तूर्तास महत्वाचे

निरन्जनदास's picture
निरन्जनदास in जनातलं, मनातलं
20 Jun 2015 - 3:42 pm

मित्रहो,
सोमवारपासून एका नव्या वैचारिक ठणाणाची सुरुवात होणारच आहे. पण त्या आधी काही मला महाजालच्या उत्खननात सापडलेल्या मौल्यवान नितांत सुंदर कोहिनूर हिऱ्यांचा शोध तुमच्या नजरेस आणावयाचा आहे. कदाचित तुमच्यातल्या काही खनकांन्ना आधीच हाती लागले असतीलही. पण मला नव्याने गवसल्याने ते आपणापुढे सादर करीत आहे. भक्तांनी लाभ घ्यावा.

विश्वनाथ खंदारे या अचाट माणसाने ही संकेतस्थळे जन्माला घातली आहेत!

हे ठिकाणसमीक्षासंदर्भप्रतिभा

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

20 Jun 2015 - 4:22 pm | अमोल केळकर

मस्त संकलन

अमोल केळकर

निरन्जनदास's picture

20 Jun 2015 - 6:06 pm | निरन्जनदास

धन्यवाद अमोल !

रामदास's picture

20 Jun 2015 - 4:54 pm | रामदास

आणि दिलेल्या लिंका - यांचा काही संबंध आहे का ?
विश्वनाथ खंदारे या अचाट माणसाने ही संकेतस्थळे जन्माला घातली आहेत !
यातील काही संस्थळे माधव शिरवळकरांच्या पूजासॉफ्ट या कंपनीची आहेत . मग हे विश्वनातह खंदारे कोण ?

निरन्जनदास's picture

20 Jun 2015 - 6:00 pm | निरन्जनदास

मी असेच काहीतरी शोधात होतो. तेंव्हा मला राम गणेश गडकरी यांचे संस्थळ सापडले. मग मी त्या संपर्क पत्त्यावर संपत्र रवाना करून आनंद व्यक्त केला. तेंव्हा त्यांनी त्यांनी आणखी कोणती संस्थळे तयार केली, त्याची यादी दिली. तीच मी दिली आहे. त्यांचे नाव विश्वनाथ खांदारे 9987642793. यात कुणी कुणाला संस्थळे तयार करून दिली किंवा काय, याची मला माहित नाही. तुम्ही कृपया शोधा बरं, म्हणजे नेमके काय ते बाहेर येईल.

"सोमवारपासून एका नव्या वैचारिक ठणाणाची सुरुवात होणारच आहे."

ह्या वाक्याचा काही संदर्भ लागला नाही.

(अज्ञानी) मुवि

निरन्जनदास's picture

20 Jun 2015 - 6:06 pm | निरन्जनदास

जनातलं ... मनातलं मध्ये माझे पहिले पत्र तुमच्या वाचनात आले नाही, असे त्याचा अर्थ !
सोमवारपासून मी तत्त्वज्ञानाचा परिचय देत आहे. दर सोमवारी एक लेख.
मग यावर चर्चा, वाद, संवाद, दे दणादण, घे खणाखण ... इत्यादी.
आपले बहुमोल मत ... ! ?

मुक्त विहारि's picture

20 Jun 2015 - 6:16 pm | मुक्त विहारि

मग त्यात आम्हाला अजिबात रस नाही.

आमच्या बाबांचे तत्वज्ञानावर खूपच प्रभूत्व आहे आणि त्यांच्या सारखे "गुरु" मिळाल्यामुळे, आम्ही सुखी आहोत.

आजच त्यांचे "जीवनाविषयक तत्वज्ञान" ह्याचे प्रवचन ऐकून आलो.

निरन्जनदास's picture

21 Jun 2015 - 12:49 pm | निरन्जनदास

विहारी मित्रा,
रस नाही, असे म्हणू नका. आधी जरा चव तरी घ्या. रस घ्या आणि द्या .
नव्या पद्धतीने काही सांगू शकेन.
तुमच्या बाबांविषयी मला आदर आहेच. शिवाय तुमच्या सुखातही 'ययय' , सॉरी 'व्यत्यय' शब्द लिहिण्यात 'व्यत्यय' आल्यामुळे दिलगीर आहे! , अडसर आणण्याची माझी इच्छा नाही. तुम्ही सुखी राहाच. पण आमचंही वाचून तर पहा. मग ठरवा. चालेल?

अस्वस्थामा's picture

22 Jun 2015 - 7:06 am | अस्वस्थामा

निरन्जन काका, तुम्ही लई मज्जा आणणार बुवा..!!
(तेवढे रुसुन बसणे, "माझा (जालीय) अपमान झाला" वगैरे म्हणून दुखावून घेणे इ.इ. करणार नसाल तर तुम्ही पण इथे "नव्या" पद्धतीने बरेच काही शिकाल.. :) )
असो, नमनास रांजणभर तेल झाले आहे तेव्हा हाणा थाप ढोलकीवर आन हुन जावद्या..

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2015 - 8:00 am | अत्रुप्त आत्मा

=))
चला,नांदी झालि! ;-)

अरुण मनोहर's picture

21 Jun 2015 - 4:07 am | अरुण मनोहर

खूप महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तुम्ही. धन्यवाद! केशवसूत, गडकरी ह्यांचे अजरामर साहित्य पुन्हा पुन्हा वाचण्याची सोय झाली आहे. ही संकेतस्थळे निर्माण करणार्‍याने मराठी साहित्यावर उपकारच केले आहेत!

निरन्जनदास's picture

21 Jun 2015 - 12:50 pm | निरन्जनदास

धन्यवाद अरुण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2015 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

खूपच उपयोगी दुवे दिल्याबद्दल अनेक वाचक तुम्हाला नक्कीच दुवा देतील ! धन्यवाद !

निरन्जनदास's picture

21 Jun 2015 - 12:52 pm | निरन्जनदास

धन्यवाद सुहास,
नवे दुवे जोडले जाणे हीच समाजस्वास्थ्याची खूण आहे. आता, तुम्ही एक नवा दुवा लाभला, ही वाढच नव्हे का !

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2015 - 4:35 am | श्रीरंग_जोशी

या दुव्यांसाठी धन्यवाद.

अवांतरः मध्यंतरी एका कवितेच्या कवीचे नाव शोधताना ग्रंथालय.ऑर्ग या उपयुक्त संस्थळाचा शोध मला लागला. महाराष्ट्रातील अनेक ग्रंथालयांचे कॅटलॉग्ज यावर उपलब्ध आहेत. दुर्मिळ पुस्तकांचा शोध घेताना ही बाब खूप कामाची ठरू शकते.

त्याखेरीज काही मराठी साहित्यिकांच्या नावाने असलेली संस्थळे येथे देतो. बहुतांश लोकांना ठाऊक असतीलच पण कदाचित कुणाला प्रथमच ठाऊक होईल.

निरन्जनदास's picture

3 Jul 2015 - 11:04 pm | निरन्जनदास

श्रीरंगा
सॉरी बर का !
तुमचा हा प्रतिसाद वाचायचा राहून गले होता. सहज पुन्हा प्रतिक्रिया चाळत असताना इथे आलो.
तुमचे दुवे मी माझ्या फेसबुक वर शेअर केले आहेत.