एका माणसाचा कट्टा - फुडोग्राफी २०१७ भेट
डिस्क्लेमर – जास्त फोटो नसल्याने जळजळ होण स्वाभाविक आहे पण आयोजन कर्त्यांच्या नियमात बसत नसल्याने फोटो काढता नाही आले. तरी सुद्धा मिपा चे नाव वापरून जाण्याची खुण म्हणून चार दोन फोटो काढले आहेत ते गोड मानून घ्या आणि जमल तर प्रदर्शनाला जाऊनही या.
मिपा, फोटोग्राफी आणि खाद्य अस आवडत त्रिकुट केदारभाऊंच्या पोस्ट मध्ये दिसलं आणि लागलीच फुडोग्राफी इव्हेंट फेबु कॅलेंडर मध्ये टाकून ठेवला.
एका उनाड दिवस म्हणून ठरवूनच आज सकाळी उठलो आणि इतर काम उरकून भल्या दुपारी बालगंधर्वच्या गेटवर जाऊन थडकलो.
सगळीकडे नुसती लगबग चालू होती, मनात आल मिपाचा सिक्रेट कट्टा होतोय कि काय ;-) समोर कळाल कि एका शुभारंभाचा प्रयोग चालू होता. त्याची जंगी तयारी बघून पुढे गेलो आणि तिकीट खिडकीच्या पलीकडे कला दालनाचा बोर्ड दिसला.
पहिल्या मजल्यावर अत्यंत आटोपशीर अस प्रदर्शन मांडल होत.
वीकांत असल्याने निवांत होतोच आत जाताच एक एक फोटो मन लावून बघायला सुरुवात केली आणि सुरु झाला एका अप्रतिम विश्वाचा प्रवास. फोटोग्राफीमधल थोडफार कळत असल्याने प्रत्येक फोटोमागे घेतलेली मेहनत दिसायला लागली. पदार्थाची मांडणी, लाईट, त्याला पूरक अशी पार्श्वभूमी, पदार्थाचा पोत, मूळ पदार्थाच्या बाजूला असलेली सामग्री अहाहा जन्नत ! थोड्या वेळापूर्वी नसलेली भूक जागृत झाल्याचा भास झाला आणि पृथ्वीवर आलो.
ऐन श्रावणात शाकाहारी मांसाहारी पदार्थ मांडीला मांडी लावून पंगतीत (बोर्डावर) बसलेले बघून मन भरून आल. अच्छे दिन अच्छे दिन ते हेच.
नावानुसार क्रम असल्याने पहिल्यांदा फोटो होते अंगद जोशी यांचे. जवळ जवळ एक भिंत व्यापून टाकणारा हा माणूस कमाल फोटो काढतो. फाईन डाइन कुझीनचे फोटो निव्वळ लाजवाब. रेलिंग असल्याने नाहीतर हातात घेऊन खाऊन टाकू कि काय असं वाटत होत. बर पदार्थ हि असे कि क्या कहने. चोकलेट, बिस्कीट, पुडिंग, अहाहा!
भरली वांगी आणि पातळ खोबर्याच्या कापाने केलेली सजावट, ठेल्यावरची पानांची आकर्षक मांडणी, चहाच्या पेल्यावर ठेवलेली भजी, कल्याण भेळची पाणीपुरी शेवपुरी, महादेव पॅटीसवाल्याचे कढई भरून गुलाबजाम इंडियाना ग्रील ची मिसळ, मटन धन्सक अशा विविध पदार्थांची लज्जत चाखत चाखत आणि आभासी पोट भरत पुढे आलो ते थेट केदार्भौंच्या फोटोसमोर. ज्जे बात मानल केदार भाऊ. हार्दिक अभिनंदन. हा घ्या फोटो.
काही फोटोंच्याच्या खाली मूळ छायाचित्रकारांची नाव लावण्याच काम चालू असल्याने नक्की केदार यांचे फोटो किती हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. आशा आहे आज काम पूर्ण झाल असेल.
पुढे फिरताना आयोजकांपैकी मंदार कोल्हापुरे या इसमाशी ओळख झाली. फ्लाय सोलो कंपनीचा हा मालक. हि कंपनी टी शर्ट बनवते. मूळ सिविल इंजिनिअर असून छंद म्हणून फोटोग्राफी करतो. लागलीच त्याचाही फोटो घेतला आणि आपसूक अजून काही फोटो काढायची परवानगी मिळवली आणि पुढे सरकलो.
आता जवळपास सर्व फोटो दोनदा पाहून झाल्याने मूळ खादाडीच्या उद्देशाकडे मोर्चा वळवला. आमच्याच गावचे मोदी पेढेवाल्यांच्या स्टॉलवर पेढ्यांची फ्री सॅम्पल चाखले आणि एक नवीनच पदार्थ बघितला. रातराणीची बर्फी. पण रातराणी आणि साप यांचा संबंध असल्याने हात आखडता घेतला. पुढे मालपाणी यांचे क्रीमरोल, बाकरवडी ठेवले होते पण खाण्याची इच्छा संपल्याने इलुसा टुकडा खाऊन माझी भेट संपवली.
जाता जाता प्रथेप्रमाणे कॅफे गुडलकला भेट दिली आणि दारातच हि गर्दी पाहून थबकलो. थोडे अपमान पदरात पाडून घेत चहा आणि बनमस्का मागवला आणि आमचेही चार आणे म्हणून फोटोग्राफी ट्राय केली.
जाता जाता वाटतंय कि मिपाकरांना अचानक कट्टा करण्यासाठी ब्येष्ट ठिकाण आहे. पुण्यातल्या मिपाकारांनी जरूर लाभ घ्यावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
छान लिहिलंय
धन्यवाद पैसा ताई
फक्त पहिला फोटो दिसत आहे. इतर
ओक्के
धन्यवाद..
फक्त पहिला फोटो दिसतोय.
मलाही.
कालच जाऊन आले प्रदर्शनाला.
अरे हो! केडीचा हा फोटो पाहिला
हुश्श . हे घ्या फोटो.
हे पण
हुश्श .
असे करून पहा...
छान.. इथे शेअर केल्याबद्दल
बालगंधर्वचा सोडुन एकही दिसत
धागा अप्रकाशित
तुम्ही फोटो इथे प्रतिसादात टाका.
धन्यवाद डॉकटर साहेब
अनुप देशमुख, पहिला फोटो 530
फक्त पहीला फोटो दिसतो
आधी फोटो दिसत होते.
फोटो दिसत नाहीयेत.
प्रतिसादातील फोटो,