✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पैसोबा पुराण

न
निमिष सोनार यांनी
Wed, 04/29/2015 - 11:01  ·  लेख
लेख
माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण- माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने! पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका. कारण त्यांनी तो मिळवण्यासाठी केलेली मेहेनत आपल्याला माहित नसते. आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच. त्याची चिंता आपण कर्मफल सिद्धांतावर सोडून द्यावी. अर्थात पैशांचे महत्व आहे आणि ते नाकारून चालणार नाही. तेव्हा पैशाला तुमचे गुलाम बनवा. पैशाचे गुलाम बनू नका. पैशाने पैसा वाढवा. कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्‍या मिळाल्या असत्या का? त्या उद्योगपतींनीही आणि सगळ्यांनीच जर हाच विचार केला असता की, "जास्त पैसा नाश करतो, चला आपण अल्पसमाधानी राहू आणि एखादा जाॅब शोधू" तर मग या जगात इतरांना नोकरी देणार्‍या कंपन्या कारखाने उभेच राहिले नसते. मेहेनत करा. पैसा कमवा. पैसा टिकवा. पैसा वाढवा. माणसे जोडा. माणसे टिकवा. पण पैशाच्या प्रभावाने नव्हे तर चांगल्या स्वभावाने! पाच हजार रूपये जेवढे महत्वाचे तेवढेच पाच पैसे सुध्दा महत्त्वाचे हे जो जाणतो तोच खरे पैशाचे मोल जाणतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की शाही घराणे, राज घराणे यांना वारसा हक्काने पैसा मिळतो पण त्यांना तो टिकवता आला नाही. उलट तो विकून खाल्ला गेला. पैसा टिकवणे आणि वाढवणे हे एक कौशल्य आहे. ते ज्या राजघराण्यांना जमलं त्यांची रया कधीच लयाला गेली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला जर आपण अशी दूषणे देत असू की "याच्या लेखी पैसाच सर्वकाही आहे" तर त्याच न्यायानूसार आपण सुद्धा दोषी ठरतो कारण "फक्त पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला वाईट समजतो" म्हणजेच त्या व्यक्तीशी असलेल्या मैत्री अथवा नात्याला आपण सुद्धा फक्त पैश्यांपुरते महत्व देतो आहे असा त्याचा अर्थ होतो, नाही का? हे जर खरे असेल तर माणसे जोडण्यामागे स्वार्थ असतो हे सिद्ध होते. महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला? पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
22189 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

धन्यस!!

मोहनराव
Wed, 04/29/2015 - 19:00 नवीन
धन्यस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आणलेत का काजू? कुठे ठेवलेत?

निमिष सोनार
गुरुवार, 04/30/2015 - 13:42 नवीन
द्या सगळ्यांना!
  • Log in or register to post comments

काजू कविता

निमिष सोनार
गुरुवार, 04/30/2015 - 13:48 नवीन
कुठे आहे तराजू आणा सगळे काजू आपण ते मोजू
  • Log in or register to post comments

आणि तव्यावर

निमिष सोनार
गुरुवार, 04/30/2015 - 13:48 नवीन
भाजू
  • Log in or register to post comments

काजू कविता

निमिष सोनार
गुरुवार, 04/30/2015 - 14:48 नवीन
---------------- कुठे तराजू आणा काजू आपण मोजू तव्यावर भाजू नका लाजू खाऊन माजू पाणी पाजू -----------------
  • Log in or register to post comments

सगळे जण लेखाला विसंगत प्रतिक्रिया देतात म्हणून...

निमिष सोनार
गुरुवार, 04/30/2015 - 14:53 नवीन
... मी पण ठरवलं की विसंगर पीजे कविता टाकू आणि ती वाचून तुम्हाला कसा त्रास होतो ते पाहू!
  • Log in or register to post comments

अहो काका

पैसा
गुरुवार, 04/30/2015 - 16:10 नवीन
गृहपाठ म्हणून मिपाच्या पानावरचे सगळे धागे वाचा आणि एकेक प्रतिक्रिया देऊन या बघू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

सगळे जण लेखाला विसंगत प्रतिक्रिया देतात म्हणून...

होबासराव
गुरुवार, 04/30/2015 - 14:59 नवीन
उगी उगी बाळा... रडु नकोस... तो बघ तुझा मित्र पप्पु आला..
  • Log in or register to post comments

प्रबोधन चांगले आहे.पैसा

नूतन सावंत
गुरुवार, 04/30/2015 - 16:04 नवीन
प्रबोधन चांगले आहे.पैसा पुराराणाचे पैसाताईचे पुराण कधी झाले हे समजले सुद्धा नाही.हलके घ्या हो पैसाताई.
  • Log in or register to post comments

ट्यार्पी!

पैसा
गुरुवार, 04/30/2015 - 16:12 नवीन
ट्यार्पी मंगताय! तसेही माझ्या आयडीवरून आलेले प्रतिसाद अवांतर म्हणता येणार नाहीत! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!! :- श्री श्री निसो

होबासराव
गुरुवार, 04/30/2015 - 16:09 नवीन
कर्म लेखकाचे, दोष "प्रतिसादका ला" ये ना चॉलबे.
  • Log in or register to post comments

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!! :- श्री श्री निसो

होबासराव
गुरुवार, 04/30/2015 - 16:17 नवीन
अति-वैचारीक** लेखनात वाचकाचा बळी !! ** चिंता वाहतो विश्वाचि
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा