मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

एक दिवा

मनोज ·

खुपच छान जमले.असाच लिखाण चालू ठेवले तर आम्हालाही अशाच सुन्दर कविता, गझल, चारोळ्या ... वाचावयास मिळतील. वाट पाहात आहे अशाच लिखाणंची.

विसोबा खेचर 20/12/2007 - 22:23
दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... वा मन्या! छान लिहिलं आहेस... तात्या.

मनिष 20/12/2007 - 22:27
"बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... ऐवजी "बुध्द" होशील तू अन मोक्ष तुला मिळेल.... जास्त गेय वाटते!!! खुपच सुरेख जमली आहे कविता!

प्राजु 21/12/2007 - 01:42
दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल.... शेवट एकदम आवडला... - प्राजु.

पुष्कर 21/12/2007 - 08:58
खूप छान कल्पना आहे. कविता आवडली. "दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" होशील तू अन तुला मोक्ष मिळेल...." वा! लय भारी. जाता जाता एक आगाऊ सल्ला. "त्याने एका ओळीत मला ब्रम्हपोदेश दिला" ह्या ओळीतला तो शब्द खरंतर 'ब्रह्मोपदेश' (ब्रह्म+उपदेश) असा पाहिजे. -(आगाऊ) पुष्कर

In reply to by मनोज

पुष्कर 07/01/2008 - 19:43
शतशः धन्यवाद. हे शब्द ऐकायला माझे कान किती दिवसांपासून आसुसले होते. (हे मी, तू मला धन्यवाद म्हटल्याबद्दल म्हणत नाहिये. 'रे' या संबोधनाबद्दल बोलतोय). मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!) मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं. तरी एकदा कानफाट्या नाव पडल्यामुळे ह्या राव-साहेबांचा ससेमिरा काही सुटला नाही. कधी मी 'पुष्करराव' तर कधी 'पुष्कर साहेब', चुकून कधितरी 'पुष्कर शेठ' सुद्धा झालो. पुष्कर शेठ हे शब्द जेव्हा पहिल्यांदा ऐकले, त्यादिवशी रात्री मला 'मी कुठल्यातरी सावकाराची टोपी डोक्यावर घातलीये, पोट सुटलं आहे, डोळ्यांवर जस्ती काड्यांचा चष्मा लावला आहे, समोर तिजोरीत पैशांची चळत घेतलीये आणि माझ्याकडे उधार मागयला लोक येताहेत' असलं रम्य स्वप्नसुद्धा पडलं होतं तू पहिल्यांदा मला अरे-तुरे करून आपलासा केलास. माझे कान तृप्त झाले. त्याबद्दल तुझे आभार मानण्याइतकी फॉर्मॅलिटी पाळण्याइतका दुष्ट मी नाही. त्यापेक्षा माझ्याकडून तुला पार्टी. तू कुठे राहतोस तेवढं कळव. मी पुणे, मुंबई दोन्हीकडे आहे. (आमची शाखा कुठेही नाही. आम्हीच वैयक्तिकरित्या दोन्हीकडे येऊन-जाऊन असतो). -तुझाच, (अरे-तुरेतला) पुष्कर

प्रमोद देव 21/12/2007 - 09:23
कवितेतली कल्पना खूपच सुंदर आहे. मात्र शब्दांच्या मांडणीकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवेय. कवितेच्या प्रांतातले इथेले दिग्गज त्या बद्दल नक्कीच मार्गदर्शन करतील .

मनोज 21/12/2007 - 17:36
श्री धंनजय यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बदल करुन पुन्हा संपादित केली. सर्वांचे सुचना व प्रतिक्रिया बद्दल आभार. आपलाच, मन्या

सागर 21/12/2007 - 20:31
मनोज, अतिशय सुंदर कविता आहे. एकदम मस्त... तसा मी काही मोठा कवी नाही... पण पहिल्या चार ओळींमुळे मलापण थोडेसे स्फुरण चढल्यामुळे या चार ओळी लिहीत आहे ... एक घास चिमणासा पिलाच्या पोटी जायचा उपाशी राहून स्वतः तरी पोटचा जीव जपायचा... लगे रहो... असेच लिहित रहा.. (कवी मन जागे झालेला) सागर

इनोबा म्हणे 07/01/2008 - 19:53
हि कविता नुसतीच आवडली नाही,काहितरी शिकवून गेली... खुपच छान!कसं काय सुचतं तुम्हाला,देव जाणे! (कविता'चा बॉयफ्रेंड) -इनोबा

एक दिवा इवलासा रोज रात्री पेटायचा अंधार ठेऊन स्वतः खाली प्रकाश मात्र वाटायचा मला नवल वाटायचे अन नाही कळायचे असे काही वागुन याला नेमके काय भेटायचे? मी त्याच्या जवळ गेलो आणि हा प्रश्न केला त्याने एका ओळीतच मला 'ब्रह्मोपदेश' दिला दुसर्‍यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" तेव्हा होशील तू अन तुला मोक्ष मिळेल....

विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०

ॐकार ·

मुक्तसुनीत 20/12/2007 - 10:49
फार फार सुंदर कविता. कितीतरी वर्षानी वाचली ही. धन्यवाद. तुमच्याकडे "अजुनि या विजनातही" आहे का हो ? असेल तर टाका प्लीज ! आणि हो "एक दिवस असा येतो .." ही सुद्धा ! या विरूपिका नव्हेत पण माझ्या लाडक्या आहेत फार !

विसोबा खेचर 20/12/2007 - 22:46
त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्‍याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग. स्वागत आहे!.. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. जबरा!! तात्या.

धनंजय 20/12/2007 - 23:46
का? (मोठे कारण) प्रजासत्ताक शासन मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर घटनेने उकिरडा कोरून भूक शमवणार्‍या प्रजेला काय हक्क दिला, काय सत्ता दिली? हा प्रश्न पडतो (तात्कालिक कारण) २६ जानेवारी १९८०ला ३०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. २८ जानेवारीला आर.के.लक्ष्मण यांचे ते व्यंगचित्र बहुधा प्रकाशित झाले असावे. नक्की काय? माझ्या निबर झालेल्या संवेदनांना, न्यायबुद्धीला कवी विचारतो, की आपण नेमके काय साजरे करत आहोत? कुणासाठी? ही कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे. (किंवा माझ्यासारख्याच संवेदना निबर झालेल्या दुसर्‍या कोणासाठी.) अवांतर : वृत्त वगैरे. विंदांचा "संहिता" हा काव्यसंग्रह वाचून (त्यात ही कविता आलेली आहे) मला स्पष्ट दिसले की यात ठेकेबद्ध काव्य आहे, पण पुष्कळदा वृत्त सांगता येई ना. म्हणून उपक्रमावर चर्चा केली होती. http://mr.upakram.org/node/706

प्राजु 21/12/2007 - 01:37
कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. काय लिहीले आहे... सह्ह्ह्ही. बरच वर्षांनी वाचली ही कविता. - प्राजु.

3

आपण यांना पाहिलंय का?

ऋषिकेश ·

सर्किट 18/12/2007 - 02:07
ऋषिकेश, (शिळी असली तरी) कविता आवडली. - सर्किट

मुक्तसुनीत 18/12/2007 - 02:09
मिपावर आज सुरेख कवितांचा मेटीऑर-शॉवर आहे ! :-) मित्रा ऋषिकेशा , तुझी ही कविता छान आहे ! खरे सांगायचे तर "गेले ते दिन गेले " आणि "जुने जाऊ द्या मरणालागुनि" या दोन्ही परस्परविरोधी भावना आपल्यात एकत्र नांदतात ! गतकाळाच्या आठवणी, काहीतरी मागे सरल्याची हुरहूर आणि "उद्या" ची प्रतीक्षा , त्याबद्दलच्या आशा-आकांक्षा यांच्या हिंदोळ्यावर आपला वर्तमान झोके घेत असतो, नव्हे का ? आणि या दुहेरी अशा भावना असण्यामागे विसंगती नाहीच. उलट, विसंगती तेव्हा जाणवते जेव्हा या दोहोपैकी एकच भावना असेल. ज्याला भूतकाळातील सगळे विसरावेसे वाटते , ज्याला त्याच्याशी कसलेच नाते ठेवण्याची पर्वा नसेल तो माणूस किती कोरडा असेल. याउलट, ज्याला उद्याबद्दल कसलीच उत्सुकता नाही तो माणूस किती डीप्रेस्ड् असला पाहिजे !

विसोबा खेचर 18/12/2007 - 08:44
केसांतुन लाडाने फ़िरणार्‍या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का?? डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्‍याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का?? हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का? क्या बात है... ऋषिकेशा, सुंदरच लिहिलं आहेस रे!

विजय पाटील 18/12/2007 - 12:37
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण... खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं... एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं.... ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का? मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का?? मीही असच करत होतो. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

मलाही तात्यांचा लेख वाचून तीच भावना पद्यात मांडणारी माझीच एक कविता आठवली. तात्या, हि सुद्धा तशी शिळीच कविता! पण आठवली म्हणून इथे देतोय.. आपण यांना पाहिलंय का? ********* अजुनही आठवतय,आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं.. तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं... जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण... माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का? रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलंय का?? चिंब पावसात भिजुन..

एडीपस आणि कूटप्रश्न

धनंजय ·

विसोबा खेचर 17/12/2007 - 07:47
एडिपसची काव्यरूप कथा मस्त! :) अवांतर - "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला तर लवथवती विक्राळाच्या चालीत अगदी सहज बसतंय! :) तात्या.

एडीपस आणि कूटप्रश्न "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, किती रे विकारी असे बंधु माझा..." चिरंजीव ती स्फिंक्स हेरी तयाला. कधी एक माणूस त्या ठायि आला उखाण्यात पाहे जणू आरशाला स्वतःलाच जाणून कोड्यात साचा - स्वतःच्या विकारा, स्वतःच्या गतीला "असू तुल्य सारेच एडीपसाशी विलंबीत काळात त्या श्वापदाशी; भविष्यात होऊ, नि भूतात होतो..." असे ज्ञान झाल्यास गात्रांस गाळू! "न हो हे..." म्हणे देव मोठा कृपाळू विकारक्रमाने स्मृतिभ्रंश देतो.
मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस, मूळ भाषा : स्पॅनिश (एडीपस याबाबत बहुतेक लोकांना हा तपशील म

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

धोंडोपंत ·

केशवसुमार 16/12/2007 - 14:41
धोंडोपंत.. हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!! (आभारी)केशवसुमार अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. विशेष भावलले कडवे प्रकाश घाटपांडे

प्राजु 16/12/2007 - 21:04
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही.. खूप सुंदर. - प्राजु.

ऋषिकेश 16/12/2007 - 21:44
व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :) -ऋषिकेश

सुनील 16/12/2007 - 22:39
मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार! वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर 17/12/2007 - 11:52
पंत, तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती! तात्या.

तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही! स्वाती

एक दिवस...

दिनेश५७ ·

विसोबा खेचर 16/12/2007 - 00:43
कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या.

प्राजु 16/12/2007 - 06:09
पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु.

पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास...

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता - १. रिकामे मधुघट

धोंडोपंत ·

विसोबा खेचर 15/12/2007 - 18:43
पंत, भास्कररावांनी मराठीला दिलेल्या अमूल्य ठेव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या मालिकेच्या माध्यमातून भास्कररावांच्या काही निवडक कविता 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आमचा संकल्प आहे. आपल्या या संकल्पाचे सहर्ष स्वागत आहे! तांब्यांच्या कविता मिसळपाववर जतन करायच्या असे आपण ठरवले आहे, ही गोष्ट मिसळपावला निश्चितच वैभवाशाली बनवणारी आहे! वरील कविता हे एक आम्हाला आवडणारं अतिशय सुंदर गाणं आहे. दिदीचा हृदयाला हात घालणारा आवाज, सहजसुंदर चाल, मोहक ठेक्यातला केरवा यामुळे हे गाणं अतिशय श्रवणीय झालं आहे! आपलाच, तात्या.

ऋषिकेश 15/12/2007 - 19:04
वा! हा संकल्प बघुन कोण आनंद झाला आहे म्हनून सांगु! आज तांब्याच्या कविता वाचायला मिळणे ही गोष्टच दुर्लभ झाली आहे हे खरेच. त्यामुळे असा अमोल ठेवा देऊ केल्याबद्दल धोंडोपंतांचे अनेक आभार आणि अनेकोत्तम शुभेच्छा!! श्रीगणेशाही माझ्या एका आवडत्या गाण्याने केल्याबद्दल आभार! काहि (आगाउ)सुचना, १. गाणे दिल्यावर जर ते ऐकण्यासठी एखादा दुवा देता आला तर बहार येईल. अर्थात जेव्हा शक्य असेल तेव्हाच संपादक मंडळ, २. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का? (या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर 15/12/2007 - 19:19
२. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का? (या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश ऋषिकेशराव, मिसळपाववरील प्रेमाबद्दल आणि आस्थेबद्दल मनापासून आभार. लवकरच यातील तांत्रिक तज्ञ मंडळींना भेटून मिसळपावचे मुखपृष्ठ, साठवणीचे स्वरुप, रंगरूप, इत्यादी बाबतीत काही बदल करायचे ठरवले आहे. तात्या.

विकास 15/12/2007 - 19:06
चांगला संकल्प आहे. भा. रा. तांब्यांच्या कवितेत कधी कधी गर्भितार्थ फारच वेगळा असे, तसे माहीत असल्यास ती माहीती देखील येथे द्यावी. उ.दा. नववधू प्रिया मी बावरते ही प्रसिद्ध कविता आणि गाणे....

नंदन 15/12/2007 - 19:54
उत्तम उपक्रम, धोंडोपंत. या कवितांबरोबरच तुमचे त्यांच्यावरील भाष्यही वाचायला आवडेल. तात्याने म्हटल्याप्रमाणे, हे गाणंही अतिशय सुंदर आहे. खासकरून 'संध्याछाया भिवविती हृदया'चं आर्त कडवं. कदाचित थोडं अवांतर होईल, पण 'करीं' वरील अनुस्वार पाहून सत्त्वशीला सामंतांची काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत आलेली (दोन लेखांची) लेखमाला आठवली. जुन्या पद्धतीप्रमाणे, उच्चारानुसार अनुस्वार द्यायची पद्धत महाराष्ट्र राज्यशासनाने नेमलेल्या शुद्धलेखनविषयक समितीने १९६५ च्या आसपास कधीतरी काढून टाकली. यामुळे, विशेषकरून जुन्या गाण्यांच्या/कवितांच्या झालेल्या अर्थहानीबद्दल लिहिताना, त्यांनी या गाण्यातील 'मधु पिळण्यापरी बळ न करीं' या ओळीतील श्लेषाचे सुरेख उदाहरण दिले होते. माझ्या हातांत मध पिळण्याइतपत बळ नाही हा एक अर्थ, आणि मध पिळण्यासाठी बळ(जबरी) करू नकोस असा दुसरा. तुम्ही मूळ कविता तशीच लिहिलीत म्हणून आठवले. (त्या लेखातले, दुसरे उदाहरण म्हणजे -- 'तुझ्या गळां, माझ्या गळां'चे झालेले 'तुझ्या गळा, माझ्या गळा' हे भ्रष्ट रूप). [ विषयांतर वाटल्यास क्षमस्व.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

प्रमोद देव 15/12/2007 - 20:55
नंदनशी सहमत आहे. अतिशय उत्तम संकल्प आहे. माझ्या तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. अता मधुचे नाव कासया ह्या मध्ये कासया चा अर्थ काय असावा? का सया असे तर नसावे?

धोंडोपंत, भा.रा. तांबे यांच्या कवितांचे 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आपण जो संकल्प आहे, त्यास आमच्या शुभेच्छा आहेतच. पण, नंदन म्हणतात तसे, त्या कवितांवर आपले भाष्य आले तर खूप आनंद होईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत 15/12/2007 - 21:57
वर अभिप्राय दिलेल्या सर्वांना धन्यवाद. आपल्याला हा संकल्प आवडला हे बघून आमचाही हुरूप वाढला. १) तात्या - मिसळपाववर दर्जेदार साहित्य जतन व्हावं म्हणून आम्ही आमच्या कुवतीनुसार प्रयत्न करीत आहोत आणि करत राहू. २) ऋषिकेश - गाणे ऐकण्यासाठी दुवा देणे या बाबतीत आम्ही फारच अडाणी आहोत. गाण्य़ांच्या दुव्यासंदर्भात जे तज्ञ आहेत त्यांनी यासंबंधी काही केले तरच. ३)विकासराव - सूचना स्वागतार्ह आहे. एकदा एखादी कविता येथे आली की त्यावर चर्चा करता येईल. ४)संजयराव - धन्यवाद ५)नंदनराव - आपल्या विचारांशी १००% सहमत. शासकीय नियम जेव्हा साहित्यात लुडबुडायला लागले तेव्हापासून मराठीची मोठी हानी झाली आहे. आम्ही मात्र येथे भास्कररावांनी जसे लिहिले तसेच लिहू. कारण आम्ही फक्त भारवाही म्हणून हे काम करीत आहोत. भास्कररावांनी लिहिलेले एक टिंबही वगळण्याचा प्रमाद आम्ही करायला धजावणार नाही. आपण लिहिलेले विषयांतर मुळीच नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा यात आहे जो लोकांपर्यत पोहोचला नसता. ६)प्रमोद राव - क्या बात कही है | नाव कासया आणि नाव का सया वर येथे चर्चा व्हावी. त्यातून सर्वांच्या जाणीवा समृद्ध होतील. ७) प्राध्यापक साहेब - आपली थाप पाठीवर असली म्हणजे झाले. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 15/12/2007 - 23:10
या कवितेबद्दल थोडेसे:- या कवितेची माधव ज्युलियन यांच्या का उठता खाली बसा तरूण मंडळी, उपचार ठेविता का हा? समताच योग्य ह्या स्थळी या कवितेशी जवळी़क वाटते. याचे कारण असे आहे की , माधव ज्युलियन यांनी या कवितेत त्यांचा काव्यदीप लयाला चालला असल्याची खंत व्यक्त केली आहे. आणि 'क्रांतीचे पुढील सौंदर्य" हे तरूण कविंवरच अवलंबून आहे असे म्हटले आहे. तांब्यांनी हीच खंत अत्यंत भावुकपणे या कवितेत मांडलेली आहे की आजपर्यंत तुला हा काव्यरूपी मध मी देत आलो पण आता माझेच घट रिकामे होऊ लागलेत. कविता १९३३ ची आहे आणि तांब्यांचा मृत्यू १९४१ चा. आयुष्याच्य़ा अखेरच्या पर्वात लिहिलेली . म्हणून ते म्हणतातआजवरी कमळाच्या द्रोणी तुला हे रसपान घडवले ती पूर्वीची सेवा आठव आणि आता रागावू नकोस. आता जे आहे ते शेवटची राहिलेली एकच दुधाची वाटी ती देवपु़जेसाठी उरलेली आहे. आता जे काही उरले आहे ते ईश्वरार्पण. ती एकमेव वाटी (थोडासा काव्यरस) कसाबसा धेऊन मी पुढचा प्रवास करणार आहे. तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल? आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 16/12/2007 - 00:30
तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. वा पंत! अतिशय सुरेख रसग्रहण... तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल? क्या बात है! अगदी खरं... पंत, आपल्याकडून तांब्यांच्या, कुसुमाग्रजांच्या आणि इतरही उत्तमोत्तम कवींच्या कवितांचे उत्तम रसग्रहण इथे लिहिले जावो आणि आम्हा रसिक मिसळप्रेमींना ते वाचावयास मिळो हीच शुभकामना.. तात्या.

सुनील 15/12/2007 - 22:52
ह्या कवितेचा जन्म एका पोस्टकार्डावर झाला होता असे कुठेतरी वाचल्याचे अंधुकसे स्मरते (चु भू द्या घ्या). भास्कररावांच्या एका स्नेह्याने, "बर्‍याच दिवसात तुमची नवी कविता आली नाही तेव्हा आता एक येऊद्यात" असे पत्र पाठवले. त्याला उत्तर देताना भास्कररावांनी ही कविताच पाठवली. अशी कथा आहे. बाकी भा रा तांब्यांच्या कविता इथे देण्याचा संकल्प छानच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by बाबुराव

धोंडोपंत 16/12/2007 - 11:41
बाबूराव, भास्कररावांच्या कवितांवर प्रगल्भ प्रतिसाद अपेक्षित आहेत. कृपया आमचा नाही पण त्यांचा मान राखा. प्लीईईईईईईईईईईईईईईईज. धोंडोपंत

सर्किट 16/12/2007 - 06:39
धोंडोपंत, मिसळपावावर आपल्यासारख्यांचा वावर ही मिसळपावाला अभिमान वाटावा अशी गोष्ह्ट आहे ! तांब्याम्च्या कवितांचे इतके सुंदर रसग्रहण आपण करताहात, की क्या कहने ! आपला हा उपक्रम हा असाच सुरू रहावा, ही शुभेच्छा ! - सर्किट

मुक्तसुनीत 16/12/2007 - 06:59
भा रा तांबे यांच्या कविता आमच्या पिढीपर्यंत पोचल्या त्याचे श्रेय मंगेशकर भावंडाना जाते. किंबहुना वसंत प्रभु आणि मंगेशकर यानी त्यांच्या कवितेतील उत्तमोत्तम धन गाण्यांच्या रूपाने जतन केले , लोकांपर्यंत पोचविले. वसंत प्रभुंनी दिलेली तांब्यांची गाणी साठीच्या दशकाच्या आगेमागे मनामनात पोचली. त्यात रेडीयोचा वाटा फार मोठा होता. "देवानाही हेवा वाटावा" असे प्रेम या गाण्याना , गायकाना आणि संगीतकाराना उभ्या महाराष्ट्राने दिले. आणि त्या सगळ्याचा एक मोठा परिणाम म्हणजे रेडीयो ऐकणार्‍या लाखो लोकांपैकी तांब्यांच्या पुस्तकांकडे वळले. राजकवी तांबे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकानी लोकांपर्यंत पोचले. त्या गाण्यातील आणि संगीतातील गोडी इतकी की, आजच्या भीषण वेगवान जगात सुद्धा कुणाला त्याची आठवणा जतन करावीशी वाटते; आणि कित्येक जणांची दाद त्याला मिळते. व्यक्तिशः मला मंगेशकरानी केलेली तांब्यांची गाणी फार आवडतात. "मावळत्या दिनकरा" सारख्या कवितेने मंगेशकराना आपल्या स्वतःच्या वडीलांच्या आठवणीपर्यंत नेले आणि एका उत्कृष्ट सांगितिक रचना जन्माला आली. "दे मला गे चंद्रिके" हे देखील (कलावती रागातील ?) फार सुंदर गाणे आहे.

प्राजु 16/12/2007 - 09:44
सुंदर आहे ही कल्पना.. आणखीही येऊदेत तांब्यांच्या कविता... खूप दिवसांनी वाचते आहे या कविता. - प्राजु.

पंत, कवितेचे रसग्रहण आवडले. आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय. मस्त !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंत 16/12/2007 - 13:29
वा! मस्त प्रकल्प आहे. कविता वाचायला मिळाव्यात हे आमचे भाग्यच आहे. आपल्याला या कार्यासाठी शुभेच्छा! आपला गुंडोपंत

केशवसुमार 16/12/2007 - 14:17
धोंडोपंत, हा ही संकल्प अतिउत्तम.. अभिनंदन आणि शुभेच्छा.. सगळे संकल्प खंड न पाडता लगेच हता वेगळे करा.. अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना) (आतूर) केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 16/12/2007 - 19:59
अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना) हम्म! अवश्य करू सुमार साहेब. आत्ताच जरा कुठे काही नवीन लेखन करण्यास निवांतपणा मिळाला आहे! :) आता भरभरून लिहीन...:) तात्या.

राजकवी भा रा तांबे एक अफलातून कवी होते. बालगीत प्रेम,शृंगार ते अध्यात्म सर्व क्षेत्रात त्यांची लेखणी अश्वमेध यज्ञाच्या अश्वा समान निर्विवाद चालली. शंभर वर्षापुर्वी त्यांनी लिहीलेले बालगीत आज मस्त रॅप संगीत होऊ शकते. २७ ऑक्टोबर १८७३,जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून खाली रसिकांच्या माहितीसाठी देत आहे. हे कोण गे आई? नदीच्या शेजारी । गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत । वेळूच्या जाळीत दिवसा दुपारी । जांभळी अंधारी मोडके देऊळ । त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठायी। राहते गे आई ? ॥ १ ॥ चिंचांच्या शेंड्यांना । वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी । कोण गे पालवी ? कोण गे जोरानें। मोठ्याने मोठ्याने शीळ गे वाजवी । पांखरां लाजवी ? सारखी किती वेळ । ऐकू ये ती शीळ ? ॥ २ ॥ वाळली सोनेरी। पानें गे चौफेरी मंडळ धरोनी । नाचती ऐकोनी ! किती मी पाहिलें । इतकेची देखिलें - -झाडांच्या साउल्या । नदीत कांपल्या ! हांका मी मारिल्या । वांकोल्या ऐकिल्या ॥ ३ ॥ उरांत धडधडे । धांवतां मी पडे पळालो तेथून । कोण गे ये मागून ? ॥ ४ ॥ राजकवी भा. रा. तांबे

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 27/10/2025 - 13:29
ही कविता माझ्या मुलीला बालभारती पुस्तकात (चौथीला)होती.मी तिला शिकवली होती.तिच्या बालमनात आले की मंदिर मोडकं कसं काय असू शकते :)पण मला मात्र गावाकडचं एक मंदिर आठवलं जिथे मूर्ती नाही,असेच पिंपळ त्यावर उगवली आहे.

सोडुन गाव मी माझा ...

मनोज ·

ऋषिकेश 14/12/2007 - 05:11
अतिशय सुंदर भावगर्भ कविता. प्रत्येक कडवं हृदयस्पर्शी आहे. पु. ले. शु. -ऋषिकेश

विसोबा खेचर 14/12/2007 - 11:14
मन्याशेठ, अतिशय सुरेख कविता! प्रत्येक कडव्याला अगदी भरभरून दाद द्यावी अशी! तुमच्या प्रतेय्क शब्दासोबत तुम्ही आम्हालाही तुमच्या गावाला घेऊन गेलात, तिकडचं सगळं चित्र आमच्यासमोर उभं केलंत! क्या बात है... आपला, (हळवा) तात्या.

आजानुकर्ण 14/12/2007 - 23:25
साधी सोपी तरी चित्रमय कविता आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

विजय पाटील 15/12/2007 - 14:14
अतिशय साध्या पध्दतीने मनाला भुरळ घालणारी व आपल्या गावची मनापासुन आठवण काढावी अशी ही भावपूर्ण कविता खरच खुप आवडली. -विजय

धोंडोपंत 15/12/2007 - 14:33
वा वा. सुंदर कविता. आवडली. जरा वृत्तात बसवून घेतली नीट, तर अधिक मजा येईल. गणवृत्तापेक्षा किंवा छंदापेक्षा जातींमध्ये ही रचना मस्त होईल. उदाहरणार्थ, उद्धव वापरून बघा. एकूण-१४ मात्रा. ....खंड २ + ८ + ४ त्या | पारावरच्या | गप्पा जो | श्यांची सुन्दर | पारू २ | ८ | ४ या पद्धतीने. या ओळी कशा चपखल वृत्तात आलेत तशा इतरही आल्यास फार सुंदर रचना होईल..... अगदी जोश्यांच्या पारूसारखी...... गोरी, घारी, लाजरी, नखरेल.... आपला, (आस्वादक) धोंडोपंत ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी अप्रतिम. फारच छान. लिहीत रहा. थांबू नका. आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत 15/12/2007 - 14:45
केश्या, झकास विडंबन टाक. इतका चांगला माल आलाय बंदरावर. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सोडुन गाव मी माझा उडून आलो यैसा पश्चिम स्वप्न उराशी अन डोळ्या समोर पैसा प्रफुल्ल रान ते हिरवे अन २० घरांची वाडी विसरून पार ते गेलो भरधाव हाकतो गाडी बेधुंद रांगडा पाउस कस्तुरी गंध मातीचा ते हरवून बसलो सगले आवडे श्वास येसीचा त्या पारावरच्या गप्पा जोश्यांची सुन्दर पारू मिटउन टाकले सारे जोडीला डिस्को अन दारू ती उशास मांडी आईची अंगाइच्या प्रेमळ ओळी जरी इथे संपदा बाजुला मी घेतो झोपेची गोळी

दारू एके दारू... :)

विसोबा खेचर ·

In reply to by जुना अभिजित

छोटा डॉन 13/12/2007 - 15:01
नाही म्हणजे कुठलाही पायथा हा मिसळ चापण्यास अयोग्यच .... पायथा म्हणजे रेव्ह पारर्ट्या आल्याच ...... तेव्हा ........ हे हे हे ........

In reply to by छोटा डॉन

जुना अभिजित 13/12/2007 - 17:21
दोन्ही हात पसरून बोलावणार्‍या निसर्गाच्या जवळीकीने आलेला उन्माद मारिजुआनाचे कश घेउन कसा येणार? काय एंजॉय करायच याची अक्कल नसणारे रेव्ह पार्ट्या करतात. आणि गडांच्या पायथ्याची नावे आपल्या कर्तृत्वाने फेमस करतात. मला त्या अजाण युवकांची आणि त्यांच्या पालकांची कीव येते. देव त्यांच भलं करो. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विजय पाटील 13/12/2007 - 14:34
तात्या, जरा ही कविता पण पहा. मला माझ्या विरोपावर मिळाली विडंबन ...... फिटे अंधाराचे जाळे या गाण्याच्या चालीवर पिती अंधारात सारे झाले मोकळे हो ग्लास नाकानाकातुन वाहे एक उग्र असा वास !!ध्रू!! बार जागे झाले सारे बारबाला जाग्या झाल्या सारे जमता हो एकत्र बाटल्याही समोर आल्या सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास !!१!! दारु पिऊन नवेल्या झाल्या बेवड्यांच्या जाती बारमध्येच साय्रांच्या सरू लागल्या हो राती क्षणापूर्विचे पालटे जग भकास भकास !!२!! जुना सकाळ्चा प्रवास झाला संध्येचा काळोख दारूड्यांचा दारूड्यांना दारूनेच अभिषेक एक अनोखे हे मद्य आले ग्लासात ग्लासात !!३!!

दारुचा पाढा! दारू एके दारू, बैठक झाली सुरू दारू दुणे ग्लास, मजा येई खास! दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन! दारू चोक बियर, टाका पुढचा गियर! दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला! :) एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे. आपला, (ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.

विसरून जायचे तुला

मनोज ·

प्राजु 13/12/2007 - 06:30
विसरून जायाचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेचा घेतो.... ही ओळ मस्त आहे. - प्राजु.

विसोबा खेचर 13/12/2007 - 07:08
कळते माला ही सारे साराच भास आहे समजाऊ कसे मनाला कसली त्या आस आहे डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविन भासते गे आयुष्य रेघ मोठी हम्म! मनोज, तुझा प्रॉब्लेम जरा सिरियसच दिसतोय मला! सावर बाबा वेळीच स्वत:ला! :) *(शुध्दलेखनाच्या चुका बद्दल माफी) अहो साहेब, माफी वगैरे मागण्याची मुळीच गरज नाही. शुद्धलेखनाचे घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या नियमांनुसार शुद्धलेखनाचे महत्व मिसळपावही जाणते, नाही असं नाही! परंतु मिसळपावला शुद्धलेखानाचे अवास्तव आणि फाजिल महत्व नाही. कवतिक तर नाहीच नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नाही! :) तेव्हा शुद्धलेखनाची वगैरे नसती काळजी न करता बिनधास्त लिवा ही विनंती! :) व्याकरण, शुद्धलेखनाची वगैरे सगळी शाणपट्टी तिकडे, त्या तिथे पलिकडे! :) आपला, तात्या वाळिंबे!

मनोज 13/12/2007 - 07:27
प्राजु ,तात्या - आपली प्रतिक्रिया वाचुना खूप समधान वाटले. धन्यावाद. आपलाच, मन्या

विजय पाटील 13/12/2007 - 15:29
छान ! डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविन भासते गे आयुष्य रेघ मोठी या ओळी विशेष आवडल्या. -विजय

बेसनलाडू 15/12/2007 - 17:31
ही गझल आहे का? वाटत नाही. तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्यास आनंद होईल. येथून गायब झालेल्या एक विडंबनात्मक गझलेत 'काफिया छान निभावला आहे', 'वृत्तबद्ध', 'गेय' वगैरे प्रतिक्रिया नोंदवणार्‍यांनी मार्गदर्शन केले तर अधिकच उत्तम! (जिज्ञासू)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनोज 15/12/2007 - 20:40
श्री बेसनलाडू, आपल्यला जास्त काही कळत नाही हो :( तरी आपल्या सरख्या तज्ञांनी वेळोवेळी मार्गदशन करावे. (शिकाऊ) मन्या

ऋषिकेश 15/12/2007 - 18:52
सुंदर कविता!! डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविण भासते गे आयुष्य रेघ मोठी वा!! मस्तच!! पु. ले. शु. (अवांतरः ही कविता चुकून गझल विभागात टाकली आहे काय?)

*(शुध्दलेखनाच्या चुका बद्दल माफी) विसरून जायचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेच घेतो कळते माला ही सारे साराच भास आहे समजाऊ कसे मनाला कसली त्या आस आहे डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविन भासते गे आयुष्य रेघ मोठी विसरून जायाचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेचा घेतो....