तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय
तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय
माझं मन बी बोन्साय केलंय
पयलं व्हतं त्ये धरणावाणी
त्यात मॉप व्हतं पाणी
रंगीत मासळी पवत होती
मस्त लव्हाळं झुलंत होती
दिवसा खोखो नि रात्री कबड्डी
जल्ला स्पीड म्हणू कि जेट्टी
चाबूक घेऊन खाली तू आली
काय ठाऊक तू खाऊन आली ?
फटक्यात जिंदगी स्मशान केली
ती चमचमती दुनिया बी गेली
त्या समद्यास्नी मारून टाकलंय
मॉप पाणी बी आटवून टाकलंय
समद्या भावनांना पेटवून टाकलंय
माझं मन बी बोन्साय केलंय
पयला होतो म्या ताडावाणी
दिस रात एक मज होते
मनी तारे लखलखत होते
खायचो कोंडा अन प्यायचो पाणी
चउत भाकरीने बाजार जो केला
आत्ता जन्माचा उरलो अडाणी
फगस्त तुझ्याचसाठी झुरतोय
गप गुमान कामावर जातोय
तू सांगशिल त्येच करतोय अन घरामन्दिचं मुरतोय
राणी मुरून अर्धा झालोय
आता म्या पण बोन्साय झालोय
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
लॉल
:D:D:D:D
लै भारी