बाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
16 Jul 2017 - 1:27 am

आमचे मोठे चिरंजीव कागदोपत्री इंजिनियर झाले (कागदोपत्री बरेच काही होता येते पण .....कागदोपत्री बरेच काही होणे, ह ह्या धाग्याचा विषय नाही....) म्हणून आमच्या बाबांकडे गेलो.शनिवार असल्याने बाबांच्या मठात बरीच गर्दी होती,त्यात चिलिमवाले बाबा, कटोरीवाले बाबा, खापरवाले बाबा आणि जपमाळ वाले बाबा पण होतेच.

आज बाबांच्या मठांत इतकी गर्दी पाहून मी जरा हबकलोच.पण मी पाय पळता पाय काढण्यापूर्वीच बाबांची नजर आमच्याकडे वळाली आणि बाबा म्हणाले.....

बाबा : या मुवि.काय काम काढलेत? तसे तुम्ही आजकाल कामाशिवाय आमच्याकडे पण येत नाही.आज मूद्दाम का आलात?

आम्ही : तसे काही विशेष नाही.आपल्या कृपेने मुलगा इंजिनियर झाला. म्हणून आलो होतो.

बाबा : आमची कसली कृपा? त्याने अभ्यास केला, तो पास झाला.

आम्ही : तुम्ही असे म्हणता.पण आम्हाला अनुभव तर वेगळाच येतो. कुणी जर आम्हाला योग्य त्या ठिकाणी मदत केली तर दोघांवर खापर फुटते.

बाबा : आले आमच्या लक्षांत. मुळात ही लढाई आस्तिक आणि नास्तिक ह्यांच्या विरोधातली आहे.

आम्ही : म्हणजे?

बाबा : तुमच्या भाषेत पुणेकर आणि अपुणेकर.....

आम्ही : नीट समजावून सांगाल तर उत्तम...

बाबा : ह्या जगांत ज्या अनेक जाती आहेत त्यात, पुणेकर आणि अपुणेकर, ह्या पण येतात.आमच्या भाषेत त्यांना आस्तिक आणि नास्तिक असे म्हणतात.

प्रत्येक व्यक्ती जन्माला येतांना न्युट्रल असते पण पुढे ती ती व्यक्ती तिच्या तिच्या जाणीवे नुसार अस्तिक किंवा नास्तिक होते.

एखाद्या व्यक्तीची स्तुती, तिची वर्तमान योग्यता न पाहता करणे, म्हणजे आस्तिकता.

आणि कालाप्रमाणे मत बदलणारा आणि योग्य काय? अयोग्य काय? हे मत स्वतःचे स्वतः ठरवणारा म्हणजे नास्तिक.

आस्तिकांना, काळाचे, स्थानाचे भान नसते. मग त्यात पुणे असो किंवा मुंबई.(पुर्वी मुंबई ही फक्त तटबंदी पुरतीच होती मग पुढे त्यात कुर्ला, बांदरा आले आणि सध्या कागदोपत्री मुलुंड-दहिसर-बोरीवली पर्यंत.....पण जिथपर्यंत लोकल जाते तिथपर्यंत मुंबै, हे सर्वसामान्यांचे मत, त्यामुळे सध्या मुंबई = डहाणू, कर्जत, कसारा आणि पनवेल.)

आस्तिकांच्या मते मुंबै = बोरीवली,मुलुंड आणि पुणे = काही पेठा.

पण आज खरोखरच तसे आहे का?

चिलिमवाले बाबा : सॉरी हां. मी मध्येच बोलतोय. असो, सगळे आयुष्य मी कपड्याविना काढले. वेळेवर २ घास कधीतरी मिळायचे, पण मी देवाघरी जाताच, आमच्या नावाने दक्षिणा मागायला सुरुवात.आमचे तरी ठीक आहे पण ह्या कटोरीवाल्या आणि जपमाळ वाल्या बाबांच्या बाबतीत काही विचारू नका.

कटोरीवाले बाबा : खरी गोष्ट....

जपमाळवाले बाबा ; अहो, आयुष्यभर मी "एकांतवासात जपमाळ ओढा" म्हणूम सांगीतले तर, आमची लोकं, मोठमोठ्याने वेळ-काळ-स्थान न बघता. जोरजोरात नामे घेत असतात.

खापरवाले बाबा : अहो, आम्ही पण भजने केली.पण त्यातला मतितार्थ कोणाच्याच लक्षांत आला नाही.

बाबा : कारण एकच, लोकांना आस्तिकता आवडते.शिवाय आस्तिकांचा कंपू फार लवकर तयार होतो. कुणी २-४ जणांनी दगड उचलले की, भले-भले धोंडे उचलतातच. ही मानवी स्वाभाविकता आहे.

आम्ही ; मग आमच्या सारख्या नास्तिकांनी काय करावे?

बाबा : नंबर एक, नास्तिक हा एकटाच असतो.त्याला कंपू नसतो पण, कुठलाही नास्तिक दुसर्‍या नास्तिकाला दोष देत नाही.आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे, अजया, सगा, सूड, अभिजित अवलिया, सुखी, कलंत्री, कपिल मुनी, औरंगजेब, पिरा ताई, पैजार बुवा, त्रिवेणी आणि मितान हे त्या पैकीच.हे जोपर्यंत विरोध करत नाहीत तोपर्यंत आस्तिकांनी कितीही गरळ ओकली तरी बिंधास्त रहा.

आणि.

नम्बर २ : आस्तिक फक्त बोंबलतात...पण पुरावे दिले किंवा मागीतले की, मग शेपूट घालतात. (बादवे, "शेपूट घालणे' हा वाक्प्रचार आहे.) मग ती तिकीटे असोत किंवा लिंका. ते तिकीटे किंवा लिंका मागतील पण स्वतः कष्ट करून शोधणार नाहीत. साधे पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड इथपर्यंत जायची तिकिटे द्यायची असतील तरी डोंबोली ते कोथरूड बस प्रवास परत करावा अशी अव्यावहारीक अपेक्षा पण धरतील.म्हण्जे १५ रुपये आणि साधारण २ तासाच्या (बसची वाट बघण्याच्या वेळेसकट) प्रवासासाठी २०० रु. आणि २ दिवस खर्च डोंबोलीकरांनी करावा. आस्तिकांच्या अपेक्षा ह्या अशा असतात.

तस्मात तुम्ही ज्यांना पुणेकर म्हणता, त्यांना आम्ही आस्तिक असे म्हणतो.आस्तिक फक्त एकांगीच विचार करतात.त्यांना फाट्यावर मारणेच उत्तम......

--------------

ह्यापुढे आस्तिकांच्या प्रतिसादांना उत्तरे न देण्यात आम्ही आमचा वेळ जास्त खर्च करणार नाही.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पहिल्या धारेची वाट्ट आज, सावरा स्वताला :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2017 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

मनिमौ's picture

16 Jul 2017 - 1:23 pm | मनिमौ

पुणेकरांबद्दल आपुलकी वाढतच चाललीये तुमची.

कापूसकोन्ड्या's picture

16 Jul 2017 - 1:55 pm | कापूसकोन्ड्या

बाटगा जास्त कट्टर असतो म्हणतात

गॅरी ट्रुमन's picture

16 Jul 2017 - 2:22 pm | गॅरी ट्रुमन

गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे.

(जन्माने नास्तिक, सध्या राहायलाही नास्तिकांच्याच शहरात पण आस्तिकांच्या शहरात आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा काळ राहिलेला आणि त्या शहराविषयी अगदी जवळचे ऋणानुबंध असलेला) ट्रुमन

मोदक's picture

17 Jul 2017 - 1:45 am | मोदक

गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे.

सहमत.

खास धागा टाकून मात्र कुणाचेही नांव न घेता स्कोअर सेटल करण्याची कसरत करण्याची नक्की का गरज भासली ते कळाले नाही.

(इतर कोणत्या धाग्यावर धुळवड झाली असल्यास कोणीतरी प्लीज लिंक व्यनी केली तरी चालेल - नक्की काय मुद्दे होते / मुद्दे होते का - हे तरी कळेल.)

असो, आपण एखाद्या विषयावर जाहीरपणे विशिष्ट भूमीका घेतली की त्या भूमीकेचे विरोधक असू शकतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे - हा एक सल्ला.

(वैयक्तिक मत आहे - चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे)

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 3:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या मताशी सहमत! सेटलिंग करण्यासाठी धागा हा प्रकार पटला नाही. त्या मूळ धाग्यावरही ३-४ वेळा पुरावा मागण्यात आला, इतका पाठपुरावा करण्यासारखा विषय वाटलं नाही.

उपेक्षित's picture

17 Jul 2017 - 3:39 pm | उपेक्षित

सहमत ग्यारी जी तुमच्याशी.

खरे तर प्रतिसाद देणार नव्हतो पण अगदीच राहवले नाही म्हणून देतोय, मिसळपाव वर जरी मी नवीन वाटत असलो तरी गेली ४/५ वर्ष वाचनमात्र आहे त्यामुळे सर्व सदस्यांना तसे जाणून आहे.

गेल्या काही दिवसातील मूवी काकांचे लेखन/ मते इतकी बालीशपणाकदे झुकता आहेत कि मला खरच आश्चर्य वाटत आहे कि पूर्वीचे मूवी काका ह्येच का म्हणून.
GST धाग्यावर म्हात्रे सरांच्या विरोधात मी स्वतः तसेच इतरही काही जणांनी मते नोंदविली होती पण त्याला त्यांनी दिलेली संयमी उत्तरे आणि काही ठिकाणी केलेले दुर्लक्ष्य (जे बरोबर होते) त्याला तोड नव्हती. ते काही असे लगेच वयक्तिक पातळीवर घसरले नाहीत कि उगाच आकांतांडव केला नाही.

कसय मूवी काका नुसते वय जास्त असून भागात नाही थोडा परिपक्वपणा सुद्धा असायला लागतो, खरे तर हे तुम्हाला सांगायला मी कोणी मोठा लागून नाही गेलेलो आणि माझी तितकी लायकी पण नाही पण माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाची अशी वैचारिक अधिगती निदान मी तरी गप्प बसून पाहू नाही शकत. :(

असो आता तुमच्या या वागण्याचा राग तर नाहीच येत पण आता कीव वाटू लागली आहे आणि चेहऱ्यावर खिन्नता पसरली आहे कारण प्रतिक्रिया वाचून पहा सगळ्यांच्या १दा काका कि तुम्ही काय गमवत चालला आहात.

तुमच्या विषयी पुर्वी असलेल्या आदरामुळे इतके लिहिले आहे समजून घ्याल हि आशा.

ग्यारी ट्रुमन म्हणजे गिरीष खरे का हो?

गॅरी ट्रुमन's picture

16 Jul 2017 - 6:45 pm | गॅरी ट्रुमन

ग्यारी ट्रुमन म्हणजे गिरीष खरे का हो?

हो.

रिकामटेकड्यांच्या क्लोज्ड फेसबुक ग्रुपमध्ये माझ्याविषयी ऐकलेत का? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2017 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे,...

नाही, नाही. आम्ही नास्तिक नाही, आम्ही अज्ञेयवादी :) ;)

तुम्ही किमान लिस्ट मध्येतरी आहात.....

राहू द्या हो म्हात्रेकाका, तंबूवाल्या हकिमाकडे बच्चन, धर्मेंद्र, हेमा, जॉनी वाकरपासून बिंदू, हेलन पर्यंत सगळ्यांसोबत फोटो असतात, बच्चन कधी सांगत बसतो का मी ब्रीच कॅण्डीत उपचार केले म्हणून?

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 3:02 pm | हतोळकरांचा प्रसाद

:D :D

पिलीयन रायडर's picture

17 Jul 2017 - 12:11 am | पिलीयन रायडर

हे नक्की काय आहे? संदर्भ लागला नाही. मी कुठुन आले मध्येच त्या लिस्टीत?

रुपी's picture

17 Jul 2017 - 3:05 am | रुपी

गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे. >>

हे माझेही मत आहे. माझ्या सात वर्षांच्या सदस्यकाळात ही माझी पहिलीच वेळ असेल एखाद्या न पटलेल्या गोष्टीबद्दल लिहायची. पण मु.वि.काका एकंदरीतच सध्या जे काही लेखन (लेख आणि प्रतिसाद) करत आहेत ते मुळीच पटले नाहीये. कुणा सदस्यांशी मतभेद, वाद असतील तर ख.व., व्य.नि. असे पर्याय असताना कुठल्याही धाग्यावर काहीच्या काही प्रतिसाद देऊन धाग्यांचे ख.फ. करणं मुळीच आवडलं नाहीये. धागा कॅनडाचा असो की चीनचा, बाइकचा असो की क्रिकेटचा तेच तेच वाचायचा कंटाळा आलाय. याआधीही हे मत देणार होते, पण उगीच स्वतः त्यात सामील होणं पटत नव्हतं. त्यामुळे हा धागा काढून एका अर्थी बरंच केलं.

मु.वि.काका, तुमचे आस्तिक-नास्तिक, पुणेकर-अपुणेकर वाद ज्यांच्याशी असतील त्यांच्याशी घाला, पण माझ्यासारखे यात कुठेच नसलेले मिपाकर आणि मिपाकर नसलेले वाचक आता कंटाळलेत.

आता आपणच एकंदरीत मिपावरचा वावर कमी करावा असं वाटायला लागलं आहे.

विशुमित's picture

17 Jul 2017 - 12:44 pm | विशुमित

<<<गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे. >>
==> शेती व्यवसायात उतरल्यामुळे असे झाले असेल का कदाचित?

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे..?

विशुमित's picture

17 Jul 2017 - 2:00 pm | विशुमित

काही महिन्यापासून काकांनी शेती चालू केली आणि त्याच बरोबर त्यांचे लेखन ही ह्या काळामध्ये खालावत गेले. या दोहींचा काही कार्यकारणभाव असावा का ही शंका वाटली.

तुमच्या अफाट लॉजिकमुळे तुमच्याप्रती आदर वाढतच चालला आहे.

वाढदिवसाच्या धरणभर शुभेच्छा.

विशुमित's picture

17 Jul 2017 - 2:30 pm | विशुमित

आदर तसाच ब्रकरार ठेवा.

आणि धरणातील पाणी फिल्टर करून प्या. दादा मागच्या आठवड्यात पिंची ला येऊन गेल्यात.

सोळाव्याला आमंत्रण नाही पोहचलं आम्हाला. असो...!!

जेम्स वांड's picture

17 Jul 2017 - 8:12 am | जेम्स वांड

आता आपणच एकंदरीत मिपावरचा वावर कमी करावा असं वाटायला लागलं आहे.

मुवि मोड ऑन

तुमचे आमचे जुने ऋणानुबंध दिसतात, तुम्हाला वाद घालायला वेळ असेल, तुम्हाला उत्तर द्यायला मात्र माझ्याकडे वेळ नाही, ह्यापुढे तुम्हाला कुठल्याच धाग्यावर उत्तर देणार नाही

मुवि मोड ऑफ

गामा पैलवान's picture

17 Jul 2017 - 8:09 pm | गामा पैलवान

मुवि,

आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे, अजया, सगा, सूड, अभिजित अवलिया, सुखी, कलंत्री, कपिल मुनी, औरंगजेब, पिरा ताई, पैजार बुवा, त्रिवेणी आणि मितान हे त्या पैकीच.

अतृप्तात्मा नास्तिक कसे? ते तर पुरोहित आहेत ना?

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

18 Jul 2017 - 12:49 am | कपिलमुनी

फाट्यावर मारा ओ सगळ्यांना !
कुठलेसे झेंडे फिरवत हागणदारी पसरवण्यापेक्षा बरेच चांगले लिहिता , बाकी विशिष्ट कंपूच्या रडारवर आलात म्हणून शुभेच्छा !!

जेम्स वांड's picture

18 Jul 2017 - 8:09 am | जेम्स वांड

त्याला हागायला जागा न मिळाल्यामुळे झालेलं बद्धकोष्ठ 'कुठलेसे झेंडे फिरवत हागणदारी पसरवण्यापेक्षा बरेच चांगले लिहिता' म्हणून मांडता आहात काय?

जे चूक त्याचं समर्थन तरी नको, पुण्याला शिव्या देऊन, अक्षरशः वडाची साल पिंपळाला लावत दर धाग्यावर मुंबई पुणे (चुकलो डोंबिवली पुणे) असलं दळभद्री तर्कट आणून काय बरं लिहितात हो हे मुवि तुमचे? , शेती ते शिक्षण अन आयुष्य ते धर्म फक्त आपण काय केलं त्याची जाहिरात करणे, कायम नकारात्मक बोलणे, काही नवीन करू इच्छित असलेल्या लोकांना हतोत्सहित करणे बरे लेखन आहे? सगळाच मूर्खपणा.

फाट्यावर मारा ओ सगळ्यांना !
कुठलेसे झेंडे फिरवत हागणदारी पसरवण्यापेक्षा बरेच चांगले लिहिता , बाकी विशिष्ट कंपूच्या रडारवर आलात म्हणून शुभेच्छा !!

लोकं झेंडे फिरवत असतील तर तुम्ही (पांढर्‍या) टोप्या घालता ते सोयीस्कर विसरलात का..? इथे मिपाकरांच्या लेखनाला सरसकट हागणदारी म्हणताना तुम्ही काय मोगर्‍याच्या बागा फुलवल्या ते बोला.

मूर्खशिरोमणी नेत्याचे अनुयायी तसेच असतात हे सिद्ध करण्याचा चंग बांधला असेल तर चालूद्या. तुमचे केजरीवाल सध्या कुठे तोंड लपवून बसले आहेत..?

जेम्स वांड's picture

18 Jul 2017 - 8:02 am | जेम्स वांड

आमचे मोदीजी मनरेगा वर भारी बोलले होते संसदेत, त्यांचे म्हणणे होते की युपीए सरकारच्या राजकीय पराभवाचे स्मारक म्हणून ते मनरेगा सुरु ठेवण्यावर ठाम होते, राजकीय पराभव कारण स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतरही खड्डे खोदायला अन चर काढायचा रोजगार लोकांना द्यावा लागतोय हे.

मुवि, तुमचा हा धागा आम्ही तसाच रोज ऐक (किमान) पिंक प्रतिसाद टाकून जिवंत ठेवणार आहोत. वर्षोनुवर्षे मिपावर आदर मिळवूनही बालिशपणा करणार एक व्यक्ती म्हणून तुमचा उदोउदो झालाच पाहिजे.

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 9:26 am | सुबोध खरे

मुनी आणि जेम्स वांड
एक विनंती आहे. बीभत्स भाषा नसेल तर बरे.
टीका करायचा तुमचा अधिकार आहेच. पण भाषा सभ्य असावी हि एक विनंती आहे.
पटत असेल तर पहा.

जेम्स वांड's picture

18 Jul 2017 - 10:15 am | जेम्स वांड

मी त्याच भाषेत उत्तर दिले ज्या भाषेत प्रतिसाद आला होता. तरीही तुमचा आदेश शिरसावंद्य मानून मी ह्यापुढे भाषा संयत ठेवायचे कबूल करतो.

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 10:35 am | सुबोध खरे

विनंती दोघांना ( आणि सर्वानाच) आहे.

पिलीयन रायडर's picture

18 Jul 2017 - 6:43 pm | पिलीयन रायडर

इतकं करुन नक्की झालंय काय हे मला कळालेलंच नाहीये. हा पुणेकर - अपुणेकर वाद आला कुठुन? (म्हणजे मुविंच्या डोक्यात. तसा तो वाद मिपावर अमर आहे.)

"पुणेकर" ही कन्सेप्ट इतकी ओव्हररेटेड आहे खरं तर. असणंही काही विशेष नाही, आणि नसणंही. पण लोकांना आपण पुणेकर आहोतच्च किंवा अज्याबात नाही आहोत हे सांगण्यात इतकी मज्जा का वाटत असेल? प्रत्येक शहराची खासियत असते, एकट्या पुण्यालाच काही सोनं लागलेलं नाही. हा मुद्दा इतका जीवाला लावुन घ्यावा असा आहे तरी का? मुवि तुम्ही ऑब्सेस्ड वाटताय ह्या बाबतीत. आधी ते डोंबिवलीचे खुळ होते, आता हे.

जेम्स वांड's picture

18 Jul 2017 - 7:00 pm | जेम्स वांड

मला वाटतं आशु जोग ह्यांच्या 'पीएमटी' धाग्यावरून हे सूरु झालं, ह्यांनी त्यांना काहीतरी विचारलं अन त्यांनी उत्तर दिलं नाही, त्यावरून ह्यांचा पुणे द्वेष उफाळून आला असावा अन असला धागा काढण्यात पर्यवसान झाले असावे.

तुमच्याशी सहमत आहे, पुणेकर असणे/नसणे ह्यात चघळण्यासारखे काही नाही पुण्यातले सगळे चांगले फक्त पुणेकरांमुळे नाही अन सगळे खराब बाहेरच्यांमुळे सुद्धा नाही, प्रत्येक गावाची उणीदुणी असतातच , पण पुणेकरच टार्गेट का होत असावेत? सेम अप्लाय होतं , कोकणी लोकांच्या घाऊक मत्स्यप्रेम कोकणची माणसं साधी भोळीला सुद्धा अन अति तिखट तेल खाऊन त्याचं कौतुक करणाऱ्या खानदेश विदर्भातील लोकांना सुद्धा. अर्थात ज्याला जे समज/गैरसमज स्वतःबद्दल स्वतःच्या गावाबद्दल आहेत त्याला ते ठेवायचा हक्क आहेच, फक्त असले खुळे धागे काढण्याला अर्थ नाही हे माझं वैयक्तिक मत.

(पुणेकर) वांडोबा

अभ्या..'s picture

18 Jul 2017 - 8:00 pm | अभ्या..

पुणेकर अन नॉन पुणेकर ह्याचबाबतीत मुविकाका ऑब्सेस्ड असतील असे बिलकुल वाटत नाही.
एकंदरीत त्यांच्या वाटचालीवरुन अन माझ्या गरीब निरिक्षणातून काही वाटले ते बोलतो.
.
मुविकाका असो की आणि कुणी असो ह्यातून कृपया गैरसमज करुन घेऊ नये हि विनंती.
.
सुरुवातीपासून मुविकाकांचे लेख वाचत होतो, अगम्य असत. निदान मला तरी त्यात काही मनोरंजन मूल्य जाणवले नाही.
नंतर मुविकाका वैयक्तिक होत गेले. कट्टे करणे, कट्टे करण्याचा सतत पुरस्कार करत राहणे वगैरे वगैरे.
मुविकाकांच्या परदेशी राहण्याचे, बिनधास्त वागण्याचे अन कौटुंबिक जिव्हाळ्याचे मिपाकरांनी कौतुकच केले.
नंतर शेती करण्याच्या धाडसी निर्णयाचेही स्वागत केले. त्यातून काही वाचनीय मिळत राहील अशीही अपेक्षा केली.
ह्यानंतर मात्र मुविकाका बदलले.
फक्त वैय्क्तिक संबंध, खरडी, पूर्वनियोजीत भेटी, स्वआयोजित कट्टे अन प्रतिसादातील कौतुक एवढेच मिपाजग त्यांना अपेक्षित वाटू लागले.
त्यातूनच पुणेकर, नॉन पुणेकर, नास्तिक, आस्तिक अशा फालतू लेबलखाली आपले कौतुक करणारे अन न करणारे अशी वाटणी सुरु केली.
बरं ही वाटणी आपल्यापूर्वी सिमीत न ठेवता प्रतिसादातून, नवीन धाग्यातून ओतू लागले.
मिपाकरांचे बिनधास्तपणा अन विरोधी मत नोंदवण्यातला उत्साह हे एक वैशिष्ट्य इथेही दिसून आलेच.
लोकांनी मुविकाकांच्या वागणुकीतला हा बदल दाखवून दिल्यावरही त्यावर अजून ह्या धाग्यातून ही बदललेली मनोवॄत्ती त्यांनी साफ दाखवून दिली.
.
मुविकाका, कमज्यादा बोललो असेल तर माफ करा पण तुमचे असे वागणे ना पटलेले आहे ना आवडलेले आहे. मान्य आहे आपण लोकांच्या आवडीनिवडी जपायला आंजावर येत नाही पण एखादा उमदा, दिलखुलास माणूस इतका बदलू शकतो हे माझ्या मनाला न पटणारे आहे. आमची काही मते पटत नसतील तर बिनधास्त खंडन करा, चार शिव्या द्या, कुणालाच वाईट वाटणार नाही पण अशी कुत्सित तिरकस भाषा वापरुन काहीतरी अगम्य लिहु नका. फाट्यावर बिट्यावर मारणे ह्या गोष्टींचे आजकाल कुणालाच ना कौतुक ना नवलाई राह्यलीय. घरात पोरगे बापाला फाट्यावर मारते, बाहेर शिपाई साह्यबाला मारतो, असली कंडीशन असताना उगी आपण लै कै दुनियेस फाट्यावर मारणारे क्रांतीकारक असा समज करुन घेण्यात अर्थ नाही. आपण सर्वच जण चांगले काही वाचायला मिळते, घडीभराचे मनोरंजनाला इथे येतो, चार मित्र बनवतो. त्यात असल्या फळ्या कशाला पाडता?
मिपाला कुणा बाबा हकिमाची अन त्यांच्या फूट्पाडू सल्ल्यांची गरज नाहीये. तुम्हीच तुमच्या संपन्न जीवनातील काही आनंदी क्षण आमच्यासोबत वाटा, त्याचेच आम्हास खूप कौतुक वाटेल.
.
माझे ह्यामध्ये काही गैरसमज असतील तर म्या अल्पबुध्दीस माफ करावे. क्षमस्व.

आदूबाळ's picture

18 Jul 2017 - 11:21 pm | आदूबाळ

यू, सर, ह्याव हिट द हेड ऑन अ नेल.

मोदक's picture

18 Jul 2017 - 11:34 pm | मोदक

+११

बेशर्त सहमत.

चांदणे संदीप's picture

19 Jul 2017 - 12:04 pm | चांदणे संदीप

=))

Sandy

यशोधरा's picture

19 Jul 2017 - 9:53 am | यशोधरा

+१

विशुमित's picture

19 Jul 2017 - 10:01 am | विशुमित

प्रतिसादाला आपले +111

अद्द्या's picture

19 Jul 2017 - 11:57 am | अद्द्या

अभ्यामोरे शी लै वेळा सहमत

अभिजीत अवलिया's picture

19 Jul 2017 - 10:12 am | अभिजीत अवलिया

मुविकाका,
हा धागा आणि बऱ्याच धाग्यान्वर विनाकारण होत असलेला तुमचा पुणेकर - नॉन पुणेकर वाद अजिबात पटलेला नाही. वर रुपी, गॅरी, पिरा, अभ्या ह्यांनी जे लिहिले आहे त्याच्याशी सहमत. तुम्ही तुमच्या नोकरीच्या, शेतीच्या, आयुष्यातल्या इतर अनुभवांचे चार शब्द इथे लिहिलेत तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. पण हे असले बिनकामाचे वाद सतत उगाळत बसल्याने काय मिळते?

मराठी_माणूस's picture

19 Jul 2017 - 10:46 am | मराठी_माणूस

अवांतरः पुण्यात तसे काहीही विशेष नाही हे खरे आहे पण ते लोक त्या गोश्टीचा इतका कंठाळी (कंटाळी सुध्दा) सुरात उल्लेख करत असतात की नंतर इतर लोक इरीटेट होतात. उदाहरणार्थ, ह्या सोमवार मंगळवारचा "चला हवा येउ द्या" चा कार्यक्रम. हा कार्यक्रम तसा इतर शहरात सुध्दा झालेला आहे आणि त्या वेळेस त्या शहराच्या वैषीष्ठांचा माफक उल्लेख ही करण्यात आला. पण परवाच्या कार्यक्रमात, स्टेज वर बोलावलेल्यांनी फक्त पुण्या बद्दल 'च' त्याच त्या गोष्टी सांगुन कंटाळा आणला. "१ ते ४ बंद " च्या विनोदाला आजकाल कोणी हसत नाही तसेच सतत दुसर्‍याना कमी लेखुन आपण मोठे होत नाही हे त्याना कोणीतरी सांगीतले पाहीजे.