छोटीसी बात..
..न जाने क्यूं.. होता है ये जिंदगी के साथ..
अचानक ये मन.. किसीके जाने के बाद.. करे फिर उसीकी याद.. छोटी छोटीसी बात..
तिचं आवडतं गाणं... आणि "काय जुनी गाणी ऐकतेस..?", असं म्हणत म्हणत का होईना पण तिच्या नादाने ऐकून नादावलेला मी.
लताचे सूर समोरच्या समुद्रासारखे.. पुन्हापुन्हा लाटा बनून आपटणारे..
किसीके जाने के बाद..
करे फिर उसीकी याद..
पण मग एकदम तो सगळा काळ उलटून अंगावर येतोय असं वाटलं.. समोर आत्ता खळखळणारी छोटीशी लाट एकदम चाळीस फुटाची बनून अंगावर यावी तसा..
गाणं एफएमवर लागलेलं असतं तर बंद करुन ती लाट थोपवता आली असती.. पण मनातच गुणगुण वाजणार्या गाण्याचं काय? बंद कसं करु? गुणगुणीतून एकदम भण्ण भण्ण असं व्हायला लागलं तर?
जिवाच्या आकांताने उठल्यासारखा वाळूतून उठलो.. माणसांच्या वस्तीत पोचलो असतो की सुटलो असतो.. वाळूत पळताही येत नाही.. मग पायात पेटके येतील एवढ्या जोराने पाय रेटत वाळू पार केली आणि डांबरी रस्त्यावर आलो.. डांबरी रस्ता सेफ.. नो मेमरीज..नो लाटाबिटा..
शहाळेवाला..
लक्ष दुसरीकडे घालवायचंय ना? मग हे करुन बघू..
"ए दोस्त.. मलईवाला दे रे एक.. बडा दे ना भाई.. कैसा छोटा निकालता है रे देखके.."
....
ती माझी का झाली नाही? काही अघटित घडलं होतं? की सगळं छान चाललेलं असताना कोणी येऊन सांडलं सगळं?
तसं काही नव्हतंच.. मी तिला कधी विचारलंच नाही..
मी गांडू होतो? तसंही वाटत नाही..
कदाचित माझंच नशीब इतकं वाईट होतं की मला तिच्याशिवाय राहणं इतकं नकोसं होईल अशी जाणीव होईहोईपर्यंत तिचं लग्न आणि पोरंही होऊन गेली...
मी फार हळूहळू प्रेमात पडलो काय तिच्या? स्लो पॉयझन?? आणि मधल्या काळात मला त्याची तीव्र जाणीव कधीच झाली नाही? मी माझ्या मनात तिला घोळवत राहून मनातच अफेअर करत राहिलो? आणि प्रत्यक्षातल्या तिला दूरच ठेवली?
ती तर मजेत आहे तिच्या घरी.. तिचा नवरा आणि पोरं..दोन दोन..
मग ठीकच आहे ना.. ठीक आहे तर मग आत्ता इतल्या वर्षांनंतर ही धगधग कसली.. आता का अनावर उलटीसारखं वर येतंय सगळं? काळाने कमी होण्याऐवजी चटका वाढत कसा जातोय? ती हवीच.. काही झालं तरी हवी हा कसला भलता रेटा मनाचा..
काही कळत नाही.. कसलाच तर्क चालत नाही.. आणि आता काय करु या विचाराने डोक्यातला मेंदू..
शहाळ्यात सर्रकन सुरी आणि मलई बळ्ळकन बाहेर.. शी... मेंदू..बाहेर येईल आता विचार करुन...
नको. शहाळं नको..
"नही चाहिये भाई... बराबर नही है तुम्हारा नारियल.. सडा है साला.. "
"अर्रे..मैं खराब है बोला तो खराब है.. कस्टमर मैं है के तू?? .. तुम्हारा पैसा ले लो ना तुम.."
आता पटपट लॉजवर जायला पाहिजे.. एक गोळी जिभेवर चघळली की लॉजपर्यंत पोचेपर्यंत ती लाट विरुन जाईल..
खिशात गोळी नाही.. संपल्याहेत गोळ्या आणि नवीन स्ट्रिप घ्यायला विसरलो कसा च्यायला??
एकावेळी एकच स्ट्रिप.. तीही प्रिस्क्रिप्शनशिवाय इथे मिळणार नाही.. प्रिस्क्रिप्शन लॉजवर.. व्हॉट द फक.. ते खिशात ठेवण्याइतका पण मी भानावर नसतो..
नेहमीच्या सन मेडिकोपर्यंत जायला पाहिजे.. तो प्रिस्क्रिप्शनशिवाय एक स्ट्रिप देईल..अॅटलीस्ट एक गोळी सुट्टी.. पण त्यासाठी पण लॉजच्या अर्ध्या वाटेपर्यंत जायला पाहिजे.. विनागोळी..
मग ती लाट?? ... लाट जाणार आहे.. डॉक्टरांनी स्वतःला समजावायला सांगितलंय.. स्वयंसूचना..
ती फक्त भीतीची लाट आहे..ती जाईल.. तिला महत्त्व द्यायचं नाहीये..
आणि आता तर डांबरी रस्ता आहे.. वाळूपण नाही..पटकन पोचता येईल..एकदा गोळ्या मिळाल्या की झालं. लॉजचा एक जिना.. की मग बस्स.. खोली लपेटून झोपून टाकू.. झोप झाली की होईल रिसेट..
..लॉजपर्यंत पाय पुढे पुढे टाकत राहायला पाहिजे.. पावलं मोजता येतील हवीतर...
........................
(मे बी कंटिन्यूड..)
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
भावना पोहोचल्या.
शहारा आला!
खरच ,'टु बी कंटिन्यूड' करा
पुढचा भाग टाकाच...
+ १
ठीक आहे तर मग आत्ता इतल्या
मस्त
वाचतोय.
प्रेमकथा
लिखान आवडले.. आवडल्याचे कारण
झायरात !!!
झायरात कसली वो....
लिहा ओ लिहा तुम्ही, उगा
बदल
लिहा गवि. चांगलं झालय हे
अशी कुठली गोळी असली तर मला
पुढे?
छोटीसी बात
_/\_ गवि, हॅट्स ऑफ. याचा
...नकोच
हम्म!
ते डोक्याला की..
अशी अवस्था कुणाची होऊ नये
अस्वस्थ करणारे लिखाण.
प्रचंड अस्वस्थ करणारे लिखाण...
भावना....
लै भारी..
कथा आवडली...
सुखान्त?
+१००
ती लग्न करून सुखात आहे, ती
व्वा .. झकास अॅब्स्ट्रक्ट !