मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

नो रिग्रेट्स

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात. मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं २०१० मध्ये. म्हणजे हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास ५१ वर्षांनी. क्रिस्तोफर नोलानच्या इन्सेप्शन चित्रपटात हे गाणं वारंवार येतं. इतकंच काय पण संपूर्ण चित्रपटात हेच गाणं पार्श्वसंगीत म्हणून संथ लयीत वाजत रहातं. बॅटमॅन आणि जोकरमुळे नोलानचा फॅन बनलेल्या मला इन्सेप्शनमध्ये मात्र फसगत झाल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर बांधलेला हा चित्रपट जरी मला आवडला असला तरी यात प्रेक्षक कसा विचार करतील त्याची गणितं मांडून पटकथेची मांडणी केल्यासारखी मला वाटली होती. हे काही वाईट नाही.

कासव - जेथे जातो तेथे मी माझा सांगाती

सई कोडोलीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली. जेथे जातो तेथे मी माझा सांगाती पुढे आणि पाठी मीच माझ्या मीच माझी वाट मीच माझा दिवा हि-याचा ताजवा मीच माझ्या मीच माझी रुपे पाहतो पाण्यात आणितो गाण्यात मीच त्यांना मीच मला कधी हासडितो शिव्या कधी गातो ओव्या मीच मला अशी माझी चाले नित्य मम पूजा लोकी माझ्या ध्वजा मिरवितो नाही कधी केली तुझी आठवण म्हणालास पण मीच तू रे कधीतरी मन आजारतं. कधी नुसत्या सर्दी-पडश्यावर भागतं, कधी दीर्घ मुदतीचा ताप येतो. फतकल मारून बसतो, हटत नाही. अश्यावेळी हायबरनेट व्हावंसं वाटतं.

मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी लोकसत्ताच्या दि. २३ सप्टेंबरच्या "चतुरंग"च्या पुरवणीत विन्दा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मराठी कवींच्या कवीतेतील स्त्रीरूपाची काव्यसृष्टी" असा विषय घेऊन अनेक साहित्यिकांनी निरनिराळ्या कवींवर लेख लिहले होते.त्यांची यादी पाहिली तरी हा आढावा किती विस्तृत होता त्याचा अंदाज येईल. (१) मधुवंती सप्रे --विन्दा करंदीकर -- माझ्या घरी मी पाहुणी (२) नीरजा -- कुसुमाग्रज -- चिराच होईन इथे चिर्‍यातील (३) संगीता जोशी -- सुरेश भट --चंदन आणि चांदणेही (४) डॉ. नीलिमा गुंडी --मंगेश पाडगावकर --जय जय हे पार्थिवते (५) डॉ. अरुणा ढेरे -- बा. भ.

बदलाच्या गतिचे नवे नियम मांडणारा: 'न्युटन'

पुंबा ·
भारत बदलतो आहे, सत्तर वर्षांच्या प्रवासात असंख्य खाचखळग्यांतून, काट्याकुट्यातून वाट काढताना, जुन्या समस्यांवर विजय मिळवत नव्या समस्यांना तोंड देताना सतत कात टाकून नविन रुपडे घेतोय. काही बदल इतके क्रांतीकारी की त्यांच्याशी जुळवून घ्यायलाच शक्तिचा अफाट व्यय होतो अन काही इतके धीमे की 'काही होतंच नाही' अशी निराशा व्हावी. कित्येक प्रामाणिक लोक व्यवस्थेला आव्हान देता देता थकून जाऊन परत व्यवस्थेचाच भाग होऊन राहतात अश्या वेळेला धीमी पण आश्वासक पावले टाकत काही शिलेदार मात्र आपल्या परीने लढत राहतात. न्युटन ही अश्याच एका शिलेदाराची कथा आहे.

पाऊस, भूमी आणि मैथिली

उपेक्षित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

पाऊस, भूमी आणि मैथिली

विस्कळीतपणे मांडले आहे गोड मानून घ्या. ----------------------------------------------------------------------------------------------------------- कधीपासून पावसाची झड लागलीये, *हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार*.. पावसाची झड अजूनही चालूच आहे, थोडी वाढल्यासारखी वाटत्ते आहे का ? असेल कदाचित. हि कातर संध्याकाळ या धो धो पडणार्या पावसाने अजूनच कातर भासत आहे. आतून कुठूनतरी गझलेचा आवाज येत आहे पण पावसाच्या जोराबरोबर तो आवाजही कमी जास्त होतोय...

मान गए पंतवैद्य...

टर्मीनेटर ·
लेखनविषय:
काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला.

सेकंड लाईफ - भाग ७

अक्षरमित्र ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ सेकंड लाईफ - भाग ५ सेकंड लाईफ - भाग ६ ------------------------------------------------------------------------------------------------- दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफीसला गेलो.

रुक्मिनि म्हणे

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९८८ मध्ये श्री. चंद्रकांत काळे यांनी शब्दवेध या संस्थेची स्थापना केली. शब्द व स्वर यांचे वेड असलेल्या माणसांनी एकत्र येऊन पहिला कार्यक्रम केला तो "अमृतगाथा " संतांनी भक्तीरचना रचल्या; त्यातील लोकसंगीताशी नाळ असलेल्या काही रचना एकत्र करून.सुरवात केली. पुढे त्यांनी कै. ग्रेस यांच्या कवितांवर सांजवेळ, प्रीतरंग, शेवंतीचे बन, आख्यान तुकोबाराय असे मराठी कवितांवरचे कार्यक्रम सादर केले. आंतरभारतीचा कार्यक्रम म्हणून गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे भाषांतर व "नाटक्याचे तारे " हा कै.

साखर खाल्लेला माणूस - एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी अर्थात एक प्रसन्न नाट्याविष्कार

श्रीगुरुजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विलास व माधवी देशपांडे हे एक मध्यमवर्गीय जोडपं. यांना २२-२३ वर्षांची ऋचा ही एकुलती एक मुलगी. ती जाहिरात क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडतेय. विलास एका खाजगी विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जास्त वेतनाच्या अपेक्षेमुळे सरकारी नोकरी सोडून तो खाजगी क्षेत्रात आला आहे. लठ्ठ वेतनाबरोबरच तिथे असलेले विक्रीचे चढते लक्ष्य, व्यवसायवृद्धीची जबाबदारी, त्यामुळे येणारे ताणतणाव या सर्वांचा त्याच्या प्रकृतीवर व वागणुकीवर परीणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव बराचसा चिडचिडा व उतावळा झाला आहे. कामाबरोबरच येणार्‍या दारू पार्ट्या, धूम्रपान, जागरणे याने तो त्रस्त आहे.