नमस्कार !
हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते.
ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.