मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमचे मोठे चिरंजीव कागदोपत्री इंजिनियर झाले (कागदोपत्री बरेच काही होता येते पण .....कागदोपत्री बरेच काही होणे, ह ह्या धाग्याचा विषय नाही....) म्हणून आमच्या बाबांकडे गेलो.शनिवार असल्याने बाबांच्या मठात बरीच गर्दी होती,त्यात चिलिमवाले बाबा, कटोरीवाले बाबा, खापरवाले बाबा आणि जपमाळ वाले बाबा पण होतेच. आज बाबांच्या मठांत इतकी गर्दी पाहून मी जरा हबकलोच.पण मी पाय पळता पाय काढण्यापूर्वीच बाबांची नजर आमच्याकडे वळाली आणि बाबा म्हणाले..... बाबा : या मुवि.काय काम काढलेत? तसे तुम्ही आजकाल कामाशिवाय आमच्याकडे पण येत नाही.आज मूद्दाम का आलात? आम्ही : तसे काही विशेष नाही.आपल्या कृपेने मुलगा इंजिनियर झाला. म्हणून आलो होतो. बाबा : आमची कसली कृपा? त्याने अभ्यास केला, तो पास झाला. आम्ही : तुम्ही असे म्हणता.पण आम्हाला अनुभव तर वेगळाच येतो. कुणी जर आम्हाला योग्य त्या ठिकाणी मदत केली तर दोघांवर खापर फुटते. बाबा : आले आमच्या लक्षांत. मुळात ही लढाई आस्तिक आणि नास्तिक ह्यांच्या विरोधातली आहे. आम्ही : म्हणजे? बाबा : तुमच्या भाषेत पुणेकर आणि अपुणेकर..... आम्ही : नीट समजावून सांगाल तर उत्तम... बाबा : ह्या जगांत ज्या अनेक जाती आहेत त्यात, पुणेकर आणि अपुणेकर, ह्या पण येतात.आमच्या भाषेत त्यांना आस्तिक आणि नास्तिक असे म्हणतात. प्रत्येक व्यक्ती जन्माला येतांना न्युट्रल असते पण पुढे ती ती व्यक्ती तिच्या तिच्या जाणीवे नुसार अस्तिक किंवा नास्तिक होते. एखाद्या व्यक्तीची स्तुती, तिची वर्तमान योग्यता न पाहता करणे, म्हणजे आस्तिकता. आणि कालाप्रमाणे मत बदलणारा आणि योग्य काय? अयोग्य काय? हे मत स्वतःचे स्वतः ठरवणारा म्हणजे नास्तिक. आस्तिकांना, काळाचे, स्थानाचे भान नसते. मग त्यात पुणे असो किंवा मुंबई.(पुर्वी मुंबई ही फक्त तटबंदी पुरतीच होती मग पुढे त्यात कुर्ला, बांदरा आले आणि सध्या कागदोपत्री मुलुंड-दहिसर-बोरीवली पर्यंत.....पण जिथपर्यंत लोकल जाते तिथपर्यंत मुंबै, हे सर्वसामान्यांचे मत, त्यामुळे सध्या मुंबई = डहाणू, कर्जत, कसारा आणि पनवेल.) आस्तिकांच्या मते मुंबै = बोरीवली,मुलुंड आणि पुणे = काही पेठा. पण आज खरोखरच तसे आहे का? चिलिमवाले बाबा : सॉरी हां. मी मध्येच बोलतोय. असो, सगळे आयुष्य मी कपड्याविना काढले. वेळेवर २ घास कधीतरी मिळायचे, पण मी देवाघरी जाताच, आमच्या नावाने दक्षिणा मागायला सुरुवात.आमचे तरी ठीक आहे पण ह्या कटोरीवाल्या आणि जपमाळ वाल्या बाबांच्या बाबतीत काही विचारू नका. कटोरीवाले बाबा : खरी गोष्ट.... जपमाळवाले बाबा ; अहो, आयुष्यभर मी "एकांतवासात जपमाळ ओढा" म्हणूम सांगीतले तर, आमची लोकं, मोठमोठ्याने वेळ-काळ-स्थान न बघता. जोरजोरात नामे घेत असतात. खापरवाले बाबा : अहो, आम्ही पण भजने केली.पण त्यातला मतितार्थ कोणाच्याच लक्षांत आला नाही. बाबा : कारण एकच, लोकांना आस्तिकता आवडते.शिवाय आस्तिकांचा कंपू फार लवकर तयार होतो. कुणी २-४ जणांनी दगड उचलले की, भले-भले धोंडे उचलतातच. ही मानवी स्वाभाविकता आहे. आम्ही ; मग आमच्या सारख्या नास्तिकांनी काय करावे? बाबा : नंबर एक, नास्तिक हा एकटाच असतो.त्याला कंपू नसतो पण, कुठलाही नास्तिक दुसर्‍या नास्तिकाला दोष देत नाही.आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे, अजया, सगा, सूड, अभिजित अवलिया, सुखी, कलंत्री, कपिल मुनी, औरंगजेब, पिरा ताई, पैजार बुवा, त्रिवेणी आणि मितान हे त्या पैकीच.हे जोपर्यंत विरोध करत नाहीत तोपर्यंत आस्तिकांनी कितीही गरळ ओकली तरी बिंधास्त रहा. आणि. नम्बर २ : आस्तिक फक्त बोंबलतात...पण पुरावे दिले किंवा मागीतले की, मग शेपूट घालतात. (बादवे, "शेपूट घालणे' हा वाक्प्रचार आहे.) मग ती तिकीटे असोत किंवा लिंका. ते तिकीटे किंवा लिंका मागतील पण स्वतः कष्ट करून शोधणार नाहीत. साधे पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड इथपर्यंत जायची तिकिटे द्यायची असतील तरी डोंबोली ते कोथरूड बस प्रवास परत करावा अशी अव्यावहारीक अपेक्षा पण धरतील.म्हण्जे १५ रुपये आणि साधारण २ तासाच्या (बसची वाट बघण्याच्या वेळेसकट) प्रवासासाठी २०० रु. आणि २ दिवस खर्च डोंबोलीकरांनी करावा. आस्तिकांच्या अपेक्षा ह्या अशा असतात. तस्मात तुम्ही ज्यांना पुणेकर म्हणता, त्यांना आम्ही आस्तिक असे म्हणतो.आस्तिक फक्त एकांगीच विचार करतात.त्यांना फाट्यावर मारणेच उत्तम...... -------------- ह्यापुढे आस्तिकांच्या प्रतिसादांना उत्तरे न देण्यात आम्ही आमचा वेळ जास्त खर्च करणार नाही.

वाचन 13422 प्रतिक्रिया 0