सोना, सोSSना, सोनुSSटली, काहीच उत्तर नाही. शेवटी आबा जोरात ओरडले गधडी बहरी आहेस का, ऐकू येते कि नाही. जोर-जोरात पाय आपटत ११ वर्षाशी सोनुटली दोन्ही हात कमरे वर ठेऊन आबासमोर उभी ठाकली. मोठे-मोठे डोळे वटारून बेंबीच्या देठाने ओरडली आSSबाSS, ओ द्यायला थोडा उशीर का झाला, मी बहरी, मी गधडी. आता कुकल बाळ नाही मी. मोठी झाली आहे. ६वीत शिकते. गधडी म्हंटलेले मला मुळीच खपणार नाही. एवढी वर्ष सहन केले, आता मुळीच सहन करणार नाही. येउ ध्या ममाला ऑफिसातून, कशी वाट लावते तुमची, बघाच.
आबाही तेवढ्याच त्वेषाने म्हणाले, "एवढ्या आवाज देतो, तू ऐकूनहि न ऐकल्यासारखे करते, आणि वर मला धमकी देते.