जागे राहा, रात्र भुताची आहे.... रिलोडेड..... (स्वैर अनुवाद)
लेखनविषय (Tags)
लहान मुलांनी सांगितलेल्या विचित्र गोष्टी....
१. मी माझ्या मुलाला- झोप आता. तुझ्या बेडखाली काहीच नाहीये.
माझा मुलगा- पण पप्पा , तुमच्या मागे ’तो’ उभा आहे ना!
२. माझी ३ वर्षाची मुलगी घरात लाईटस् गेले असताना अचानक म्हणाली,’ बाबा वर पाहा ना. आपल्या पंख्याला कोणीतरी माणूस लोंबकळून झोके घेतोय्.’
३. मी माझ्या ४ वर्षाच्या मुलीला गोष्ट सांगत होतो, तेवढ्यात तिने माझ्या हातातील पुस्तक झटकन् बंद केले आणी उघड्या दाराकडे बोट करत म्हणाली, तू निघून जा इथून लगेच. तू आधीच कितीतरी लोकांना मारले आहेस. हे माझे पप्पा आहेत.
४. माझा मुलगा स्वत:शीच हातवारे करत बोलत बसला होता. मी त्याला विचारले तर तो म्हणाला, ’बघा ना पप्पा , हे तिघे काय म्हणत आहेत. ते मला म्हणत आहेत की आम्हांला तुमच्या बागेतील मागल्या नारळाच्या झाडाखाली पुरले आहे. मला तिकडे त्यांना पाहायला बोलवत आहेत. ’
५. माझा भाऊ लहान मुलांना गोळ्या वाटत होता. त्याने एका लहान मुलीला विचारले.’ बाळा तुला गोळ्या हव्यात?’
ती त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली,’ हे तुम्ही त्या बागुलबुआच्या घरात लऊन बसून म्हणत होता ना? ’
६. माझ्या सात वर्षाच्या मुलाने मला विचारले- आई मी तुझ्यासारखा ४१ वर्षाचा होईल, तेव्हा तू किती वर्षाची होशील?’
मी म्हणाले ’ मी ७५ वर्षाची होईल.’
’किंवा तोपर्य़ंत मेलेली असशील.’ माझी ५ वर्षाची मुलगी चटकन् बोलली.
७. माझी मुलगी तिच्या बेडरूममध्ये एकटीच रडत बसली होती. मी जाऊन तिला विचारले तर ती मला म्हणाली- बघ ना आई, आज आपण सिमेट्रीमध्ये ज्या बाईला पुरून आलो, ती समोर बसून, मला सारखी चिडवत आहे.
८. माझ्या मित्राच्या ३ वर्षाच्या मुलाने मित्राला अचानक म्हटले- पप्पा मी तुमच्या तोंडावर उशी दाबून तुम्हाला देवाघरी पाठवणार आहे, आईसारखेच. ’
९. तुम्ही राजेश काकाला टाटा करणार नाहीत?
माझी मुलगी झोपाळ्यावर झोके घेत असताना मला म्हणाली. राजेश माझा भाऊ होता, तो मरून ९ वर्षे होऊन गेली होती. त्यावेळेस तिचा जन्मही झाला नव्हता. आणि आमच्यातील कोणीही तिच्याजवळ हा विषय कधीच काढला नव्हता.
मी तिला विचारले, ’तुला राजेश काका कसा काय माहिती आहे गं?’
’त्यात काय एवढं?’ ती म्हणाली. ’ तो रोज तर मला भेटतो. आतापण तो समोर उभा आहे आणि मला जपून झोके घ्यायला सांगतोय. पहा ना तिकडे.’
१०. माझी मुलगी घरातल्या एका खांबाकडे एकटक पाहत होती. मी विचारले असताना ती म्हणाली, ’ पिंटूने तिकडे एक गोष्ट केली होती.’
आमच्या घरात आणि आजूबाजूला कोणीच पिंटू नावाने राहत नव्हते.
मी तिला आश्चर्याने विचारले, ’ कोण हा पिंटू? आणि काय केले त्याने?’
’तो रोज रात्री छतावरून माझ्या खोलीत येतो.’ ती म्हणाली, ’ आणि मला सारखे सांगत असतो, की त्याने त्याच्या आईला त्या खांबाजवळ बॅटने मारले. तू पण कर, छानपैकी रक्ताचे कारंजे उडते असे केल्याने!’
११. माझ्या चारही आयांमध्ये तू माझी सर्वात आवडती आई आहेस!
’मी तुझी एकुलती एक आई आहे.’ मी चकीत होत माझ्या मुलीला म्हणाले.
ती बेसमेंटकडे हात करून म्हणाली,’ त्या तीन आयापण हेच म्हणत असतात.!’
१२. नी मिळालेल्या जेवणाबद्दल देवाकडे आभार मानले आणि ते माझ्याकडे पाहात गालातल्या गालात हसले. मी चमकून डायनिंग टेबलावर पाहिले तर ...
टेबलावर अन्नाचा एक कणदेखील नव्हता...!!! ( रत्नाकर मतकरी- जेवणावळ या कथेशी विलक्षण साधर्म्य)
स्वैर अनुवादक- अर्थात मीच
मूळ कल्पना- आंतरजालावरून साभार
प्रतिक्रिया
हायला!!! पितृपक्षाची भेट काय
xD खिक्क...
छानपैकी रक्ताचे कारंजे उडते
माझा एक खरा अनुभव आहे. मी एक
सर्वांसाठी ता. क.
आई ग घाबरले मी आता झोप नै
बेष्टाड बेष्ट!
अरे बापरे!
गोयंकर भुतास घाबरत नैत असं
ह्या:
त्यांना गाणगापूरला का नेत
एवढी "झाडं" आख्ख्या गोव्यात
अगदी अगदी.
भुतांना कसं नेणार?
सोप्पंय की.
=))
एक दोन सुंदर हडळी आहेत का हो
(No subject)
रात्रीचे १२:५० झालेत , अंधार
मस्त.
मस्तं! सही लिहिलंय.
मस्त !!
ही ही ही
झाडीतुन विचीत्र आवाज येत होता
काल मी व दिनु खेकडे पकडायला
.
ह्या ह्या ह्या ....
>मांत्रिक : ती गावातलीच मंडळी
" फारच सोज्वळ बुवा तुम्ही..
सोडून द्या. फार शिरेस नाहीये.
म्हणजे ? समजलं नै . हे कसले
'रिलोडेड'
आज हा अख्खा धागा जसाच्या तसा
सगळीकडे फिरवायच्या तयारीनेच लिहिला होता.
ह्या अजून काही भूत-भयकथा.निव्वळ मनोरंजनासाठी
ड्रँकुल्यातली ल्युसी ४०
मस्त........ खूप आवडल.
माझ्या मोबाईल मधे मी बेडवर
आधी मला हे किस्से काल्पनिक
सबवे सर्फर