✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संक्षीप्तानुभव

इ
इनिगोय यांनी
Mon, 12/17/2012 - 09:30  ·  लेख
लेख
मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं. मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली. या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या (आणि लावणार असलेल्याही) इतर बल्लवांचेही आभार. :-D ... मिसळपावच्या दुनियेमध्ये आहेत काही सदस्य त्यांच्यापैकी एकांचे काही कळेना हे रहस्य न लागू दे टोटल तरी धागे तू काढावे गरज असो नसो भले प्रतिसादही द्यावे चर्चा होईल वादळी, परि अर्थ? .. शून्य. झाला नाही उपयोग तरी तू मात्र धन्य. म ची बाराखडी आहे विशेष प्रिय तुला सदा तुझा घोष सुरू - मी.. माझे.. मला. नसलेल्या मुद्यावर शब्दाळल्या भाषी एकुलत्या एका संदर्भावर लिही लिही लिहिशी बघता बघता जमून येते वाचकांची गर्दी ४०, ५०, ६० प्रतिसाद.. होत राहते भरती धाग्यावरती आल्यावर चालवायची शाब्दिक कात्री एकेकट्या सदस्याशी मात्र करायची असते मैत्री तुझ्या मताविना वेगळे असूच नये काही दरवेळी हाच हट्ट..? असं बरं नाही. ऎकवले कोणी चार शब्द की खट्टू होते मन आपलंच असं का होतं हे बघायचं नाही पण गाणं, कविता, अध्यात्म, असो कोणताही 'विषय' सग्गळ्यातलं सग्गळं तुलाच कळतं. खरंच का रे ...असंय?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कविता
विडंबन

प्रतिक्रिया द्या
6194 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

वा सहीच !!

अक्षया
Mon, 12/17/2012 - 09:35 नवीन
अगदी मनातले लिहीलेत. :)
  • Log in or register to post comments

लाखातले एक

लीलाधर
Mon, 12/17/2012 - 09:41 नवीन
मस्तच की इनिगोय लाखातले एक मांडले आहे बरं का :)
  • Log in or register to post comments

शिर साष्टांग दंडवत.

स्पा
Mon, 12/17/2012 - 09:51 नवीन
=)) =)) शिर साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments

=))

मूकवाचक
Mon, 12/17/2012 - 10:24 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

माननीय अक्षया / मा. चचा / मा. स्पाऊ / मा. मूकवाचक...

मोदक
Mon, 12/17/2012 - 11:28 नवीन
माननीय अक्षया / मा. चचा / मा. स्पाऊ / मा. मूकवाचक... मज पामराला याबद्दल अधिक माहिती देता का प्लीज? व्यनी केला तरी चालेल.
  • Log in or register to post comments

आधी 'पामर' या शब्दाची

कवितानागेश
Mon, 12/17/2012 - 12:01 नवीन
आधी 'पामर' या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ सांग बरे लब्बाडा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+ 1 टू लीमाउ

लीलाधर
Mon, 12/17/2012 - 18:40 नवीन
+ 1 100% सहमत लीमाउशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हम्म

मूकवाचक
Mon, 12/17/2012 - 12:18 नवीन
समझ समझ के समझ को समझो, समझ समझना भी एक समझ है। समझ समझ के जो न समझे, मेरी समझ में वो नासमझ है।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१

अक्षया
Mon, 12/17/2012 - 12:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

आपकी नजरोने समझा व्यनीके

सस्नेह
Mon, 12/17/2012 - 15:41 नवीन
आपकी नजरोने समझा व्यनीके काबिल मुझे सब प्रतिसादको ठहर जा मिल गया कातिल मुझे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हाण्ण तेच्या मारी

बॅटमॅन
Mon, 12/17/2012 - 12:40 नवीन
हाण्ण तेच्या मारी =))
  • Log in or register to post comments

हं!

स्पंदना
Mon, 12/17/2012 - 12:54 नवीन
हं! एकुण ऑरगॅझॅमिक लेखन दिसतय.
  • Log in or register to post comments

कवितेविषयी नंतर..

गवि
Mon, 12/17/2012 - 13:03 नवीन
कवितेविषयी नंतर.. भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे ते आधी कोणीतरी सांगा आणि अडाण्याचा दुवा घ्या.. (जालीय दुवा नव्हे.. )
  • Log in or register to post comments

भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय

कवितानागेश
Mon, 12/17/2012 - 13:17 नवीन
भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे> उपरोक्त माहितीसाठी कृपया 'संपादक मंडळ' या आयडीला व्यनि करा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एक कॉपी

पैसा
Mon, 12/17/2012 - 18:13 नवीन
मला पण पाठवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

येक कॉपी हिकडंपन पाट्वा बरं

बॅटमॅन
Mon, 12/17/2012 - 18:17 नवीन
येक कॉपी हिकडंपन पाट्वा बरं का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते कोडाईकनालचे भूछत्र कवितेबरोबर बाय डिफॉल्ट चिकटते.

मोदक
Mon, 12/17/2012 - 20:04 नवीन
ते कोडाईकनालचे भूछत्र कवितेबरोबर बाय डिफॉल्ट चिकटते. या विषयी जास्ती बोललो तर अवांतर होवून आमच्या आधीच्या विडंबनाच्या आठवणी निघतील म्हणून इतकेच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कवितेबरोबर नव्हे, जिलबीबरोबर्

सस्नेह
Mon, 12/17/2012 - 21:59 नवीन
कवितेबरोबर नव्हे, जिलबीबरोबर्! चिकट असते ना जिलबी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

कुत्र्याची छत्री...

एस
Tue, 12/18/2012 - 23:15 नवीन
भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे> उपरोक्त माहितीसाठी कृपया 'संपादक मंडळ' या आयडीला व्यनि करा.
वेल, ही खरंच काय भानगड आहे बरं? कृपया कुणीतरी मला व्यनि करून सांगा... :P व्यनि पाठवणार्‍याचा आयडी गुप्त ठेवला जाईल.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

नक्की कारण माहिती नाही...

मोदक
Tue, 12/18/2012 - 23:22 नवीन
नक्की कारण माहिती नाही... पण धाग्याची वर्गवारी करताना "काव्य" विभाग निवडलाकी "भूछत्र आणि कोडाईकॅनाल" आपोआप चिकटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अगगग.

अभ्या..
Mon, 12/17/2012 - 13:16 नवीन
लैच बारीक निरिक्षण बाबौ. नेक्स्ट ट ट टSSSSSSS ?
  • Log in or register to post comments

बेक्कार सहमत.

गणपा
Mon, 12/17/2012 - 14:45 नवीन
बेक्कार सहमत. :)
  • Log in or register to post comments

आगगाग्गा....याला म्हणतात

Dhananjay Borgaonkar
Mon, 12/17/2012 - 15:47 नवीन
आगगाग्गा....याला म्हणतात शालजोडीले... लैच भारी लिवलय...___/\___
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/17/2012 - 15:51 नवीन
और भी आने दो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अभ्यास लै दांडगाय ब्वा तुमचा.

किसन शिंदे
Mon, 12/17/2012 - 19:26 नवीन
अभ्यास लै दांडगाय ब्वा तुमचा. ;)
  • Log in or register to post comments

लै भारी लिहिलंय, ते

५० फक्त
Tue, 12/18/2012 - 22:54 नवीन
लै भारी लिहिलंय, ते इंग्रजीमध्ये असतंय ना एसे रायटिंग अन प्रेसे रायटिंग तसलं काही.
  • Log in or register to post comments

अरेच्चा.... हे चावायचं आपलं

प्यारे१
Tue, 12/18/2012 - 23:08 नवीन
अरेच्चा.... हे चावायचं आपलं वाचायचं राहूनच गेलं. ह्याची बॅलन्स शीट बनवायला एखाद्या 'सी ए' कडं च जावं लागणार की वो इनिगोय! कुनी हाय काय 'वळकीचं'? ;)
  • Log in or register to post comments

:)

इष्टुर फाकडा
Tue, 12/18/2012 - 23:09 नवीन
काय प्रतिसाद पाडावा समजेना झालंय :) वर्गवारीत सामील होण्याची भीती आहे ;)
  • Log in or register to post comments

एक तर वर्गात या नाहीतर वारीत,

५० फक्त
Tue, 12/18/2012 - 23:26 नवीन
एक तर वर्गात या नाहीतर वारीत, उगा चौरस्त्यावर उभं नका राहु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

मंग बोला,

इष्टुर फाकडा
Wed, 12/19/2012 - 15:09 नवीन
पुंडलिक वरदे हारीठ्ठल, स्री द्य्नादेव तुकाराम... फंडरीनात म्हाराज कि जय, ज्ञानेस्वर म्हाराज कि जय, झालंस्तर पिंपळपार म्हाराज कि जय..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चांगभलं

अनिल तापकीर
गुरुवार, 12/20/2012 - 17:19 नवीन
चांगभलं
  • Log in or register to post comments

आमचेही चार आणे.

अन्या दातार
गुरुवार, 12/20/2012 - 21:49 नवीन
आमचेही चार आणे. नसलेल्या मुद्द्यावर, शब्दाळल्या हाती एकल्या संदर्भावर लिहित तू राही अंती येशी कोपयाशी, दुखावेल मन पायाखाली घसरलेले वाळूचे अंगण धाग्यावर जमून येईल वाचकांची गर्दी मंद स्मित करतील कवितेचे दर्दी
  • Log in or register to post comments

_/\_

स्मिता चौगुले
गुरुवार, 05/09/2013 - 16:57 नवीन
अक्शी शालजोडितन कि व ...:)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त!

यशोधरा
Fri, 05/10/2013 - 05:29 नवीन
इनि :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा