✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एस्कीमो

व
वडगावकर यांनी
Sat, 02/25/2017 - 14:22  ·  लेख
लेख
काल दुपारची गोष्ट.... साधारण साडेतीन चार..... आळशीपणाची दुलई अंगावर पांघरून मस्तपैकी पुस्तक वाचत लोळत पडलो होतो.... आज आंघोळ होणार आहे की नाही?....कमरेवर दोन्ही हात ठेऊन मान तिरकी करत तिने विचारलं खरं म्हणजे तो प्रष्ण नव्हता.... ती धमकी होती..... काळ आंघोळ केली होती ना!...आज नाही केली तर नाही चालणार का? काल जेवण केलं होतं ना,मग आज केलं नाहीतर चालणार नाही का?...हातात टॉवेल कोंबत तिने विचारलं मी आता पुढच्या जन्मी एस्कीमोच होणार आहे....मी हसत म्हणालो काहो बाबा?...एक्सिमो कशाला?...छोटे नवाब का एंट्री के साथ सवाल.... आबे येडे....वहां पे ईत्ती ठंडी मे कोयी एक्सिमो नहाता होगा क्या ?... वा,बाबा मी पण तुमच्या बरोबर एक्सिमो होणार....त्याने लगेच आपली पण ऍडव्हान्स बुकींग करून टाकली.... एक्सिमो होऊन कायमस्वरूपी आंघोळीला कट मारायची आयडीया त्याला भयंकर आवडली असावी.... कपाळावर हात मारत ती हतबलपणे हसली....आणी ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटली.... तो शब्द मी लगेच ओळखला.... बेशरम.... आता, इतक्या वर्षात एव्हडा गेस तर येतो ना राव.... तिने दिलेलं अवॉर्ड मी लगेच त्याच्या बरोबर शेअर करून टाकलं.... फिफ्टी फिफ्टी...एक पर्सेंट भी कम नही... मनावरचं ओझं लगेच पन्नास टक्क्यांनी हलकं झालं.... आपण नेहमी ईतके सुखी आणी आनंदी का असतो ह्या रहस्याचा शोध लागला निर्लज्जम सदासुखी.... गालातल्या गालात हसत मी बाथरूम चं दार ढकललं.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3754 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

.

संजय क्षीरसागर
Sat, 02/25/2017 - 15:12 नवीन
Image removed. हा पर्याय निवडायचा राहीला वाटतं !
  • Log in or register to post comments

नसीहत के लिये शुक्रिया

वडगावकर
Sat, 02/25/2017 - 15:28 नवीन
नसीहत के लिये शुक्रिया जनाब,लेकिन ये बाल कथा के साथ साथ बाल के बाप की भी कथा है :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संजयजी,

अभ्या..
Sat, 02/25/2017 - 16:35 नवीन
संजयजी, ३.०१ ला जनातलं मनातलं ला तुमचा लेख तयार करत होतात, अजून आला नाही हो, शिवाय एचपीची सर्विस भंगार हो गॅसला. बीपीसीएल भारी, तुमच्या नावावर करा वाटल्यास एक एक्स्ट्रा टाकी. ;) . (हल्के घ्या बरं का)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

३.०१ ला जनातलं मनातलं ला

संजय पाटिल
Sat, 02/25/2017 - 17:49 नवीन
३.०१ ला जनातलं मनातलं ला तुमचा लेख तयार करत होतात, अजून आला नाही हो त्याचाच तर स्क्रीन शॉट आहे हा.. बाकी सर अजून विंडोज एक्स्पी वापरतात हे एक निरीक्षण नोंदवतो आणि खाली बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

त्यात काय पाटील, एक्सपी भारीय

अभ्या..
Sat, 02/25/2017 - 18:49 नवीन
त्यात काय पाटील, एक्सपी भारीय हो. , मी पण वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

सरांचा याहूमेल आयडीसुद्धा

सतिश गावडे
Sun, 02/26/2017 - 10:03 नवीन
सरांचा याहूमेल आयडीसुद्धा दिसतोय. बाय द वे, एक्सपी खरंच भारी होती. मात्र उद्योगांना सतत नविन काही आणत राहावं लागतं. एखादे उत्पादन कितीही चांगले असले आणि कितीही खपत असले तरी उद्योग त्यावरच थांबत नाहीत. हुंडाईची सँट्रो तुफान चालली तरीही त्यांनी "i xx" आणली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

+१

संजय पाटिल
Sun, 02/26/2017 - 21:46 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हुंडाईची सँट्रो तुफान चालली तरीही त्यांनी "i xx" आणली.

अभिजीत अवलिया
Mon, 02/27/2017 - 10:48 नवीन
ह्याबाबतीत एकदा एका वाहन निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते की जेव्हा एखाद्या गाडी बनवणाऱ्या कंपनीचे एखादे मॉडेल खूप जास्त लोकप्रिय होते तेव्हा त्याचा फटका त्या कंपनीच्या बाकीच्या मॉडेलच्या विक्रीला बसतो. त्यामुळे असे लोकप्रिय मॉडेल बऱ्याचदा बंद देखील करावे लागते कारण त्यामुळे इतर मॉडेल्सला बाजारात मागणी वाढते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गालातल्या गालात हसत मी बाथरूम

उगा काहितरीच
Sat, 02/25/2017 - 16:02 नवीन
गालातल्या गालात हसत मी बाथरूम चं दार ढकललं.....
हे महत्वाचं !
  • Log in or register to post comments

बाथरूम चं दार ढकललं....

वडगावकर
Sun, 02/26/2017 - 09:52 नवीन
मी जर बाथरूम चं दार ढकललं नसत तर दारासकट आत ढकलल्या गेलो असतो :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

हे असं खुसखुशीत, हलकंफुलकं

सतिश गावडे
Sun, 02/26/2017 - 10:04 नवीन
हे असं खुसखुशीत, हलकंफुलकं नसतं लिहायचं हो. मिपावरील लेखन कसं गंभीर आणि लोकांना अजिबात न कळणारं हवं.
  • Log in or register to post comments

फुल्टू,वासूनाका

वडगावकर
Sun, 02/26/2017 - 11:39 नवीन
ओहो....असंय का?....हे तर माहीतच नव्हतं राव आता उद्या पासून पायथॅगोरियन फिलॉसॉफी,थिऑसॉफी,क्वांटम मेकॅनिक्स या विषयावर लेख लिहायला चालू करतो.... मग समीक्षेच्या ठेकेदारांना करुद्या समीक्षण...मजा आयेगा खेल मे फुल्टू,भाऊ पाध्ये चा वासूनाकाचं करून टाकू :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ओहो....

अभिदेश
Tue, 02/28/2017 - 01:30 नवीन
तुम्ही आंघोळीचा उत्सव नाही केला त्यामुळे ही बालकथा वाटली असेल सं. क्षी. ना...
  • Log in or register to post comments

आंघोळीचा उत्सव?...ई का है भैय्या ?

वडगावकर
Tue, 02/28/2017 - 09:17 नवीन
बाबौ.... आंघोळीचा उत्सव?,ते काय असतं? म्हणजे लिरिल च्या जाहिराती मधल्या सारखं किंवा राम तेरी गंगा मैली मधल्या गंगा सारखं चौकात वगैरे उभं राहून आंघोळ करायची कि काय? :-) जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं,म्हणजे तसा प्रयत्न करून बघता येईल :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

काहि नाही हो..

संजय पाटिल
Tue, 02/28/2017 - 10:58 नवीन
सोडून ध्या... फार गहन विषय आहे तो! बायदवे खुसखुशीत लेख...
  • Log in or register to post comments

खरोखंर!

संजय क्षीरसागर
Tue, 02/28/2017 - 12:48 नवीन
`स्नानोत्सव : सामान्यांचा परमानंद' असा लेख लिहीणार होतो. पण म्हटलं जाऊं द्या पब्लिक आधीच रिंगोत्सव आणि भोजनोत्सवानं हैराणे त्यात अजून भर नको !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा