✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धावपटू- शतशब्दकथा

न
निओ यांनी
गुरुवार, 01/06/2022 - 23:56  ·  लेख
लेख
पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी. बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते. अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले. दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र त्याने अपेक्षेने उघडले. क्रिडाविभागात, धावत असतानाचा त्याचा पूर्ण फोटो छापून आला होता. उजव्या मांडीपासून खालचा, स्टीलचा रॉड सकाळच्या उन्हात चमकत असतानाचा क्षण छायाचित्रकाराने सुरेख टिपला होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
1507 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

छान कथा, शेवट अपेक्षेप्रमाणेच

सौन्दर्य
Fri, 01/07/2022 - 00:23 नवीन
छान कथा, शेवट अपेक्षेप्रमाणेच होता.
  • Log in or register to post comments

मस्त, आवडली

सौंदाळा
Fri, 01/07/2022 - 14:10 नवीन
मस्त, आवडली
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा