठी पाठवले जाते. या प्रक्रियेला जरा वेळ लागतो. तो पर्यंत तुम्ही मिसळपाव वर वाचन करू शकता. जरा जास्तंच वेळ लागत असेल तर तुम्हाला आलेला ईमेल खाली दिलेल्या ईमेल वर पाठवून खाते लवकर सक्रिय करण्याची विनंती करू शकता.
५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे. आणि हो येथे केवळ तुमचेच लेखन किंवा कविता प्रकाशित करता येतात. अन्य कुणाचेही चोरलेले लेखन येथे प्रकाशित करता येत नाही.
६) येथे सर्वांनी एकत्रीत येऊन चांगल्या वातावरणात लेख लिहावेत चर्चा कराव्यात अशी अपेक्षा आहे. मात्र तुम्हाला कुणाचाही त्रास झाल्यास तुम्ही येथील संपादक मंडळाला तसे कळवल्यास त्याची काळजी घेतली जाईल.
७) नवीन सदस्यं आहात तर येथे रूळायला जरा वेळ लागेल. कधी आपल्या लेखांचे लोक कौतुक करतील तर कधी चेष्टा करतील. मात्र एक नक्की आहे की थोडा वेळ येथे टिकून रहा म्हणजे तुम्हाला तुमच्यासारखे मित्र नक्की भेटतील. आणि पुढे मिसळपाव सोडवणार नाही. यासाठी गरज आहे ती नवीन असताना टिकून राहण्याची. हवं तर ही कसोटी क्रिकेट आहे असं समजा. खेळपट्टीवर टिकून राहणे सर्वात आधी आवश्यक आहे. एकदा टिकलो की हव्या तेवढ्या धावा काढू. :)
८) येथे सदस्यं झाल्यावर तुम्ही लेखन करू शकता. विविध विषयांवर चर्चा करू शकता. अन्य विषयांवर प्रतिक्रिया देऊ शकता. इतर सदस्यांशी खरडवहीतून व्यक्तिगत निरोपांतून बोलू शकता. खरडफळ्यावर चालू घडामोडींवर गप्पाटप्पा आणि अन्य सदस्यांसोबत कुठल्याही विषयावर गप्पा करू शकता. तुम्हाला आवडलेल्या लेखांची सूची बनवून आपल्या वाचनखूना ठेवू शकता. आपल्या आवडत्या लेखकाचे आधीचे सर्व लेखन बघु शकता.
९) मिसळपाव.कॉमचे स्वत:चे एक धोरण आहे. तुम्ही आता या परिवारात सामील होताय तर कृपया हे धोरण एकदा नक्की वाचा. म्हणजे येथे कोण कसं आणि का? वागतं याचा अंदाज येईल. संपादक मंडळ व व्यवस्थापनाचा भूमीकेचा परिचय होईल. हे धोरण येथे वाचता येईल.
१०) सर्वात शेवटी , मिसळपाव तुम्हाला आवडले असेल तर येथे सक्रिय सहभागी व्हा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना मिसळपावबद्दल सांगा. जास्तीत जास्त मराठी लोकांना मिसळपाव आपलंसं वाटावं असा प्रयत्न आहे. त्यात सक्रिय सहभागी व्हा.
संपर्कासाठी ईमेल पत्ता :- neelkant.akl@जीमेल.कॉम (जीमेल इंग्रजीतूनच लिहा. स्पॅम मेल वाचवण्यासाठी तो प्रयत्न आहे. :) )
धन्यवाद.
प्रतिक्रिया
26 Feb 2011 - 11:21 am | प्रीत-मोहर
. वर आणतेय
26 Feb 2011 - 1:03 pm | सहज
नविन सदस्य नोंदणी करण्याअगोदर ह्या लेखाचा दुवा ह्या पानावर असावा.
तसेच नोंदणी झाल्यावर मिपाची नियमावली, कोणत्याप्रकारचे लेखन धोरणात बसते याची मार्गदर्शक तत्वे असे सदस्याला व्यनि द्वारा, इ-पत्राद्वारा मिळेल अशी सोय आहे का?
26 Feb 2011 - 1:46 pm | सुत्रधार
आणि उपयोगी
26 Feb 2011 - 4:14 pm | चिंतातुर जंतू
एक सूचना: 'वाविप्र'साठी एक कॅटेगरी बनवून हे सर्व धागे याखाली टाकावेत. मग ते कधीही चटकन सापडतील.
8 Mar 2011 - 8:20 pm | अग्रजा
आभारी आहे
8 Mar 2011 - 8:25 pm | प्राजु
छान. :)
20 Dec 2012 - 12:08 am | केदार-मिसळपाव
अहो इथे काही दिसत नहिये धाग्यावर.. हे वाचण्यात माला रस आहे...कोणी मदत करेल काय?
20 Dec 2012 - 12:26 am | केदार-मिसळपाव
खुप तत्परतेने द्रुश्य केलेत लिखाण...
20 Dec 2012 - 12:32 pm | मालोजीराव
अजून दोन सूचनावजा मुद्दे टाकायला पाहिजे होते !
१. हे फेसबुक नाही त्यामुळे स्टेटस अपडेट केल्यासारखे धागे टाकू नयेत
२.हे फ्लिकर किंवा पिकासा नाही - सगळेच फोटो अपलोड करू नयेत
:P
20 Dec 2012 - 12:48 pm | गणपा
हा हा हा.
शेमत आहे. :)
20 Dec 2012 - 12:49 pm | मिहिर
'सदस्य'चे अनेकवचन आणि इतर काय काय करूनही 'सदस्यं' पर्यंत मी पोचलो नाही आहे. नक्की काय आहे म्हणे हे?
फार तर सदस्य हा शब्द नपुंसकलिंगी धरला तर त्याचे अनेकवचन 'कपाट-कपाटं'नुसार 'सदस्यं' होऊ शकेल!
20 Dec 2012 - 12:58 pm | सस्नेह
सरळ साध्या मराठीत 'मेंबरं' म्हणून सोडा की हो..!
20 Dec 2012 - 3:03 pm | बॅटमॅन
अजून एक- जेव्हा कैतरी शोधल्या जाते तेव्हा "तुमच्या शोधातून कसलेच निष्पण्ण झाले नाही" असा मेसेज दिसतो. त्याजागी
"तुमच्या शोधातून काहीच निष्पन्न झाले नाही" असे वाक्य बदलावे ही इणंती.