मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)

पाषाणभेद ·
काव्यरस

काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)

)तुझ्या रेशमी केसांनी(

sur_nair ·
लेखनविषय:
काव्यरस
विजुभाउंची कल्पना आवडली http://www.misalpav.com/node/11426. जरा वेगळा मार्ग निवडलाय पण प्रेरणा तुमचीच तुझ्या रेशमी केसांनी, केलीस काय किमया कित्येक गळे कापले, केलेस जीव वाया तुझ्या रेशमी केसांनी, आषाढमेघ लाजले श्वासात गंध भरुनी, उरात पूर वाहिले तुझ्या रेशमी केसांनी, उधाण येई अंधारा अवसेची रात्र काळी, कि देवळातील गाभारा? तुझ्या रेशमी केसांनी, भलतीच होय जादू वेणीत बांध यांना, नको मोकळे सोडू - आत्तापुरता एवढंच सुचतंय सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/

आठव

आमोद ·
लेखनविषय:
काव्यरस
वारा भन्नाट भन्नाट, फांदी फांदी धुमशान्, सखी तुझीया केशांचा, येई आठव बेभान . थेंब थेंब सुईगत, अंग अंग शहारत, सय तुझिया स्प्रशाची, माझ्या मनी उफाळत. गती वाढत वाढत तना मनात भीनते, तुझ्या सवेच्या दीसांतच, मन का हे डोकावते? चिंब ओलेत्या ढगांची, इथं गळाभेट होते, तुझिया मिठीची ओढ, मात्र फोफावत जाते. ह्या अचाट पाण्यात, दंगा माझिया मनात, फुफाटत वेडा खुळा, अग्निलोळाचा प्रपात.

जाणीव

तुका म्हणे ·
लेखनविषय:
काव्यरस
तू गेल्यावर शरद चांदणे, कधीच पडले नाही, पुन्हा पहाटे निशिगंधाचे फूल उमलले नाही. तू गेल्यावर पुन्हा मोगरा, तसाच सजला नाही, खिडकी मधुनी चंद्र चोरटा, कधीच दिसला नाही. तू गेल्यावर हरवून गेली, अंधारातील वाट, आकाशातील ताऱ्यानशी मग, पुन्हा न घडली गाठ. तू गेल्यावर पाउस पहिला, कधीच पडला नाही, अन भिजलेला सूर गळ्यातून कधी उमटला नाही. तू गेल्यावर कधी न घेतल्या, अंगावरती लाटा, वाळू मध्ये तुला शोधतो दूर किनारी आता. तू गेल्यावर वाटे मजला, असे हरवले काही, शोधीत फिरतो इथे तिथे, पण तरी गवसले नाही. - तुका म्हणे

अंतर

sur_nair ·
लेखनविषय:
अंतर शब्दांच्या सुंदर जाळ्यात मला अडकवू नकोस वचनांच्या खोल बंधनात उगा बांधू नकोस बोटात बोटे गुंफून दोघे हवे तेवढे फिरू मनगटाभोवती मात्र कधी नकोस हात धरू सहज सुटण्याइतकी दोघांतली सैल गाठ नको पण श्वास कोंडेल असा घट्ट गळफासही नको रागावू नको, माझी प्रेमाची कल्पना जरा निराळी आहे फक्त भावनांचा रस नाही अनुभवाचं सारही आहे शेवटी काही असले तरी तू 'तू' आहेस, मी 'मी' आहे दोघेमिळून 'आपण' असलो तरी….

लावणी - खास होळी निमित्त

sur_nair ·
लेखनविषय:
काव्यरस
गेली संक्रांत आली बाई होळी हो नाही काही तुमचा पता कुणासंग पंचीम रंगाची मी खेळू हो सन भाग्याचा, आहे फार मोठा घरला या धनी, राग आता सोडा तुम्हांसाठी केली, पुरणाची पोळी हो दिस उन्हाळी, सोसवेना उन किती पुसावं, घामाघूम अंग आग लावी राती, चंदनाची चोळी हो तुमच्याविना शेज, सुनी सुनी लागे विझली होळी अन, राख उरं मागे, रोज खुणविते, चंद्रकोर भाळी हो ही लावणी मीराबाईंच्या " केनो संग खेलू होरी, पिया त्यज गये है अकेली" या वरून स्फुरली.

जाते म्हणतेस...................

मंगेशपावसकर ·
लेखनविषय:
काव्यरस
जाते म्हणतेस................... जाते म्हणतेस हरकत नाही ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही मनी आज फक्त एकदा तरी राहून जा भातुकली मोडतेस हरकत नाही पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा हसते आहेस हरकत नाही माझी बुडती नाव पाहून जा जाळत आहेस हरकत नाही जळणारे माझे गाव पाहून जा छळत आहेस हरकत नाही माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................ मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com

चल उसात दंगा करू

पाषाणभेद ·
काव्यरस
चल उसात दंगा करू मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला: (पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.) हिरो:
पिक आलं वयात आता नको उशीर तू ग करू अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

हसली रे हसली...

Navigator ·
लेखनविषय:
काव्यरस
हसली रे हसली... हसली रे हसली... माझ्या जाळ्यात ती फ़सली, बागेत होतो खात भेळ पा्हता पाहता मुलांचा खेळ रंगल्या होत्या आमच्या गप्पा तेवढ्यात तिकडुन आले तिचे पप्पा वडिलांना बघताच बावरली बिचारी आम्ही दोघेही पडलो विचारी सुट्ला तिचा माझा संग झाला आमचा प्रेमभंग तेवढ्यात दुसरीही अशीच हसली मला वाटले ती पण फ़सली म्हणुन पुढे गेलो तर................. ........................ काणाखाली बसली... -संदीप...