✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम...!!

म
मोदक यांनी
Wed, 11/02/2016 - 17:16  ·  लेख
लेख
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
112300 वाचन

💬 प्रतिसाद (496)

प्रतिक्रिया

८.८ किमि

दाते प्रसाद
Mon, 11/07/2016 - 10:07 नवीन
आज ८. ८ किमी चाललो , १ तास १९ मिनिटे लागली , ८. ५९ मिनीट /किमी , ८५० कॅलरिज जळाल्या

आजचा व्यायाम

मोहन
Mon, 11/07/2016 - 10:32 नवीन
२.० कि.मी चालणे व २ मजले चढणे.

काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन

बाळ सप्रे
Mon, 11/07/2016 - 10:47 नवीन
काल बेटर-हाफ ला हाफ मॅरॅथॉन धावताना पेसिंग केले. तिला वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवता आली आणि चक्क ३ रे बक्षीसही मिळाले..

अप्रतिम ! क्या बात है !

वेल्लाभट
Mon, 11/07/2016 - 10:52 नवीन
अप्रतिम ! क्या बात है ! जबरदस्त.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मस्त

प्रशांत
Mon, 11/07/2016 - 11:45 नवीन
अभिनंदन..
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन.

अप्पा जोगळेकर
Mon, 11/07/2016 - 12:04 नवीन
अभिनंदन.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन..!!!

मोदक
Mon, 11/07/2016 - 12:42 नवीन
अभिनंदन..!!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/07/2016 - 18:44 नवीन
अरे वाह ! अभिनंदन सेठ. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनन्दन

सही रे सई
Mon, 11/07/2016 - 20:08 नवीन
अभिनन्दन धवताना पेसिंग म्हणजे काय?
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

४ डिसेंबरच्या पुणे हाफ

अप्पा जोगळेकर
Mon, 11/07/2016 - 12:02 नवीन
४ डिसेंबरच्या पुणे हाफ मॅरेथॉन ला रजिस्ट्रेशन करायचे आहे. काय करावे लागेल. क्रूपया ऑनलाईन पर्याय सुचवावेत.

वर्तमानपत्रात काय सापडले नाही

अप्पा जोगळेकर
Mon, 11/07/2016 - 12:03 नवीन
वर्तमानपत्रात काय सापडले नाही आणि गुगलबाबा वर सुद्धा नुसतीच इव्हेन्टची माहिती आहे. नोंदणीचे कळत नाही काय करायचे.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

ही घ्या लिंक

बाळ सप्रे
Mon, 11/07/2016 - 12:19 नवीन
ही घ्या लिंक https://www.townscript.com/e/pune-international-marathon-2016
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

धन्यवाद. मी वेगळ्या लिंकवरुन

अप्पा जोगळेकर
Mon, 11/07/2016 - 12:28 नवीन
धन्यवाद. मी वेगळ्या लिंकवरुन केली नोंदणी.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सापडले. इथे करता येते नोंदणी.

अप्पा जोगळेकर
Mon, 11/07/2016 - 12:27 नवीन
सापडले. इथे करता येते नोंदणी. http://www.marathonpune.com/
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

पाठोपाठ दोनदा पर्वती चढ उतार

अनुप ढेरे
Mon, 11/07/2016 - 12:05 नवीन
पाठोपाठ दोनदा पर्वती चढ उतार केलं. चार वेळा जमायला हवं.

नक्की जमेल. कीप गोइंग

वेल्लाभट
Mon, 11/07/2016 - 12:15 नवीन
नक्की जमेल. कीप गोइंग
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

शनवारी दीड तास आणि आज अर्धा

सूड
Mon, 11/07/2016 - 15:44 नवीन
शनवारी दीड तास आणि आज अर्धा तास पवलो.

सकाळी चालणे आणि संध्याकाळी सायकलींग .....

नितीन पाठक
Mon, 11/07/2016 - 15:55 नवीन
मी काल (रविवारी) सकाळी ६.५ किमी चाललो आणि संध्याकाळी १४ किमी सायकल ४५ मिनिटांत चालवली. आज सकाळी परत ६.५ किमी चालणे झाले. संध्याकाळी पुन्हा सायकलींग करणार आहे. दररोज ओफिस मध्ये तीन मजले चढणे आणि उतरणे (अंदाजे ५-६ वेळा) चालू असतेच.

मस्त चालु आहे...

डॉ श्रीहास
Mon, 11/07/2016 - 16:41 नवीन
बादवे तुमचं वय नेमकं किती ? हा व्यायाम समतोल वाटतो आहे.... सुरू ठेवाच
↩ प्रतिसाद: नितीन पाठक

पोहणे शिकायला वयाची-वजनाची

संदीप डांगे
Mon, 11/07/2016 - 16:10 नवीन
पोहणे शिकायला वयाची-वजनाची मर्यादा नसेल ना?

अजिबात नाही

बाळ सप्रे
Mon, 11/07/2016 - 16:16 नवीन
अजिबात नाही
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मोठ्या बोटी पण तरंगतात हो

अप्पा जोगळेकर
Mon, 11/07/2016 - 16:58 नवीन
मोठ्या बोटी पण तरंगतात हो प्लावी बलाने. माणसाचे काय.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अजिबात नाही. कोरी पाटी होऊन

सूड
Mon, 11/07/2016 - 17:19 नवीन
अजिबात नाही. कोरी पाटी होऊन जायचं आणि ट्रेनर सांगेल ते ऐकायचं. उडी मार म्हटलं की मारायची.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मलाही पुर्वी वाटायचं की

सही रे सई
Mon, 11/07/2016 - 20:13 नवीन
मलाही पुर्वी वाटायचं की वयोमर्यादा असेल किंवा फारस शक्य नसेल काही एका वयानंतर. पण माझ्या आईने हे साफ खोट ठरवलं. तिला अजिबात पोहायला येत नसताना तीन साठाव्या वर्षी पोहणे शिकायला सुरवात केली आणि काही महिन्यात तिला ते जमल पण. आता ती नियमित पोहायला जाते. तिने पहिले पोहण्याच्या तलावात चालण्यासाठी नाव घातले होते कारण कोणीतरी तिला सांगितलं कि पाण्यात रोज अर्धा तास चाललात तर गुढघेदुखी थांबेल. आणि ती खरच थांबली पण. मग आजूबाजूच्या बायकांनी प्रोत्साहित केल्यामुळे पोहायला शिकायचं पण ठरवलं.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

क्या बात है. सई, मस्तं. खूप

पद्मावति
Mon, 11/07/2016 - 22:04 नवीन
क्या बात है. सई, मस्तं. खूप प्रेरणादायी.
↩ प्रतिसाद: सही रे सई

कालपासून चालण्याचा श्रीगणेशा

किसन शिंदे
Mon, 11/07/2016 - 16:21 नवीन
कालपासून चालण्याचा श्रीगणेशा केलाय. पहिल्याच दिवशी ५ किमीचे टारगेट ठेवले होते ते ५५ मिनिटात पूर्ण केले. सातत्य राहणं महत्वाचं.

भारी

प्रशांत
Mon, 11/07/2016 - 21:20 नवीन
देवा मस्त चालु ठेवा
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कालचा व्यायाम

अरिंजय
Mon, 11/07/2016 - 17:40 नवीन
Image removed. काल मी न थांबता सलग ५० किमी चालवली. घरुन निघताना जे सायकल वर बसलो, ते घरी आल्यावरच उतरलो. ३५ किमी काही वाटले नाही. पण नंतर साधे साधे चढ सुद्धा जड चालले होते. ४० नंतर फारच जिवावर आले होते. शेवटचे ५ किमी अक्षरशः रडत पडत केल्यासारखे केले. शेवटी ५१.५ किमी करुनच सायकल थांबवली. घरी आल्यावर थोड्या मांड्या दुखल्या. त्या पलिकडे काहीही त्रास झाला नाही. सकाळी एकदम ओके.

भारी..!!

मोदक
Mon, 11/07/2016 - 17:51 नवीन
भारी..!!
↩ प्रतिसाद: अरिंजय

फारच बेश्ट....

डॉ श्रीहास
Mon, 11/07/2016 - 18:45 नवीन
तुमच्या सायकलला गियर नाहीत म्हणे..... १०० गुण दिले तुम्हाला !!
↩ प्रतिसाद: अरिंजय

धन्य ...

नितीन पाठक
Tue, 11/08/2016 - 12:18 नवीन
मानस भाउ ध्न्य .......... आमचा नमस्कार
↩ प्रतिसाद: अरिंजय

आज ३५ जोर मारले!! एक

चावटमेला
Mon, 11/07/2016 - 19:53 नवीन
आज ३५ जोर मारले!! एक आठवड्याने ४० चं टारगेट आहे..

सायकलींग

प्रशांत
Mon, 11/07/2016 - 21:25 नवीन
आज २० किमी सायकलींग झाली घर -ऑफिस - घर

पुल अप्ससाठी काही टिप्स देउ

अंतु बर्वा
Mon, 11/07/2016 - 22:02 नवीन
पुल अप्ससाठी काही टिप्स देउ शकेल का कुणी? पाच सहा वर्षांपुर्वी नियमित जिम करत होतो तेव्हा जास्त नाही पण आठ दहा पुलाप्स वगैरे जमायचे. पण मधे चार पाच वर्षे खंड पडला आणि आता कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या पुलअपपेक्शा जास्त जमतचं नाही. काहीतरी चुकतय पण काय ते कळत नाहीये. डोक्यात एक कल्पना अशी येतीये की पुलअप्स सोडुन बॅक आणि कोअर चा व्यायाम दोन तीन आठवडे करुन पाहायचा आणि मग पुलअप्स ट्राय करायचे. याव्यतिरीक्त काही टिप्स असतील तर क्रुपया सांगाव्यात (सध्याच्या जिमात खाली पायापाशी ठरवलेल्या वजनाचा सपोर्ट देणारी मशिन नाहिये, सो तो ऑप्शन बाद आहे :-))

थोडा पाठीचा व्यायाम करून बघा

John McClain
Mon, 11/07/2016 - 23:02 नवीन
थोडा पाठीचा व्यायाम करून बघा आधी 1, 2 आठवडे... जसा कि lat pulldown machine, dumbbell row वगरे. अजून दुसरे म्हणजे, सपोर्ट घेऊन वर जा (पूल उप rod वर) जसे कि खुर्ची किंवा बेंच, आणि मग खाली येताना स्वतःच्या ताकदीने हळू या... काही दिवसात छान strength येईल. पूल उप च्या वेळेस grip width change करून बघा... जितके दूर तुमचे हात असतील तितके बॅक muscles (lats) वापरले जातील. Grip जवळ आणल्यास middle बॅक, दंड वगरे थोड्या प्रमाणात वापरल्या जातील. खूपच औघड होत असल्यास chin up करा...सोपे असतात थोडे pull up पेक्ष्या. यामध्ये biceps पण भरपूर वापरल्या जातात बॅक सोबत. Chin up साठी हाताची grip ulati ठेवा.
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

वर अगदी बरोबर सांगितले. चिन

limbutimbu
गुरुवार, 11/10/2016 - 09:49 नवीन
वर अगदी बरोबर सांगितले. चिन अप्स हाच उपाय असेल. हात खांद्याच्या लेव्हलमधे सरळ वर बारला मुठ आपल्याकडे वळवुन बार धरुन शरीर वर उचला. मुठ बाहेर समोरचे बाजुला काढुन बार पकडून शरिर वर उचलणे सुरवातीला अवघड जाते. तसेच दोन हातातील अंतर जितके वाढत जाईल तितके ते अवघड, व वेळेस खान्द्यास दुखापत करु शकते. सबब सुरवातीस वर सांगितल्याप्रमाणे चिन अप्स करा. सुरवातीस बॉडीस सराव होईस्तोवर इनहेल - एक्सहेल अंमलात आणताना, श्वास पुर्ण भरुन घेऊन थोडा रोखुन बॉडी वर उचला, व हनुवटी बारचे वर पोहोचेस्तोवरच श्वास एका गतीत सोडून द्या. मला हे जमायचे नाही सुरवातीला, तेव्हा व अजुनही सुरवातीचे ५ चिन अप्स मी एका श्वासात, श्वास रोखुन धरुन करतो (कदाचित हे चूक असेलही), व सलग पुढील ५/६ इनहेल-एक्सहेलचे नियम वापरुन करतो. असेच करा असे सांगणे नाही.
↩ प्रतिसाद: John McClain

पुलप्ससाठी दंडांबरोबरच

चतुरंग
Mon, 11/07/2016 - 23:20 नवीन
कोअर स्ट्रेन्ग्थ लागते. आधी सिटप्स मारा मग पुलप्स ऐवजी नुसते बारला लोंबकळून कमरेतून पाय वर घेऊन जमिनीसमांतर ठेवायचा प्रयत्न करा. साधारण आठवड्यात दोन पुलप्सपर्यंत प्रगती दिसायला हरकत नाही. आठव्ड्याला एक याप्रमाणे पुलप वाढवायचा प्रयत्न करा. आठ आठवड्यात आठ पुलप साधायला हवेत असे वाटते! शुभेच्छा!
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

हा वजन आटोक्यात आणल्यावर

अप्पा जोगळेकर
Tue, 11/08/2016 - 11:15 नवीन
हा वजन आटोक्यात आणल्यावर करण्याचा व्यायाम आहे. आधी नुसतेच लटकून पाहावे. अर्धा मिनिट, मग १ मिनिट. असे सलग पाच मिनिटे पर्यंत विनासायास लटकता आले की मग एखादा पुल जामायला लागतो. हा अतिशय अवघड प्रकार आहे. ० ते सलग १४ पर्यंत पोचायला मला १ वर्ष लागले होते. तूर्तास पुन्हा ० आहे.
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

John McClain, चतुरंगसर आणि

अंतु बर्वा
Tue, 11/08/2016 - 20:04 नवीन
John McClain, चतुरंगसर आणि अप्पा... सुचनांसाठी धन्यवाद. भरपुर धावण्यामुळे वजन आटोक्यात आहे (ढेरी सोडुनः-)), पण मसल स्ट्रेंग्थची बोंब आहे. कोअरसाठी अजुनपर्यंत काही करत नव्हतो पण आता सुरु करेन. कमीत कमी चार पुलप्स महिन्याअखेरीस जमावेत असा प्रयत्न करणार आहे. (प्रत्यक्षात दोन जमले तरी भरपुर, पण दोनच टार्गेट ठेवुन एकच होइल :-) त्यासाठी चार).
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

नाही. असे टार्गेट ठेवून पुल

अप्पा जोगळेकर
Wed, 11/09/2016 - 19:22 नवीन
नाही. असे टार्गेट ठेवून पुल अप्स करु नयेत. हमखास इजा होते. मान, खांदा या भागाला. बळ वाढवत न्यावे आणि सहज जमतील तितकेच काढावेत. सहज म्हणजे ज्या सहजतेने आपण चालू धावू शकतो तितकी सहजता. खेचाखेच नाही अजिबात.
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

धन्यवाद अप्पा, सुचना लक्षात

अंतु बर्वा
गुरुवार, 11/10/2016 - 19:41 नवीन
धन्यवाद अप्पा, सुचना लक्षात ठेवेन.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आठवड्याची सुरुवात

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 11/07/2016 - 23:14 नवीन
नो व्यायामाने झाली! उद्या सक्काळी उठुन जीम गाठणे.

कविता१९७८ - Mon, 07/11/2016 -

कविता१९७८
Mon, 11/07/2016 - 23:17 नवीन
कविता१९७८ - Mon, 07/11/2016 - 23:10 रोज सलग 2 तास चालते पण मोजुन मापुन नाही. रोजच चालते पण रात्री. १० मि.=१ कीमी पकडतात म्हणजे १२० मि म्हणजे कीती कीमी होतील बरे?? तरी कमीतकमी ८ कीमीच पकडते नशा लागते चालण्याची हे खरय पण पदयात्रेमुळे चालायची सवय लागली हे ही खरे. बेल्ट /बँड किंवा अॅप शिवाय, फीटनेस साठी अनावश्यक गोष्टींवर अवलंबुन राहणे आवडत नाही.

खूप छान धागा.

खटपट्या
Tue, 11/08/2016 - 07:56 नवीन
खूप छान धागा.

आजचा व्यायाम

स्थितप्रज्ञ
Tue, 11/08/2016 - 08:24 नवीन
साधारण १९च्या वेगाने ११किमी सायकल चालवली. बऱ्याच दिवसांनी सुरुवात केल्यामुळे प्रचंड आळस आला होता आणि सकाळी अंथरुणातून उठून जावेसेच वाटत नव्हते पण मनाचा हिय्या केला आणि थोडे तरी हात-पाय हलवू या निश्चयाने निघालोच.

जाम सर्दी!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/08/2016 - 08:59 नवीन
अन त्यामुळे व्यायाम अर्ध्यावर आलाय :( आजचा व्यायाम, अर्धा तास लेग्स, बस.

येथे दोन तर्हेचे लोक आहेत१)

सुबोध खरे
Tue, 11/08/2016 - 09:24 नवीन
येथे दोन तर्हेचे लोक आहेत १) व्यायाम पटू --ज्यांचा एकंदर व्यायामाचा दर्जा आणि पातळी बरीच उच्च आहे आणि ज्यांना या प्रकारातील विविध अत्याधुनिक साधें आणि त्यांचा वापर याची बरीच माहिती आहे. २) आमच्या सारखी सामान्य माणसे-- ज्यांच्या व्यायामाची एकंदर बोंबच आहे पण ज्यांना व्यायाम करायला पाहिजे असे "आतून" पटलेले आहे. पण "कळतंय पण वळत नाही" . आपल्यासारख्या माणसांनी वरील प्रथम दर्जाच्या माणसांपासून स्फूर्ती घेऊन आपल्या व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीचे पातळी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु वरील दर्जाच्या माणसांचे व्यायाम त्याचे प्रकार आणि पद्धती पाहून आपण निराश व्हायची गरज नाही. सुरुवातीला एक तास भर चालायला सुरुवात तर करू या.शिवाय लिफ्ट वापरायच्या ऐवजी जिने वापरूया. जवळ जायचे असेल तर दुचाकी ऐवजी पायी चालू या मग हीच चाल भरभर गती वाढवत नेऊ या. सर्दी खोकला ताप इ आजारीपणामुळे व्यायाम थांबला तर तो परत चालू करू या. सुरुवात तर करू. मग पुढे वरच्या वर्गात कधी आणि कसे जायचे या बद्दल विचार करू.

परफेक्ट

वेल्लाभट
Tue, 11/08/2016 - 10:10 नवीन
Like they say 'It doesn't matter how slow; but as long as you are moving, you are getting there.'
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अल्कोहोलिक ऍनॊनिमस सारखे मी

सुबोध खरे
Tue, 11/08/2016 - 09:26 नवीन
अल्कोहोलिक ऍनॊनिमस सारखे मी आळशी आहे आणि व्यायाम करीत नाही असे प्रथम लोकांमध्ये मान्य करू या. आणि मग आज मी १० मिनिटे चाललो बरं वाटलं इथून पुढे जाऊ या

आजचं सायकलींग....।। रोड बाईक ।।

डॉ श्रीहास
Tue, 11/08/2016 - 09:42 नवीन
३६ किमी, २३.६ किमी/तास, १३८६ उष्मांक , १तास ३१ मिनीटे ३२ सेकंद.......स्ट्रेचींग,क्रंचेस् आणि जोर मारून कुल डाऊन....: निघण्याआधी वाॅर्मअप केला होता.
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा