विडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, "झालं रे! किती वेळ लागतोय! पाचच मिनिटे अजून." असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं.
आता, बॅचलरची रूम म्हणजे, जास्त काही सांगायलाच नको. पांघरायला दिलं त्याने पण त्याचा असा काही सुगंध येत होता की, मी कुडकुडून मरायचं मरण निधड्या छातीने अंगाशी कवटाळलं!
मिळतेच मिपावर दादही भन्नाटशी
=))
नेहमीचेच यशस्वी... पैजाराबुवा
जमतंय जमतंय! :)
कविता भन्नाट जमलीये,
तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ