तु नाही म्हणालीस,
ह्या वादळात आणि अश्रुंच्या पुरात,
माझ्या मनाने बांधलेले तुझे-माझे आपलं
इवलसं घर उध्वस्त झाले
पण परसातली रातरानी तशीच आहे,
ती वाट पाहतेय,
कोणाची ते माहीत नाही
अंगनातली बाग वाहुन गेली पण मोगरा तसाच आहे,
त्याच्यातली कुठ्ली ही जिद्द माहीत नाही,
त्याला कोणाच्या केसांत माळायचे आहे, माहीत नाही
अंगणातली तुळस ती पण तग धरुन आहे ,
का कोणासाठी ते माहीत नाही
आणि त्या माझ्या मनातल्या उध्वस्त घराजवळ,
आभाळाएवढ माझं वेडं मन इवलसे होउन बसलय,
घराकडे येणार्या हिरव्या पाऊलवाटेकडे डोळे लावुन,
का कोणास ठाउक ...