कथा विविधा
नमस्कार मिपाकरांनो,
विविध विषयांवरील लेखन आणि कवितांमुळे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या मिपा सदस्या ज्योती अळवणी यांच्या सात निवडक कथांचा समावेश असलेल्या ‘कथा विविधा’ ह्या त्यांच्या पहिल्या कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग काल जुळून आला.
मुळात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी हि पहिलीच वेळ होती, त्यामुळे चिन्मयी सुमीत, सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, डॉ. स्नेहलताताई देशमुख, खा. पूनम महाजन, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, समीरा गुजर आणि प्रा. लतिका भानुशाली, अशा नाट्य, कला, चित्रपट, शिक्षण, राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या ह्या बहारदार कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालेला एक अतिशय सुंदर असा अनुभव, (मान्यवरांनी मनोगतात आपल्या आवडत्या मिसळपाव ह्या संस्थळाचा आवर्जून केलेल्या उल्लेखाचा सार्थ अभिमान मनात बाळगून) सदर सोहळ्याच्या सचित्र वृत्तांताच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे.
*****
दिनांक : ९ डिसेंबर २०१८
वेळ : संध्याकाळी ६ वाजता.
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), पार्ले (पूर्व) मुंबई.
कार्यक्रम : लेखिका ज्योती अळवणी लिखित “कथा विविधा” ह्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा.
विशेष उपस्थिती : चिन्मयी सुमीत, सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, डॉ. स्नेहलताताई देशमुख, खा. पूनम महाजन, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, समीरा गुजर आणि प्रा. लतिका भानुशाली.
रविवारच्या प्रसन्न संध्याकाळी, निमंत्रितांच्या चैतन्यपूर्ण उपस्थितीत सहा वाजून वीस मिनिटांनी, आपल्या निवेदनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री समीरा गुजर यांनी सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत मंचावर येऊन पोडियमचा ताबा घेतला आणि टाळ्यांच्या गजरात एका दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सर्वप्रथम लेखिकेच्या आई सौ. कल्पना जिन्सीवाले यांचे आशीर्वचन झाले, आपल्या लेकीच्या लहानपणीच्या काही आठवणी त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.
ग्रंथाली प्रकाशनच्या ट्रस्टी प्रा. लतिका भानुशाली ह्यांनी प्रकाशकाच्या भूमिकेतून लेखिकेला शुभेच्छा देऊन, चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथाली प्रकाशन संस्थेच्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीचा अत्यंत मोजक्या शब्दात आढावा घेतल्यावर वाचनसंस्कृती वाढीसाठी संस्थेद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री, नाट्य दिग्दर्शिका व अभिनेते सुमित राघवन ह्यांच्या पत्नी सौ. चिन्मयी सुमीत ह्यांनी आपल्या खास शैलीत कथासंग्रहातील सात कथांपैकी एक असलेल्या ‘एक रेडवाईन नातं’ ह्या कथेचे अल्प अभिवाचन केले आणि श्रोत्यांच्या उस्फुर्त टाळ्या मिळवल्या.
तद्नंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. सतीश राजवाडे ह्यांनी आपले नाट्य-चित्रपट सृष्टीतले आपले काही अनुभव कथन करून लेखिकेने (ज्योती अळवणी) मिसळपाव ह्या संस्थळा साठी घेतलेल्या आणि २२ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या “विंगेत गलबला - सतीश राजवाडे येत आहेत हो!!!” ह्या त्यांच्या मुलाखतीच्या वेळच्या काही आठवणींना उजाळा दिला.
सतीश राजवाडेंचे छोटेखानी भाषण संपण्याच्या सुमारास स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ह्या मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कलाकार द्वयीचे मंचावर आगमन झाले.
त्यानंतर खा. पूनम महाजन यांनी आपल्या छोटेखानी भाषणात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना ह्या कार्यक्रमासाठी येथे निमंत्रित करून वाढदिवसा निमित्त एक आगळीवेगळी भेट दिल्याबद्दल लेखिका आणि त्यांचे पती आ. श्री. पराग अळवणी ह्यांचे विशेष आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले.
दुसऱ्या एका कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी पूनम महाजन उपस्थितांची रजा घेऊन निघाल्यावर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘तो आणि ती’ या कथेतील एका प्रसंगावर उत्कृष्ठ असा एकपात्री प्रयोग सादर केला, त्यांच्या अभिनयाने आणि वक्तृत्व शैलीने उपस्थितांच्या टाळ्या तर वसूल केल्याच पण त्याचं बरोबर सर्वांना भावूकही केले.
चिन्मय मांडलेकरांच्या एकपात्री सादरीकरणानंतर उत्सवमूर्ती ज्योती अळवणी ह्यांनी आपला एक वाचक ते लेखिका ह्या प्रवासाविषयी माहिती देत, आपले भाऊ अभय, पती पराग, शिवानी आणि सानिया या दोन्ही कन्या, आई तसेच मैत्रीण वर्षा ह्यांना श्रेय देऊन आजच्या कार्यक्रमाचे संयोजन करणारे सोहम प्रतिष्ठानचे श्री. विनीत गोरे यांचे आभार मानले.
तद्नंतर कथासंग्रहातील एक असलेल्या ‘लालीची गोष्ट’ ह्या कथेवर आधारित एक शॉर्ट फिल्म भव्य स्क्रीनवर दाखवण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आणि त्यांच्या पत्नी रजनी वेलणकर, रिया सिद्धये अभिनित आणि अर्चना गोरे ह्यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेली हि शॉर्ट फिल्म सर्वांनाच प्रभावित करून गेली.
टाळ्यांच्या गजरात शॉर्ट फिल्मच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला.
‘लालीची गोष्ट’ ह्या शॉर्ट फिल्म नंतर वेळ झाली होती आजच्या मुख्य कार्यक्रमाची, म्हणजेच पुस्तकाच्या प्रकाशनाची. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. स्नेहलताताई देशमुख (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) ह्यांनी आपल्या विध्वत्तापूर्ण अध्यक्षीय भाषणानंतर अतिशय देखण्या कमळाच्या फुलासारख्या वेष्टनातून ‘कथा विविधा’ नावाचे पुस्तक बाहेर काढून ते प्रकाशित केले.

पुस्तक प्रकाशित झाल्यावर लेखिकेच्या दोन्ही कन्यांनी उपस्थितांचे आभार मानून आणि आईला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर विविध विषयांवरील कथांचा समावेश असलेल्या ह्या कथासंग्रहास ‘कथा विविधा’ असे अत्यंत समर्पक शीर्षक सुचवणारे लेखिकेचे पती आ. श्री. पराग अळवणी यांनी मोजक्या शब्दात सर्व मान्यवर, संयोजक, कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी पडद्यामागे राबणाऱ्या सर्वांचे, मिसळपाव ह्या संस्थळाचे व उपस्थितांचे आभार मानले.
श्री. पराग अळवणी यांच्या छोटेखानी भाषणानंतर अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांनी पुस्तका विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक सोहम प्रतिष्ठानचे श्री. विनीत गोरे यांचे निरोपाचे भाषण झाल्यावर एका नितांत सुंदर सोहळ्याची सांगता झाली.
एका शानदार कार्यक्रमासाठी निमंत्रित करून त्या कार्यक्रमाचा वृत्तांत लिहिण्याची संधी मला दिल्याबद्दल मी, लेखिका ज्योती अळवणी यांचा मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या पुढील लेखनास अनेकानेक शुभेच्छा. अशीच त्यांची आणि आपल्या इतर मिपाकर लेखक/लेखिकांची अनेक पुस्तके प्रकाशित होवोत आणि त्यांच्या प्रकाशन सोहळ्यात आपल्या सर्वांना सहभागी होण्याचे भाग्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त
वाह. ज्योति अळवणी यांचे मन
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
कुमार१, पद्मावति आणि ज्योतिजी आपले मनःपूर्वक आभार.
अभिनंदन ज्योती ताई
सुरेख समारंभाचे तेवढेच सुरेख
अरे वा... मस्त
ज्योती, अभिनंदन!
वा खुप छान वाटले. ज्योती
खूप अभिनंदन ज्योती ताई :)
अभिनंदन ज्योती ताई!!
ज्योति अळवणी यांचे अगत्याचे
अभिनंदन
सर्वांचेच मनापासून धन्यवाद.
अभिनंदन ज्योतीजी. पुढील
.
श्वेता२४, सिरुसेरि, पैजारबुवा, यशोधरा, जागु, विनिता००२, स्मिता
अरे वा ! ज्योति अळवणी यांचे
अरे वा ! अभिनंदन.
वाह वाह ज्योतिताई
_/\_
मन:पूर्वक
धन्यवाद तेजस आठवले, जव्हेरगंज
धन्यवाद तेजस आठवले, जव्हेरगंज
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनन्दन
डॉ सुहास म्हात्रे,तेजस आठवले,निओ,जव्हेरगंज,नाखु,जेडी, सविता००१
ज्योती ताईंचे अभिनंदन आणि
धन्यवाद शब्दबम्बाळ _/\_
छान वृत्तांत...