✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कालचक्र

ज
जव्हेरगंज यांनी
Wed, 09/30/2015 - 20:27  ·  लेख
लेख
कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता. त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली. दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता. एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले. वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले. एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले. या चमत्कारी मडक्यात त्याला त्याचे भविष्य दिसले. तो महान तपस्वी हा अनमोल ठेवा घेऊन परतीच्या वाटेवर आपल्या गृहस्थीकडे निघाला. वाटेत भेटणाऱ्या असंख्य वाटसरुंना त्यांचे तंतोतंत भविष्य सांगुन चकित केले. याकामी बऱ्याच मुद्रा मिळवुन तो घरी परतला. त्याची महती सर्वदुर पसरली. दुरदूरच्या प्रदेशातील लोक आता त्याच्या कुटीबाहेर भविष्य जाणण्यासाठी भल्याथोरल्या रांगा लावु लागले. त्याची गृहस्थी प्रसन्न हसली. त्याच्या मुलाबाळांनी सोन्याचे दिवस पाहिले. मिळणाऱ्या अखंड मुद्रेतुन त्याने एक रुबाबदार वाडा बांधला. हळुहळु त्याचे रुपांतर राजवाड्यात झाले. नगरातल्या प्रजेने त्याचा उदोउदो केला. हा महान तपस्वी आता या नगरीचा एक बलाढ्य राजा झाला. कोण्या एका सर्वदुर प्रदेशातील एका महान राजाने या महान तपस्वीचे बंदिस्त शुभ्र मडके पळविण्यासाठी भलामोठा फौजफाटा पाठवला. तपस्वी नेस्तनाबुत झाला. त्याचा अनमोल ठेवा लुटला गेला. त्याला दुर अज्ञातवासात पाठवले गेले. परंतु झालेल्या घनघोर रणसंग्रामात त्या चमत्कारी मडक्याचे तुकडे तुकडे झाले. महान राजाच्या वैभवाचे दिवस आता उलटे फिरु लागले. कपटनीतीने त्याचे सिंहासन भरडले गेले. दुर अज्ञातवासात त्याला सोडुन दिले गेले. हा महान राजा एका निबिड अरण्यात एकाकी भटकत राहिला. त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली. दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा राजा आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता. एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त कुट्ट मडके सापडले. एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले. या चमत्कारी मडक्यात त्याला त्याचा भुतकाळ दिसला. त्याला दिसले एक महान तपस्वी एका अवाढव्य शिळेवर एका चमत्कारी मडक्यात आपले भविष्य पाहत आहे. एक महान तपस्वी आणि एक महान राजा एका अवाढव्य शिळेवर एका चमत्कारी मडक्यात एकमेकांना कुतुहलाने पहात आजही एकाकी ऊभे आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
4984 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मस्त , कथा आवडली

कविता१९७८
Wed, 09/30/2015 - 21:05 नवीन
मस्त , कथा आवडली
  • Log in or register to post comments

छान आहे कथा.

सानिकास्वप्निल
Wed, 09/30/2015 - 21:54 नवीन
छान आहे कथा.
  • Log in or register to post comments

जव्हेर भौ,

बाबा योगिराज
Wed, 09/30/2015 - 22:10 नवीन
जव्हेर भौ, आवड्यास. येक लम्बर. मस्तच.
  • Log in or register to post comments

वा...

सिध्दार्थ
Wed, 09/30/2015 - 22:41 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

हीच गोष्ट टाइम

द-बाहुबली
Wed, 09/30/2015 - 22:47 नवीन
हीच गोष्ट टाइम मशीनच्यानुशंगाने लिहुन अजुन खोदकर करता येउ शकते. पण मस्त आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

येस, पुन्हा आत जायचा विचार

जव्हेरगंज
Wed, 09/30/2015 - 23:11 नवीन
येस, पुन्हा आत जायचा विचार होता. पण ऊगाच बोर वगैरे मारेल म्हणुन आवरती घेतली. :) सर्व प्रतिसादकांचे आभार :):):):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

आवडेश

वगिश
Wed, 09/30/2015 - 22:49 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

कथा आवडली!

पैसा
Wed, 09/30/2015 - 23:13 नवीन
कथा आवडली!
  • Log in or register to post comments

नवीन शीर्षक सुचवल्याबद्दल

जव्हेरगंज
Wed, 09/30/2015 - 23:50 नवीन
नवीन शीर्षक सुचवल्याबद्दल पैसाताईंचे आभार :):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त बॅटिंग चालू आहे. आवडली

उगा काहितरीच
गुरुवार, 10/01/2015 - 00:45 नवीन
मस्त बॅटिंग चालू आहे. आवडली ही पण कथा हेवेसांनलगे
  • Log in or register to post comments

कथा आवडली!!!

राघवेंद्र
गुरुवार, 10/01/2015 - 02:10 नवीन
कथा आवडली!!!
  • Log in or register to post comments

छान कथा!

इशा१२३
गुरुवार, 10/01/2015 - 15:01 नवीन
छान कथा!
  • Log in or register to post comments

मस्त आहे. भाषेमुळे अजुनच मजा

राजाभाउ
गुरुवार, 10/01/2015 - 18:52 नवीन
मस्त आहे. भाषेमुळे अजुनच मजा आला.
  • Log in or register to post comments

:):):) आभारी आहे.

जव्हेरगंज
गुरुवार, 10/01/2015 - 19:52 नवीन
:):):) आभारी आहे. तुमचा आयडी मत्तच्च.!!:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा